राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, November 7, 2024

मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ‘कौमी एकता सप्ताहात’ व्याख्यानमाला व विविध स्पर्धांचे आयोजन


- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील मखदुम एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी व मराठा सेवा संघाच्यावतीने स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त कौमी एकता सप्ताहाचे दि. ९ ते १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मख़दुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान व मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि. अभिजीत एकनाथ वाघ यांनी दिली.
या सप्ताहाचा शुभारंभ शनिवार दि.९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता डॉ. अल्लामा इकबाल यांच्या जयंती राष्ट्रीय उर्दु दिनी अलकलम अकॅडमी लखनौ च्या संयुक्त विद्यमाने महफिले मुशायरा ने होणार आहे. 
सोमवार ११ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता अहमदनगर च्या भुईकोट किल्यात नेताकक्ष मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना अभिवादन केले जाणार आहे. मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मुकुंदनगर येथील मौलाना आझाद हायस्कुल मध्ये प्रा. डॉ. महेबुब सय्यद यांचे पहिले व्याख्यान होईल. तर दुसरे पुष्प प्रा.डॉ.अब्दुस सलाम सर हे बुधवार १३ नोव्हेंबर रोजी आलमगीर येथील मातोश्री उर्दू हायस्कूल येथे सकाळी दहा वाजता गुंफतील. शेवटचे व्याख्यान गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता माणिक चौक येथील चॉद सुलताना हायस्कूल येथे प्रा.डॉ.महेबुब सय्यद यांच्या व्याख्यानाने होणार आहे. 
तसेच या सप्ताहा मध्ये चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा व वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून,या सर्व स्पर्धा शहरातील विविध शाळेत घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा ४ थी ते ६ वी, ७ वी ते ९ वी व १० वी ते १२ वी या तीन गटात होणार आहे.
या व्यतिरिक्त अलकरम हॉस्पिटल तर्फे विविध आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती मख़दुम सोसायटीच्या सचिव डॉ कमर सुरुर यांनी दिली. 
तरी या सप्ताहातील विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी व व्याख्यानमालेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद खलील व सचिव निसार बागवान यांनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Wednesday, November 6, 2024

आमदार लहू कानडे यांच्याप्रचार कार्यालयाचे उद्घाटन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) व महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. लहू कानडे यांचे,येथील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा प्रवक्ते अविनाश आदिक,आमदार लहू कानडे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अरुण पाटील नाईक व डॉ. सुरेश ग्यानचंदानी यांच्या हस्ते करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील निर्मल कॉम्प्लेक्स येथे आ. कानडे यांच्या प्रचार कार्यालयाचा आज शुभारंभ करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मुख्तार शहा, कुरेशी समाजाचे नेते मेहबूब कुरेशी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रतिनिधी विश्वनाथ आवटी, सुनील थोरात, तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे, विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकाल, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, मल्लू शिंदे, तालुका युवक अध्यक्ष ॲड. संदीप चोरगे, युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, महिला तालुकाध्यक्ष मंदाताई गवारे, शहराध्यक्ष माजी नगरसेविका अर्चना पानसरे, युवती जिल्हाध्यक्ष प्रियंका जनवेजा, रुबीना पठाण तसेच वळदगांवचे सरपंच अशोक भोसले, मूठेवडगावचे सरपंच सागर मुठे, ॲड. मधुकर भोसले, ॲड. जयंत चौधरी, जयकर मगर, दीपक कदम, सागर कुऱ्हाडे, गोपाल वायनदेशकर, गुरुचरणसिंग भाटियानी, योगेश जाधव, विलास ठोंबरे, अनिरुद्ध भिंगारवाला, नयन गांधी, सुमित मुथा, दीपक निंबाळकर, प्रशांत खंडागळे, सोहेल शेख, अक्षय नाईक, सल्लाउद्दीन शेख, निरंजन भोसले, राजू साळवे, विलास ठोंबरे, राहुरी विभागाचे राजेंद्र लोंढे, अनिकेत आसने, श्रीकांत दळे, अविनाश नागरे, सुधाकर बोंबले, राहुल बोंबले आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी अरुण पाटील नाईक यांची नियुक्ती


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता `
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी अरुण पाटील नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती केली आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा प्रवक्ते अविनाश आदिक यांच्या हस्ते तसेच आमदार लहू कानडे व माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या प्रमुख उपस्थितीत अरुण पाटील नाईक यांना 
 नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक मुख्तार शहा, कुरेशी समाजाचे नेते मेहबूब कुरेशी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रतिनिधी विश्वनाथ आवटी, सुनील थोरात, तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे, विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकाल, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, मल्लू शिंदे, तालुका युवक अध्यक्ष ॲड. संदीप चोरगे, युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, महिला तालुकाध्यक्षा मंदाताई गवारे, शहराध्यक्षा माजी नगरसेविका अर्चना पानसरे, युवती जिल्हाध्यक्षा प्रियंका जनवेजा, रुबीना पठाण तसेच वळदगांवचे सरपंच अशोक भोसले, मूठेवडगांवचे सरपंच सागर मुठे, अँड. मधुकर भोसले, अँड. जयंत चौधरी, जयकर मगर, दीपक कदम, सागर कुऱ्हाडे, गोपाल वायनदेशकर, गुरुचरणसिंग भाटियानी, योगेश जाधव, विलास ठोंबरे, अनिरुद्ध भिंगारवाला, नयन गांधी, सुमित मुथा, दीपक निंबाळकर, प्रशांत खंडागळे, सोहेल शेख, अक्षय नाईक, सल्लाउद्दीन शेख, निरंजन भोसले, राजू साळवे, विलास ठोंबरे, राहुरी विभागाचे राजेंद्र लोंढे, अनिकेत आसने, श्रीकांत दळे, अविनाश नागरे, सुधाकर बोंबले, राहुल बोंबले आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

श्रीरामपूरात कॅांग्रेस पक्षाला मोठे खिंडारकॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

श्रीरामपूरात कॅांग्रेस पक्षाला मोठे खिंडार
कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

- शौकतभाई शेख - श्रीरामपूर -/ वार्ता -
आमदार लहू कानडे यांची कामाची शैली व विकासाभिमुख राजकारणाला प्रभावित होऊन, श्रीरामपूरातील अनेक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांचे उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर श्रीरामपूर कॉंग्रेस ला मोठे खिंडार पडले आहे.
श्रीरामपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, महंमद शेख, सलीम शेख यांच्यासह, अशोक बँकेचे मा.संचालक महाराज कंत्रोड, जय मातादी पतसंस्थाचे संचालक अनिल (बंटी) गुप्ता, कमालपूर गुरुद्वाराचे ट्रस्टी भगवंतसिंग बत्रा, प्रशांत अलग, सचिन गुलाटी, नीरज त्रिपाठी, गणेश वर्मा, राकेश सहानी, बंटी थापर, चेतन जग्गी, प्रदीप गुप्ता नामदेव अस्वर,नासिर शेख, गणेश गायकवाड, मदन कणघरे, सुनील परदेशी, रोहित गुलदगड, प्रशांत यादव, अशोक गायकवाड आदिंसह असंख्य कार्यकर्ते आणी प्रमुख पदाधिकारी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थित आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला आहे.
याप्रसंगी अंकुश कानडे, अमृत धुमाळ पाटील,जयंत चौधरी आदि उपस्थित होते. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
 पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस,
 श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

श्रीरामपूर जिल्हा मुख्यालयासाठी पाठपुरावा करणार - आ. कानडे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व श्रीरामपूर 
विधानसभेच्या घोषणापत्राचे प्रकाशन

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 अहमदनगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. या जिल्ह्याचे विभाजन व्हावे, यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करणारा मी पहिला आमदार आहे. श्रीरामपूर हेच जिल्ह्याचे मुख्यालय असावे, यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच श्रीरामपूर विधानसभेच्या घोषणापत्राचे प्रकाशन ऑडिओ- व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आले. याचवेळी काँग्रेस भवन येथे श्रीरामपूर विधानसभा घोषणा पत्राचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत आ. कानडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, आदिवासी भिल्ल संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, सरपंच सागर मुठे, विश्वनाथ आवटी, मल्लू शिंदे, पी. एस. निकम, उत्तमराव पवार, भागचंद औताडे, महिला तालुकाध्यक्ष मंदा गवारे, प्रियंका जनवेजा, रुबीना पठाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे हे आपले स्वप्न आहे. भौगोलिक दृष्ट्या जिल्हा विस्तीर्ण असल्याने विभाजन अटळ आहे. त्यामुळे विधिमंडळात श्रीरामपूर जिल्हा व्हावा, अशी मागणी करणारा मी पहिला आमदार आहे. याशिवाय शहरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे व्हावेत, अशी आपली मागणी आहे. प्रशासकीय कामाचा अनुभव असल्याने त्याचा उपयोग मतदार संघातील विकास कामे करण्यासाठी केला. यापूर्वी केवळ उद्घाटन होत होती. परंतु आपण कार्यारंभ आदेश आल्याशिवाय तसेच विकास कामांचे फलक लावल्याशिवाय उद्घाटने केली नाही. स्व. आदिकांनी तालुक्याला विकासाचे पर्व सुरू करण्याचा वारसा दिला. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मतदार संघातील मायबाप जनतेने माझ्यासारख्या गरिबाच्या मुलाला विधानसभेत पाठविले. त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता मतदार संघात बाराशे ते तेराशे कोटी रुपयांची विकास कामे केली. या कामांमध्ये पारदर्शकता हवी हे धोरण ठेवले. विकास कामांमुळे सर्व सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर होतो. परंतु काहींनी कटकारस्थान करून आपली उमेदवारी कापली. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली. पुढील काळात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे ध्येय घेऊन वाटचाल करणार असल्याचे आ. कानडे यावेळी म्हणाले.
           यावेळी अविनाश आदीक म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा राज्यात एकाच वेळी प्रसिद्ध केला. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला असून जाहीरनाम्यातील सर्व कामे पूर्ण होतील. आ. कानडे यांच्या रूपाने चांगला आमदार मिळणार आहे. त्यांना पुन्हा संधी दिली जाणे हे आपले भाग्य राहील. त्यामुळे निवडणुकीत त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अशोक कारखान्याचे माजी संचालक प्रा. कार्लस साठे, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, सतीश बोर्डे, वळदगांवचे सरपंच अशोक भोसले, सचिन जगताप, राजेंद्र कोकणे, विष्णुपंत खंडागळे, विजय शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रईस जागीरदार, शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, तालुका युवक उपाध्यक्ष ॲड. संदीप चोरगे, युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव फारुख पटेल, हंसराज आदिक, सुनील थोरात, आदित्य अदिक, बाळासाहेब उंडे, संदीप चोरगे, श्रीकांत दळे, अविनाश नागरे, सुधाकर बोंबले, राहुल बोंबले, अक्षय नाईक, बाबासाहेब कोळसे, सुरेश पवार, राजेंद्र औताडे, आबा पवार, मदन हाडके, रमेश आव्हाड, अमोल आदीक, ज्ञानदेव आदीक, दीपक कदम, अजिंक्य उंडे, इमरान शेख, भैय्या शहा, सागर कुऱ्हाडे, बाबासाहेब ढोकचौळे, अण्णासाहेब गवारे, सुदाम पटारे, प्रताप पटारे रवींद्र मुरकुटे, रवी अण्णा गायकवाड, सचिन ब्राह्मणे, संदीप दांगट, तुकाराम चीधें, राधाकृष्ण तांबे, डॉ. सर्जेराव सोळुंके, अनिल बिडे, नानासाहेब बडाख, विष्णुपंत बडाख, विजय दवंगे, जमीर पिंजारी, कदीर पटेल, हरिश्चंद्र साळुंके, रवी राजुळे, सचिन कोळसे, प्रकाश चौधरी, दत्तात्रय जाधव, जुगल गोसावी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Tuesday, November 5, 2024

माजी सैनिक संघर्ष समितीच्यावतीनेbएक दिवा शहिदांसाठी कार्यक्रम संपन्न

- श्रीरामपूर प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील आजी माजी सैनिक संघर्ष समितीच्या वतीने शहरातील शहीद स्मारकास दिपावली निमित्त जे सैनिक डोळ्यात तेल घालून आपल्या मातृभूमीचे रक्षण करत असतात व त्यांना आपल्या परिवारासह दिवाळी साजरी करता येत नाही सर्व प्रकारचे सणवार विसरून ते भारत मातेच्या सिमा रेषेचे रक्षण करत असतात आणि ज्या सैनिकांनी भारत मातेच्या रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुती दिली आहे त्यांच्या त्यागाच्या समर्थनात त्यांना नमन करून एक दिवा शहिदांसाठी व एक दिवा सैनिकांसाठी प्रज्वलित करून लावण्यात आला व दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. याप्रसंगी कॉंग्रेस चे नेते हेमंत ओगले यांनी भेट देऊन एक दिवा प्रज्वलित केला. या कार्यक्रमास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मेजर सुधाकर हरदास, कृष्णा सरदार, सुरेश बोधक, प्रकाश बनकर रवींद्र कुलकर्णी, भगीरथ पवार, चांगदेव धाकतोडे, बाळासाहेब बागडे, विलास खर्डे, अशोक कायगुडे, आजी सैनिक प्रशिल शिरसाट, छायाताई मोटे इत्यादी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर -९५६११७४१११
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

प्रा.डॉ.कैलास पवारांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक कार्य प्रेरणादायी- प्राचार्य डॉ.शंकरराव गागरे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महात्मा गांधी, कर्मवीर अण्णा, साने गुरुजी, डॉ. बाबा आमटे इत्यादिंचा आदर्श समोर ठेवून प्रा.डॉ. कैलास पवार यांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक कार्य सुरु असून ते आजच्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे विचार माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी व्यक्त केले.
  येथील मार्केट यार्ड शिवाजीनगर भागातील शेळके सभागृहात प्रा.डॉ कैलास पवार यांचा विविध संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला, त्याप्रसंगी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी स्नेह परिवार ग्रुपचे अध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. प्रारंभी वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करुन प्रा.डॉ. कैलास पवार यांच्या सेवाभावी कार्याचा परिचय करून दिला. प्राचार्य टी.ई. शेळके, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, डॉ. बाबुराव उपाध्ये, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, प्रा.शिवाजीराव बारगळ, आरोग्यमित्र भीमराज बागूल, पत्रकार बाबासाहेब चेडे आदिंनी प्रा.डॉ. कैलास पवार यांचा सत्कार केला. त्यांना नुकतीच वर्धा येथील महात्मा गांधी सेवाग्राम शांती भवनमध्ये सेवाभावी कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय राष्ट्रपिता महात्मा गांधी सेवासमितीतर्फे मानव मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानीत करण्यात आले, तसेच महांकाळ वाडगाव येथील संतगड दर्शन आश्रमात परमपूज्य श्रध्दानंदजी महाराज व ग्रामस्थांनी नागरी सन्मान केला, त्याबद्दल प्रा.डॉ. कैलास पवार आणि सौ. अनिता पवार यांना सन्मानचिन्ह, शाल, बुके, विविध पुस्तके देऊन सन्मानीत करण्यात आले. प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी प्रा.डॉ. कैलास पवार यांच्या विद्यार्थी अवस्थेतील खडतर जीवनाचे प्रसंग सांगून कमवा आणि शिका योजनेतून एका शेतकरी पुत्राने गरिबीशी झुंज देत शिक्षण घेऊन, निराधारांसाठी जीवन वाहून घेतले आहे, त्यामुळेच त्यांना लाभलेले सन्मान नव्या पिढीला स्फूर्तीप्रद असल्याचे सांगितले. प्रा. शिवाजीराव बारगळ, बाबासाहेब चेडे, आरोग्यमित्र भीमराज बागूल, सुखदेव सुकळे यांनी मनोगत व्यक्त केले, प्रा.डॉ. कैलास पवार यांनी आपल्या मनोगतातून रयत शिक्षण संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापक यांचे संस्कार व सहकार्य याविषयी आठवणी सांगून०२ ऑक्टोबर२०१९ पासून भूमी फाऊंडेशनने राबविलेल्या विविध सेवाभावी प्रकल्पाची माहिती दिली. प्राचार्य टी.ई. शेळके यांनी अध्यक्षीय भाषणातून भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेद्वारे प्रा.डॉ. पवार यांनी जे कार्य सुरु ठेवले आहे, त्यांची दखल आंतररष्ट्रीय महात्मा गांधी सेवासामितीने घेतली,हे भूषणावह असल्याचे सांगितले. वाचन संरकृती प्रतिष्ठान, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान हे नेहमीच चांगल्या कार्याचा सन्मान करतात, त्याबद्दल कौतुक केले. यावेळी ईशान पवार, भाग्यशा पवार, प्रतीक जाधव, श्रेयस ठोंबरे, तेजल घोंडगे आदिंनी सहभाग घेतला. प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी मनोगत व्यक्त करून सूत्रसंचालन केले तर सौ. अनिता पवार यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================