राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, October 17, 2024

पत्रकार संघाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय बॅग व शालेय साहित्याचे वितरण


- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय, प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोझिंरा गावातील कोकणेवाडी, कारवाडी आणि गावठाण जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅग व शालेय साहित्य वितरण करण्यात आले. 
या विभागातील राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात माजी आ. डॉ. सुधीर तांबे,आ. सत्यजित तांबे यांचे विश्वसनीय समर्थक शुभम घुले यांच्याकडून सदरील भागातील शाळेंना मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती ती आज पूर्ण करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे, संगमनेर तालुकाध्यक्ष संजय गोपाळे,ग्रामपंचायत पिंपळगाव कोझींरा यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
याप्रसंगी पिंपळगाव कोंझीरा गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सोनाली ताई करपे, उपसरपंच संगम आहेर, शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे सर तथा सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद उपस्थित होते.
याप्रसंगी ग्रामस्थ बादशाह पाटील वाळुंज, रोहिदास पाटील मोरे,संदीप करपे, दत्तात्रय कडलक, संजय खर्डे, बाबासाहेब आहेर तथा इतर नागरिक उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================



No comments:

Post a Comment