राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, November 5, 2024

सातपुर पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल जाळणारा इसम ताब्यात गुन्हेशाखा युनिट क्र. २ ची कामगिरी


- माजीद - खान -/ नाशिक -
नाशिक पोलिसांनी गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी कंबर कसली असुन विविध गुन्ह्यातील फरार आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना तुरुंगात पाठवले जात आहे.
त्यात सातपूर पोलिस ठाणे हद्दीत मोटार सायकल जाळणाऱ्या आरोपीस पोलिसांनी आज जेरबंद केले आहे.
मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे. श्री. प्रशांत बच्छाव, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे. श्री. संदिप मिटके, नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील विविध गुन्ह्यातील पाहीजे / फरार आरोपींचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या.
त्यानुसार आज दिनांक. ०५/११/२०२४ रोजी सहा. पो. उ. नि. बाळु शेळके यांना गोपनीय बातमी मिळाली की, सातपुर पोलीस ठाणे कडील गुरनं. २८७/२०२४ भा. न्याय. संहीता कलम-३२६ (फ) प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी नामे कुणाल कैलास गायखे वय-२३ वर्ष, रा. पळसे, ता. जि. नाशिक हा शिवाजी पुतळा, नाशिकरोड येथे असल्या बाबत माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. उ. नि. बाळु शेळके, शंकर काळे, विलास गांगुर्डे, पो. हवा. प्रकाश भालेराव अशांनी त्यास ताब्यात घेवुन पुढील कारवाई कामी सातपुर पोलीस ठाणेत हजर केले.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे. श्री. प्रशांत बच्छाव, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे. श्री. संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विद्यासागर श्रीमनवार सहा. पो. उ. नि. बाळु शेळके, शंकर काळे विलास गांगुर्डे पो. हवा. प्रकाश भालेराव, प्रकाश महाजन यांनी केलेली आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

डॉ.कैलास पवार हे महांकाळवाडगाव चे भूषण- संत श्रद्धानंदजी महाराज


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
भूमी फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष आदर्श तरुण समाजसेवक डॉ. कैलास पवार हे अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्र , सामाजिक क्षेत्र, ग्रामीण भाग विकास ,विधवा निराधार महिला,अनाथ निराधार मुलं,साहित्य संमेलन ,राज्यात असंख्य ठिकाणी आपत्ती काळात अत्यावश्यक मदत, अशा असंख्य विषयावर राज्यस्तरीय स्वरूपाचे कार्य करीत आहे.ही संस्था आज असंख्य देशासोबत जोडली गेली आहे हे निश्चित कौतुकास्पद आणि गौरवास्पद बाब आहे.डॉ. कैलास पवार यांना नुकतीच राष्ट्रपिता महात्मा गांधी सेवा समिती द्वारा वर्धा येथे महात्मा गांधी सेवाग्राम आश्रमात आंतरराष्ट्रीय मानद डॉक्टर पदवी प्राप्त झाल्याने महांकाळवाडगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सोहळा प्रसंगी महांकाळवाडगाव येथे आले असता कैलास पवार यांचा कमी वयात उत्कृष्ट कार्याचा आलेख हा निश्चित इतर तरुणांना आज दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर डॉ. कैलास पवार सारखे तरुण हे आज आमच्या गावाचे खरे भूषण आहे असे प्रतिपादन संतगड येथील श्रद्धांनंद महाराज यांनी व्यक्त केले.यावेळी अनेक नागरिकांनी आपली मनोगत व्यक्त केले.
झालेल्या सत्काराचे समाजसेवक डॉ.कैलास पवार व प्राध्यापिका अनिता ताई पवार यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले. तसेच
आपल्या आजी आणि वडिलांच्या प्रित्यर्थ संतगड विकास कामासाठी आर्थिक सहकार्य केले.यावेळी गोपीनाथ महाराज,नाथा आबा खुरुद,उपसरपंच कचरूभाऊ महांकाळे, सुखदेवआप्पा महांकाळे, राहुलभाऊ दातीर,सिकंदर भाई शेख,दत्तात्रयभाऊ चोरमल,अशोक अण्णा चोरमल,हरिभाऊ चोरमल, शंकर जाधव,पोपट शेख, गोरख जाधव,ज्ञानेश्वर मोरे,रामनाथ जाधव, कडूभाऊ पवार,रंभाजी महांकाळे,सोनवणे भाऊ, संदीप बडाख,मिठू बनगैया,पोपट बनगैया, नवनाथ दिघे,फकीरचंद चोरमळ,संजय भनगडे,बबन जाधव,मच्छिंद्र दिघे, पिंटूभाऊ खुरुद, महिलावर्ग आणि इतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

वृक्षसंवर्धन हा जगण्याचा ध्यास - प्रमोद मोरे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
वृक्षसंवर्धन आणि प्रदूषण निवारण हा माझ्या जगण्याचा ध्यास असून याचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे मत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी व्यक्त केले. श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील श्री खंडेश्वर माध्यमिक विद्यालयात मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
 वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे यांनी सुरू केलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यांमध्ये वर्षभर अनेक उपक्रम सुरू असतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सहसचिव श्री संजय गायकवाड यांनी केले. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील श्री खंडेश्वर माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमप्रसंगी प्रमोददादा मोरे यांनी सांगितले की, पर्यावरण हा प्रत्येकाच्या जगण्याचा भाग असून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने आपापल्या घराभोवती अथवा परिसरात वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमप्रसंगी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे पाईक व्हावेत. वृक्षसंवर्धन आणि प्रदूषण निवारण हा माझ्या जगण्याचा ध्यास असून याचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक श्री रवींद्र पवार, शिक्षक श्री देविदास खेडकर, श्री अमोल जाधव यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. आभार श्री संजय नेटके यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

बेलापूरात दिपावली सणानिमित्त 'एक पणती जवानांसाठी 'उपक्रम संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील बेलापूर येथील फ्रेंडस फाॕर एव्हर ग्रुप व समस्त ग्रामस्थ यांचेवतीने सालाबादप्रमाणे दिवाळीनिमित्त शहिद जवान,भारतीय सैनिक तसेच पोलिसांच्या सन्मानार्थ 'एक पणती जवानांसाठी'उपक्रम संपन्न झाला. बेलापूर-ऐनतपूर येथे गेल्या अकरा वर्षांपासून सदरचा उपक्रम राबविला जातो. सणवार विसरुन देशाचे जवान,पोलिस हे देशवासियांचे संरक्षण करीत असतात.दिवाळीसारखा महत्त्वाचा सण त्यांना त्यांचे कुटुंबासमवेत साजरा करता येत नाही.त्यांच्या या त्यागाच्या स्मरणार्थ पाडव्याच्या दिवशी पणत्या पेटवून जवान व पोलिसांचा सन्मान केला जातो. विजयस्तंभ चौकात फ्रेंडस फाॕर एव्हर ग्रुप तसेच बेलापूर-ऐनतपूर ग्रामस्थांच्या वतीने एक पणती जवानांसाठी कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी आजी माजी सैनिक,पोलिस बांधव तसेच ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

जिद्द आणि चिकाटी असली की यश प्राप्त होते - प्रा.डॉ. पवार


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
माणसाच्या मनात जिद्द आणि चिकाटी असली की कुठल्याही अडचणीचा सामना करत यश प्राप्त होते असे प्रतिपादन प्रा.डॉ. कैलास पवार यांनी केले.
श्रीरामपुर तालुक्यातील हरेगांव या ठिकाणी भूमी फाउंडेशन यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्री. पवार यांनी विद्यार्थीना शिक्षणाचे महत्व पटवून दिले तसेच येथील शेती महामंडळाचे निवृत्त कर्मचारी श्री. वामन सिताराम वानखेडे यांची नात कु. श्रृष्टी वानखेडे हिने नुकत्याच पार पडलेल्या नीट परिक्षेत घवघवीत यश संपादन करत दंत चिकित्सक या अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल कु.श्रृष्टी वाघमारे तसेच भुमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. कैलास पवार आदि मान्यवरांचा आरोग्य मित्र भिमराज बागुल यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रसंगी प्रा. अनिताताई पवार, 
प्रा. रेखा वानखेडे, नितीन बागुल, सचिन बागुल, सुरभी वानखेडे आदि उपस्थित होते. फराळ वाटपाने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
प्रास्तविक सुत्रसंचालन भिमराज बागुल यांनी केले तर आभार नितीन बागुल यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

अजून किती निर्भया...


बलात्काराची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. वाटलं होत निर्भया नंतर तरी . पूर्णविराम लागेल, परंतु निर्भयानंतर स्वल्प विरामच लागत गेले, याला पूर्णविराम लागणार तरी कधी ? वारंवार असे का घडत आहे? निर्भयाचे नाव बदलते ,पण तिचे मरण थांबत नाही. आणखी अजून किती निर्भया पहायच्या?
चार वर्षांपूर्वी दिल्लीतील निर्भया नावाच्या तरुणीवर अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर केंद्र सरकारने कठोर कायदे तर केलेत पण त्यानंतरही बलात्कार थांबले नाहीत. अशाच घटना आज रोज घडतांना दिसत आहेत. ताजी बात‌मी आहे. कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवरील नृशंस बलात्कार आणि अमानुष खून प्रकरणाच्या वेदना आणि याचा संताप लोकमानसात कायम असतानाच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण समोर आले. कोलकाता, बदलापूर आणि अन्य ठिकाणी घडणाऱ्या बलात्कार अत्याचाराच्या घटना अत्यंत शरमेच्या आहेत. या गुन्ह्यांचे स्वरूप आता अधिक भेदक, नृशंस आणि अमानूष होत चालले आहे . दरवेळी अशी एखादी घटना घडल्यानंतर शासन आणि समाज जागा होतो. पण अशाप्रकारचे कृत्य घडू नये, यासाठी उपाययोजना का केल्या जात नाहीत? 
अलीकडील काळात
 बालिका, तरुणी आणि महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत.
मणिपूर कोलकाता, बदलापूर आदी ठिकाणी घडलेल्या अत्याचाराच्या घटनानंतर तेथील शासनकर्त्यांकडून "आम्ही आरोपीला कठोर शिक्षा करू" अशा प्रकारची वेगवेगळी वक्तव्ये केली जातात, पण ही सर्व प्रक्रिया गुन्हे घडून गेल्यानंतर केली जाते. परंतू प्रत्यक्षात अत्याचाराचे गुन्हे घडू नयेत यासाठी भरीव काहीतरी करण्याची गरज भासत आहे . परंतू त्यादृष्टीने शासनाने कोणते धोरण आखले आहे का किंवा त्यासाठी काही पावले टाकली जात आहेत का? हे पाहणे देखील तितकेच गरजेचे आहे? हे लक्षात घेता शासन आणि समाज यांनी अशी घटना घडू नयेत, यासाठी पावले टाकणे आवश्यक आहे. पण पण तशाप्रकारचे ठोस प्रयत्न अथवा कृती होताना आपल्याला का दिसत नाही , निर्भयानंतर आजपर्यंत बलात्कार होऊ नयेत, यासाठी कोणतेच प्रयत्न होताना का दिसले नाहीत, बलात्कार अत्याचार, लैंगिक शोषण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना का केल्या जात नाहीत?
देशाच्या स्वातंत्र्याला आज ७७ वर्षे पूर्ण झाली.
पण तरी देखील आज महिलांवरील अत्याचार थांबले आहेत का? किंवा महिला सुरक्षेच्या दृष्टीकोणातून. विचार केला जातोय का ? महिलांसाठी सुरक्षित समाजाची निर्मिती करू शकलो का? याचे उत्तर नकारार्थीच भेटेल ही शोकांतिका म्हणावी लागेल, आपण पाहतोय, स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी, सुरक्षिततेसाठी असंख्य भाषण बाजी झाली कायदेबदल झाले, नव्याने कायेद केले गेले आणि देशातील महिला सुरक्षित झाल्या पाहिजेत असे सांगित‌ले गेले, पण त्या खरोखरच सुरक्षित कशा होतील याकडे शासण का लक्ष घालत नाही..
मुळात अत्याचाराच्या घटनांकडे आणि महिलांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलण्यामध्ये आपल्याला अपयश आले का ही क्रूर मानसिकता बदलण्यासाठी आपण काही करायला नको का? सांगण्याचा मुद्दा इतका की. बालिकांवरील, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी, महिलांनी स्वतः पुढे येऊन
तक्रारी नोंदविणे गरजेचे आहे, लहान मूलांबाबतीत असे घडल्यास त्यांच्या पालकांनीही कोणतेही समाजभय न बाळगता या प्रवृत्तींना लगाम बसावा यासाठी प्रयत्न केले पाहिले. एखादी महिला स्वत:वर झालेल्या अत्याचाराविरोधात दाद मागण्यासाठी कधीच पुढे येत नाही, परंतू ती न्याय मिळावा या आशेने न्यायालयाचा उंबरठा चढली तरी तिच्या पदरात फक्त निराशाच पडते. शिवाय ज्या स्त्रिया बदनामीच्या भीतीपोटी तक्रार दाखल करत नाहीत त्यांच्यासाठी सरकारकून विशेष समुपदेशन मोहीम राबविले जाणे गरजेचे आहे.
सूरक्षेच्या संद‌र्भात कोणी पावले उचलली तर सरकार सहकार्य करत नाहीत, महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावलेही उचलणे गरजेचे आहे.

दाहि दिशांत भारताच्या, रोजच अत्याचार किती
दृष्ट हैवान जिकडे तिकडे भारत कसा घडायचा
अजून किती निर्भया जातील बळी देशामध्ये
फक्त वाहून अश्रु आता, हा प्रश्न नाही सुटायचा ..
 आपला देश खुप प्रगती करत असूनही देशातील मुलींसाठी लोकांची विचारसरणी मागासलेली आहे,
सध्या चे उदाहरण घ्यायेचे झाले तर आपल्याकडे वेगवेगळ्या स्त्री देवता आहेत ज्यांच्या प्रतिमांची समाज भक्तीभावाने पूजा करतो, पण देव माणसातच आहे ही गोष्ट मात्र विसरून जातो. मग त्या स्त्री चे काय जी काम करू लागली व्यक्त होऊ लागली, यशाची शिखरे गाठू लागली, तिचा मात्र समाजाला जाच वाटू लागतो, मग ती कसे कपडे घालते, कुठे जाते, किती वाजता जाते, कुठे काम करते, कोणासोबत फिरते, कोणाच्या विरोधात ती आवाज उठवते या सर्व गोष्टींचे मूल्यमापन सूरु होते आणि त्यातून अंतिमतः तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. हे वास्तव आपण कधी बदलणार?
          महिला सक्षमीकरणाचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून दिड हजार रूपयांमध्ये महिलांचे तोंड गोड केले जाते, पण महिला सूरक्षित राहून त्यांचे आयुष्य कधी गोड होणार? तिला समाजामध्ये मूक्तपणाने कधी वावरता येणार? आजकाल तर मूलींना घरातून बाहेर पडायची देखील भिती वाटते की आज सकाळी जाऊ, पण दिवसभरात कोणत्या
परिस्थतीला सामोरे जाऊन घरी सूखरूप येऊ की नाही... हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित राहतो? आपण कथी सूरक्षित होऊ, ही भीती त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कायम असते. निष्पाप चिमुकल्यां विकृत लोकांच्या शिकार बनत आहेत ,ही घसरलेली नैतिकता पाहिली तर महिलांवरील अत्याचार हे सर्वात मोठे आव्हान समाजापुढे उभे ओहे. पण विचार करायला कुणाला वेळ आहे? धकाधकीच्या आयुष्यात आपण बरेच काही हरवून बसलो आहोत. राजकारणही नासले आहे, समोर आदर्श नसलेल्या वातावरणात तरुणांना आवरणार कोण?
मला ऐवढेच सांगायचे आहे. नवीन कायदे निर्माण करण्यापेक्षा जे आहेत जे ते तरी व्यवस्थित दिल्या पाळले गेले पाहिजेत. कायदे .आस्तित्वात असून उपयोगाचे नाही, त्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी देखील झाली पाहिजे.
'स्त्री' कडे बघण्याचा वाईट दृष्टीकोण बदलला पाहिजे, जोपर्यंत हा दृष्टीकोण बदलत नाही तोपर्यंत हे थांबणे शक्य नाही. आणि म्हणून उपायाच्या दृष्टीने विचार करता, प्रत्येक आई - वडीलांनी आपल्या मूलांसोबत बिनधास्तपणे संवाद साधण्याची गरज आहे. मुलांसोबत प्रत्येक विषयावर संवाद साधल्यावर त्यांच्या विचारांचा मार्ग कुठे जात आहे. हे लक्षात येईल, संवाद साधला की प्रश्न निर्माण होतात आणि प्रश्नांना योग्य उत्तर मिळाले की चांगला मार्ग मिळतो. शाळा, कॉलेजमध्ये लैंगिक शिक्षण दिले जावे त्याने मूलांमधील क्रोध , द्वेश, राग, विभत्स विचारांना सात्विक विचाराकडे वळवण्यास मदत होईल...

=================================
-----------------------------------------------

*लेखन*✍️✅🇮🇳...
समिक्षा चंद्रकांत चव्हाण
तारळे जि.सातारा
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Monday, November 4, 2024

निस्वार्थी मनाच्या शीतल चांदण्यात


माणसाला रोजच्या दैनंदिन कामकाजाच्या चक्रातून थोडं बाहेर पडावं व काही वेळा पुरतं तरी मुक्त व्हावं असं वाटत असतं.थोडक्यात, थोडी बदलाची आवश्यकता असते. मलाही अशाच बदलाची गरज होती .रोज सकाळी लवकर उठून उरकून ८ वाजता कामावर हजर होणं, रोजचा प्रवास..... अगदी कंटाळा आला होता....
झोप पुरेशी न झाल्याने वैतागलेल्या स्थितीमध्ये माझा प्रवास सुरू होता. कामावर जायला आज खरंतर थोडा उशीरच झाला होता. रोजच्या त्याच त्याच रुटीनला कंटाळून मी कामावर जात असताना माझं लक्ष रस्ता झाडणार्‍या स्त्रियांवर पडलं. किती लवकर उठून यांना यावं लागत असेल? आपला दिवस सुरू होण्याआधी यांचा दिवस सुरू झालेला असतो. यांना सुद्धा लवकर उठण्याचा, रोजच्या दैनंदिन चा कंटाळा येत नसेल का? त्यांचं काम स्वच्छ होतं. एकमेकींना सोबत करत ते समोरील काम पार पाडत होत्या. स्वच्छ रस्ता आत्ता चकाकत होता. त्या चकाकणाऱ्या रस्त्यावरून जाताना माझ्या मनावर असलेला ताण, वैतागलेपणा दूर झाला. त्या स्त्रियांची कामावरील निष्ठा, प्रेम त्या चकाकरणाऱ्या रस्त्यावरून प्रतिबिंबित होत होतं....
              प्रत्येकाचं आपल्या कामावर प्रेम हवं, निष्ठा हवी, श्रद्धा हवी. वाचनालयासमोरील देवळातील गणपतीची मूर्ती जेव्हा मी पाहते त्यावेळी मला फक्त ती मूर्ती दिसत नाही तर तिथे ज्या ज्येष्ठ वयातील स्त्रिया सेवा देण्यासाठी येतात त्यांची सेवा दिसते. पहाटे ६ ते ८ या वेळेमध्ये या स्त्रिया एकत्र येतात. सडा, रांगोळी ,पूजा ,हार करणं, स्तोत्रपठण व आरती करणं ,प्रसादाची तयारी करणं इत्यादी कामे अगदी अविरत चालू असतात. ऊन असो ,थंडी असो व पाऊस असो त्यांची सेवा चालू असते त्यांचं श्रद्धास्थान अढळ आहे आणि त्यांनी केलेली सेवा ही देवाला देवपण देते. प्रत्यक्ष देवाला कोणीही पाहिलेले नाही. पण माणसातील देव आपल्या भेटीला येतो. त्या स्त्रिया मन लावून आपलं काम करतात. एक एक फुल वेचून त्यांनी गणपतीसाठी बनवलेला हार हा गणपतीचे सौंदर्य अजून वाढवतो. या सर्व स्त्रियांची सेवाभावी वृत्ती देवळातच नाही तर आजूबाजूलाही एक सकारात्मक ऊर्जा पसरवते. 
  आपण जेव्हा अशी उदाहरणे पाहतो की ,जी आपल्या डोळ्यांसमोर घडत असतात. ती आपल्याला प्रेरणा देत असतात. आपल्याला अनेक सामाजिक बांधिलकीची जबाबदारीची जाणीव करून देतात.
एक रिक्षावाले काका दररोज दुपारी ४ नंतर बिस्किटांचे पुडे घेऊन येत व दररोज ,अगदी नित्यनेमाने त्या कुत्र्यांच्या पिल्लांना खाऊ घालत. हे दृश्य मी जवळजवळ रोज बघत होते आणि निरीक्षणही करत होते. पिल्लांनाही आता त्या काकांची सवय झाली होती. ती पिल्ले ठराविक वेळ झाली की आतुरतेने त्यांची वाट पाहत बसत. कधी कधी काकांना कामामुळे उशीर होई पण त्यातूनही वेळ काढून ते येत व पिल्लांना खाऊ घालीत. काकांना उशीर झाला तर पिल्लांच्या डोळ्यात भेटीची आतुरता दिसे व आल्यावर भेटीचा आनंद.हेच खर निस्वार्थी प्रेम. आपल्या एका छोट्या कृतीमुळे समोरच्या व्यक्तीला आनंद होत असेल तर तो आनंद समोरच्याला मिळवून देणं, त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरवणं खूप सुंदर गोष्ट आहे. या अशा निस्वार्थी प्रेमात एकमेकांबद्दल कोणत्याही ,कसल्याही अपेक्षा नसतात. दोघांमध्ये फक्त एक निखळ प्रेमाचा झरा वाहत असतो. 
             मुक्या जीवांबाबत प्रेम असणं, कणव असणं ,दयाभाव असणं, हे माणसाचं 'माणूस'असण्याचे लक्षण आहे. गौतम बुद्धांची शिकवण आपल्याला हेच तर शिकवते. 
लहान मुलांना घडवताना आई-वडिलांनी दिलेले संस्कार फार महत्त्वाचे असतात. एक चांगली व्यक्ती घडण्यासाठी ते फार महत्त्वाचे असतात. असाच एक प्रसंग माझ्यासमोर घडला. कामानिमित्त जात असताना मला एक गाढव दिसलं. त्याच्या गळ्यातील बांधलेला दोरखंड एका हातगाडीच्या दांड्यात अडकला होता. ते गाढव सुटका करण्यासाठी धडपडत होतं. एक छोटा मुलगा व मुलगी तो दोरखंड सोडवत होते आणि आजूबाजूला असलेली मोठी माणसं ढुंकूनही न पाहता निघून जात होती. जणू आपल्याला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. ती मुले न घाबरता त्या गाढवापाशी आली. व त्या हातगाड्याच्या दांड्यामधून दोरखंड काढू लागली. थोड्या प्रयत्नानंतर त्या मुलांनी त्या गाढवाला मोकळं केलं. या लहानग्यांना बघून माझे डोळे पाणावले. आपण लहान आहोत, आपल्या सोबत कोणीही मोठे माणूस नाही त्या गाढवाने अचानक हल्ला केला तर आपल्याला लागेल . असे भीतीदायक विचार त्या लहानगांच्या मनात क्षणभर सुद्धा आले नाहीत. ते वयाने लहान असले तरी त्यांचं मन मात्र मोठ्ठ निघालं. त्यांच्यावर झालेले संस्कार पक्के निघाले. या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला 'माणूस 'म्हणून घडता येतं...
एक मोठे नामांकित प्रतिथयश डॉक्टर त्यांची आज या निमित्ताने आठवण झाली. वाई येथील डॉ.शरद अभ्यंकर असेच एक निर्मळ मनाचे परोपकारी व्यक्तिमत्व होते. दानशूर व्यक्तीमत्व,मोकळा स्वभाव, वाचनाची प्रचंड आवड असणारे एक सद् गृहस्थ.ज्ञानी व आर्थिक सुबत्ता असली तरी त्याचा त्यांना कसलाही अहंकार नव्हता.त्यांनी खूप जणांना मदत केली अगदी उदार होउन. एके दिवशी एक मुलगा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आला.तो डॉक्टरांना भेटला व रक्तदान करण्यासाठी आलो आहे असं म्हणाला.रक्तदान करून थोडे पैसे मिळावे या हेतूने तो आला होता.एका गरीब कुटुंबातील हा मुलगा दहावी नंतरच्या पुढील शिक्षणासाठी पैसे जमा करत होता.नोकरी करत शिक्षण घेऊन आपल्या पायावर लवकर उभं रहावं म्हणून त्याची प्रामाणिकपणे धडपड सुरू होती.आत्ता सध्या तातडीची आवश्यकता असल्याकारणानें तो रक्तदान देण्यासाठी आला होता.डॉक्टरांनी त्याला काही पैसे दिले व रक्तदान करण्याची गरज नाही असे बोलले.डॉक्टरांनी एक दोन ठिकाणी बोलून एका ठिकाणी त्याला नोकरी मिळवून दिली.शिक्षण घेत आता तो नोकरी करु शकत होता.अधूनमधून सुट्टी असेल त्यावेळी तो डॉक्टरांना भेटत असे व तिथे वेळप्रसंगी मदतही करत असे.डॉक्टरांनी अशी अनेक कुटुंबे सावरली, उभी केली. याच डॉक्टरांनी केलेल्या अनेक कामांतील आणखी एक घटना इथे सांगाविशी वाटते.आसपासच्या परिसरात कातकरी समाजातील माणसे रहात होती.मासेमारी , खेकडे पकडून विकणे, छोटीमोठी कामे करणे ....अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह चालू होता.काही लागलं,खुपलं , आजारी पडलं तर ते डॉक्टरांकडे येत.डॉक्टर घेतली तर नाममात्र फी घेत कारण कातकरी अशिक्षीत असले तरी स्वाभिमानी होते.या माणसांना डॉक्टरांविषयी आदर होता ,अभिमान होता. याच समाजातील अवघडलेल्या स्त्रियांची बाळंतपणं डॉक्टरांनी मोफत केली तसेच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रियाही असा हा देवमाणूस मी माझ्या डोळ्यांनी पाहिला.अनेक प्रसंगांतून त्यांची आठवण सदैव येत राहते.मदत केलेली काही माणसे जाण ठेवतात ,काही ठेवतही नाहीत म्हणून आपला चांगूलपणा आपण सोडायचा नसतो.
 आपण प्रसिद्ध नावाजलेल्या व्यक्तींना बघतो आणि प्रेरित होतो. काही काही लोक तर त्यांच्या नशिबाचा हेवा करतात. परंतु ,त्या प्रसिद्धीसाठी नशीब कारणीभूत आहे का? त्यामागील त्यांच्या परिश्रमांना काहीच बोल नाही का? त्यांनी घेतलेले अपार कष्ट ,मेहनत ,संकटांविरूध्द ठामपणे लढून ते 'त्या ' स्थानावर आलेले असतात. अशाच एका प्रसिद्ध व्यक्तीला दोन वेळा जवळून भेटण्याचा मला दुग्धशर्करा योग आला. पद्मभूषण ,पद्मश्री पुरस्कार प्राप्त ,भारतीय सामाजिक कार्यकर्ता व लेखिका सुधा मूर्ती. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे ब्रीदवाक्य त्यांना शोभून दिसते. त्या एक अभियांत्रिकी शिक्षिकाही आहेत. अभियांत्रिकी आणि लोकोमोटिव्ह कंपनी मध्ये नियुक्त केलेल्या त्या पहिल्या महिला अभियंता होत्या. त्यांचा तो तिथपर्यंतचा प्रवास खूप खडतर झालेला आपणास दिसून येतो शिक्षक असल्याने त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले तसेच अनेक सामाजिक कार्यात आपले मोलाचे योगदानही दिले. त्यांनी लिहिलेल्या गोष्टी माणसांच्या,तीन हजार टाके ,सामानातले असामान्य , आयुष्याचे धडे गिरवताना इत्यादी अशा अनेक पुस्तकांमधून त्यांचे ' ''विस्तृत कार्य 'व जमविलेले 'माणुसकीचे धन 'आपणास पाहायला मिळते आज 'त्या 'अनेकांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांना जवळून पाहण्याचे, त्यांचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला लाभले. अशा अनेक व्यक्ती आपल्याला एकच तत्व शिकवतात ते म्हणजे 'माणुसकी 'व 'निस्वार्थ प्रेम'. मृत्यूनंतर जर काही शाश्वत गोष्ट शिल्लक राहत असेल तर ती प्रेम हे आहे. अशा अगणित व्यक्तींनी अनेकांना शाश्वत प्रेम देऊन त्यांच्या जीवनाला खोल अर्थ दिला आहे.बा.भ .बोरकरांची कविता माझ्या वाचनात आली.
मीपण ज्यांचे पक्‍व फळापरी
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे,
गेले तेथे मिळले हो
चराचरांचे हो‍उनि जीवन
स्‍नेहासम पाजळले हो
जीवन त्यांना कळले हो
सिंधूसम हृदयांत जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन्‌ दीनांवर
घन हो‍उनि जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो
खरेच ,कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता माणसात एक निरपेक्ष प्रेम नावाची गोष्ट असते. स्नेह ही खूप उदात्त गोष्ट आहे. जग तटस्थ होऊन न्याहाळले तर जीवनाच्या विविध अंगाचे दर्शन घडत असते. गौतम बुद्धांनी मैत्री भावना वृद्धिंगत होण्याला महत्व दिले आहे. मी तू पणा भेद निर्माण करतो ,पण तुझ्यात आणि माझ्यात काही वेगळे नाही ,परिस्थितीने आपण वेगवेगळे झालो असू ,पण आपण सदैव एकमेकांच्या हिताचा विचार केला पाहिजे ही भावना मन समाधानी करत जाते. अज्ञ लोकांना ज्ञानी बनवणारे जगातील करुणाशील लोक यांचे अनेक उपकार आपल्यावर आहेत. झाडलोट करणाऱ्या कामगारापासून अनेकजण आपल्या कल्याणासाठी झटत असतात .निष्ठेने कर्तव्य करणारी ,आणि सगळ्यांचे भले चिंतणारी ही माणसे जेंव्हा निस्वार्थी असतात तेंव्हा ती मनाने खूप मोठी असतात. म्हणूनच आपण भोवताल नीट पाहून अशी माणसे मिळवून त्यांना समाधान दिले पाहिजे.त्यांचे कर्म त्यांना आनंद देते . म्हणूनच अहितकारी कर्म न करता सर्वांचे कल्याण करणारी माणसे हीच खरी तर निस्वार्थी ठरतात. दुःख समजून घेऊन दुःख निवारण करण्याचा छोटासा प्रयत्न करणारी माणसे उपयोगी ठरतात .दुःख वाढवणारी माणसे नसावीत .आधार देणारी ,प्रोत्साहित करणारी ,दिलासा देणारी ,योग्य वेळी कौतुक करणारी ,संकटात उपयोगी पडणारी ,वेळेचा सदुपयोग करणारी ,निराशा दूर करून जीवन जगण्यास उत्साह देणारी ,अशी निर्मळ निस्वार्थी माणसे जे प्रेम देऊन जातात त्यामुळेच या विश्वाला सौख्य प्राप्त होते. 
आपण दैनंदिन आपल्यात मनातल्या अनेक अंतर्गत संवेदनात मश्गुल झालेले असतो. सभोवतालचे जगात अनेक बरी वाईट माणसे भेटत असतात. जी स्वतः जाणतात की आपले आयुष्य खूप थोडे आहे ,यातच आपण चांगल्या गोष्टी करून स्वतः समाधानी व्हावे व इतरांना समाधान द्यावे. अशा व्यक्तींना अहंकार नसतो ,त्याचे मीपण नेहमीच विनम्र असते. मिळालेले जीवन बहुजन हिताय ,बहुजन सुखाय असे ते जगत असतात .त्यांच्या मनावर त्यांचे नियंत्रण असते ,ते मनाने भटकत नाहीत .चिंतनशील स्वभावाने ती माणसांची ,प्राण्यांची मने समजून घेतात .ते आळसी नसतात,ती माणसे कर्मयोगी असतात .ती साधी असतात ,ती संयमी असतात . भले कधी रागावतील पण ते देखील इतरांच्या हितासाठी.असे करुणाशील माणूसपण खरे तर प्रत्येकाच्या मनात असतेच ,पण मनाला भान देण्याचा अभ्यास झालेला नसल्याने ती स्वैर भटकतात ,कधी परिस्थितीने दबून जातात ,कधी संस्काराने माजोरी होतात.... या पार्श्वभूमीवर अशा भान हरपलेल्या मनाला सन्मार्गाला लावणारी निस्वार्थी प्रेमळ माणसे सर्वांच्या जीवनात पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीतल चांदणे देऊन जातात ..खरेच आपले मनही मग एक निस्वार्थी चंद्र होऊन जाते....आणि आनंदाचे टिपूर चांदणे मनात सभोवार पसरत जाते.

=================================
-----------------------------------------------
*लेखन*✍️✅🇮🇳...
धनश्री निंबाळकर
एम.ए.भाग २, मराठी विभाग
छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस
श्रीरामपूर - ९५६११७४१११
----------------------------------------------
=================================