राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, October 18, 2024

देशात ज्ञानी पिढी घडविण्यासाठी घराघरात ग्रंथ हवेतच ! - प्रा. डॉ. सुभाष वाघमारे


उंब्रज - सातारा -/ प्रतिनिधी -
‘ बहुश्रुत वाचन केल्यानेच माणूस ज्ञानी होत असतो. आपल्या प्रत्येक घरात जीवनाला विविध प्रकारचे ज्ञान देणारे ग्रंथ असायला हवेत. घर हे सदाचारी व ज्ञानसमृद्ध व्हायचे असेल तर वाचन संस्कृती घरात रुजवली पाहिजे. वाचन व्यासंगानेच जगात विविध क्षेत्रातील विविध विद्वान, संशोधक तयार झाले. त्यांच्या ज्ञानाने माणसाला यथार्थ जग समजू लागले. न्याय व अन्याय कळू लागला. महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर , महात्मा गांधी इत्यादींनी देखील खूप वाचन करून देशासाठी योगदान दिले आहे. जगात आपल्या देशाचा दर्जा उंचावला आहे. वाचनाने व्यक्तिमत्व बहुश्रुत बनते, वाचन हे जीवनाला मार्गदर्शन करीत असते. वाचन सतत केल्याने माणूस विवेकी होत जातो.आपल्या घरात कितीही सोनेनाणे असले तरी ज्ञानासाठी ग्रंथाचे कपाट असले तरच मनाची व घराची श्रीमंती वाढते असे मत त्यांनी व्यक्त केले. देशात ज्ञानी पिढी घडविण्यासाठी घराघरात ग्रंथ हवेतच. ग्रंथ वारसा असलेली सर्जनशील माणसे आपण तयार केली पाहिजेत. अनेकांना लिहिते , वाचते केले पाहिजे असे विचार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. मंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘अभिजात मराठी भाषा व वाचन संस्कृती’ या विषयावर ते बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कांबळे होते. 
  वाचन करण्याविषयी आवाहन करताना ते पुढे म्हणाले की‘ देह जगविण्यासाठी जशी अन्नाची गरज असते तसे मनाचे पोषण होण्यासाठी ग्रंथाची व अनुभवाची गरज असते. ग्रंथ आपल्याशी हितगुज करून सुख दुःख सांगत असतात. आपल्याला जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करीत असतात. व्याकूळ झालेल्या मनाला धीर देतात. तर दुःखी मनाला आधार देतात. ग्रंथ मित्र असतात तसे आपले सेवक असतात. ग्रंथ कधी आदेश देत असतात तर कधी सदुपदेश करीत असतात. ग्रंथ निष्ठावंत असतात. ते आपल्याला अनेक रस प्यायला देतात.आपल्या बालपणात ,तारुण्यात, वृद्धापकाळात देखील आपले सोबती असतात. आपली प्रिय माणसे आपल्याला सोडून गेली तरीही ग्रंथ धीराने राहण्याची हिम्मत देतात आणि शांती आणि आनंदाच्या वाटा सांगत राहतात.आज मात्र ग्रंथ सोडून माणसे मोबाईलमध्ये अडकली आहेत. एकट्याने पुस्तक वाचून जग समजून घेण्याचा आनंद खूप मोठा असतो,म्हणून प्रत्येकाने नियमित दररोज एक तास तरी अवांतर वाचन केले पाहिजे. माणसे मटण खाण्यासाठी भरपूर खर्च करतात पण वर्तमान घडामोडी जाणून घेण्यासाठी वर्तमानपत्र विकत घेत नाहीत अद्ययावत माहितीसाठी नियमित वर्तमानपत्र वाचले पाहिजे.खरोखर अवांतर वाचनाने माणसाचे दृष्टीकोन उदात्त होतात.भाषा हे मन भावना व विचाराचे स्पंदन आहे .मुळात कोणत्याही भाषेची किंमत कमी जास्त नसते. प्रत्येक भाषेला तिची स्वतःची किंमत असते. व्यवहारात,व्यापारात,ज्ञान व्यवहारात त्या भाषेचा वापर जास्त होत गेला तर तिची प्रगती होते. मराठी माणूस आपल्या कर्तृत्वाने जगभर नाव कमवेल आणि भाषेशी निष्ठा ठेवून तिचा विस्तार करेल तर मराठीचा वापर वाढत जाईल. पण आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषेची देवाण घेवाण मोठ्या प्रमाणात होत आहे.इतर भाषेतील ग्रंथ मराठी भाषेत भाषांतरीत झाल्याने जगातले विविध प्रकारचे ज्ञान आपल्याला मिळत आहे. जगातील विविध माणसांची संस्कृती,अनुभव काय आहेत हे जाणून घेण्याची जिज्ञासा आता वाढलेली आहे. मराठीतील ग्रंथ इतर भाषेत अनुवादित होत आहेत त्यामुळे या पुढच्या काळात मराठीच्या वृद्धीबरोबर जगातल्या अनेकविध भाषा शिकल्या पाहिजेत. 
    अभिजात भाषा निवडीच्या पद्धतीविषयी सविस्तर माहिती देऊन ते पुढे म्हणाले की, ‘ पूर्वी तमिळ,संस्कृत,कन्नड ,तेलगु,मल्ल्याळम,ओडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला . अलीकडे ३ ऑक्टोबरला मराठी , पाली, प्राकृत ,असामी,बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यासाठी रंगनाथ पठारे समितीने जे परिश्रम घेतले ,आणि अनेक साहित्यिक व मराठी भाषिकांनी यासाठी परिश्रम घेतले त्यांचे कृतज्ञ आपण राहिले पाहिजे असेही ते म्हणाले.
         अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.संजय कांबळे म्हणाले की ‘ विद्यार्थ्यांनी कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक वाचले पाहिजे . आपल्या ग्रंथालयात, वैचारिक, ललित चरित्रात्मक अशी अनेक चांगली पुस्तके असून विद्यार्थ्यांनी ती मनापासून वाचली पाहिजेत.जसे शिक्षक विद्यार्थ्यांना मूल्य शिकवतात तसे ग्रंथ न रागावता आपल्याला जागृत करतात. मूल्य विवेक शिकवतात. कार्य संस्कृती जशी महत्वाची तशी ज्ञानासाठी वाचन संस्कृती महाविद्यालयात तयार झाली पाहिजे. प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी वाचन ,लेखन या बाबतीत सातत्य ठेवले असून विचारपूर्वक कृती करून ते समाजाचे हित करणारे ते मानवतावादी लेखक असल्याचे त्यांनी सांगितले.लंडन आणि मॉरिशस या देशांना भेटी देऊन त्यांनी तेथील संस्कृती व शिक्षणक्षेत्राची माहिती जाणून घेतल्याबद्दल त्यांनी प्रा.वाघमारे यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात ग्रंथालय विभागाने ‘चांगले वाचक’ म्हणून मराठीचे प्राध्यापक प्रा.घनश्याम गिरी यांची निवड केली. व त्यांचा या कार्यक्रमात ग्रंथ व गुलाबपुष्प देऊन प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
 या कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल प्रा.विकास बर्गे यांनी केले.तर आभार प्रा. सौ.सुवर्णा मूळगांवकर यांनी मानले या कार्यक्रमास प्रा.डॉ.संभाजी गावडे, प्रा. डॉ.अनिल उबाळे,प्रा.डॉ. वंदना मोहिते, प्रा.आर.एस. जाधव,प्रा.प्राजक्ता पाटणे, प्रा.धनाजी सावंत,प्रा. कुलकर्णी, श्रीमती नीता मोहिते , महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते. 

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस 
श्रीरामपूर,९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

 
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने प्रा.डॉ.सुभाष वाघमारे युवकांना संदेश दिला.‘ वाचन संस्कृती रुजण्यासाठी एकमेकाला ग्रंथ भेट द्यायला हवेत. वाढदिवशी ज्ञान किती वाढले,माणसे किती जोडली. स्व हिताचे व समाज हिताचे काम किती केले याचा विचार करायला हवा. युवकांनी कोणत्याही विध्वंसक कार्यात सहभागी न होता घराचे व समाजाचे चांगले व्हावे अशाच कामात सहभागी व्हावे. विषमता असलेल्या समाजात समता निर्माण करण्यासाठी बंधुभाव जोपासला पाहिजे आणि माणसे तोडण्याऐवजी माणसे जोडण्याचे काम केले पाहिजे. जगात अनेक प्रकारच्या श्रद्धा निर्माण झाल्या असल्यातरी आपल्याला माणसातच जीवन जगायचे आहे . त्यामुळे स्वतःस व इतरास सुखशांती मिळावी म्हणून आपण कर्म करीत रहायला हवे, म्हणून माणसात रहा. आळशी न राहता उत्साही रहा, कष्टाळू व प्रयत्नवादी व्हा. स्वावलंबी व्हा. जीवनात सदाचारी व्हा, निर्व्यसनी व्हा ,शीलवान व्हा,समतावादी व्हा.मैत्री भावना प्रसार करा. जीवन पुन्हा नाही त्यामुळे वेळेचा सदुपयोग करून वाईट कामे न करता चांगलीच कामे करा असे ते म्हणाले. त्यांनी आपले भाषण संवाद पद्धतीने केल्याने विद्यार्थी प्रश्नोत्तरात सहभागी होत समरस झाले होते. या वेळी ग्रंथपाल प्रा. विकास बर्गे यांनी मी पुस्तक बोलतोय या आशयाची कविता सादर केली*
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

अग्राहाचे निमंत्रण साईगंगा न्यूज पोर्टल अनावरण सोहळा



मा.महोदय,महोदया यांसी स.न.वि.वि.
स्वाभिमानी संपादक सेवा संघ संचलित,संपादक संघ. ओआरजी (sampadak sangh.org) च्या माध्यमातून,मिरपूर लोहारे ता.संगमनेर येथील ज्येष्ठ पत्रकार *रमेश भागवत कापकर* संपादित *साई गंगा न्यूज पोर्टल* चे स्वाभिमानी संपादक सेवा संघ संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी श्रीरामपूर येथील समता कार्यालयात सकाळी ठिक ११.०० वाजता अनावरण आणी लोकार्पण होणार आहे.तरी या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.

=================================
-----------------------------------------------
आपला स्नेहांकित
रमेश भागवत कापकर 
संपादक: साप्ता.साईगंगा
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
(समन्वयक: संगमनेर तालुका)
-----------------------------------------------
=================================

Thursday, October 17, 2024

स्व.पत्रकार लक्ष्मण पवार यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा आधार *पत्रकार संघाच्यावतीने मदतीचा धनादेश**किराणा व शालेय साहित्याचे वितरण

- ठाणे - प्रतिनिधी -/ वार्ता -
ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील मूळ रहिवासी आणि सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेले पत्रकार स्वर्गीय लक्ष्मण पवार यांचे नुकतेच हृदयविकाराच्या त्रिव झटक्याने दुर्दैवी निधन झाले. पवार यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांच्या राहत्या घराचे वर्णन केल्यास, ते पत्र्याच्या घरात राहत होते, हे त्यांच्या कठीण परिस्थितीचे प्रतिक होते.

लक्ष्मण पवार हे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सदस्य नसतानाही, त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांना समजतात त्यांनी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरी चे संपादक डॉ.विश्वासराव आरोटे यांना त्यांच्या परिवाराची भेट घेऊन आर्थिक मदत करण्याचे सांगितले. यानंतर, त्यांनी संघाच्या वतीने पवार यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय घेतला.
डॉ. विश्वासराव आरोटे आणि पत्रकार संघाचे काही पदाधिकारी पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी डोंबिवली येथे जाऊन पवार कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले आणि त्यांना मदतीचा धनादेश व किराणा साहित्य आणि मुलांच्या शालेय साहित्याचे वाटप केले. 
या प्रसंगी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण, पत्रकार विष्णू बुरे आदि उपस्थित होते.
कै. लक्ष्मण पवार यांच्या कुटुंबाला या मदतीमुळे काहीसा दिलासा मिळाला असून पत्रकार संघाच्या या कृतीने सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्तम उदाहरण देखील घालून दिले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

सामाजिक एकता और समरसता के प्रतीक हैं सार्वजनिक उत्सव ऐक्यं बलं समाजस्य तद्भावे सदुर्बल तस्मात् ऐक्यं प्रशंसन्ति दृष्टं राष्ट्र हितैशिन


हमारा भारत अपनी सांस्कृतिक धरोहर के लिए पूरे विश्व में अपनी अलग पहचान रखता है हमारी संस्कृति हमें अपनी जड़ों से जोड़कर रखती है जिस कारण से हम अपने सभी तीज-त्यौहार को हर्ष और उल्लास के साथ मनाते हैं,और यही तीज-त्यौहार हमें आनंद के साथ ही सकारात्मक सोच बनाए रखने में मदद करते हैं। हर भारतीय परिवार में पीढ़ीयों से चली आ रही परंपरा के अनुरूप अपने धार्मिक उत्सव को मनाया जाता है जो आने वाली पीढ़ियों को भी अपने रीति-रिवाजो से परिचय करवाती साथ ही उस रीति रिवाज को क्यों और किस वजह से मनाया जाता है उनकी बारीकियां भी सिखाती है पीढ़ी दर पीढ़ी चलने वाली इसी परंपरा के कारण ही हमारी सभ्यता आज भी उसी रूप में कायम है जिसकी कल्पना हमारे पूर्वजों ने की थी सनातन धर्म की एक खूबसूरती यह भी है कि वहां समय के अनुरूप खुद को ढाल लेता है या नए शब्दों में कहा जाए तो अपडेट होता रहा है। सार्वजनिक उत्सवों में गणेश उत्सव,दुर्गा उत्सव, होली उत्सव और भी इसी प्रकार के कई उत्सव है जो हमारे समाज को एक दूसरे के साथ घुलने-मिलने का मौका देते हैं और उनमें आपसी भाईचारा और प्रेम बनाकर रखते हैं हर त्यौहार को हम लोग एक नए उत्साह के साथ मना कर अपने जीवन में सकारात्मक ऊर्जा को बढ़ाते हैं जो हमें हर परिस्थिति से लड़ने की शक्ति देता है और हमारा मनोबल बनाए रखता है। सार्वजनिक उत्सव के अनेक महत्व हैं यही उत्सव हमारी सामाजिक एकता को बनाए रखने में अति महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं सामाजिक समरसता के लिए भी इन उत्सवों का अपना एक विशेष योगदान है इन उत्सवों में ही हम जाति ऊंच-नीच अमीरी गरीबी छोटा बड़ा हर बात को पीछे छोड़कर सब एक दूसरे के साथ घुल-मिल कर उत्सव को मनाकर सामाजिक एकता की मजबूत कड़ी को जोड़े रखते हैं। समरसता के लिए भी सार्वजनिक उत्सव अपना विशेष महत्व रखता है किसी भी उत्सव के लिए लोगों का एक दूसरे के साथ घुल-मिल कर रहना आवश्यक है, भंडारे के रूप में एक साथ बैठकर भोजन करना इन सारी बातों से ही समरसता फलती और फूलती है जो हमारे समाज और देश के लिए जरूरी है और सभी में आपसी प्रेम की भावना को जागृत रखती, आज के बदलते आधुनिक युग में सार्वजनिक उत्सवों का महत्व और भी महत्वपूर्ण हो जाता है क्योंकि आज भागती-दौड़ती जिंदगी में हम कई ऐसी महत्वपूर्ण भावनाओं से दूर होते जा रहे हैं जो परिवार और समाज के लिए बहुत जरूरी है, वर्तमान समय में एकल परिवार की संख्या बढ़ती जा रही है जिस वजह से कुछ परिवारों में अपनी संस्कृति के प्रति लापरवाही भी बढ़ती जा रही है जिस कारण से आने वाली पीढ़ियों को अपने संस्कारों की जानकारियों का अभाव होता है और इन अभाव का ही कुछ अधर्मी फायदा उठाकर उन्हें गलत रास्ते पर ले जा रहे हैं, उनकी इन कोशिशों को नाकाम करने में भी सार्वजनिक उत्सवों की अपनी एक महत्वपूर्ण भूमिका है हर क्षेत्र में अपने समर्थ अनुसार सार्वजनिक उत्सव की व्यवस्था की जाती है जिसमें उसे क्षेत्र के लगभग सारे लोग सम्मिलित होकर उस उत्सव का आनंद तो लेते ही हैं साथ ही अपनी परंपराओं से भी जुड़े रहते हैं और सभी का एक दूसरे से संपर्क बने रहता है जो उन्हें सुख दुख में साथ देने के लिए भी प्रेरित करता हैं। सार्वजनिक उत्सवों के अनेकों फायदे हैं वर्तमान में युवा पीढ़ी में सार्वजनिक उत्सवों के द्वारा ही संगठित होकर काम करने की भावना को जगाने में भी सार्वजनिक उत्सव अपनी महत्वपूर्ण भूमिका अदा करते हैं। 
संगठित होना - युवाओं द्वारा छोटी-छोटी टोली बनाकर सार्वजनिक उत्सव के लिए घर-घर जाकर चंदा इकट्ठा कर उस धन संग्रह करते हैं, जिससे सभी लोगों में हमारा भी योगदान है यह भावना बनी रहती है। 
प्रबंधन - यूवा टोली सामूहिक रूप से आयोजन के प्रबंध के लिए योजना बनाकर उसे क्रियान्वित करने की रूपरेखा बनाते हैं जो उनमें कार्य को योजनावत तरीके से करने की कुशलता का विकास करती है। 
संस्कृति से जुड़ाव - सार्वजनिक उत्सव के द्वारा ही हम अपने रीति-रिवाजों और संस्कृति को दोहराते रहते हैं जिनसे आने वाली पीढ़ियों का निरंतर अभ्यास होता रहता है और उनके प्रति उनका विश्वास बढ़ता है।
सांस्कृतिक कार्यक्रम - छोटी-छोटी झांकियों पर नन्हे मुन्ने बच्चों द्वारा सांस्कृतिक कार्यक्रम में भाग लेकर अपनी प्रतिभा का प्रदर्शन किया जाता हैं जिससे उनकी प्रतिभा का निखार होता है और आत्मविश्वास की बढ़ोत्तरी होती है,
भंडारा - ऐसे अनेक अवसर आते हैं जिसमे भंडारे का आयोजन किया जाता है साथ में भोजन करने से लोगों में एक दूसरे के प्रति प्रेम भाव बढ़ता है और गरीब अमीर जात-पात ऊंच-नीच की भावनाओं को दर किनार कर समरसता की भावना जागृत रहती है। 
लोकमान्य बाल गंगाधर तिलक ने 1893 में गणेश उत्सव की शुरुआत की थी तिलक जी का मकसद सभी लोगों को एक मंच पर लाकर सामाजिक एकता को बढ़ाना था, धार्मिक आयोजन के द्वारा राष्ट्रीयता की भावना को जागृत करना था। भारत वर्तमान समय में कुछ राजनीतिक लोगों ने इन आयोजन का राजनीतिक लाभ के लिए ज्यादा उपयोग किया जाता है और कई जगह तो अपनी वर्चस्व की लड़ाई के रूप में भी इसे प्रसारित किया जाता है जो इन आयोजन की मूल भावना को भारी नुकसान पहुंचा कर एक दूसरे के प्रति बैर रखना की भावना ज्यादा बनती जा रही है इन लोगों से सावधान रहकर हमें अपनी मूल भावनाओं पर रहकर सार्वजनिक उत्सव को इस भावना के साथ मनाना चाहिए जिस उद्देश्य के लिए इन उत्सवों का उदय हुआ था, कई जगह देखा गया है कि सार्वजनिक उत्सव अपने महत्व को भूल कर भव्यता पर ज्यादा ध्यान देते हैं और इन उत्सवों का व्यापारिक दृष्टिकोण से ज्यादा लाभ कमाना ही उनका मकसद बन गया है। पर हमें सावधानी के साथ सार्वजनिक उत्सव की मूल भावनाओं को बनाए रखना है जो हमारी अखंडता के लिए अति आवश्यक है राष्ट्रीय प्रेम सामाजिक एकता समरसता इन उत्सवों की मूल भावना रही है। भारत को एक सूत्र में बांधने का काम भी इन सार्वजनिक उत्सव के द्वारा ही किया जा सकता है जो हमें राष्ट्रीयता की भावना को जागृत करके राष्ट्र के प्रति अपने कर्तव्यों का निर्वहन करने की भी प्रेरणा देते हैं।

=================================
-----------------------------------------------
*लेखक*✍️✅🇮🇳...
*राजकुमार बरूआ* 
भोपाल - मध्य प्रदेश
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
मध्य प्रदेश प्रभारी 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*लेख विशेष सहयोग*💐✅🇮🇳...
चंद्रकांत सी.पूजारी
महुवा सुरत गुजरात 
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
गुजरात प्रदेश प्रभारी 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 09561174111
-----------------------------------------------
=================================




विद्यानिकेतनच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा स्पर्धेत जिंकली अनेकांची मने


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता 
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,स्टेट बोर्डमध्ये नुकतीच वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेत इ.पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी स्पर्धेचे खास आकर्षण ठरलेल्या यशप्राप्त चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित प्रेक्षक- मान्यवरांची मने जिंकली. 
स्पर्धेतील विद्यार्थ्यांमधून अनुक्रमे इ.पहिली (लोटस) - विहान सोनवणे, विहान धुवावीया,स्वरुप पटारे
इ.पहिली (रोझ) - काव्या परदेशी, नबीहा सय्यद, श्राव्या मेटे,इ.दुसरी (लोटस) -अरहान पोपटिया, मेघना आहेर, श्रीराज खरात, इ.दुसरी (रोझ)
शरण्या मंधारे,श्रेया गौड, 
ओंकार गधे,इ.तिसरी (लोटस) -विश्वजीत मोरगे, स्वरांगी भवार,सोफिया पठाण,इ.तिसरी (रोझ)-
स्वरा परदेशी, अरोही त्रिभुवन, पियुष बिडलान हे विद्यार्थी यशस्वी झाले.

          स्पर्धेत विद्यार्थ्यांना वर्गनिहाय नेचर,कार्टून,
सुपरहिरो, इंडियन कल्चर या थीम देण्यात आल्या होत्या.यावेळी परीक्षक म्हणून प्रतिमा किशोर साळुंके,अश्विनी कांबळे, स्विटी प्रवीण पारख यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी वर्गशिक्षिका योगिता गवारे,सोनिका शिरसाट, साक्षी भणगे, ज्योती गाढे,ज्योती खंडागळे, प्रीती नाणेकर,कोमल पारखे, सुप्रिया बाबरस, राजश्री व्हटकर,सोनाली म्हसे,गायत्री तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले.
          यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके,व्हा. चेअरमन प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ.राजीव शिंदे, सहसचिव डॉ.अर्चना शेळके, प्राचार्य विनोद रोहमारे, उपप्राचार्या भारती कुदळे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले. 
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन ज्योती खंडागळे यांनी केले,तर आभार प्रीती नाणेकर यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
शंकर बाहूले (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


खंडाळा येथे श्री दुर्गा माता दौड मोठ्या उत्साहात साजरी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे "श्री दुर्गा माता दौड" श्री शिव हिंदुस्थान प्रतिष्ठान खंडाळा यांच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरी झाली. शेवटच्या दिवशी "श्री दुर्गा माता दौड" कार्यक्रमाचा समारोप शानदार सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला.खंडाळा गावात श्री दुर्गामाता दौड कार्यक्रम श्रीरामपूर विभाग अंतर्गत आयोजित करण्यात आली होती.
नवरात्री कालावधीत सलग ९ दिवस पहाटे ५:३० वा खंडाळा गावी प्रेरणा मंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले.श्री दुर्गामाता,श्री तुळजाभवानी माता,श्री जगदंबा माता,श्री भारत माता आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जय जयकार करत राष्ट्रभक्ती गीतांचे गायन करीत संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून गावाचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यांचे दर्शन घेऊन जगदंबा मातेच्या चरणी भारत मातेच्या अंतर बाह्य शत्रूंचा नाश करण्याची शक्ती अंगी यावी अशी विनवणी, प्रार्थना करण्यात आली.श्री दुर्गा माता दौड " चे ठिकठिकाणी,जागोजागी अनेक माता-भगिनी कडून मनोभावे पूजन करण्यात आले. "श्री दुर्गामाता दौड" कार्यक्रमात अनेक नागरिक स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस,
 श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

पत्रकार संघाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय बॅग व शालेय साहित्याचे वितरण


- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय, प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोझिंरा गावातील कोकणेवाडी, कारवाडी आणि गावठाण जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅग व शालेय साहित्य वितरण करण्यात आले. 
या विभागातील राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात माजी आ. डॉ. सुधीर तांबे,आ. सत्यजित तांबे यांचे विश्वसनीय समर्थक शुभम घुले यांच्याकडून सदरील भागातील शाळेंना मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती ती आज पूर्ण करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे, संगमनेर तालुकाध्यक्ष संजय गोपाळे,ग्रामपंचायत पिंपळगाव कोझींरा यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
याप्रसंगी पिंपळगाव कोंझीरा गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सोनाली ताई करपे, उपसरपंच संगम आहेर, शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे सर तथा सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद उपस्थित होते.
याप्रसंगी ग्रामस्थ बादशाह पाटील वाळुंज, रोहिदास पाटील मोरे,संदीप करपे, दत्तात्रय कडलक, संजय खर्डे, बाबासाहेब आहेर तथा इतर नागरिक उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================