- शिर्डी - प्रतिनिधी -/ वार्ता -
ना.राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना प्रणित जनेश्वर प्रतिष्ठाण रिक्षा संघटना साईआश्रम एक हजार रुम रिक्षा संघटनेतील सभासदांना दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम महंत काशिकानंदजी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला.यावेळी महंत काशिकानंदजी महाराज यांनी रिक्षा संघटनेच्या सामाजिक कार्य व उपक्रमांचे कौतुक करत श्री साईबाबांच्या पवित्र भूमित रिक्षा चालक हा खरोखर श्रमिक वर्ग असुन येणाऱ्या साईभक्तांना प्रामाणिक सेवा देत असल्याचे सांगितले. तर दिवाळी हा आनंदाचा सण आणि या सणानिमित्त रिक्षा चालक , अनाथालय व गरजवंताना दिवाळी फराळ वाटप करुन संघटनेचे संस्थापक प्रशांत कोते व अध्यक्ष रविंद्र शेळके हे साईबाबांच्या शिकवणीचे पालन करत असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी महंत काशिकानंदजी महाराज यांनी उपस्थिती देऊन त्यांच्या शुभहस्ते हा दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला याचे समाधान व्यक्त करत जनेश्वर प्रतिष्ठाण हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेत असुन याकामी असंख्य कार्येकर्त्यांचे सहकार्य लाभत असल्याचे संस्थापक प्रशांत कोते यांनी स्पष्ट केले.तर साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असे म्हणत संघटनेचे अध्यक्ष रविंद्र शेळके यांनी आज महंत काशिकानंदजी महाराज यांच्या शुभहस्ते दिवाळी फराळ वाटप झाले असल्याचे समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी जनेश्वर रिक्षा संघटनेचे संस्थापक प्रशांत कोते , अध्यक्ष रविंद्र शेळके , संतोष जेजुरकर , शंकर आवारे , विशाल दहीवाळ , नासीर पठाण , संतोष आवारे , अवी जेजुरकर , अमोल वाडगे , गोकुळ बारगळ , प्रमोद कदम , जाकीर पठाण , रविंद्र जगताप , दिपक वाघ , बाळासाहेब शिंदे , दिपक मगर , मनोज उदावंत , साईराम सोळसे , जयंत शेलार , मछ्चिंद्र तांदळे , प्रवीण डेंगळे आदीसह सदस्य उपस्थित होते.
<^><७><७><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र बनकर - शिर्डी
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±