राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, November 11, 2024

राज्यस्तरीय युवक महोत्सव इंद्रधनुष्य -२०२४ स्पर्धेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाला सुयश


राज्यस्तरीय युवक महोत्सव इंद्रधनुष्य -२०२४ स्पर्धेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाला सुयश

- जावेद शेख - राहूरी -/ वार्ता -
डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे दि ७ -११ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत पार पडलेल्या राजभवन मुंबई संकल्पित राज्यस्तरीय युवक महोत्सव इंद्रधनुष्य २०२४ या सांस्कृतिक स्पर्धेत राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या संघाला तीन पारितोषिक जाहीर झाले असल्याची माहिती विद्यापीठाचे संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण डॉ. महावीरसिंग चौहान यांनी दिली आहे. यात श्री. क्षितीज जाधव यास ऑन दि स्पॉट फोटोग्राफीसाठी द्वितीय रजतपदक, श्री. तेजस कांबळे यास पाश्चिमात्य गायनासाठी प्रथम सुवर्णपदक तर गोद्रा ह्या एकांकिकेस प्रथम सुवर्णपदक पारितोषिक सिने अभिनेत्री गिरीजा प्रभु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख होते.
 इंद्रधनुष्य २०२४ या सांस्कृतिक स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील कृषि व अकृषी मिळून एकुण २४ विद्यापीठातील १५०० विद्यार्थी कलाकार सहभागी झाले होते. यात नृत्य, अभिनय, संगीत, ललित कला व साहित्य या विविध कलाप्रकाराचे सादरीकरण करण्यात आले. या विविध कलाप्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील व अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. महावीरसिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली ४५ विद्यार्थी कलाकारांसह ८ सहकलाकार दिग्दर्शक, नृत्य निर्देशक, संघ व्यवस्थापक व इतर कर्मचार्‍यांचा समावेश होता. यात सर्वश्री सागर गावंड, ऋतीराज रास्ते, प्रा दिपाली वाघ, आकाश साळवे, चांगदेव दातीर व बापूसाहेब गवते, श्रीमती अर्चना टकले, ॠषी कदम व सागर नन्नावरे यांनी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. या यशस्वी विद्यार्थी कलाकारांसह डॉ. महावीरसिंग चौहान यांचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संचालक संशोधन डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्षनाथ ससाणे व कुलसचिव डॉ. मुकूंद शिंदे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*👍✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

साने गुरुजी यांनी राष्ट्रभक्ती आणि मानवप्रेमाची मूल्ये रुजविली- सुखदेव सुकळे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
साने गुरुजी यांनी भारतीय स्वातंत्र्य आणि भारतीय संस्कृतीची मूल्यनिष्ठा शिकविली. त्यांनी लिहिलेली ७६ पुस्तके म्हणजे अमृतमूल्ये आहेत. २४ डिसेंबर १८९९ ते ११ जून १९५० या जीवनकाळात त्यांनी केलेली समाजसेवा दिशादर्शक आहे. त्यांची राष्ट्रभक्ती व मानवप्रेमाची मूल्ये जोपासली पाहिजेत असे विचार विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी व्यक्त केले.
  येथील आंतरभारती श्रीरामपूर शाखेतर्फे सुखदेव सुकळे यांचे साने गुरुजींची मूल्यनिष्ठा जाणीव विषयावर व्याख्यान अतिथी कॉलनीतील समाज मंदिरात आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. स्वागत, प्रास्ताविक शाखेचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष लिंगायत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय शाखेचे उपाध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी करून दिला. यावेळी नायब तहसिलदार दत्तात्रय रायपल्ली यांनी कथा सादर केली.ॲड. बाबासाहेब मुठे यांनी श्रीशिव मंदिर उभारणीची माहिती दिली. ह.भ.प. प्रा. सखाराम कर्डिले महाराज, प्रा. शिवाजीराव बारगळ, माजी प्राचार्य श्री ए.डी. पोटघन,माजी मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण, दगडू शिंदे, लेविन भोसले, कारभारी वाघ इत्यादींनी चर्चेत भाग घेतला.
          सुखदेव सुकळे यांनी साने गुरुजी यांचा खडतर जीवनप्रवास सांगून भारतीय संस्कृतीचा आदर्श म्हणजे शिक्षक साने गुरुजी होते. मंदिर प्रवेश, शेतकरी आंदोलन, तुरुंगवास, समाजवादी विचारधारा, विविध उपक्रमांची माहिती सुकळे यांनी सांगून आंतरभारती शाखेने आपले कार्य वाढवावे म्हणून ११११ रुपये देणगी दिली. प्राचार्य टी.ई. शेळके यांनी साने गुरुजी यांची साहित्यसंपदा आणि आंतरभारती संकल्पना विद्यार्थी आणि उगवत्या पिढीसमोर ठेवली पाहिजे. त्यांची देशभक्ती आणि समाजमूल्ये यांची शिकवण समजून घेतल्यास साने गुरुजींचा मोठेपणा कळेल. असे सांगून आपण सर्वजण त्यांच्या विचारांचा आदर्श प्रत्यक्ष कृतीत आणणे गरजेचे असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले.त्यांनी उपस्थितीतांना ग्रंथसंवाद पुस्तके भेट स्वरूपात देऊन वाचन संस्कृतीला घरोघरी प्रतिष्ठा लाभावी अशी अपेक्षा व्यक्त केली. शाखेचे सचिव लेविन भोसले यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


ठराविक घराण्याचे हित बघण्यासाठी आपली उमेदवारी कापली - आ. कानडे


- श्रीरामपूर,- प्रतिनिधी - / वार्ता -
गरीब समाजामधील नेतृत्व पुढे येऊ द्यायचे नाही, केवळ ठराविक घराण्याची हित बघायचे असल्याने माझी उमेदवारी कापली. काँग्रेसला फक्त दलित, आदिवासी मागासवर्गीय केवळ मते हवे आहेत. मात्र त्या समाजातून पुढे आलेले नेतृत्व रुजू द्यायचं नाही, वास्तविक विद्यमान आमदाराचे (सीटिंग MLA) तिकीट कधीच कापले जात नाही. उलट त्यामुळे त्या त्या पक्षाला तेथील जागा सुटते. श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचा आमदार असल्यामुळे काँग्रेसला उमेदवारी मिळाली. परंतु एकच घराण्यांचे लाड पुरवण्यासाठी माझी उमेदवारी नाकारून काँग्रेसचे नेत्यांनी श्रीगोंदामध्ये विधानसभेला काँग्रेसच्या चिन्हावर अनामत रक्कम (डिपॉझिट) वाचवू न शकलेला बाहेरचा उमेदवार लादला. हा केवळ माझ्यावर नव्हे तर श्रीरामपूर-राहुरी मतदारसंघामधील मायबाप जनतेवर केलेला अन्याय आहे. त्यामुळे अशा संकट काळात महायुतीचा उमेदवार म्हणून आपण मला आशीर्वाद देऊन पुन्हा सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी राहूरी तालुक्यातील चिंचोली येथील प्रचार सभेत बोलताना केले.

आ. कानडे यांच्या प्रचारार्थ मतदार संघातील राहुरी तालुक्यातील रामपूर, चिंचोली, पिंपळगाव फुणगी, गंगापूर, संक्रापूर व दवणगांव येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, राहुरी बाजार समितीचे माजी सभापती विनोद कोतकर, महिपती देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, सरपंच किशोर बकाल, नानासाहेब रेवाळे, आदिवासी भिल्ल संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, दीपक पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले, काँग्रेसच्या स्थानिक मंडळी भारुडे रचून पक्षाची दिशाभूल करून तिकीट कापले परंतु परमेश्वर चांगल्या माणसाच्या पाठीशी असतो आणि कधीही कोणाबद्दल वाईट बोललेलो नाही पक्षाशी एकनिष्ठ होतो हा चांगुलपणा आपल्या कामाला आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील चौकशी केली एकीकडे कसे चित्रपट केले या आनंदात फटाके फुटत होते तर दुसरीकडे अनेक पक्षांनी फोन करून तुम्ही सर्व सर्वेमध्ये अग्रेसर आहात पक्षात या असे म्हणत असताना मी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांच्या तसेच माझ्या विचारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झालो, अडचणीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटक पक्षातील नेत्यांशी चर्चा करून आपल्याला उमेदवारी दिली, ही आपल्या प्रामाणिकपणाची पावती असून मायबाप मतदारांनी पुन्हा आपल्याला संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

अविनाश आदिक म्हणाले, सन ९९ पासूनचा इतिहास बघितल्यास इतर आमदार विधानसभेत शांत बसायचे, परंतु आ.कानडे यांची प्रश्नांना वाचा फोडणारे आमदार म्हणून ओळख आहे. मतदार संघातील शेतकरी. शेतमजूर. महिला यांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडून सरकारला त्यावर उत्तर देण्यास भाग पाडले. मतदार.संघात १२०० कोटी रुपयांची विकास कामे केली. विज, पाणी, शेती, शिक्षण, उद्योग, महिला अशा विविध क्षेत्रात त्यांनी विकास कामे केली आहेत. त्यामुळे मतदारसंघात कामदार आमदार` म्हणून ओळख निर्माण झाली आहे. अशा काम करणाऱ्या आ. कानडे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सरपंच दादासाहेब मेहत्रे, नारायण टेकाळे, कारभारी विटनोर, नितीन खळदकर, तुषार तनपुरे, मनोज सरोदे, अमोल पठारे, चांगदेव नालकर, दीपक पवार, माजी चेअरमन ज्ञानदेव लोखंडे, माजी सरपंच भाऊसाहेब साबळे, गवजी लोखंडे, नबाजी जगताप, रामदास पांढरे, रमा गांगरे, विक्रम जगताप, सागर चेढे, अंबीर शेख, द्वारकनाथ चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, पंढरीनाथ जगताप, भरत सालबंदे, ज्येष्ठ कलावंत शांताबाई जाधव, दावल शेख, सरपंच शिवा जाधव, माजी सरपंच दत्तात्रय पारखे, शंकर नान्नोर, दत्तात्रय जाधव, परसराम गर्दे, गोपीनाथ वर्पे, बाळासाहेब डमाळे, श्याम जाधव, सचिन बनसोडे, किरण माळी, रमजान शेख, पोपट वडीतके, अशोक नानोर, सुभाष परभणी, विकास जाधव, दिलीप डमाळे, पंडित वडीतके, गणेश वडीतके यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️💐✅...
समता मीडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

माजी आ.चंद्रशेखर कदम आणी नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांचा लहू कानडेंना पाठिंबा


आ.लहू कानडे यांच्या देवळालीतील संपर्क 
कार्यालयाचे कदम यांच्या हस्ते उद्घाटन

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार चंद्रशेखर कदम आणी त्यांचे सुपुत्र देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी अध्यक्ष सत्यजित कदम यांनी कै.शांताबाई कदम मंगल कार्यालयामध्ये श्रीरामपूर विधनसभा मतदार संघांतील समाविष्ट राहूरी तालुक्यातील व श्रीरामपूर तालुक्यातील त्यांच्या समर्थक भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात ५०० ते ६०० कार्यकर्ते उपस्थित होते.
         सन २०२४ मधे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी श्रीरामपूर राहूरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारी बाबतचा संभ्रम दुर करण्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून महायुतीच्या अधिकृत उमेदवारीबाबत माहीती घेतली. राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरामपूरचे विद्यमान आमदार लहू कानडे यांना कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

याप्रसंगी बोलताना माजी नगराध्यक्ष सत्यजीतदादा कदम म्हणाले, आपला कार्यकर्ता मेळावा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोन झाला. त्यांनी महायुतीचे उमेदवार लहू कानडे हेच असून त्यांच्या विजयासाठी काम करा असे स्पष्ट आदेश दिले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. लहू कानडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याने त्यांचेच काम करण्याचे आदेश दिल्याने आपण सर्वांनी महायुतीचे उमेदवार आ. लहू कानडे यांच्या विजयासाठी तन-मन-धनाने काम करावे, असे आवाहन केले.
यावेळी विक्रम तांबे, सुरेश थेऊरकर, अमृत धुमाळ, अमोल धुमाळ, काशिनाथ जाधव, भास्कर खाडे, दत्तात्रय आढाव, नाना निमसे, सोसायटी चेअरमन शहाजी कदम, भाजप फॅक्टरी शहराध्यक्ष वसंत कदम, गणेश पवार, पोपट खाडे, राधुभाऊ करपे, रामभाऊ पवार, दिलावर पठाण, बाळासाहेब मुसमाडे आदींनी मनोगत केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, सोपान भांड, भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण, अमोल कदम, भारत शेटे, सचिन सरोदे, शहाजी पाटील कदम, अभिजित कदम, जगन्नाथ येवले, जिजाबा चिंधे, शशी खाडे, रामेश्वर तोडमल, बाळासाहेब लोखंडे, सतीश वने, सचिन शेटे, सचिन निमसे, राजू चव्हाण आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्तविक माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केले. सूत्रसंचालन चेतन कदम यांनी केले.

मेळाव्यनंतर देवळाली प्रवरा येथे सुरू करण्यात आलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष सत्यजीतदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार लहू कानडे, राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदीक, राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढूस, अंकुश कानडे, अमृतकाका धुमाळ, , राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, सरपंच किशोर बकाल, नानासाहेब रेवाळे, आदिवासी भिल्ल संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, अजय खिलारी, बाळासाहेब लोखंडे, अनिल बिडे, दीपक पवार, केदारनाथ चव्हाण, सचिन निमसे, राहुल महांकाळ, विलास संसारे, नारायण रिंगे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷


*****************************************
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
®®®®®®®®®®®®®®®®®®®®®®®®

:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...

*****************************************
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
®®®®®®®®®®®®®®®®®®®®®®®®



Sunday, November 10, 2024

साने गुरुजी यांनी राष्ट्रभक्ती आणि मानवप्रेमाची मूल्ये रुजविली- सुखदेव सुकळे


- शौकतभाई शेख - श्रीरामपूर -/ वार्ता -
साने गुरुजी यांनी भारतीय स्वातंत्र्य आणि भारतीय संस्कृतीची मूल्यनिष्ठा शिकविली. त्यांनी लिहिलेली ७६ पुस्तके म्हणजे अमृतमूल्ये आहेत.२४ डिसेंबर १८९९ ते ११ जून १९५० या जीवनकाळात त्यांनी केलेली समाजसेवा दिशादर्शक आहे. त्यांची राष्ट्रभक्ती व मानवप्रेमाची मूल्ये जोपासली पाहिजेत असे विचार विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी व्यक्त केले. येथील आंतरभारती श्रीरामपूर शाखेतर्फे सुखदेव सुकळे यांचे साने गुरुजींची मूल्यनिष्ठा जाणीव विषयावर व्याख्यान अतिथी कॉलनीतील समाज मंदिरात आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. स्वागत, प्रास्ताविक शाखेचे संस्थापक,अध्यक्ष सुभाष लिंगायत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय शाखेचे उपाध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी करून दिला. यावेळी नायब तहसिलदार दत्तात्रय रायपल्ली यांनी कथा सादर केली.ॲड. बाबासाहेब मुठे यांनी श्रीशिव मंदिर उभारणीची माहिती दिली. ह.भ.प प्रा. सखाराम कर्डिले महाराज, प्रा. शिवाजीराव बारगळ, माजी प्राचार्य श्री.ए.डी. पोटघन,माजी मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण, दगडू शिंदे, लेविन भोसले, कारभारी वाघ इत्यादींनी चर्चेत भाग घेतला. सुखदेव सुकळे यांनी साने गुरुजी यांचा खडतर जीवनप्रवास सांगून भारतीय संस्कृतीचा आदर्श म्हणजे शिक्षक साने गुरुजी होते. मंदिर प्रवेश, शेतकरी आंदोलन, तुरुंगवास, समाजवादी विचारधारा, विविध उपक्रमांची माहिती सुकळेसरांनी सांगून आंतरभारती शाखेने आपले कार्य वाढवावे म्हणून ११११ रुपये देणगी दिली. प्राचार्य टी.ई. शेळके यांनी साने गुरुजी यांची साहित्यसंपदा आणि आंतरभारती संकल्पना विद्यार्थी आणि उगवत्या पिढीसमोर ठेवली पाहिजे. त्यांची देशभक्ती आणि समाजमूल्ये यांची शिकवण समजून घेतल्यास साने गुरुजींचा मोठेपणा कळेल. असे सांगून आपण सर्वजण त्यांच्या विचारांचा आदर्श प्रत्यक्ष कृतीत आणणे गरजेचे असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले.त्यांनी उपस्थितीतांना ग्रंथसंवाद पुस्तके भेट स्वरूपात देऊन वाचन संस्कृतीला घरोघरी प्रतिष्ठा लाभावी अशी अपेक्षा व्यक्त केली. शाखेचे सचिव लेविन भोसले यांनी आभार मानले. - वृत्त विशेष सहयोग, पत्रकार राजेंद्र देसाई वडाळा महादेव

कारेगांव येथे दिव्यांग मतदार प्रबोधन मेळावा गौरवास्पद- नोडल अधिकारी धीमते


कारेगांव येथे दिव्यांग मतदार प्रबोधन मेळावा गौरवास्पद- नोडल अधिकारी धीमते

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
आसान दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून जिल्ह्यातील दिव्यांगांना सक्षम बनवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य आपण करत आहात. सर्वसाधारण नागरिक मतदार मतदान न करता सुट्टी चा आनंद घेतात.परंतु दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदार स्वयंस्फूर्तीने मतदान करून एकप्रकारे देशसेवाच करत आहेत.
            दिव्यांग व वयोवृद्धांकरिता विविध शासकीय योजना राबविण्यात येतात.परंतु त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी आसान दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात दिव्यांग योजना मेळावे निवडणूक कालावधी संपल्यानंतर घेतले जातील असे प्रतिपादन स्वीप नोडल अधिकारी तथा नायब तहसीलदार सौ.सुनिता धिमते यांनी आसान दिव्यांग संघटना शाखा उदघाटन आणि दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदार प्रबोधन अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
              अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर, आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र,जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग दिव्यांग कक्ष अहमदनगर, प्रांत कार्यालय निवडणूक शाखा श्रीरामपूर आणि मूकबधिर विद्यालय श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय कारेगांव यां ठिकाणी आसान दिव्यांग संघटना शाखा कारेगांव उद्घाटन आणि दिव्यांग व जेष्ठ नागरिक मतदार प्रबोधन अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
          कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.साधना चुडिवाल यांनी आज कारेगांव या गांवात आसान दिव्यांग संघटनेच्या शाखेचे उद्घाटन व मतदार जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्ताने आंपणाशी संवाद साधताना मनस्वी आनंद होत आहे आसान दिव्यांग संघटना हि दिव्यांगाच्या जीवनात आशावादी प्रकाश निर्माण करण्यासाठी सदोदित प्रयत्नशील आहे आंपण १००% मतदान करून सक्षम लोकशाही निर्माण करावी असे आवाहन केले.
       याप्रसंगी दिव्यांग व्यवस्थापन नोडल अधिकारी संजय साळवे यांनी दिव्यांगासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर असणाऱ्या सोयी सुविधा संदर्भात सविस्तर माहिती दिली.केंद्रप्रमुख अशोक विटनोर यांनी संस्था व संघटनेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड यांनी सामुहिक मतदार शपथविधी सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडला. याप्रसंगी अंध गायक विनोद कांबळे यांनी देशभक्तीपर गीत सादर केले
        कार्यक्रमासाठी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, जिल्हाध्यक्ष विश्वास काळे, खजिनदार सौ.साधना चुडिवाल, केंद्रप्रमुख अशोक विटनोर, स्वीप समन्वयक सागर माळी,अनुप खरात,मार्सिया सर,ज्ञानेश्वर जाधव,अमोल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
              आसान दिव्यांग संघटना शाखाध्यक्ष पदी महादेव कनगरे,उपाध्यक्ष शामराव बार्से, सचिव रामा इंगळे व संपर्क प्रमुख प्रशांत पटारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 
           कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय साळवे,वर्षा गायकवाड, महादेव कणगरे, शामराव बार्से,रामा इंगळे,महेंद्र दिवे,गंगाधर सोमवंशी, विश्वास काळे,चांगदेव वानखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुश्ताक तांबोळी यांनी केले तर आभार बाळासाहेब पटारे यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳....
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


Friday, November 8, 2024

पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवून गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढणार- खा. तटकरे



आ.कानडे हेच महायुतीचे
उमेदवार - राधाकृष्ण विखे पा.

आ.लहू कानडे यांचा
 प्रचार नारळ शुभारंभ

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवून गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी केले. तर आमदार लहू कानडे हेच महायुतीचे उमेदवार असल्याचे सांगत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. कानडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

    भैरवनाथनगर येथील महादेव मंदिरात आयोजित केलेल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांचा प्रचार नारळ शुभारंभ पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते व खा. तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, इंद्रनाथ थोरात, माजी सभापती नानासाहेब पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, अमृत धुमाळ, जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले, नितीन दिनकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

खा. तटकरे म्हणाले, शेतीचा सहकाराचा जिल्हा म्हणून अहील्यानगरची ओळख आहे. जिल्ह्याच्या पाणी प्रश्नासाठी पालकमंत्री विखे पाटील यांच्या मागणीनुसार पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवले जाईल. कारण २०० ते ३०० टीमसी समुद्राला वाया जाते ते वळविण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. राज्यातील महायुती सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली, साखरेचे धोरण घेतले, वीज माफी केली, लाडकी बहिण योजना केली, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्याला आर्थिक शिस्त लावल्याचे सांगत ते म्हणाले, स्वर्गीय गोविंदराव आदिक यांनी मतदारसंघात मोठी विकास कामे केली. त्यांच्या रूपाने सुसंस्कृत नेतृत्व तालुक्याने अनुभवले. श्रीरामपूर ते जनता सुसंस्कृत आहे. आ. कानडे यांच्या रूपाने तालुक्याला समंजसपणाचे नेतृत्व त्यांनी दिले आहे. विखे पाटील यांनी मनावर घेतले तर कानडे साहेब तुम्ही आमदार झाला. त्यांनी मनावर घेतले म्हणून मी येथे आलो. त्यामुळे तुम्ही मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेत जाणार असल्याचे खा. तटकरे म्हणाले.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, आ. कानडे यांची जबाबदारी आपली आहे. त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. त्याचा उपयोग त्यांनी निष्ठेने विकास कामांसाठी केला. परंतु त्यांची एक चूक झाली, प्रशासकीय कामाचा अनुभव असला तरी राजकीय अनुभव नव्हता, भलत्याच लोकांच्या नादी लागल्याने तुमचा घात झाला. परंतु त्यानिमित्ताने एक चांगला आमदार महायुतीला मिळाला. आ. कानडे हेच महायुतीचे उमेदवार असून श्रीरामपूर तालुक्यातील जनता काँग्रेसचे भूत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.


±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उद्देशून, तुम्ही माघारीच्या दिवशी नॉट रिचेबल होता. आता रिचेबल आहात. तुम्हाला जाहीर संगतो की, महायुतीचे उमेदवार लहू कानडे हेच आहेत. तुम्हाला आमचा पाठिंबा नाही, तुम्ही विश्वासघात केला, त्यामुळे क्षमा नाही, असे पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷


आ. कानडे म्हणाले, आपले तिकीट कापले जाईल, तुम्हाला हिरवळीतील साप या पद्धतीने चावतील, असे स्वप्नातही वाटले नव्हते. एवढा विश्वास घातकी अनुभव कोणाच्या वाट्याला येऊ नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री विखे खासदार तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपल्याला उमेदवारी दिली. कपटनीतीच्या माणसापासून दूर झालो, झाले ते बरच झालं, असे ते म्हणाले. आपण मतदार संघात १२०० कोटींचा निधी आणत विकास कामे केली. माहिती सरकारने शेतकरी कष्टकरी महिला यांच्यासाठी महत्त्वकांक्षी योजना राबविल्या. पालकमंत्री विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्यासाठी भेदभाव न करता मोठा निधी दिला. गावठाणसाठी जमिनी दिल्या. श्रीरामपूर शहरासाठी २५ एकर जमीन विनामूल्य दिली.

आ. कानडे यांनी सन्मानपूर्वक वागणूक दिल्याचे तसेच कोट्यावधी रुपयांची विकास कामे केल्याचे मतदारसंघातील मतदार सांगत आहेत. त्यामुळे तालुक्यात महायुतीसाठी पोषक वातावरण आहे. आ. कानडे यांचे तिकीट कापल्याने आम्हाला चांगला उमेदवार मिळाला असून तेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे अविनाश आदिक यावेळी म्हणाले. यावेळी कैलास बोर्डे, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, निलेश भालेराव यांची भाषणे झाली. भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे यांनी आभार मानले.

यावेळी अशोक कारखान्याचे माजी संचालक प्रा. कार्लस साठे, पोपटराव जाधव, बाळासाहेब मुंगसे, उद्योजक अंकुश कानडे, उपसभापती अभिषेक खंडागळे, जि. प. चे माजी अध्यक्ष मिस्टर शेलार, नानासाहेब शिंदे, शिवाजी गांगुर्डे, माजी नगरसेवक रवींद्र गुलाटी, राजेश अलग, मोहम्मद शेख, सलीम शेख, मुख्तार शहा, प्रकाश ढोकणे, विजय शेळके, मल्लू शिंदे, अल्तमश पटेल, जितेंद्र छाजेड, अशोक कानडे, गौतम उपाध्ये, केतन खोरे, शामराव निमसे, विनोद कोतकर, राधाकृष्ण आहेर, सतीश बोर्डे, सचिन जगताप, विष्णुपंत खंडागळे, राजेंद्र कोकणे, सुरेश पवार, दीपक निंबाळकर, दीपक कदम, विजय शेलार, सरपंच अशोक भोसले, सरपंच सागर मुठे, अमोल कदम, हरिभाऊ बनसोडे, बाबासाहेब कोळसे, सुरेश पवार, आबा पवार, नानासाहेब रेवाळे, विष्णुपंत बडाख, रमेश उंडे, रवींद्र मुरकुटे, विजय दवंगे, पी. एस. निकम, रवी गायकवाड, सचिन ब्राह्मणे, सुभाष त्रिभुवन, भीमा बागुल, अजय खिलारी, अनिल बिडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रतिनिधी विश्वनाथ आवटी, सुनील थोरात, विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकाल, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे, श्रीकांत दळे, भागचंद औताडे, सुधाकर बोंबले, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, माजी नगरसेवक नजीर मुलानी, तालुका युवक उपाध्यक्ष ॲड. संदीप चोरगे, युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख, सागर कुऱ्हाडे, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, वनिता खोसरे, सुप्रिया धुमाळ, मंगल व्यवहारे, महिला तालुकाध्यक्ष मंदाताई गवारे, युवती जिल्हाध्यक्ष प्रियंका जनवेजा, रुबीना पठाण यांच्यासह श्रीरामपूर शहर तालुका व राहुरी तालुक्यातील 32 गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================