राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, December 30, 2024

उन्नती वर्पे हिस नेमबाजीतीलरेनॉल्ड शूटर पुरस्कार


- अजीजभाई - शेख -/ राहाता -
 प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलची इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. उन्नती संजय वर्पे हिस नेमबाजीतील बहुमानाचा रेनॉल्ड शूटर पुरस्कार प्राप्त झाला आहे. तिची नेमबाजीमध्ये स्कीम इंडियाच्या पात्रता फेरीसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.बी.बी. अंबाडे यांनी दिली. 
६७ एनसीसी राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिप भोपाळ (मध्य प्रदेश) या ठिकाणी झालेल्या नेमबाजी स्पर्धेत आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन नियमानुसार आय.एस. एस.एफ. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर येथील राष्ट्रीय खेळाडू कु.उन्नती संजय वर्पे या विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ६० शॉटमध्ये ६११.६ स्कोर करून रेनॉल्ड शूटर हा बहुमान पटकावला आहे. यामुळे ह्या विद्यार्थिनीची इंडिया नेमबाजी संघाच्या पात्रता फेरीसाठी निवड झाली आहे. तिला प्राचार्य डॉ. अंबाडे, उपप्राचार्य के. टी. अडसूळ, पर्यवेक्षिका एम. एस. जगधने, शुभांगी रत्नपारखी व सर्व क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे आदींनी अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट- श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Sunday, December 29, 2024

देश-धर्म के लिए श्री गुरु गोबिन्द सिंह जी का महान बलिदान...

- भगवंत सिंग प्रितम सिंग बत्रा  जी -/ लेख वार्ता -

इतिहास पुरूष कभी भी राजसत्ता प्राप्ति, जमीन-जायदाद, धन सम्पदा या यश प्राप्ति के लिए लड़ाईयां नहीं लड़ते। श्री गुरु गोबिन्द सिंह जी ऐसे इतिहास पुरूष थे, जिन्होनें ताउम्र अन्याय, अधर्म, अत्याचार और दमन के खिलाफ तलवार उठाई और लड़ाईयां लड़ी। गुरू जी की तीन पीढ़ियों ने देश धर्म की रक्षा के लिए महान बलिदान दिया। आज देश अपनी स्वतंत्रता की 75वी वर्षगांठ ’’आजादी के अमृत महोत्सव’’ के रूप में मना रहा है, ऐसे में पूरे देश में स्वतंत्रता सेनानियों, शहीदों, बलिदानियों को याद किया जा रहा है। सिखों के दसवें गुरु श्री गुरु गोबिंद सिंह जी को उनकी जयंती पर नमन कर प्रत्येक भारतवासी गर्व महसूस कर रहा है।
गुरु गोबिन्द सिंह सिक्खों के दसवें गुरु थे। वे एक महान दार्शनिक, प्रख्यात कवि, निडर एवं निर्भीक योद्धा, युद्ध कौशल, महान लेखक और संगीत के पारखी भी थे। उनका जन्म 1666 में पटना में हुआ । वे नौवें सिख गुरु, श्री गुरु तेग बहादुर और माता गुजरी के इकलौते बेटे थे, जिनका बचपन का नाम गोबिंद राय था।
सन् 1699 ई0 में बैसाखी के दिन गुरु गोबिंद सिंह ने खालसा पंथ की स्थापना कर पांच व्यक्तियों को अमृत चखा का ’पांच प्यारे’ बना दिए। इन पांच प्यारों में सभी वर्गो के व्यक्ति थे। इस प्रकार से उन्होंने जात-पात मिटाने के उद्देश्य से अमृत चखाया । बाद में उन्होंने स्वयं भी अमृत चखा और गोबिंद राय से गोबिंद सिंह बन गए।
गुरु गोबिंद सिंह ने एक खालसा वाणी “वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह” स्थापित की। साथ ही उन्होंने आदर्शात्मक जीवन जीने और स्वयं पर नियंत्रण के लिए खालसा के पांच मूल सिद्धांतों की भी स्थापना की। जिनमें केस, कंघा, कड़ा, कछ, किरपाण शामिल है। ये सिद्धान्त चरित्रनिर्माण के मार्ग थे। उनका मानना था कि व्यक्ति चरित्रवान होकर ही विपरित परिस्थितियों व अत्याचारों के खिलाफ लड़ सकता है।
गुरू गोबिन्द सिंह जी की वीरता और लोकप्रियता से आस पास के पहाड़ी राजा द्वेष करने लगे यहां तक बिलासपुर के राजा भीमचन्द सहित गढ़वाल, कांगड़ा के राजाओं ने मुगलशासक औरंगजेब के पास जाकर गुरु गोबिंद सिंह के खिलाफ लड़ने के लिए सैनिक सहायता मांगी और कहा कि इसके बदले में वे वार्षिक लगान देंगें। भीम चंद की माता चम्पादेवी ने गुरु गोबिंद सिंह के खिलाफ युद्ध का विरोध किया और कहा कि गुरु गोबिंद सिंह एक महान संत है, उनके साथ युद्ध नहीं बल्कि उनको घर बुला कर सम्मान देना चाहिए।

इसी प्रकार जब औरंगजेब की सेना का जनरल सैयद खान युद्ध के लिए आनंदपुर साहिब जाने लगा तो रास्ते में साधुरा नामक स्थान पर उनकी बहन नसरीना से मिले। उनकी बहन ने सैयद खान को गुरू गोबिन्द सिंह के खिलाफ युद्व करने से रोका और कहा कि वे पहले से ही गुरु जी की अनुयायी हैं और गुरु गोबिंद सिंह एक धार्मिक व आध्यात्मिक संत हैं। यहां तक कि उन्होंने पहले से ही सैयद खान की हार की भविष्यवाणी कर दी थी। नसरीना खान ने अपने पति व बेटों को गुरू गोबिन्द सिंह की सेना में भर्ती करवा दिया था। सैयद खान युद्ध के लिए निकल पड़ा। युद्ध के मैदान में नीले घोड़े पर सवार श्री गुरू गोबिन्द सिंह जब मुगल सैनिकों को मौत के घाट उतार रहे थे तो सैयद खान गुरू जी के सामने आया तब गुरू जी स्वयं घोड़े से उतरे और वे सैयद खान को मारने के लिए तैयार नहीं हुए। सैयद खान गुरू जी की आभा और तेज से प्रभावित हुआ और युद्ध मैदान छोड़कर योग, ध्यान व शान्ति प्राप्ति के लिए पर्वतों में चला गया।
गुरु गोबिंद सिंह जी के चार पूत्र थे, जिनका नाम साहिबजादे अजीत सिंह, साहिबजादे जुझार सिंह, साहिबजादे फतेह सिंह, साहिबजादे जोरावर सिंह था। उन्होंने अपने चारों पुत्र धर्म की रक्षा के लिए कुर्बान किए। मुगल शासक द्वारा दो पुत्र जोरावर सिंह और फतेह सिंह को सरहिंद में दीवार में चुनवा दिया गया । दो पुत्र अजीत सिंह और जुझार सिंह युद्ध में वीरगति को प्राप्त हुए । गुरु गोबिंद सिंह ने अपने पुत्रों की शहादत में कहा था-
सब पुत्रन के कारन वार दिए पुत चार ।
चार मुुए तो क्या हुआ, जीवित कई हजार ।।
गुरु गोबिंद सिंह जी ने अपने जीवन में आनंदपुर, भंगानी, नंदौन, गुलेर, निर्मोहगढ, बसोली, चमकोर, सरसा व मुक्तसर सहित 14 युद्ध किए। इन जंगों में पहाड़ी राजाओं एवं मुगल सूबेदारों ने हर बार मुंह की खाई। गुरू गोबिन्द सिंह ने कभी स्वार्थ व निजहित के लिए लड़ाई नहीं लड़ी बल्कि उन्होंने उत्पीड़न व अन्याय के खिलाफ लड़ाई लड़ी। इस कारण से हिन्दु व मुस्लिम धर्मों के लोग उनके अनुयायी थे।
सितम्बर 1708 में गुरू जी दक्षिण में नांदेड़ चले गए और बैरागी लक्ष्मण दास को अमृत छका और युद्व कौशल से पारंगत कर बंदा सिंह बहादुर बनाया और उन्हें खालसा सेना का कमाण्डर बनाकर संघर्ष के लिए पंजाब भेज दिया। पंजाब पहुंच कर बन्दा सिंह बहादुर ने चप्पा चीड़ी की जंग जीती।
अक्तूबर 1708 में महाराष्ट्र के नांदेड़ साहिब में गुरु गोबिंद सिंह जी ने अपनी आखिरी सांस ली। इस प्रकार से पहले पिता गुरु तेग बहादुर सिंह, फिर चारों पुत्रों ने और बाद में श्री गुरु गोबिन्द सिंह जी ने स्वयं बलिदान देकर धर्म की रक्षा की।
स्वामी विवेकानंद जी ने गुरू गोबिंद सिंह जी को एक महान दार्शनिक, संत, आत्मबलिदानी, तपस्वी और स्वानुशासित बताकर उनकी बहादुरी की प्रशंसा की थी। स्वामी विवेकानंद जी ने कहा था मुगल काल में जब हिन्दु और मुस्लिम दोनों ही धर्मों के लोगों का उत्पीड़न हो रहा था तब श्री गुरू गोबिंद जी ने अन्याय, अधर्म और अत्याचारों के खिलाफ और उत्पीड़ित जनता की भलाई के लिए बलिदान दिया था जो एक महान बलिदान है। इस प्रकार से गुरू गोबिंद सिंह जी महानों में महान थे।
गीता में कहा है कि ’’कर्म करो, फल की चिन्ता न करो’’। ठीक इसी प्रकार गुरु गोबिंद सिंह जी ने कहा है ’देह शिवा बर मोहे इहै, शुभ करमन ते कबहूं न टरूं’ यानि हम अच्छे कर्मो से कभी पीछे न हटें, परिणाम भले चाहे जो हो। उनके इन विचारों व वाणियों से पता चलता है कि गुरु गोबिंद सिंह जी ने कर्म, सिद्धान्त, समभाव, समानता, निडरता, स्वतंत्रता का संदेश देकर समाज को एक सूत्र में पिरोने का काम किया। उन्होंने कभी भी मानवीय व नैतिक मूल्यों से समझौता नहीं किया। आज फिर जरूरत है कि उनके बताए मार्ग पर चल हम सभी धर्म, समाज व भाईचारे को मजबूत कर एक भारत-श्रेष्ठ भारत के लिए कार्य करें।
जय हिन्द!


=================================
-----------------------------------------------
सौजन्य लेख अनुमती...
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

विद्यानिकेतन स्टेट बोर्डचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन टाईमलेस ओडिसी- कालचक्रचा प्रवास या मार्मिक, वैचारिक विषयावर आधारित नुकतेच उत्साहात संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मिस इंटरनॅशनल इंडिया- सौंदर्यवती रश्मी शिंदे, अमेरिकास्थित रोहित शिंदे, विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई.शेळके, खजिनदार राजीव शिंदे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या व्हा. चेअरमन डॉ.प्रेरणाताई शिंदे होत्या.
       प्रसंगी इ.नर्सरी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी काळाला गवसणी घालत, आपल्या बहारदार नृत्याविष्कारांतून कालचक्रच्या नाट्यमय प्रवासाचा वेध घेतला. तसेच या संकल्पनेद्वारे विद्यार्थ्यांनी आपला भूतकाळ, भविष्यकाळ जाणून घेतला. व बदलत्या कालचक्रावर प्रकाशझोत टाकला. दरम्यान चि.पार्थ मुळे,गौरव गोसावी, साईराज गायकवाड या विद्यार्थ्यांनी टाईम मशीनच्या प्रतिकृतीद्वारे आपल्या वैचारिक संभाषणातून कालचक्राचा अवघा नाट्यमय प्रवास विद्यार्थी, श्रोत्यांसमोर उलगडला. 
यावेळी बदलत्या कालचक्र प्रवासानुसार वार्षिक स्नेहसंमेलनात प्रायमरी डान्स,अर्ली ह्युमन्स, मोहेंजोदडो, कार्टून वर्ल्ड, एलियन,घोष्ट स्टोरी, चाईल्डहुड,बॉलीवूड, फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र, कारगिल,मुंबई परफॉर्मन्स, वारी, बुद्धा, डॉक्टर्स चाईल्डहुड, जालियनवाला बाग, वैदिक पिरेड,चाणक्य अँड चंद्रगुप्ता, छत्रपती शिवाजी महाराज, फ्युचर २५०, फ्युचर २५००, फायनल मिक्स सॉंग या ओघवत्या जीवन शैलीतील नृत्य-गीतांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान या मनोवेधक नृत्यांनी रसिक- प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य विनोद रोहमारे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.
         प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कु. संजीवनी गाडेकर, चि.रुद्र ढमाले या विद्यार्थ्यांना या वर्षीचा स्टुडन्ट ऑफ द ईयर हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. तसेच क्रीडा क्षेत्रातील राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कु.तनिष्का राऊत, चि.सार्थक सोलंकी, राज बारहाते यांनाही सन्मानित करण्यात आले. दरम्यान मागील वर्षी माध्यमिक शालांत परीक्षा इ. दहावीमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांमधून कु.आदिती तांबे,दिशा राऊत,साक्षी सिनारे,मयुरी उंडे या विद्यार्थिनींचा गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित शिक्षक-पालक प्रतिनिधींचाही सत्कार करण्यात आला. शेवटी मान्यवरांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी कठोर परिश्रम घेतले.
         प्रसंगी कार्यक्रमास विद्यालयाचे पदाधिकारी, ज्येष्ठ विधीज्ञ भागचंद चुडीवाल,प्रकाश निकम पाटील,सुखदेव सुकळे, संजय शहा, मंगलाताई आढाव,शुभांगी देवकर, डॉ.अर्चना शेळके, विद्यालयाचे प्राचार्य विनोद रोहमारे,योगेश गायकवाड, वर्षा धामोरे,चित्रा सुरडकर, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे,अमित त्रिभुवन कार्यालयीन अधीक्षक सतीश थोरात,रावसाहेब रशिनकर, सुनील ठाणगे, शिक्षक- पालक प्रतिनिधी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षिका प्रीती नानेकर,सूत्रसंचालन कु.अनन्या राकेचा हिने केले, तर आभार कु.अक्षदा दळे हिने मानले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
शंकर बाहुले (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

अन्यायग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी* *भारतीय लहुजी सेना धावून येते


*अन्यायग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी* 
*भारतीय लहुजी सेना धावून येते !*

*म्हणूनच ही संघटना जिल्हाभरात* 
*अग्रगण्य अशी मानली जाते !!*

*भारतीय लहुजी सेनेची जिल्हास्तरीय*
*बैठक संपन्न; पदाधिकारी नियुक्त्या*

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
सामाजातील रांजले - गांजले, उपेक्षित आणी दुर्लक्षीतांबरोबरच कुठे अन्याय अत्याचार होत असल्यास भारतीय लहूजी सेना क्षणात धावून येते आणी अन्यायाचा प्रतिकार करणेकामी पुढाकार घेते करीता जिल्हाभरात ही संघटना अग्रगण्य मानली जाते, म्हणून या संघटनेत प्रत्येक गांव/ शहरातून नेहमीच कार्यकर्त्यांचे इनकमिंग हे मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.
              नुकताच भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांच्या उपस्थितीत व अध्यक्षतेखाली शहरात भारतीय लहुजी सेनेची अहमदनगर जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली असून या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करुन त्यांना पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यावेळी प्रामुख्याने सुनिल सकट यांची भारतीय लहुजी सेनेच्या युवा जिल्हाध्यक्षपदी तर मिराताई राम सरोदे यांची महिला आघाडी जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.तसेच कमलताई जगधने शहर अध्यक्ष,प्रिता विजय ससाणे शहर कार्याध्याक्ष, ज्योति परदेशी ‌शहर उपाध्यक्ष, लता सुनिल बरेलीया शहर संघटक यांना पदाची जबाबदारी देवून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी भारतीय लहुजी सेने चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल,राष्ट्रीय महासचिव हानिफभाई पठाण, जिल्हा प्रमुख रज्जाकभाई शेख, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख, जिल्हा संघटक राजेन्द्र त्रिभुवन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

विनोदी दिवाळी अंकाचा राज्यस्तरीय पुरस्कार स्नेहलता कुलथे यांन जाहीर

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दिला जाणारा विनोदी दिवाळी अंकाचा राज्यस्तरीय पुरस्कार श्रीरामपूर येथील वर्ल्ड सामना दिवाळी अंकाच्या संपादिका सौ. स्नेहलता प्रकाश कुलथे यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी दिली. 
राज्यातील नामवंत पत्रकारांना पत्रकार भुषण आणि अन्यही विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. सदरचा पुरस्कार सोहळा ६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, डॉ. सुरेंद्र गावसकर सभागृह (शारदा सिनेमाच्या शेजारी), दादर, मुबंई या ठिकाणी होणार आहे. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. राज्यपाल पद्मभूषण रामभाऊ नाईक हे भूषविणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, भाऊ तोरसेकर सुकृत खांडेकर आदि उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अनिल रोकडे व कैलासवासी यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार पत्रकार तुळशीदास भोईटे यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
तरी या कार्यक्रमास सर्व साहित्यिक,पत्रकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एकनाथ बिरवटकर, संतोष धोत्रे, शंकर शिंदे, शंकरराव राहणे आदींनी केले आहे.
यापूर्वी वर्ल्ड सामना दिवाळी अंकास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, विविध सामाजिक संस्था व संघटनांनी सन्मानित केले आहे. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल संपादिका सौ.स्नेहलता कुलथे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


=================================
-----------------------------------------------
 *वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्रास बदनाम करण्याचा कूटील डाव, प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत पैसे खाण्यात कसे नाही तोतया पत्रकारांचे नाव,,,


- संगमनेर - लियाकत पठाण - / वार्ता -
साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्रास बदनाम करण्याचा कूटील डाव, प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत पैसे खाण्यात कसे नाही तोतया पत्रकारांचे नाव,, संगमनेर महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या अधिपत्याखाली अनेक चेक पोस्ट नाका आहे या सर्वच चेक पोस्ट वर दिवस भरात हजारो वाहने येतात आणि जातात या वाहनांची तपासणी या चेक पोस्ट वर केली जाते या चेक पोस्ट वर खासगी नोकर भरती करुन त्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे निदर्शनास दिसून येत आहेत अनेक वेळा या चेक पोस्ट वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळे लावले मोठ्या प्रमाणावर लाचखोरी करणार्या अनेक प्रादेशिक परिवहन अधिकारी खासगी् नोकर यांच्या वर कारवाई करण्यात आली सर्वांना वाटत असेल की आता तरी या प्रकरणी आळा बसेल परंतू आळा घालण्यासाठी वरीष्ठ अधिकारी यांना वेळ तर मिळाला पाहिजे कारण या मिळणाऱ्या उत्पन्नातून अनेक अधिकारी याचे भागिदार असल्याचे देखील समजते केवळ आर टी ओ अधिकारी यांच्या शिपा बदलत असतात परंतु वाहन धारकांची लूट सुरू असतेच यात शंकाच नाही याचच फायदा उचलण्यासाठी काही तोतया पत्रकार कोणताही अधिकूरत परवाना नसताना केवळ शे पाचशे रुपये खर्च करून बनावट व्हिजीटिग कार्ड तयार करून सर्रास वापरले जाते असाच काहीसा प्रकार साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्र कमी कालावधीत सर्वत्र लोकप्रिय झाली असताना या वर्तमान पत्राच्या नावे काही महाभाग भिक मागण्याचा धंदा करत असल्या कारणाने तक्रारी आहेत तरी साप्ताहिक खरे सव्वाशेर संपादक लियाकत खान पठाण यांचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना विनंती आहे की या नावाने कोणी व्यक्ती आपल्या चेक पोस्ट वर लाच मागण्यांसाठी येत असेल तर त्या व्यक्तीला तात्काळ जवळपास असणाऱ्या पोलिस प्रशासन यांच्या ताब्यात देण्यात यावे सदर तोतया पत्रकार आर टी ओ चेक पोस्ट आर टी ओ कार्यालयात केव्हापासून बोगसगिरी करतं फिरत होता हे उघडकीस येण्यासाठी वेळ लागणार नाही असे आवाहन संपादक खरे सव्वाशेर लियाकत खान पठाण यांनी केले आहे वेळ पडल्यास संपादक खरे सव्वाशेर मोबाईल नंबर 9665282010,या क्रमांकावर संपर्क साधावा साप्ताहिक खरे सव्वाशेर च्या नावाने कोणी व्यक्ती आपल्या चेक पोस्ट वर कार्यालयात आल्यास त्याचे ओळखपत्र कार्ड मागणी करण्यात यावी साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्र पत्राचा असा कोणी व्यक्ती अधिकूरत नेमलेला नाही सर्व महाराष्ट्र राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी नोंद घ्यावी सविस्तर माहिती पुढील अंकात प्रकाशित करण्यात येईल


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Thursday, December 26, 2024

पालिका प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरुद्धउबाठा शिवसेनेचे ढोल बजाओ आंदोलन


नेवासा - संगमनेर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा उग्र स्वरुपाचे आंदोलन - संजय छल्लारे 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर येथील नेवासा - संगमनेर रोड दुरवस्था व इतर रस्त्यांच्या अत्यंत दुरावस्थेबाबत शिवसेना (उबाठा) च्या वतीने श्रीरामपूर नगरपलिकेसमोर ढोल बजवो आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना नेते संजय छल्लारे यांनी केले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांबद्दल तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी प्रशासनाला सुनावले की, "नेवासा-संगमनेर रस्त्याची तातडीने दुरुस्ती झाली नाही, तर शिवसेना तीव्र आंदोलन उभारून नागरिकांसाठी न्याय मिळवेल. 
यावेळी आंदोलनकर्त्यांनी नगर पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. "रस्ते दुरुस्त करा" आणि "प्रशासन हाय हाय" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर रोष व्यक्त करत समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.
रस्त्यावरील दुरवस्थेमुळे प्रवाशांचे होत असलेले हाल ची दखल घेऊन प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अन्यथा शिवसेनेला अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा यावेळी दिला गेला.
या आंदोलनात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन देऊन, रस्त्याच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. "शिवसेना नेहमीच जनतेसाठी लढत राहील," असे नेते संजय छल्लारे यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, व्यापारी असोसिएशनचे सुनील गुप्ता, गौतम उपाध्ये, बाळासाहेब खाबिया, योगेश ओझा, संदीप आगरकर,नंदूशेठ कोठारी, संजय कासलीवाल, राहुल कोठारी, प्रेमचंद कुंकुलोळ, मुकेश कोठारी, माजी नगरसेवक राजू अदिक, पत्रकार सलीम पठाण सर, नगरसेवक भरत कुंकूलोळ, शरद कोठारी, माजी नगरसेवक आण्णासाहेब डावकर, माजी नगरसेवक आशिष धनवटे, भरत जगदाळे,अशोक बागुल, संजय रूपटक्के, अशोक शिवरकर, नवनाथ जेजुरकर, संजय लाड, चंद्रकांत कर्नावट, सुभाष जंगले, नवनाथ शेळके, श्री नामदे साहेब, कैलास शिंदे, राजेंद्र भोंगळे,राजेंद्र भांबरे, सुरेश कांगुने, संजय आगाशे, बापूसाहेब तुपे, जगन्नाथ हरार, विजय गांधी, चिरायु नगरकर, नजीरभाई शेख, माजी नगरसेवक सुनील बोलके, सुनील गलांडे,निलेश गोराणे, अमरप्रीतसिंग सेठी, माजी नगरसेवक श्याम अडांगळे, निलेश धुस्सा, सुरेश कोळेकर, किरण कर्नावट, पत्रकार दीपक कदम, हरीकृष्ण निर्माळ, नितीन हारदे,धीरज तलवार, संतोष मोरगे,अजय भागवत, मयूर पाटणी,विनीत कुंकूलोळ, निलेश बोरावके, विलास बोरवके,
शिवसेनेचे शहरप्रमुख माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोक मामा थोरे, तालुकाप्रमुख लखन भगत, सुधीर वायखिंडे, भगवान उपाध्य, शरद गवारे, तेजस बोरावके, युवासेना तालुका प्रमुख सुरेश थोरे, युवासेना शहर प्रमुख सिद्धांतभैय्या छल्लारे, रोहित नाईक, विशाल पापडीवाल, विक्रम नाईक, अकील पठाण, प्रमोद गायकवाड, रोहित भोसले, अजय छल्लारे, प्रकाश परदेशी, योगेश ढसाळ, शुभम छल्लारे, राजू डुकरे, मुस्ताक शेख, विशाल दुपाती, महेश जगताप, गोरख गुळवे, निलेश मटाले, मोती व्यवहारे, देवेन पीडियार, ज्ञानेश्वर सारंधर, विकी गंगवाल, लोकेश नागर, सुहस परदेशी, बापू बुधेकर, दत्ता करडे, प्रवीण शिंदे,व इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत, "प्रशासन हाय हाय" आणि "रस्ते दुरुस्ती करा" अशा घोषणा दिल्या. आंदोलनात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने शामील झाले होते. शिवसेना नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर येत्या काळात आणखी उग्र आंदोलन केले जाईल, अशी स्पष्ट चेतावणी त्यांनी दिली. नागरिकांच्या पाठीशी शिवसेना ठाम उभी असून रस्त्यांची समस्या सोडविण्यासाठी हा लढा सुरूच राहील, असे आंदोलकांनी ठामपणे सांगितले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳..
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================