राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, November 5, 2024

माजी सैनिक संघर्ष समितीच्यावतीनेbएक दिवा शहिदांसाठी कार्यक्रम संपन्न

- श्रीरामपूर प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील आजी माजी सैनिक संघर्ष समितीच्या वतीने शहरातील शहीद स्मारकास दिपावली निमित्त जे सैनिक डोळ्यात तेल घालून आपल्या मातृभूमीचे रक्षण करत असतात व त्यांना आपल्या परिवारासह दिवाळी साजरी करता येत नाही सर्व प्रकारचे सणवार विसरून ते भारत मातेच्या सिमा रेषेचे रक्षण करत असतात आणि ज्या सैनिकांनी भारत मातेच्या रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुती दिली आहे त्यांच्या त्यागाच्या समर्थनात त्यांना नमन करून एक दिवा शहिदांसाठी व एक दिवा सैनिकांसाठी प्रज्वलित करून लावण्यात आला व दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. याप्रसंगी कॉंग्रेस चे नेते हेमंत ओगले यांनी भेट देऊन एक दिवा प्रज्वलित केला. या कार्यक्रमास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मेजर सुधाकर हरदास, कृष्णा सरदार, सुरेश बोधक, प्रकाश बनकर रवींद्र कुलकर्णी, भगीरथ पवार, चांगदेव धाकतोडे, बाळासाहेब बागडे, विलास खर्डे, अशोक कायगुडे, आजी सैनिक प्रशिल शिरसाट, छायाताई मोटे इत्यादी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर -९५६११७४१११
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

प्रा.डॉ.कैलास पवारांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक कार्य प्रेरणादायी- प्राचार्य डॉ.शंकरराव गागरे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महात्मा गांधी, कर्मवीर अण्णा, साने गुरुजी, डॉ. बाबा आमटे इत्यादिंचा आदर्श समोर ठेवून प्रा.डॉ. कैलास पवार यांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक कार्य सुरु असून ते आजच्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे विचार माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी व्यक्त केले.
  येथील मार्केट यार्ड शिवाजीनगर भागातील शेळके सभागृहात प्रा.डॉ कैलास पवार यांचा विविध संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला, त्याप्रसंगी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी स्नेह परिवार ग्रुपचे अध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. प्रारंभी वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करुन प्रा.डॉ. कैलास पवार यांच्या सेवाभावी कार्याचा परिचय करून दिला. प्राचार्य टी.ई. शेळके, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, डॉ. बाबुराव उपाध्ये, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, प्रा.शिवाजीराव बारगळ, आरोग्यमित्र भीमराज बागूल, पत्रकार बाबासाहेब चेडे आदिंनी प्रा.डॉ. कैलास पवार यांचा सत्कार केला. त्यांना नुकतीच वर्धा येथील महात्मा गांधी सेवाग्राम शांती भवनमध्ये सेवाभावी कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय राष्ट्रपिता महात्मा गांधी सेवासमितीतर्फे मानव मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानीत करण्यात आले, तसेच महांकाळ वाडगाव येथील संतगड दर्शन आश्रमात परमपूज्य श्रध्दानंदजी महाराज व ग्रामस्थांनी नागरी सन्मान केला, त्याबद्दल प्रा.डॉ. कैलास पवार आणि सौ. अनिता पवार यांना सन्मानचिन्ह, शाल, बुके, विविध पुस्तके देऊन सन्मानीत करण्यात आले. प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी प्रा.डॉ. कैलास पवार यांच्या विद्यार्थी अवस्थेतील खडतर जीवनाचे प्रसंग सांगून कमवा आणि शिका योजनेतून एका शेतकरी पुत्राने गरिबीशी झुंज देत शिक्षण घेऊन, निराधारांसाठी जीवन वाहून घेतले आहे, त्यामुळेच त्यांना लाभलेले सन्मान नव्या पिढीला स्फूर्तीप्रद असल्याचे सांगितले. प्रा. शिवाजीराव बारगळ, बाबासाहेब चेडे, आरोग्यमित्र भीमराज बागूल, सुखदेव सुकळे यांनी मनोगत व्यक्त केले, प्रा.डॉ. कैलास पवार यांनी आपल्या मनोगतातून रयत शिक्षण संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापक यांचे संस्कार व सहकार्य याविषयी आठवणी सांगून०२ ऑक्टोबर२०१९ पासून भूमी फाऊंडेशनने राबविलेल्या विविध सेवाभावी प्रकल्पाची माहिती दिली. प्राचार्य टी.ई. शेळके यांनी अध्यक्षीय भाषणातून भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेद्वारे प्रा.डॉ. पवार यांनी जे कार्य सुरु ठेवले आहे, त्यांची दखल आंतररष्ट्रीय महात्मा गांधी सेवासामितीने घेतली,हे भूषणावह असल्याचे सांगितले. वाचन संरकृती प्रतिष्ठान, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान हे नेहमीच चांगल्या कार्याचा सन्मान करतात, त्याबद्दल कौतुक केले. यावेळी ईशान पवार, भाग्यशा पवार, प्रतीक जाधव, श्रेयस ठोंबरे, तेजल घोंडगे आदिंनी सहभाग घेतला. प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी मनोगत व्यक्त करून सूत्रसंचालन केले तर सौ. अनिता पवार यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

सातपुर पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल जाळणारा इसम ताब्यात गुन्हेशाखा युनिट क्र. २ ची कामगिरी


- माजीद - खान -/ नाशिक -
नाशिक पोलिसांनी गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी कंबर कसली असुन विविध गुन्ह्यातील फरार आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना तुरुंगात पाठवले जात आहे.
त्यात सातपूर पोलिस ठाणे हद्दीत मोटार सायकल जाळणाऱ्या आरोपीस पोलिसांनी आज जेरबंद केले आहे.
मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे. श्री. प्रशांत बच्छाव, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे. श्री. संदिप मिटके, नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील विविध गुन्ह्यातील पाहीजे / फरार आरोपींचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या.
त्यानुसार आज दिनांक. ०५/११/२०२४ रोजी सहा. पो. उ. नि. बाळु शेळके यांना गोपनीय बातमी मिळाली की, सातपुर पोलीस ठाणे कडील गुरनं. २८७/२०२४ भा. न्याय. संहीता कलम-३२६ (फ) प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी नामे कुणाल कैलास गायखे वय-२३ वर्ष, रा. पळसे, ता. जि. नाशिक हा शिवाजी पुतळा, नाशिकरोड येथे असल्या बाबत माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. उ. नि. बाळु शेळके, शंकर काळे, विलास गांगुर्डे, पो. हवा. प्रकाश भालेराव अशांनी त्यास ताब्यात घेवुन पुढील कारवाई कामी सातपुर पोलीस ठाणेत हजर केले.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे. श्री. प्रशांत बच्छाव, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे. श्री. संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विद्यासागर श्रीमनवार सहा. पो. उ. नि. बाळु शेळके, शंकर काळे विलास गांगुर्डे पो. हवा. प्रकाश भालेराव, प्रकाश महाजन यांनी केलेली आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

डॉ.कैलास पवार हे महांकाळवाडगाव चे भूषण- संत श्रद्धानंदजी महाराज


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
भूमी फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष आदर्श तरुण समाजसेवक डॉ. कैलास पवार हे अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्र , सामाजिक क्षेत्र, ग्रामीण भाग विकास ,विधवा निराधार महिला,अनाथ निराधार मुलं,साहित्य संमेलन ,राज्यात असंख्य ठिकाणी आपत्ती काळात अत्यावश्यक मदत, अशा असंख्य विषयावर राज्यस्तरीय स्वरूपाचे कार्य करीत आहे.ही संस्था आज असंख्य देशासोबत जोडली गेली आहे हे निश्चित कौतुकास्पद आणि गौरवास्पद बाब आहे.डॉ. कैलास पवार यांना नुकतीच राष्ट्रपिता महात्मा गांधी सेवा समिती द्वारा वर्धा येथे महात्मा गांधी सेवाग्राम आश्रमात आंतरराष्ट्रीय मानद डॉक्टर पदवी प्राप्त झाल्याने महांकाळवाडगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सोहळा प्रसंगी महांकाळवाडगाव येथे आले असता कैलास पवार यांचा कमी वयात उत्कृष्ट कार्याचा आलेख हा निश्चित इतर तरुणांना आज दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर डॉ. कैलास पवार सारखे तरुण हे आज आमच्या गावाचे खरे भूषण आहे असे प्रतिपादन संतगड येथील श्रद्धांनंद महाराज यांनी व्यक्त केले.यावेळी अनेक नागरिकांनी आपली मनोगत व्यक्त केले.
झालेल्या सत्काराचे समाजसेवक डॉ.कैलास पवार व प्राध्यापिका अनिता ताई पवार यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले. तसेच
आपल्या आजी आणि वडिलांच्या प्रित्यर्थ संतगड विकास कामासाठी आर्थिक सहकार्य केले.यावेळी गोपीनाथ महाराज,नाथा आबा खुरुद,उपसरपंच कचरूभाऊ महांकाळे, सुखदेवआप्पा महांकाळे, राहुलभाऊ दातीर,सिकंदर भाई शेख,दत्तात्रयभाऊ चोरमल,अशोक अण्णा चोरमल,हरिभाऊ चोरमल, शंकर जाधव,पोपट शेख, गोरख जाधव,ज्ञानेश्वर मोरे,रामनाथ जाधव, कडूभाऊ पवार,रंभाजी महांकाळे,सोनवणे भाऊ, संदीप बडाख,मिठू बनगैया,पोपट बनगैया, नवनाथ दिघे,फकीरचंद चोरमळ,संजय भनगडे,बबन जाधव,मच्छिंद्र दिघे, पिंटूभाऊ खुरुद, महिलावर्ग आणि इतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

वृक्षसंवर्धन हा जगण्याचा ध्यास - प्रमोद मोरे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
वृक्षसंवर्धन आणि प्रदूषण निवारण हा माझ्या जगण्याचा ध्यास असून याचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे मत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी व्यक्त केले. श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील श्री खंडेश्वर माध्यमिक विद्यालयात मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
 वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे यांनी सुरू केलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यांमध्ये वर्षभर अनेक उपक्रम सुरू असतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सहसचिव श्री संजय गायकवाड यांनी केले. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील श्री खंडेश्वर माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमप्रसंगी प्रमोददादा मोरे यांनी सांगितले की, पर्यावरण हा प्रत्येकाच्या जगण्याचा भाग असून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने आपापल्या घराभोवती अथवा परिसरात वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमप्रसंगी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे पाईक व्हावेत. वृक्षसंवर्धन आणि प्रदूषण निवारण हा माझ्या जगण्याचा ध्यास असून याचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक श्री रवींद्र पवार, शिक्षक श्री देविदास खेडकर, श्री अमोल जाधव यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. आभार श्री संजय नेटके यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

बेलापूरात दिपावली सणानिमित्त 'एक पणती जवानांसाठी 'उपक्रम संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील बेलापूर येथील फ्रेंडस फाॕर एव्हर ग्रुप व समस्त ग्रामस्थ यांचेवतीने सालाबादप्रमाणे दिवाळीनिमित्त शहिद जवान,भारतीय सैनिक तसेच पोलिसांच्या सन्मानार्थ 'एक पणती जवानांसाठी'उपक्रम संपन्न झाला. बेलापूर-ऐनतपूर येथे गेल्या अकरा वर्षांपासून सदरचा उपक्रम राबविला जातो. सणवार विसरुन देशाचे जवान,पोलिस हे देशवासियांचे संरक्षण करीत असतात.दिवाळीसारखा महत्त्वाचा सण त्यांना त्यांचे कुटुंबासमवेत साजरा करता येत नाही.त्यांच्या या त्यागाच्या स्मरणार्थ पाडव्याच्या दिवशी पणत्या पेटवून जवान व पोलिसांचा सन्मान केला जातो. विजयस्तंभ चौकात फ्रेंडस फाॕर एव्हर ग्रुप तसेच बेलापूर-ऐनतपूर ग्रामस्थांच्या वतीने एक पणती जवानांसाठी कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी आजी माजी सैनिक,पोलिस बांधव तसेच ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

जिद्द आणि चिकाटी असली की यश प्राप्त होते - प्रा.डॉ. पवार


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
माणसाच्या मनात जिद्द आणि चिकाटी असली की कुठल्याही अडचणीचा सामना करत यश प्राप्त होते असे प्रतिपादन प्रा.डॉ. कैलास पवार यांनी केले.
श्रीरामपुर तालुक्यातील हरेगांव या ठिकाणी भूमी फाउंडेशन यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्री. पवार यांनी विद्यार्थीना शिक्षणाचे महत्व पटवून दिले तसेच येथील शेती महामंडळाचे निवृत्त कर्मचारी श्री. वामन सिताराम वानखेडे यांची नात कु. श्रृष्टी वानखेडे हिने नुकत्याच पार पडलेल्या नीट परिक्षेत घवघवीत यश संपादन करत दंत चिकित्सक या अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल कु.श्रृष्टी वाघमारे तसेच भुमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. कैलास पवार आदि मान्यवरांचा आरोग्य मित्र भिमराज बागुल यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रसंगी प्रा. अनिताताई पवार, 
प्रा. रेखा वानखेडे, नितीन बागुल, सचिन बागुल, सुरभी वानखेडे आदि उपस्थित होते. फराळ वाटपाने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
प्रास्तविक सुत्रसंचालन भिमराज बागुल यांनी केले तर आभार नितीन बागुल यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================