राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, November 25, 2024

श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत हिवाळी क्रीडा महोत्सवास उत्साहात प्रारंभ


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामशेठ टेकावडे यांच्या प्रेरणेने एज्युकेशन सोसायटी संस्थे अंतर्गत सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ दरम्यान सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन दैनिक राष्ट्र सह्याद्री संपादक करण नवले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे खजिनदार जन्मजय टेकावडे,पुरुषोत्तम बुब,ॲड. दादासाहेब औताडे,सुरेश ओझा,माजी प्राचार्य सुभाष गोरे ,सौ उषाताई मुंदडा ,सौ. संगीता कासलीवाल,सौ. रेखा घाटे,प्रा. दत्तात्रय घोगरे, प्रा. पोडघन,प्रा. करंदीकर यांच्यासह पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धा बरोबरच मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहेत. हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट,व्हॉलीबॉल खो-खो,कबड्डी,रस्सीखेच या सांघिक खेळांसह १०० मीटर धावणे,२०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे,लांब उडी,उंच उडी गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक यांच्यासह चित्रकला स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,संगीत स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज,श्रीराम अकॅडमी, एज्युकेशन सोसायटी प्राथमिक आणि माध्यमिक स्कूल या चार शाळा सहभागी होणार आहेत. ३० नोव्हेंबर रोजी या हिवाळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा न्यू इंग्लिश स्कूल येथे संपन्न होणार आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Sunday, November 24, 2024

अजमत इक्बाल यांच्या "अधुरी तखलिक" या पौराणिक कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन संपन्न


- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 जागतिक उर्दू दिवस डॉ. अल्लामा इक्बाल जयंती दिनानिमित्त मखदूम एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कौमी एकता सप्ताह मध्ये अजमत इक्बाल यांच्या " अधुरी तखलिक"(अपूर्ण निर्मिती) या कथासंग्रहाचे तांबोली हज टूर्सचे संचालक हाजी शौकतभाई तांबोली , आयटीआय चे प्राचार्य खालीद जहागिरदार, रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, प्रा.डॉ. महबूब सय्यद सर, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ. कमर सुरुर, सल्लागार शरफुद्दीन शेख यांच्या हस्ते पुन: प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी मालेगावचे प्रसिध्द शायर डॉ.नईम अख्तर, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद खलील, सचिव निसार बागवान आदी उपस्थित होते. 
शहरातील रेहमत सुलतान हॉलमध्ये झालेल्या या दिमाखदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मालेगावहून आलेले कवी डॉ.नईम अख्तर होते. या सोहळ्यात अहमदनगर शहरातील सामाजिक,राजकीय, शैक्षणिक उपक्रम आणि संस्थांशी निगडित अनेक दिग्गजांनी सहभाग घेऊन सोहळ्याची प्रतिष्ठा वाढवली. शहर आणि राज्याबाहेरील कवींनी श्रोत्यांसमोर आपली शायरी सादर करून दाद आणि वाह वाही मिळवली.डाँ.कमर सुरुर यांनी लेखक अजमत इक्बाल यांचा सविस्तर परिचय करून दिला. अहमदनगर शहरात प्रथमच उर्दू कथासंग्रहचे प्रकाशन होत असल्याचे स्पष्ट केले. अहमदनगर शहरातील साहित्य वर्तुळ आणि श्रोत्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे की या शहरातून या संग्रहाची पहिली आवृत्ती शेजारच्या देशात प्रेस फॉर पीस पब्लिकेशनने प्रकाशित केली होती.
पुस्तकाचे लेखक अजमत इक्बाल यांनी आपली कहाणी अनोख्या पद्धतीने रसिकांसमोर मांडली. सभागृहात मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. अजमत इक्बाल यांनी सादर केलेली कथा श्रोत्यांनी केवळ उत्साहाने ऐकली नाही तर कथेबद्दल कौतुकही व्यक्त केले. अजमत इकबाल यांनी मान्य केलेल्या किमतीत पौराणिक संग्रह मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आला. अजमत इकबाल यांनी मखदूम एज्युकेशनल सोसायटी आणि विशेषत: आबिद खान आणि कमर सुरूर यांचे आभार मानले. कविते सारख्या शैलीतील उर्दू साहित्याच्या पुनर्प्राप्तीसाठी कल्पित लेखनाच्या कलेकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. अहमदनगर शहरातील अत्याधुनिक वाचक काल्पनिक कथांना आपल्या अभ्यासाचा भाग बनवतील अशी आशा व्यक्त केली. मालेगाव शहरातील चित्रकार अली इम्रान यांनी या कार्यक्रमात केवळ सहभाग घेतला नाही तर स्वत:च्या हाताने तयार केलेले कमर सुरूर यांचे चित्रही सादर केले. अली इम्रानच्या पेंटिंगला स्टेजवरील पाहुणे आणि प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. सोहळ्याच्या दुसऱ्या भागात निमंत्रित कवींनी आपली शायरी सादर केली. 
अध्यक्षीय भाषणात डॉ.नईम अख्तर यांनी अजमत इक्बाल यांच्या कथालेखनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आणि शुभेच्छा व्यक्त केल्या.या कार्यक्रमात प्रेक्षक रात्री उशिरापर्यंत आपापल्या जागेवर खिळून राहिले. या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अहमदनगरच्या नागरिकांच्या वतीने आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले .

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

पराभवाने खचून न जाता अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार अविनाश आदिक यांना विधान परिषदेवर घेण्याची एकमुखी मागणी




महायुतीच्यावतीने आभार सभेत
कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या भावना

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार लहू कानडे यांना मत विभागणीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले. असे असले तरी पराभवाने खचून न जाता आगामी निवडणुकांमध्ये एकजुटीने व अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक यांना विधानसभेवर घेण्यात यावे, अशी एकमुखी मागणी अनेक वक्त्यांनी यावेळी केली.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी आज काँग्रेस भवन येथील बॅरिस्टर रामराव आदिक सभागृहात महायुतीच्यावतीने विचारविनिमय करण्यासाठी तसेच आभार व्यक्त करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक अध्यक्षस्थानी होते. यावेळी अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, ज्येष्ठ नेते अजित कदम, अमृत काका धुमाळ, जि. प.चे माजी सभापती शरद नवले, बाळासाहेब तोरणे, आदिवासी संघटनेचे शिवाजी गांगुर्डे, माजी नगरसेवक रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, मुक्तार शहा, राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, बाबासाहेब खोसरे, सलीम शेख, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, अनिता ढोकणे, वेनुनाथ कोतकर आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४१ जागा मिळाल्या आहेत. अजून आपली जागा मिळाली असती तर श्रीरामपूरचे चित्र बदलले असते. आता पुन्हा ५ वर्ष तालुका बाजूला पडणार आहे. आमदार लहू कानडे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली. काम करूनही त्यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. असे असले तरी श्रीरामपूरचे प्रश्न चौथ्या क्रमांकावर असणारेच सोडविणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीरामपूरसाठी ३ हजार कोटी रुपये निधी देण्याचे शब्द दिला आहे. आगामी काळात तो निधी आणून विकासकामे करू, नवीन आमदाराने मागणी केल्यास त्यांनाही मदत करू, पराभवाने खचून न जाता संघटना वाढीसाठी प्रयत्न करू असे अविनाश आदिक यावेळी म्हणाले.

अशोक कानडे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार आले ही आपली जमेची बाजू आहे. त्यामुळे कोणत्याही प्रश्नासाठी हतबल होण्याचे कारण नाही. सहकाऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या सुखदुःखात, त्यांच्या प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहू, संघटना ही आपली मोठी ताकद आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीने उभे राहून आपली ताकद दाखवून देऊ. अविनाश आदिक यांना विधान परिषदेवर घेवून अजित पवार निश्चितपणे न्याय देतील, त्यामुळे कोणीही खचून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

विधानसभा निवडणुकीत `गड आला पण सिंह गेला` अशी स्थिती निर्माण झाली असली तरी राज्यात महायुतीचे सरकार आल्याने कोणतीही अडचण येणार नाही. स्व. गोविंदराव आदिक यांनी तालुक्याचे विकासाचे स्वप्न पाहिले तीच दूरदृष्टी ठेवून आ. कानडे यांनी मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची कामे केली. परंतु काहींनी महायुतीचा धर्म पाळला नाही. निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अविनाश आदिक यांनी तसेच कार्यकर्त्यांनी मोठे कष्ट घेतले. आगामी निवडणुकीतही एकत्रपणे काम करून पराभवाचा वचपा काढू, असे अरुण नाईक यावेळी म्हणाले.

दहा वर्षानंतर आ. कानडे यांच्या रूपाने मतदारसंघासाठी प्रतिभासंपन्न उमेदवार मिळाला होता. प्रशासकीय कामाच्या अनुभवामुळे अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली. वातावरण चांगले होते. विजयाची खात्री होती. मात्र शेवटच्या दोन दिवसात वातावरण बिघडून आत्मघात झाला. असे असले तरी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४१ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे विकासात कुठलाही खंड पडणार नाही. आगामी काळात पक्ष संघटना वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करावा, असे आवाहन अजित कदम यांनी केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, शरद नवले, अमृत काका धुमाळ, कैलास बोर्डे, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, मुक्तार शहा, प्रकाश ढोकणे, विष्णुपंत खंडागळे, बाबासाहेब कोळसे, रिपब्लिकन पक्षाचे सुभाष त्रिभुवन, निलेश भालेराव, प्रा. कार्लस साठे, भागचंद औताडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे, देवा कोकणे यांची यावेळी भाषणे झाली. तालुका युवक उपाध्यक्ष ॲड. संदीप चोरगे यांनी आभार मानले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रतिनिधी विश्वनाथ आवटी, सुनील थोरात, विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकाल, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, युवक प्रदेश सरचिटणीस फारुक पटेल, युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख, महिला तालुकाध्यक्ष मंदाताई गवारे, युवती जिल्हाध्यक्ष प्रियंका जनवेजा, रुबीना पठाण, सतीश बोर्डे, सचिन जगताप, सरपंच अशोक भोसले, सागर मुठे, शिवाजी पवार, रमेश आव्हाड, राजेंद्र ओताडे, मदन हाडके, अमोल आदिक, हरिभाऊ बनसोडे, युनुस पटेल, चंद्रसेन लांडे, प्रा. एकनाथ ढोणे, तुकाराम चिंधे, राजेंद्र कोकणे, आबा पवार, नानासाहेब रेवाळे, सुरेश पवार, अजिंक्य उंडे, दिपक कदम, राधाकृष्ण तांबे, अण्णासाहेब ढोणे, अण्णासाहेब वडीतके, सुमित मुथ्था, सारंगधर पवार, अक्षय नाईक, रवी राजुळे, मधुकर ठोंबरे, भाजपचे प्रफुल्ल डावरे, मुश्ताक शेख, दादासाहेब कुताळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



*चौकट*

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे यांनी यावेळी अविनाश आदिक यांना विधानपरिषदेवर घ्यावे, या मागणीचा ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात साथ दिली. त्यानंतर अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून अविनाश आदिक यांना विधानपरिषदेवर घेण्यात यावे, अशी मागणी केली. अरुण नाईक यांनी, राज्यात महायुतीचे सरकार आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला, उपस्थितांनी टाळ्या वाजवून या ठरावास संमती दिली. विधिमंडळ पक्षनेते पदाच्या निवडीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावून घेतल्याने माजी आमदार लहू कानडे मुंबईला गेले असल्याची माहिती श्री. आदिक यांनी यावेळी दिली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Friday, November 22, 2024

राष्ट्रवादीच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी अल्तमश जरीवाला यांची निवड


- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष अल्पसंख्यांक विभागाच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी अल्तमश जरीवाला यांची निवड प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांनी केली आहे. 
श्री.जरीवाला यांचा पक्ष बांधणी मध्ये महत्वाचा वाटा आहे. सदर कामाची पावती म्हणून शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर व जिल्हा अध्यक्ष अतहर खान यांनी श्री.जरीवाला यांच्या निवडीसाठी पक्षाकडे पाठपुरावा केला होता. सदर निवडीत खा. निलेश लंके यांनी सकारात्मक भूमिका घेत निवडी साठी सकारात्मक प्रतिसाद दिला.
अल्तमश जरीवाला यांनी समाजातील विविध प्रश्नांसाठी खास करून पीरशाह खुंट भागात त्यांनी पाण्याचे, रस्त्याचे,ड्रेनेज लाईनच्या कामासंदर्भात नेहमीच अग्रेसिव भूमिका घेत प्रशासनाकडे धरणे आंदोलन करून समस्यांचे निवारण केले आहे तसेच इतर ठिकाणी सर्व समाजाच्या सामाजिक प्रश्नांसाठी नेहमी पुढाकार घेत ते सोडविण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. 
सदर निवडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,माजी आमदार दादाभाऊ कळमकर, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष अथर खान, उपाध्यक्ष समीर पठाण, युवक अध्यक्ष रोहन शेलार, शहर उपाध्यक्ष बाबू कुरेशी, भाऊ खंडागळे, नूर कुरेशी, सोहेल खान,असीर शेख आदींनी स्वागत केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, November 20, 2024

विद्यानिकेतनमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता 
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त नुकताच बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य विनोद रोहमारे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले. 
         दरम्यान चि.रक्षित सोळंकी (इ.पाचवी) याने आपले मनोगत व्यक्त केले, तर संगीत शिक्षक दिपक वाघ यांनी उपस्थितांसमोर बालपणातील भावविश्व उलगडणारे गीत सादर केले. तसेच इ.पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांचे मनोरंजनपर शाब्दिक खेळ घेण्यात आले. व इ.पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक चित्रपट दाखविण्यात आला.
 यावेळी सहशिक्षिका ज्योती खंडागळे,गायत्री तांबे, नम्रता फोपसे,साक्षी भणगे,विजेता व्यवहारे,अजय आव्हाड यांनी विनोदी गीतगायन सादर करून, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. दरम्यान विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
         यावेळी कार्यक्रमास विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई.शेळके, व्हा. चेअरमन डॉ.प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ.राजीव शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन सुनंदा थोरात यांनी केले,तर आभार नम्रता फोपसे यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
शंकर बाहूले (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Tuesday, November 19, 2024

प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखु (गुटखा) विक्री करणारा आरोपी जेरबंद



प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखु (गुटखा) विक्री करणारा आरोपी जेरबंद

०६,२९,०१२/- रू. किं. मुद्देमाल जप्त

- नाशिक - प्रतिनिधी -/ माजिद खान -
दि. १६/११/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या व पो.नि. सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली कि, प्लॉट नं. १६, रो-हाऊस मस्जिद ए हसन, श्रीकृष्ण अपार्टमेंट शेजारी, अशोका मार्ग, खोडेनगर, नाशिक येथे इसम नामे इम्तीयाज जाफर तांबोळी, वय- ३८ वर्षे, रा- प्लॉट नं. १६, रो-हाऊस मस्जिद ए हसन, श्रीकृष्ण अपार्टमेंट शेजारी, अशोका मार्ग, खोडेनगर, नाशिक हा त्याचे ताब्यातील वाहन क्रमांक एम. एच. ०५ बी. एल. २०४० हिच्या मध्ये व त्याचे रहाते घराचे पार्किंगमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्री, साठा, वितरण, उत्पादन व वाहतूक करणेसाठी प्रतिबंधित व मानवी सेवनास अपायकारक असलेला सुंगधित पान मसाला याची विक्री करत असल्याचे माहिती मिळाल्याने, सदर आरोपी यास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी स्वत:चे कौशल्य वापरून शिताफिने पकडुन त्याचे ताब्यात ०२,२९,०१२ /- रूपये किंमतीचा प्रतिबंधित व मानवी सेवनास अपायकारक असलेला सुंगधित पानमसाला विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने सदरचा प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखु असा व वाहन असे एकुण ०६,२९,०१२/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर इसमाविरूद्ध भा.न्या.सं.२०२३ चे कलम २२३, २७४, २७५, १२३, ३ (५) सह अन्न व सुरक्षा अधिनियम कलम २६ (२) (iv) कलम २७ (३) (९) सहवाचन कलम ३(१)(zz)(iv) शिक्षापात्र कलम ५९ प्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे, नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास मुंबई नाका पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त सो, मा. श्री. प्रशांत बच्छाव, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा.श्री. संदीप मिटके, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे वपोनि. सुशिला कोल्हे, स.पो.नि. सचिन चौधरी, स.पो.नि. विशाल पाटील, स.पो.उ.नि. रंजन बेंडाळे, स.पो.उ.नि. देवकिसन गायकर, स.पो.उ.नि. संजय ताजणे, पो. हवा. १७४९ भारत डंबाळे, पो. हवा. १७३१ बळवंत कोल्हे, पो. अं. ८६९ अनिरुध्द येवले, पो. अं.२३३० अविनाश फुलपगारे, पो. अं/ २४२५ योगेश सानप, पो. अं. २४३२ बाळासाहेब नांद्रे, पो. अं. २४३३ चंद्रकांत बागडे, म. पो. शि.२३६६ अर्चना भड यांनी कामगिरी केलेली आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, November 18, 2024

वरचढ होईल मुख्यमंत्री केलं तर म्हणून अजित पवारांना पण...भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट


- मुंबई - प्रतिनिधी - / वार्ता - 
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, 
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केलं आहे. २००४ साली महाराष्ट्राचे नेतृत्व छगन भुजबळ यांच्याकडे दिले असते तर राज्याची अवस्था चिंताजनक झाली असती असं विधान शरद पवार यांनी केला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री केल्यावर वरचढ होतात म्हणून त्यांनी मला मुख्यमंत्री केले नसल्याचा पलटवार छगन भुजबळ यांनी केला आहे. तर शिवसेना फोडण्याचे चांगले कामसुद्धा शरद पवार यांनी केल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.
२००४ मध्ये भुजबळांकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती असा दावा शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान केला. छगन भुजबळांना नंतर तुरुंगात जावं लागलं, असेही शरद पवारांनी म्हटलं. शरद पवारांनी केलेल्या दाव्यावरछगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पत्रकार परिषदेदरम्यान छगन भुजबळ यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. 

"सुधाकर नाईक आणि शरद पवारांचे मतभेद झाले. त्यांच्या टोकाचे मतभेद झाले होते. त्यावेळी नरसिंहराव यांनी त्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं. त्यांना असं वाटत असावं की आपण कोणालाही मुख्यमंत्री केलं तर ते आपल्या वरचढ होतात. म्हणून कोणालाच मुख्यमंत्री न केलेलं बरं‌. त्यांनी ना अजित पवारांना ना आर आर पाटलांना किंवा छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं नाही. शरद पवार कधीपासून ज्योतिष्य पाहायला लागले कधीपासून भविष्यात भुजबळांचे काय होणार आहे हे तुम्हाला कळायला लागले," छगन भुजबळांनी म्हटलं.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================