राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, December 2, 2024

पोलीस उपनिरीक्षक अमोल गोविंदराव पवार यांची नाशिक परीक्षेत्र येथे बदली


- शेवगांव - प्रतिनिधी -/ वार्ता -
गेल्या दिड वर्षापासून शेवगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल गोविंदराव पवार यांची नुकतीच नाशिक परिक्षेत्र येथे बदली झाली. शांत संयमी आणि मितभाषी असे व्यक्तिमत्त्व पवार यांचे होते. पीएसआय अमोल पवार यांचे कामकाज अत्यंत जवळून पाहिले सुरुवातीच्या काळामध्ये वैयक्तिक कौटुंबिक अडचणी असताना देखील वरिष्ठांनी सांगितलेल्या कुठल्याही कामाला नाही हा शब्द त्यांच्याकडून ऐकायला मिळाला नाही. दिलेले काम त्यांना जमेल किंवा नाही जमेल हा पुढचा विषय असायचा परंतु तात्काळ हो सर मी हे काम करतो असं बोलून कामाला सुरुवात करायचे. दरम्यानच्या कालखंडात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि प्रभारी अधिकाऱ्यानंतर फक्त पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे एकमेव अधिकारी शेवगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी राहिले. त्यावेळी प्रचंड कामाचा लोड आणि अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीचा निर्णय घेणे या गोष्टीला ते सामोरे गेले. याच दरम्यान अचानक दुःखाचा डोंगर देखील कोसळा वडील पोलीस विभागामध्ये कार्यरत होते परंतु दीर्घ आजारपणामुळे आजारी रजेवर होते.आणि या आजाराशी झुंज देत त्यांचे निधन झाले. त्यावेळी पवार साहेब कर्तव्य बजावत होते आणि अशातच साहेबांच्या बंधूंचा फोन आला की वडिलांचे निधन झाले. एक क्षण काही सुचत नव्हते तात्काळ अंत्यविधीसाठी साहेब पाचोर्‍याला रवाना झाले.यावेळी एका गोष्टीचे विशेष वाटले आपल्या वडिलांच्या अंतिम क्षणाला देखील साहेब उपस्थित राहू शकले नाही.तेव्हा समजले पोलीस विभाग असेल किंवा सेनादल असेल या ठिकाणी काम करत असताना आपले आई-वडील पत्नी मुलं मुली बहीण भाऊ सर्व नाते एका बाजूला ठेवून देशाची सेवा करावी लागते. शेवगाव पोलीस स्टेशन येथे काम करत असताना सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांचा समन्वय ठेवण्यात त्यांचा चांगलाच हातखंडा होता. शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केटच्या घोटाळा संदर्भातील सर्वप्रथम आरोपीला अटक करण्यात साहेबांना यश आले आणि त्यापुढे अनेक आरोपी अटक होत गेले. तक्रारदार ज्यावेळेस पोलीस स्टेशनला येतो तर त्याच्याकडे आपुसकीने चौकशी करणारे पहिलेच अधिकारी मी बघितले.पोलीस खात्यात अधिकारी म्हटलं की प्रचंड ताण-तणाव आणि प्रचंड रागवा रागव, आरडा ओरडा, ही परिस्थिती बघायला मिळाली परंतु डोक्यावर बर्फ आणि हातात साखर ठेवून काम करणारे पहिलेच अधिकारी प्रथमच पोलीस स्टेशनला लाभले. पोलिसांशी मैत्री म्हटलं की *हौशे नऊशे गावशे* असे सगळेच अधिकाऱ्यांच्या अवतीभवती फिरत असतात. परंतु या सर्व लोकांना साहेबांनी कल्पना दिली होती. की कायदा हा सर्वांना समान आहे कितीही जवळचा मित्र असला आणि कायद्याने तो गुन्हेगार असेल तर मी त्याला कायद्याच्या चौकटीतच उभे करणार. 

*शेवगाव पोलीस स्टेशन येथे परि. आयपीएस अधिकारी बी.चंद्रकांत रेड्डी,उपविभागीय पोलीस अधीकारी सुनिल पाटील पोलिस निरीक्षक विलास पुजारी,पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे पोलीस निरीक्षक समाधान नागरे सह. पोलीस निरीक्षक दिपक सरोदे सह. पोलीस निरीक्षक आशिष शेळके सह.पोलीस निरीक्षक प्रशांत कांढरे सह.पोलीस निरीक्षक अनिल बागुल सह. पोलीस निरीक्षक महेश माळी सह. पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे पोलीस उपनिरीक्षक भास्कर गावंडे, पोलीस निरीक्षक नीरज बोकील पोलीस निरीक्षक विशाल लहाणे इत्यादी अधिकाऱ्यांसोबत अमोल पवार यांना शेवगाव पोलीस स्टेशनला असताना काम करण्याची संधी मिळाली*
आशा कर्तव्यनिष्ठ आणि कार्यतत्पर पोलीस अधिकाऱ्यास मानाचा मुजरा


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
प्रा.अजय नजन (सर) शेवगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Sunday, December 1, 2024

काचोळे विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी लुटला 'आनंद बाजारचा' आनंद



- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील रयत शिक्षण संस्थेचे डी डी काचोळे माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर येथे आदरणीय मीनाताई जगधने मॅनेजिंग कौन्सिल सदस्या रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली 'आनंद बाजार' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते, थोर देणगीदार, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष श्री गणेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक सुनील साळवे, पर्यवेक्षक बाळासाहेब रासकर सर हे उपस्थित होते.
         विद्यार्थ्यांना याप्रसंगी संबोधित करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे म्हणाले की, विद्यार्थ्यांना समाजाची ओळख ही खरी बाजारातूनच होत असते. दुकान कोणत्या मालाची लावावी, तो किती खरेदी करावा म्हणजे तेवढा बाजारात विकला जाईल, त्याचे दर कसे निश्चित करावे, त्याचबरोबर ग्राहकांबरोबर व्यवहार कसा करावा, गणिती क्रिया, माणसांची ओळख, स्वभाव, शेवटी नफा झाला की तोटा होतो व तो किती, व पुढच्या वर्षी आलेल्या अनुभवातून आपल्याला नवीन काय करता येईल इथपर्यंत विद्यार्थी विचार करतात. हे विद्यार्थ्यांना आनंद बाजार या संकल्पनेतून समजते. 
            विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल्स आनंद बाजार मध्ये लावले. त्याचबरोबर खाद्यपदार्थ स्टॉल, भाजीपाला स्टॉल, फळ विक्री, चायनीज पदार्थ, चहा, नाश्त्याचे पदार्थ, पेय, सँडविच, भेळ चिप्स, मेकअपचे साहित्य, पतंग, विविध खेळण्या यासारखे अनेक स्टॉल्स आनंद बाजारात उपलब्ध होते.
     सर्व विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यालयावर प्रेम करणारे अनेक नागरिक यांनी आनंद बाजारचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांना यातून प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव मिळाला विद्यार्थ्यांचा उत्साह आनंद ओसंडून वाहत होता.
      आनंद बाजार या उपक्रमाचे कौतुक करताना पालकांनी विद्यालयाचे कौतुक तर केलेच मात्र विद्यार्थ्यांना यातून जीवनाचा प्रत्यक्ष आनंद मिळाला तसेच व्यवहारात ज्ञान मिळाले. असे उपक्रम विद्यालयांमध्ये आयोजित केले जातात ही विद्यार्थ्यांसाठी ज्ञानप्राप्तीची पर्वणीच आहे अशा शब्दात आपल्या प्रतिक्रिया व समाधान व्यक्त केले.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================
बा./जा.संपर्क क्र. 9561174111

शब्दगंधच्या पाथर्डी शाखेची बैठक संपन्न


- वजीर शेख - पाथर्डी -/ वार्ता -
साहित्य क्षेत्रात नवोदितांसाठी विविध उपक्रम राबवणारी शब्दगंध ही साहित्यिक संस्था असून लिहित्या हातांना बळ देण्याचे काम शब्दगंध च्या माध्यमातून होत आहे, त्यामुळे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे सभासदत्व नवोदितांनी स्वीकारावे*, असे आवाहन माजी प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे यांनी केले.
         शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य च्या पाथर्डी तालुका शाखेची बैठक शाहीर भारत गाडेकर यांच्या निवासस्थानी नुकतीच पार पडली. त्यावेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अशोक दौंड, राज्य कार्यकारिणी चें उपाध्यक्ष भारत गाडेकर, बंडूशेठ दानापुरे उपस्थित होते. 
पुढे बोलताना प्राचार्य डॉ. ढाकणे म्हणाले की, नवोदितांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम शब्दगंध च्या वतीने होत असून पाथर्डी शाखेच्या वतीने जास्तीत जास्त उपक्रम राबवले जात आहेत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कारण शब्दगंध हे पाथर्डी - शेवगावकरांच्या अस्मितेच सांस्कृतीक प्रतीक आहे. 
प्राचार्य दौंड यावेळी बोलताना म्हणाले की, प्रत्येक माणसाला साहित्यिक, सांस्कृतिक भूक असते, आणि ती भूक भागवण्याचे काम पाथर्डी तालुका शाखेच्या वतीने होत आहे, त्यामुळें नवीन लिहिणाऱ्यांनी, साहित्याची आवड असणाऱ्यांनी या चळवळीत सहभागी होणे आवश्यक आहे.
   पाथर्डी तालुका शाखेचे अध्यक्ष डॉ.अनिल पानखडे यांनी गेल्या तीन वर्षात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन अहवाल सादर केला.
' पुढील आठवड्यात नवीन कार्यकारणी तयार करण्यात येणार असून यामध्ये नव्या जुन्यांचा संगम करण्यात येईल, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी संस्थापक सचिव सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे त्यावेळी उपस्थित असतील, असे शाहिर भारत गाडेकर यांनी सांगितले. यावेळी हाजी हूमायून आतार,शशिकांत गायकवाड, डॉ. राजकुमार घुले, महादेव कौसे, भाऊसाहेब गोरे, चंद्रकांत उदागे,राजेंद्र उदारे यांच्यासह तालुका शाखेतील सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. 
हुमायून आतार, डॉ अनिल पानखडे यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी चंद्रकांत उदागे यांनी आभार मानले.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================


Saturday, November 30, 2024

पत्रकारांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवणार – आमदार डॉ. किरण लहामटे


पत्रकारांच्या मागण्यांना नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांचा पाठिंबा !

- अकोले - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांना अकोले येथे सादर करण्यात आले. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमदार डॉ. लहामटे यांनी दैनिक समर्थ गांवकरी कार्यालयाला भेट दिली. या भेटीच्या वेळी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी त्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पेढे देऊन स्वागत केले आणि पत्रकारांच्या समस्यांबाबतचे निवेदन त्यांना सादर केले.

*पत्रकारांच्या मागण्या आणि महामंडळ स्थापना:*
पत्रकार संघाने सादर केलेल्या निवेदनात पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापणा लवकरात लवकर करण्याची मागणी केली ती पूर्ण झाली वृत्तपत्र विक्रेत्यांचे महामंडळ झाले तरी अजून २२ मागण्या प्रलंबित असून त्या तातडीने सभागृहात आवाज उठवावा या महामंडळाद्वारे पत्रकारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा आग्रह आहे. यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांच्या सुरक्षेच्या उपाययोजना, आर्थिक सहकार्य, विमा संरक्षण, तसेच त्यांच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा समावेश आहे.

यावेळी पत्रकार संवाद यात्रेचे माहिती पुस्तकही डॉ. लहामटे यांना सुपूर्त करण्यात आले. पत्रकार संघाच्या या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत डॉ. लहामटे म्हणाले, “पत्रकार समाजाचा महत्त्वाचा घटक आहेत. ते समाजाला योग्य माहिती देण्याचे कार्य करत असतात. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत.” यावेळी डॉक्टर लहाने यांनी राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क करून राज्यातील सर्व प्रश्न पत्रकारांचे सभागृहात मांडणार असा विश्वास दिला

*ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी विशेष योजना:*
या संदर्भात बोलताना आमदार डॉ. किरण लहामटे यांनी पत्रकारांच्या समस्यांवर विधानसभेत आवाज उठवण्याचा आश्वासक शब्द दिला.
राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन आणि विधानसभेत पत्रकारांचे हक्क, सुरक्षा आणि कल्याणाच्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणण्याचा निर्धार केला आहे, असे लहामटे म्हणाले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर यशस्वीपणे राबवलेल्या अभियानाचे त्यांनी कौतुक केले. डॉ. लहामटे यांनी पत्रकारांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा दर्शविताना, विशेषत: ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी नवीन योजना तयार करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी “लाडका पत्रकार” नावाची योजना राबविण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्याची ग्वाही दिली. याशिवाय, प्रत्येक ग्रामपंचायत आणि शाळेत वर्तमानपत्र खरेदीसाठी दरमहा दहा हजार रुपयांची तरतूद करण्याची मागणीही त्यांनी मान्य केली.

*पत्रकार सुरक्षेसाठी प्रयत्न:*
डॉ. विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांच्या सुरक्षेबाबतच्या अडचणी मांडल्या. त्यांनी पत्रकारांसाठी आर्थिक सहाय्य, जीवन आणि आरोग्य विमा, तसेच पेन्शन योजना लागू करण्याची आवश्यकता स्पष्ट केली. डॉ. लहामटे यांनी या विषयांवर लक्ष केंद्रित करत विधानसभेत पत्रकारांच्या समस्यांसाठी आवाज उठवण्याचे आश्वासन दिले.

*प्रतिनिधींचे समाधान:*
या भेटीवेळी अकोले ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार मैड, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सचिव हरिभाऊ फापाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय आभाळे, तसेच रेडे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत बंदावणे एलआयसीचे सल्लागार जीवन पाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी आमदार डॉ. लहामटे यांच्या पाठिंब्याबद्दल समाधान व्यक्त केले.

*पत्रकारांच्या हितासाठी पुढील वाटचाल:*
या चर्चेत पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षा आणि त्यांच्या समस्यांवर सखोल चर्चा झाली. पत्रकार संघाच्या मागण्यांना राजकीय स्तरावर पाठिंबा मिळाल्याने भविष्यात पत्रकारांच्या कल्याणासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

अकोले येथे झालेल्या या महत्वपूर्ण चर्चेमुळे पत्रकारांच्या समस्या ऐरणीवर आल्या असून, त्यावर उपाययोजना करण्यासाठी राजकीय स्तरावर हालचाली होणार आहेत. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या पाठिंब्यामुळे पत्रकारांच्या मागण्यांना शासनाकडून लवकरात लवकर प्रतिसाद मिळेल, अशी आशा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने व्यक्त केली आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================

सदैव विद्यार्थीहित पाहणारा प्राध्यापक डॉ. विलास महाले


३० नोव्हेंबर - सेवानिवृत्तीच्या निमित्ताने

मैत्रीच्या दुनियतेला एक राजा माणूस, कायम विद्यार्थीहित पाहणारा प्राध्यापक आणि सहृदयी मित्र आणि अशी ओळख असलेले माझे परममित्र प्रा. डॉ. विलास महाले सर आज दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी आपल्या नियत वयोमानानुसार रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे उरण (रायगड) येथून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा !

शहरात जन्मलेली माणसं शहराइतकीच मनाने मोठी आणि अंतःकरणाने दिलदार असतात याचा प्रत्यय मला महाले सरांच्या रूपाने आला. उरणच्या फुंडे महाविद्यालयात त्यांनी उपप्राचार्य व ग्रामीण विकास या विषयाचे विभागप्रमुख म्हणून आपली जबाबदारी अतिशय यशस्वीपणे व प्रामाणिकपणे पार पाडली आहे. महाले सरांच्याबरोबर दहा वर्ष एक सहकारी म्हणून काम करण्याचा योग आला. एक प्राध्यापक म्हणून, एक सहकारी म्हणून, एक मित्र म्हणून त्यांचा स्वभाव नेहमीच दिलदार राहिला आहे.
सहा फूट दोन इंच उंची लाभलेले हे व्यक्तिमत्व कायम हसतमुख असे. आनंदीवृत्ती आणि सदैव सहकार्याची भूमिका हे त्यांचे लोभस गुण आम्हा सर्व सहकाऱ्यांना आजही तितकेच भावतात. कॉलेजमध्ये सर्वात अगोदर येणारा प्राध्यापक म्हणजे महाले सर. कॉलेजच्या स्थापनेपासून ते सेवानिवृत्तीपर्यंत त्यांना एकाच कॉलेजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अशी संधी अनेकांना लाभत नाही. पण महाले सरांना ती लाभली आणि त्यांनी या संधीचे सोनं केलं.आपल्या संपूर्ण ३५ वर्षांच्या सेवेत त्यांनी अध्यापनाचे व संशोधनाचे काम एक कर्तव्यदक्ष प्राध्यापक म्हणून आनंदाने केलेच. पण त्याहीपेक्षा संपूर्ण महालण विभागात त्यांची जिमखानाप्रमुख म्हणून असलेली ओळख फार मोठी आणि सन्मानाची आहे. कॉलेजच्या स्थापनेपासून ते सेवानिवृत्तीपर्यंत त्यांनी जिमखानाप्रमुख ही जबाबदारी अतिशय अभिमानाने सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी, खोखो, मॅरेथॉन, ॲथेलेटिक्स, कराटे, फूटबॉल अशा विविध क्रीडा प्रकारात १२५ हून अधिक सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व राज्य स्तरावर प्राप्त केली आहेत. राष्ट्रीय व राज्यस्तरावर क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळवलेली अनेक मुले आज रेल्वे पोलिस व लष्करी सेवेत नोकरीला आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात नेहमीच वीर वाजेकर महाविद्यालयाचा दबदबा व नावलौकिक त्यांनी खेळाच्या माध्यमातून वाढवलेला आहे.
महाले सर विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन ठेवून त्यांनी काम केले आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचे व कल्याणाचे निर्णय त्यांनी कायम घेतले आहेत. कधी कधी गरज भासल्यास पदरमोड करून त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला आहे. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरही सरांनी अनेक वर्ष काम केले आहे. तसेच अनेक पुस्तकांचे लेखन व संपादनही केले आहे. आज रायगड विभागातला अख्खा महालण विभाग त्यांना ओळखतो आहे. त्यांनी शिकवलेल्या पहिल्या बॅचच्या मुलांमुलींची मुले आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रॅज्युवेट करतात. याचा त्यांना भारी आनंद वाटतो.
शेवरीसारखा उंच असलेला हा माणूस शेवरीसारखाच सरळ आहे. मनाने निर्मळ आणि प्रेमळ आहे. मैत्रीचा बंध जोपासणारी आणि ती अतुट ठेवणारी त्यांची वृत्ती कायम मनाला भावते. कायम आनंदीस्वभाव असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर ना कधी ताण दिसतो ना कधी तणाव दिसतो. आमच्यासारख्या नव्या पिढीतल्या तरूणांना ते नेहमी धीर आणि आधार द्यायचे. कितीही आर्थिक मदत लागली तर त्यांचा हात नेहमी पुढे असायचा. कायम शहरी पोशाखात आणि रूबाबात राहणारा हा प्राध्यापक मित्र सर्वांच्या सुखदुःखात, कार्यक्रमात व समारंभात त्याच जाणिवेने सहभागी होत असे. जाणिवेची खोल जाणीव असलेला हा प्राध्यापक मित्र अजातशत्रू आहे.

महाले सर आपल्या कामाशी नेहमी प्रामाणिक असत. जे योग्य, नैतिक आहे त्यांच्या सोबत ते असत. अतिरेकी, अन्यायीवृत्ती त्यांना आवडत नसे. पण एखाद्याचा उपमर्द करून ते कधीच कोणाला बोलत नसत. म्हणूनच ते एक प्राध्यापक म्हणून, माणूस म्हणून दिलदार आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक विनोदाची किनारही आहे. एकमेकांच्यावर कोट्या करण्यात ते माहेर आहेत. पण ते तेवढ्यापुरतेच. मधल्या ब्रेकमध्ये चहाच्या वेळेस ते हमखास कोणावर तरी कोटी करायचे आणि मग आम्ही सगळेजण त्या हास्यरसात बुडून जायचो. मागील दहा वर्षातले असे अनेक प्रसंग आज डोळ्यासमोर उभे राहतात आणि मनाला स्तब्ध करून जातात.

महाले सर एक मित्र म्हणून माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचे राहिले आहेत. कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेमुळे मला रायगड विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळेच महाले सरांसारखे अनेक चांगले मित्र जोडता आले. महाले सरांच्या बरोबरच्या अनेक आठवणी आहेत. त्यातील काही ठळक सांगता येतील. माझ्या लग्नाच्या वेळेस सूट घेताना, टु व्हीलर गाडी घेताना ते प्रत्यक्ष माझ्या सोबत होते. त्यांच्या ओळखीमुळे गाडी घेताना माझी खूप आर्थिक बचत झाली आहे. कॉलेजची सहल घेऊन ते कुठेही गेले तर माझ्या मुलीला ते हमखास खाऊ घेऊन येत असे.२०२१ साली मी वाशी कॉलेजला आल्यानंतर त्यांची रोज होणारी भेट थांबली पण मैत्रीत आमच्या खंड पडला नाही. कधी फोनवरून तर कधी प्रत्यक्ष भेटून आजही त्यांच्या बरोबर मैत्रीचा बंध अतुट आहे. तो असाच पुढे दीर्घकाळ राहावा ही आशा. 

असा हा दिलदार मनाचा एक प्राध्यापक मित्र आज आपल्या सेवेतून निवृत्त होत आहे. महाले सरांच्या पुढील आनंददायी वाटचालीसाठी मी अंतःकरणापासून त्यांना शुभेच्छा देतो. आपणांस चांगले आरोग्य लाभो, आपल्या अपूर्ण राहिलेल्या अनेक इच्छा, आकांक्षा पूर्ण होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

=================================
-----------------------------------------------
*डॉ.आबासाहेब सरवदे*✍️✅🇮🇳...
कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज
वाशी,नवी मुंबई
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================

महिलांसह हिंदू धर्मावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे उपकार मिलिंदकुमार साळवे यांचे प्रतिपादन


श्रीरामपूर संघ कार्यालयात डॉ. आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्रांचे अनावरण

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून
 हिंदू समाजावर व महिलांवर प्रचंड असे उपकार केले आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य, भाजपचे शहर उपाध्यक्ष मिलिंद कुमार साळवे यांनी केले. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्रीरामपूर येथील दामू अण्णा दाते भवनात लोकहित मंडळाच्या वतीने ७५ वा अमृत महोत्सवी भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्रीरामपूर येथील दामू अण्णा दाते भवनात लोकहित मंडळाच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न, महामानव, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर, साहित्यरत्न, साहित्यसम्राट डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे व प्रा. शिवाजीराव पंडित यांच्या हस्ते या तैलचित्रांचे अनावरण करण्यात आले. लोकहित मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर नगर जिल्हा संघचालक किशोर निर्मळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मंडळाचे कार्यवाह केशव आवटी यांनी प्रास्ताविक केले. मंडळाचे उपक्रम प्रमुख गणेश नवले यांनी स्वागत केले. प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचे याप्रसंगी सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्या शहीद जवान व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मिलिंदकुमार साळवे म्हणाले, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या प्रमुख चार स्तंभांवर, चतुःसूत्रीवर आधारित जगातील सर्वात मोठी, लिखित, आदर्श राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेली आहे. आतापर्यंत राज्यघटनेविषयी समाजात न होणारी चर्चा आता गेल्या काही वर्षांपासून होत आहे, ही चांगली बाब आहे. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांनी हिंदू समाजावर प्रचंड असे उपकार केले आहेत. सर्वच जाती, धर्मांचा राज्य घटनेद्वारे सन्मान ठेवण्यात आला आहे. पण डॉ. बाबासाहेबांनी केलेले विशाल कार्य आजही समाजाच्या तळागाळापर्यंत न पोहचल्यामुळे उपेक्षित आहे, अशी खंतही साळवे यांनी व्यक्त
 केली.

=================================
-----------------------------------------------
श्रीरामपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दामू अण्णा दाते भवनात लोकहित मंडळाच्या वतीने अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्रांचे अनावरण ज्येष्ठ पत्रकार मिलिंदकुमार साळवे व प्रा. शिवाजीराव पंडित यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उत्तर नगर जिल्हा संघचालक किशोर निर्मळ, केशव आवटी, भूषण साठये, गणेश नवले आदी मान्यवर.
-----------------------------------------------
=================================
भारतात विविध जाती, धर्म, पंथ, भाषा असतानाही फक्त भारतीय राज्यघटनेमुळेच देशात एकता, अखंडता आहे, असे प्रा. शिवाजीराव पंडित यांनी सांगितले. किशोर निर्मळ म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सर्व जाती, धर्माचे स्वयंसेवक विविध गतीविधींमध्ये सहभागी होत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निस्सीम राष्ट्रवादी होते. राष्ट्रवाद, राष्ट्रभक्तीसोबतच त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या आत्मसन्मानास महत्त्व दिले.
प्रमुख वक्ते समरसता मंचाचे उत्तर नगर जिल्हा गतीविधी संयोजक वसंतराव कदम यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, समरसता मंच यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. तसेच डॉ. आंबेडकर व लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या उत्तुंग कार्याचा जीवनपट समोर मांडला.
समाजाच्या विविध घटकांमध्ये, विविध पातळीवर आजही मोठ्या प्रमाणात विषमता दिसत आहे. ही विषमता दूर करून समाजात समरसता निर्माण करण्याची ताकद फक्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या भारतीय राज्य घटनेमध्येच आहे. या राज्य घटनेमुळेच खरी समरसता निर्माण होऊ शकेल, असा विश्वासही समरसता कदम यांनी व्यक्त केला.
 विजय ढोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संघाचे श्रीरामपूर तालुका कार्यवाह प्रमोद शेजूळ, देवीदास चव्हाण, महेश देशपांडे, श्रीरामपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, रिपाइंचे सुभाष त्रिभुवन, समरसता मंचाचे रामचंद्र भवर, भूषण साठये आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================


अनधिकृत पार्किंगने घेतला श्रीरामपूर शहरातील रस्त्यांचा ताबासर्वच रस्त्यांवर होते वाहतुकीची कोंडी; पालिका व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

- श्रीरामपूर शहरात वाहनांची पार्कीग रस्त्यावर आल्याने नेहमीच अशी वाहतूक कोंडी निर्माण होते. - (छाया अमोल कदम) -

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शहरातील रस्त्याचा ताबा अनधिकृत पार्कीगने घेतला आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या अबालवृध्द, विद्यार्थी आदींसह प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. मेनरोड, छत्रपती शिवाजी रोड, संगमनेर रोड, बेलापूर. रोड आदी रस्त्यांवर रोजच मोठी वर्दळ असते. परंतु पार्कंगची व्यवस्था नसल्याने रस्त्यावरच पार्किंग केली जात असल्याने शहरात वाहतूक कोंडींची समस्या नित्याची झाली आहे. याकडे पोलीस व नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील ठिकठिकाणी व्यापारी संकुलाबरोबरच इमारतीमधील पार्किंगची व्यवस्था आजही कागदावरच आहे. वर्षानुवर्षांपासून वाहनांची मोठी

गर्दी होत असताना, पार्किंगचाही प्रश्न अधिकाधिक बिकट होत आहे. शहरात खरेदीसाठी कुटुंबासह आलेल्यांना वाहन लावायचे कोठे? असा प्रश्न दररोज पडत आहे. हा महत्वाचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कोणीच घेत नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत. पार्किंगची सुविधा मिळत नसल्याची स्थिती वर्षानुवर्षे प्रत्येकाला अनुभवायला मिळत आहे.

ठिक ठिकाणची व्यापारी संकुले आणि इमारतींमधील पार्किंगच्या जागा गायब झाल्याने नागरिक रस्त्यालगत वाहने लावतात. त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शहराचा = विस्तार वाढत असतानाच - वाहनांची संख्याही वाढत आहे.  शहरातील बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, - संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज

आणि इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय असल्याने अनेक ग्राहक कामानिमित्त येतात. येथे पार्किंगची व्यवस्था तोकडी व - कूचकामी आहे. या रस्त्यावरून शासनाचा प्रत्येक अधिकारी- कर्मचारी, पोलीस व अधिकारी, बहुसंख्य नगरसेवक, आजी- माजी लोकप्रतिनिधी दररोज प्रवास करीत असून, त्यांना ही हा त्रास होत असताना त्यावर मात्र अद्याप कोणताच तोडगा निघाला नाही.

प्रत्येक व्यापारी संकुलात पार्किंगचा मोठा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. छत्रपती शिवाजी मेनरोड, महाराज रोड, नगरपालिका चौक, बस स्थानक परिसर, संगमनेर रस्ता, मौलाना आझाद चौक, नेहरू फळ आणि भाजी मंडई, सिंधी मंदिरासमोरचा भाग, दशमेशनगर चौक तसेच इतर अनेक शासकीय कार्यालये, कर्मवीर चौकातील

मिनी स्टेडियम समोरचा भाग प्रशासकीय इमारतीसमोरचा भाग अशा अनेक ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी वर्दळ असते, परंतु याठिकाणी पार्किंगची कसलीही व्यवस्था नाही.

अनेक इमारतींची पार्कीग स्थळे तळघरात आहेत. तर काही ग्राउंड फ्लोरवर आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाकडून परवाना मिळेपर्यंत ही जागा पार्किंगसाठी दाखविली जाते. यानंतर मात्र त्याठिकाणी दुसरेच उद्योग, व्यवसाय सुरू केले जातात. परिणामी त्या ठिकाणची वाहने इमारती संकुलास समोरील सार्वजनिक रस्त्यावर लावावी लागत आहेत. याठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना तसेच नागरिकांना दुचाकी-चारचाकी वाहने कुठे लावावी, असा प्रश्न सातत्याने . पडत आहे.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================