राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, December 15, 2024

होमगार्ड सप्ताह निमित्त माऊली वृद्धाश्रमात स्वच्छता मोहीम व फराळाचे वाटप


होमगार्ड सप्ताह निमित्त माऊली वृद्धाश्रमात स्वच्छता मोहीम व फराळाचे वाटप 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 श्रीरामपूर शहरा लगत असलेले शिरसगांव येथील माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी राहाता तालुका होमगार्ड पथकाच्या वतीने येथील आजी आजोबा तसेच शालेय विद्यार्थी यांच्यासाठी फराळाचे वाटप व स्वच्छता अभियान राबविण्यात आले,
 सदरचा कार्यक्रम अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक अहिल्यानगर श्री. प्रशांत खैरे साहेब तसेच मा. संजय शिवदे केंद्रनायक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम,वृक्षारोपण आदी सामाजाभिमूख उपक्रमे राबविण्यात आली.
 परंतु केंद्रनायक संजय शिवदे यांच्या विशेष सूचनेवरून अनाथ गरजू निराधार अशा व्यक्तीसाठी मोहीम राबवून सेवा करण्याची संधी प्राप्त करावी यामुळे राहता होमगार्ड पथक यांच्या वतीने श्रीरामपूर परिसरातील माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच वयोवृद्ध आजी आजोबा यांचे आशीर्वाद घेऊन मोहिम राबविण्यात आली, प्रसंगी राहाता तालुका समादेशक अधिकारी सर्वश्री संदीप शिंदे बाबासाहेब शेलार,प्रशांत भालेराव,अरुण पवार, शुभम अंभोरे ,गुंड पत्रकार राजेंद्र देसाई आदींनी यामध्ये सहभाग नोंदवला. आश्रमाच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
आजी आजोबा तसेच शालेय विद्यार्थी यांना फराळाचे वाटप करण्यात आले,
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष सुभाष वाघुंडे, सौ. कल्पना वाघुंडे, दत्तात्रय खिलारी, शुभम नामेकर, संतोष भालेराव,श्री.जोशी आदी प्रयत्नशील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन राजेंद्र देसाई यांनी केले तर आभार दत्तात्रेय खिलारी यांनी मानले.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई
 वडाळा महादेव 


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

प्राचार्य शंकरराव उनउने राष्ट्रीय मराठी, कोकणी बोलीभाषा काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर





झाडी बोली कवी उपेंद्र रोहनकर प्रथम, बेळगावी बोलीतील कवयित्री विजया देवगोजे द्वितीय, कोकणी बोलीतील अनिता बर्गे तृतीय


- सातारा - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील कर्मवीर भाऊराव विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाने ऐतिहासिक ठरेल अशा राष्ट्रीय मराठी ,कोकणी भाषेतील बोलीभाषेतील काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन ऑक्टोबर , नोव्हेंबर २०२४ मध्ये केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निष्ठावंत अनुयायी, रयत शिक्षण संस्थेचे आजन्म सेवक, मराठीचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक व छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ज्यांनी ११ वर्षे प्राचार्यपद भूषविले असे प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब उनउने यांच्या नावे ही स्पर्धा सुरु करण्यात आली. मराठी बोली व भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी बोली भाषा कविता लेखन स्पर्धेचे आयोजन असलेली ही देशातील पहिली स्पर्धा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून कवी कवयित्री मिळून १२३ जण सहभागी झाले असून १८६ कविता या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आल्या. या स्पर्धेचा निकाल मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांनी जाहीर केला. या स्पर्धेत गडचिरोली येथील उपेंद्र रोहनकर यांच्या झाडी बोलीतील ‘ डोरे राऊन आंद्रा’ या कवितेने प्रथम क्रमांक मिळविला असून रुपये ५००० चे पारितोषिक व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक लांजा येथील कवयित्री मराठीचे अभ्यासक विजयालक्ष्मी देवगोजे यांच्या बेळगावी बोलीतील कविता ‘सासूरवाशीन’ या कवितेस जाहीर झाले आहे. रुपये चार हजार व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. अनिता नंदू बर्गे यांनी लिहिलेल्या ‘जीनेचे एक पुस्तक ‘ या कोकणी बोलीतील कवितेने तिसरा क्रमांक मिळविला असून तीन हजार रुपयांचे पारितोषिक रक्कम , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे. या स्पर्धेत बोलीभाषेतील कवितेला उत्तेजन देण्यासाठी आणखी रुपये ५०० ची १० विशेष पारितोषिके ठेवण्यात आलेली होती, या उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवणाऱ्या कवींनी विविध बोलीतून सुंदर कविता लिहिल्या . यामध्ये 
उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक : सावंतवाडीचे कवी किशोर वालावलकर यांच्या कोकणी बोलीतीतील ‘ इस्माईल ठाकूर कुरले गरयता’ कवितेने मिळवला आहे.
उत्तेजनार्थ दुसरा क्रमांक जळगाव येथील धरणगांव मधील कवी बी.एन.चौधरी यांच्या अहिराणी बोलीतील ‘अहिराणी म्हणी गोड ‘या कवितेस जाहीर झाला आहे. चंद्रपूर येथील आमडी येथील कवी ‘प्रशांत भंडारे’ यांच्या झाडी बोलीतील कविता ‘रोवणा’ हिस उत्तेजनार्थ तिसरा क्रमांक मिळाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील झाडी बोलीत कविता लिहिणारे कवी ‘ सुनील बावणे ‘यांच्या लाव बेकनी या कवितेने उत्तेजनार्थ चौथा क्रमांक मिळविला आहे. 
तर प्रा.भाऊसाहेब गोसावी यांच्या ‘निमो ‘या मालवणी बोलीतील कवितेने उत्तेजनार्थ पाचवा क्रमांक संपादन केला आहे. गोवा परिसरातील काणकोण परिसरातील कोकणी बोलीतील जयेश पाय्कर यांच्या ‘पोल्ली आणि चूल’ या कवितेने उत्तेनार्थ सहावा क्रमांक मिळविला आहे. तर साताऱ्याच्या ग्रामीण बोलीत लेखन करणारे लेखक ,कवी निलेश महिगावकर यांच्या ‘ पतंग्या’ या कवितेस उत्तेजनार्थ सातवे पारितोषिक जाहीर झाले आहे. मालवण येथील कवयित्री वैशाली पंडित यांच्या ‘ वाडा वो माय’ या घाटी बोलीतील कवितेने आठवे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले आहे. देवगड हिंदले येथील मालवणी कवी अविनाश बापट यांनी लिहिलेल्या ‘नामो कुळकार’ या मालवणी बोलीतील कवितेने उत्तेजनार्थ नववे पारितोषिक संपादन केले असून अंतिम दहावे उत्तेजनार्थ पारितोषिक लोकगीत बोलीत लिहिलेल्या ‘विलास चौगुले’ यांच्या ‘गोजरी भावज’ या कवितेस जाहीर झाले आहे. स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळविल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी कवींचे अभिनंदन केले. सदर काव्यस्पर्धेचे परीक्षक म्हणून शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख व बोलीभाषेचे अभ्यासक प्राध्यापक डॉ.नंदकुमार मोरे व डी.पी.भोसले कॉलेज कोरेगांव येथील मराठी विभागातील प्राध्यापक, काव्य समीक्षक प्रा.डॉ. देवानंद सोनटक्के यांनी काम केले. या स्पर्धेसाठी होणारा सर्व प्रकारचा खर्च भागवण्यासाठी प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब यांचे नातू अमोल अशोक उनउने व अमोल यांच्या पत्नी मीनल उनउने यांनी देणगी रूपाने देऊन सहकार्य केलेले आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या प्रत्येक कवीच्या एका कवितेस सहभागी करून व बोलीचा योग्य अभ्यास होण्याच्या दृष्टीने एकापेक्षा जास्त निवडलेल्या कवितांचा मिळून ‘ बोलीगंध’ हा प्रातिनिधिक कवितासंग्रह संपादक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे व सौ .मीनल अशोक उनउने हे संपादित करणार आहेत. जानेवारी २०२५ चे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पारितोषिक वितरण समारंभ घेण्याचे नियोजन असून या विशेष समारंभात प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येतील असे स्पर्धेचे समन्वयक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी सांगितले असून या कार्यक्रमास स्पर्धेतील व स्थानिक कवींनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================



श्रीरामपूर - विद्यानिकेतनमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक क्रिडा महोत्सवाचे बक्षीस वितरण नुकतेच पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी विद्यालयाचे शिक्षक-पालक प्रतिनिधी बेलापूर दूरक्षेत्रचे उपनिरीक्षक सुधीर हापसे, संजय काळे, विशाल उपाध्ये, प्रतीक प्रधान, रुपाली पाटील, रोहिणी कुऱ्हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करून स्व. रावसाहेब शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसंगी तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, बास्केटबॉल असे सांघिक खेळ घेण्यात आले. तर १०० (शंभर) व २०० (दोनशे) मी. धावणे स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक अशा वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी ब्ल्यू हाऊस उत्कृष्ट हाऊस म्हणून घोषित करण्यात आला. तर मोठ्या गटात उत्कृष्ट खेळाडू म्हणून संजिवनी गाडेकर व प्रतिक खंडागळे तसेच छोट्या गटात जान्हवी क्षीरसागर व गौरव ब्राम्हने या विद्यार्थ्यांना घोषित करण्यात आले. विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक (एनआयएस) कोच अजय आव्हाड, मयूर जाधव यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांचे विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके, व्हा.चेअरमन डॉ. प्रेरणाताई शिंदे, खजिनदार राजीव शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, समन्वयक मंगेश साळुंके, मनीषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमल पारखे, सूत्रसंचालन प्रीती नाणेकर, कोमल पारखे यांनी केले, तर आभार प्रीती नाणेकर यांनी मानले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
शंकर बाहूले (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

शिक्षण क्षेत्रात मोठ्या बदलाचीआवश्यकता - अनंत पाटील

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
मानवी विकासासाठी शिक्षण हे एक मुख्य साधन असून, त्यामुळेच आज शिक्षण क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत दै. सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी डिपॉल इंग्लीश मिडीयम हायस्कूलच्या २७ व्या वार्षीक स्नेह संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
 ते पुढे म्हणाले की, डिजिटल व इंटरनेट तंत्रज्ञान व माहिती भांडार यासाठी फार उपयुक्त आहे. अर्थात, ते केवळ तंत्र म्हणून न स्वीकारता, त्याचा योग्य पद्धतीने वापर करायला हवा ज्या गोष्ट्री आपण फक्त सिनेमे किंवा गोष्टींमध्ये ऐकल्या आणि बघीतल्या त्या आता प्रत्यक्षात घडत आहेत. यावेळी त्यांनी सोशल मिडीयाचे दुष्परीनाम ही समजावत कार्यक्रमासाठी सदिच्छा व्यक्त करत उपस्थितांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 
दरम्यान या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सिस्टर डॉक्टर बेनिंजा एस. सी. एस. ए .या उपस्थित होत्या त्या सेंट् लुक हॉस्पिटलमध्ये सध्या कार्यरत आहेत. विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ आसिफ जीवनी (मेडिकल ऑफिसर ग्रामीण रुग्णालय पुणतांबा ) व कुमारी नेहा ओझा (एअर होस्टेस एअर इंडिया) त्याचप्रमाणे रेव्ह. फादर जीमिल व्ही. सी.( प्रेसिडेंट ऑफ व्ही एम एस एस अहिल्यानगर) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. विद्यालयाचे व्यवस्थापक रेव्ह. फादर सीजो व रेव्ह फादर फ्रॅंको आणि विद्यालयाच्या प्राचार्य रेव्ह सिस्टर सेलीन ,रवींद्र लोंढे यांची कार्यक्रमाला अनमोल असे मार्गदर्शन लाभले. मुलांनी विविध कला गुणांचे प्रदर्शन केले. देशाचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले. श्रीरामपूर येथील डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूल गॅदरिंग या कार्यक्रमांमध्ये रतन टाटा यांची एक थीम घेऊ श्रद्धांजली देण्यात आली (छायाचित्रकार अमोल कदम)


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरवला आनंद बाजार


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील वडाळा महादेव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शारीरिक कलागुणांचा विकास व्हावा यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  
 शालेय विद्यार्थ्यांनी शनिवार दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी विद्यालयात आनंद बाजार भरवला.
 या आनंद बाजाराचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. मीनाताई जगधने यांच्या शुभहस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी.एन. माळी यांनी केले.आनंद बाजारासाठी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सर्वश्री सुधीर पा.कसार, थोर देणगीदार उद्धवराव पा.पवार यांनी उपस्थित राहून आनंद बाजाराची शोभा वाढवली. उपस्थित मान्यवरांचा गुलाब व स्नेहवस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. 
या आनंद बाजारातून विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य वृद्धिंगत होते पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी सुद्धा प्रयत्न करावे असे आवाहन मा.जगधने ताई यांनी केले. आनंद बाजारात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अतिशय चविष्ट पदार्थ , खेळणी भाजीपाला, शालोपयोगी वस्तू यांची विक्री केली. इतर विद्यार्थ्यांनीही आनंद बाजाराचा मनमुराद आनंद लुटला. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग यांनीही आनंद बाजारात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आणलेला पदार्थ, विक्रीतून झालेली कमाई तसेच स्वच्छता यानुसार प्रथम तीन विजेते काढण्यात आले. त्यांना सुधीर पाटील कसार यांच्याकडून शालोपयोगी वस्तू बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी आर.बी. एन. बी. कॉलेज येथे शरद क्रीडा महोत्सव अंतर्गत झालेल्या कबड्डी स्पर्धेत विद्यालयातील इ. १० वीतील विद्यार्थी हर्षल नगरे याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मा.जगधने ताई व स्कूल कमिटी सदस्य यांनी त्याचे कौतुक केले. या आनंद बाजाराच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कसार, शितल निंभोरे, स्वेजल रसाळ, संतोष नेहुल,उषा नाईक, भास्कर सदगीर, प्रज्ञा कसार ,अविनाश लाटे, दिपाली बच्छाव ,जिजाबाई थोरात ,सुनीता बोरावके, प्रशांत बांडे ,अशोक पवार ,संदीप जाधव व भास्कर शिंगटे यांनी परिश्रम घेतले.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई
वडाळा महादेव 


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Saturday, December 14, 2024

वृत्तनगरी"स PRGI क्र. मिळाल्याबद्दल संपादक जावेदभाई शेख यांचा सत्कार

- श्रीरामपूर -  प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जावेद एस. शेख संपादित वृत्तनगरी या वर्तमानपत्रात गत वर्षभरापासून विविध विषयांकित समाजाभिमुख लेख, बातम्यांना वृतनगरी या वर्तमानपत्र अंकाद्वारे सातत्याने प्रसिद्धी दिली जात आहे, वर्तमानपत्राची नियमित सातत्य टिकवत सदरील अंकात शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांसह जनसामान्यांचे मुलभूत प्रश्न आणि समस्यांना उजाळा दिला जात आहे, यामध्ये संपादक जावेद एस.शेख यांचे मोठे परिश्रम असल्याने नुकताच वृतनगरी या वर्तमानपत्रास पीआरजीआय रजिस्ट्रेशन क्रमांक मिळाल्याने त्यांचा परिश्रमास यश प्राप्त झाले आहे 
भारत सरकार प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (PRGI) (पुर्वी ज्यास आरएनआय असे म्हटले जायचे) या कार्यालयाकडून वृतनगरी या वर्तमानपत्रास पीआरजीआय रजिस्ट्रेशन क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल समता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या हस्ते समता कार्यालयात संपादक जावेद शेख यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच शौकतभाई शेख यांच्यासह उपस्थित मान्यवरांकडून त्यांच्या भावी उज्वल कार्यास शुभेच्छाही देण्यात आल्या.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख म्हणाले की, वर्तमानपत्र चालवणे ही तारेवरची कसरत आहे हे नाकारुन चालणार नाही,आजच्या सोशल माध्यमांच्या युगात वृतनगरी या वर्तमानपत्राने प्रिंट मिडिया क्षेत्रात आपले सातत्य टिकवून धरले असल्याने त्यांना मोठे यश प्राप्त झाले आहे, यापुढे देखील असेच सातत्य टिकवत पुढील वाटचाल करावी असेही ते म्हणाले.
याप्रसंगी ॲड.मोहसिन शौकत शेख, तहसीन पांडे, वृक्ष संवर्धन चे संपादक शब्बीर उस्मान शेख,राज प्रसारित चे संपादक राजु मिर्जा, कमालपूर डोमेगाव संत, बिरद बाबा गुरुद्वारा चे ट्रष्टी तथा समाजसेवक भगवंतसिंग बत्रा आदि मान्यवर उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Friday, December 13, 2024

मा.खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त डी.डी. काचोळे विद्यालयात क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न


मा.खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त डी.डी. काचोळे विद्यालयात क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता-
रयत शिक्षण संस्थेच्या डी डी कचोळे माध्यमिक विद्यालयामध्ये देशाचे माझे कृषिमंत्री,रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांच्या शुभहस्ते क्रीडा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक सुनील साळवे सर, पर्यवेक्षक बाळासाहेब रासकर सर आदि उपस्थित होते. 
      याप्रसंगी मीनाताई जगधने विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाल्या की जीवनात धाडसी बना, योग्य निर्णय घेण्याची क्षमता खेळामुळे विकसित होते, खेळामुळेच नेतृत्व कौशल्य विकसित होते. सहकार्यवृत्ती, सहनशीलता, खिलाडूपणा, दुसऱ्यांना समजून घेण्याची क्षमता खेळ व बाजारातील खरेदी विक्रीच्या अनुभवातून हे कौशल्य विकसित होतात. शरद पवारांचे व त्यांचे स्वतःचे बालपणातील अनुभव, आई बद्दलची प्रेम, आपुलकी, माया याबरोबरच धाडसी बनण्याचे संस्कार यामुळे शरद पवार यांचे व्यक्तिमत्व घडत गेले हे विद्यार्थ्यांना सांगितले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यालयाची भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता याबद्दल मीनाताई जगधने यांनी समाधान व्यक्त केले.
      विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारामध्ये कबड्डी, खो-खो, क्रिकेट, संगीत खुर्ची व इतर मनोरंजक खेळ विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आले आहे. क्रीडा महोत्सव उपक्रम आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक नानासाहेब मुठे यांनी केले तर पर्यवेक्षक बाळासाहेब यांनी उपस्थितांची आभार मानले.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================