राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, October 16, 2024

वडाळागाव मध्ये जुलुस - ए - गौसिया मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न


- माजिद खान - नाशिक -/ वार्ता -
नाशिक शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ग्यारवी शरीफ निमित्ताने
वडाळागाव मध्ये जुलुस - ए - गौसीया मिरवणुक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सदरील जुलुस ए गौसिया मिरवणूकीची मौलाना जुनेद आलम साहेब यांच्या मार्गदर्शनाने सकाळी गौसिया मस्जिद पाठीमागील बाजुने सुरुवात करण्यात येवून पुढे,आलीशान सोसायटी, मदार नगर, तैबा नगर, सल्ली पाॅईंट, सादिक नगर, महेबुब नगर या मार्गाने शेवटी ह.चांद शहा वली दर्गाह येथे सांगता झाली.
या वेळी मौलाना जुनेद आलम साहेब, मौलाना असजद रजा, मौलाना अब्दुल रहेमान यासीन, असजद रजा, अमजद मौलाना, इंदिरा नगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके, सहा.पो.निरीक्षक अंकोलिकर, पोलिस उपनिरीक्षक धनराज पाटील, संतोष फुंदे,वाल्मीक चौधरी, गोपनीय अमोल मानकर, जाधव साहेब, फरीद शेख, शेरू शाह, असद सय्यद, असिफ शेख, अल्ताफ सय्यद, इक्बाल पटेल, रईस शेख, रफिक शेख,असिफ शेख आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment