राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, January 10, 2025

रब्बीचे एक तर उन्हाळ्यासाठी तीन आवर्तन द्या आमदार हेमंत ओगले




कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मंत्री विखे पाटील यांच्याकडे केली मागणी

शहरासाठी लागणारे अतिरिक्त आवर्तनाकडेही मंत्री महोदयांचे वेधले लक्ष

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 रब्बी साठी एक आवर्तन आणि उन्हाळी हंगामाचे तीन आवर्तनाची मागणी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. 
     भंडारदरा प्रकल्प (प्रवरा कालवे) रब्बी व उन्हाळी हंगाम सन २०२४ - २५ च्या नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठकीचे आयोजन इरिगेशन बंगला, लोणी या ठिकाणी करण्यात आले होते. त्याप्रसंगी आमदार हेमंत ओगले यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे आवर्तनाबाबत निवेदन देऊन मागणी केली आहे.
      सध्या भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून मुबलक प्रमाणात पाणीसाठा देखील आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेने केंद्रशासन पुरस्कृत सुधारित पाणीपुरवठा योजना अमृत २.० चे काम हाती घेतले आहे. त्यामुळे शहरातील दोन तलावांपैकी मातीच्या साठवण तलावाचे विस्तारीकरणाचे काम चालू झालेले आहे त्यामुळे एका साठवण तलावाच्या आधारे शहराची दैनंदिन पाणीपुरवठ्याची गरज भागविणे आवश्यक असल्याने शेतीच्या आवर्तना व्यतिरिक्त खास बाब म्हणून आवर्तन सोडताना प्रवाह बंद कालावधी हा पंधरा दिवसापेक्षा जास्त नसावा जेणेकरून शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणे सोयीचे होईल अशी मागणी आमदार ओगले यांनी केली आहे. 
       आवर्तन सुरू असतानाच गाव तळे व प्रवरा नदीवरील केटी बंधारे भरून मिळावे ज्यामुळे शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आमदार हेमंत ओगले यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. 
          यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांचा विविध सेवाभावी संघटनांकडून सत्कार !


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण (सर) यांची श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नजीरभाई शेख मित्रमंडळ, दोस्ती फाऊंडेशन,फातेमा वेलविशर्स समूह आणी मानवता संदेश फाउंडेशन
यांच्या अशा विविध सेवाभावी संस्था, संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार सलिमखान पठाण (सर) हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असुन ते पत्रकारीतेचे गाढे अभ्यासकही आहेत, विविध वर्तमानपत्रातून माहे रमजानूल मुबारक महिन्यात प्रसिद्ध होणारी त्यांची रमजानूल मुबारक ही लेखमालेच्या माध्यमातून ते राज्यभर सर्वांना सुपरिचित आहेत. तसेच विविध प्रसार माध्यमातून विविध विषयांकित ते सातत्याने सामाजाभिमुख लेख बातम्यांच्या माध्यमातून मोठी जनसेवाही करत आहेत, शिक्षकी पेशा असल्याने सर्वभौम असा त्यांचा गाढा अभ्यास आहेच शिवाय पत्रकारितेत देखील त्यांचे मोठे महत्वाचे स्थान असल्याने त्यांची मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.यामुळे अनेक नवोदित पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहेत


करीता विविध सामाजिक संस्था,संघटनेंच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तथा त्यांच्या भावी उज्वल कार्यास हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या.
या प्रसंगी सलिमखान पठाण (सर) यांचा सत्कार करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नजीरभाई शेख,दोस्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष रज्जाक शेख (सर) मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष जाकीर सय्यद,अभियंता एस.के. खान, बुऱ्हाण भाई जमादार,केंद्रसमन्वयक फारूक पटेल,
स्वस्तधान्य दुकान असोसिएशनचे सचिव रज्जाक पठाण,नसीर सय्यद सर,फिरोज पठाण सर, अन्वर शेख, समीर शेख, साजिद शेख,फिरोज पठाण साबणवाले,चांदभाई पठाण, सैंदाणे आदी फातेमा वेलविशर्स समूह,मिल्लत नगर मित्र मंडळ व मानवता संदेश फाउंडेशन सदस्य उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, January 9, 2025

सोशल मीडिया व इंटरनेट वापरताना मर्यादा ओळखा - पो. नि. देशमुख


 काचोळे विद्यालयात सायबर क्राईम विषयी पो.नि.देशमुख यांचे मार्गदर्शन

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 रयत शिक्षण संस्थेचे येथील डी.डी.कचोळे माध्यमिक विद्यालयात, रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत सायबर क्राईम याविषयी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम विषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे व ५७ महाराष्ट्र बटालियन श्रीरामपूर सेक्टरचे मेजर उपस्थित होते.
         विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नितीन देशमुख म्हणाले की,इंटरनेट वापरून केलेले गुन्हे हे सर्व सायबर क्राईम या संकल्पनेत येतात. दुसर्‍याच्या बँक अकाउंट मधून इंटरनेटचा वापर करून पैसे काढणे, इतरांच्या भावना दुखावणारे संदेश पाठवणे, प्रक्षोभक माहिती शेअर करणे, दुसऱ्याच्या माहितीचा व फोटोचा गैरवापर करणे, इतरांना धमकवणे अशा प्रकारचे सर्व गुन्हे सायबर क्राईम आहे. आपण अशा परिस्थिती ताबडतोब पोलिसांना संपर्क करणे. आपली माहिती इतरांना शेअर न करणे, अनोळखी लिंकला प्रतिसाद न देणे, सोशल मीडियावर आलेली माहिती पडताळून पाहणे, इंटरनेट व सोशल मीडिया वापराबाबत मर्यादा ओळखणे यासारखी सतर्कता आपण बाळगणे आवश्यक आहे. इंटरनेट वापराबाबत आपण साक्षर होणे ही काळाची गरज आहे.आजच्या काळात होणारे सायबर गुन्हे हे गुन्हेगारीचे नवे रुप आहे, याबाबत इंटरनेट वापरणाऱ्यांनी सतर्क राहिले पाहिजे असेही ते म्हणाले.
        याप्रसंगी नितीन देशमुख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला त्याचबरोबर देशाचे सुजान नागरिक घडवण्यासाठी विद्यालयात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक नानासाहेब मुठे यांनी केले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

वाचन संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य दिवाळी अंकांनी केले - माजी राज्यपाल राम नाईक


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
संपूर्ण जग डिजिटल तंत्रज्ञानाच्या विळख्यात गुरफटलेले असताना वाचन संस्कृती लयास जाती की काय अशी भीती असताना ती टिकवण्याची जबाबदारी ही दिवाळी अंकांनी यशस्वीपणे पार पडली आहे. असे प्रतिपादन माजी राज्यपाल राम नाईक यांनी केले.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने पत्रकार दिन व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला होता.त्या प्रसंगी ते बोलत होते. प्रमुखअतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, डॉ. सुकृत खांडेकर, तुळशीराम भोईटे, अनिल रोकडे, उद्योजक सागर जोशी होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी केले. 
याप्रसंगी बोलताना राम नाईक म्हणाले ग्रामीण भागातून उत्कृष्ट असा वर्ल्ड सामना चा दिवाळी अंक बघून मनस्वी खूप आनंद झाला,अशा दिवाळी अंकांमधून वाचनाची गोडी निर्माण होऊन तणाव मुक्त जीवन जगण्याचा मार्ग यातून सापडतो. वर्ल्ड सामना दिवाळी अंकाला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन संपादिका सौ.स्नेहलता प्रकाश कुलथे यांचा संस्थेने केलेला हा सन्मान योग्यच आहे.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे म्हणाले बाळशास्त्री जांभेकरांना अपेक्षित अशी पत्रकारिता खरंच पत्रकार करीत आहेत का ? असा प्रश्न आजच्या पत्रकारांकडे बघून पडतो. बाळशास्त्री जांभेकरांनी सत्याचा शोध व समाज वास्तवाचे प्रतिबिंब आपल्या दर्पण या वृत्तपत्रातून मांडले आहे समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी आवाज उठवला. आजचे पत्रकार हे रामा सारखे आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिलेले नसून वाल्या कोळया सारखे झाले आहेत. हे योग्य आहे का ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर तुळशीराम भोईटे डॉ. पारकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा विनोदी दिवाळी अंकाचा राज्यस्तरीय पुरस्कार माजी राज्यपाल व केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या शुभहस्ते स्वीकारताना वर्ल्ड सामनाच्या संपादिका सौ .स्नेहलता प्रकाश कुलथे समावेत ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, दैनिक पुढारी न्युज चैनल चे तुळशीराम बोठे, एकनाथ बिरवटकर, सौ. संगीता सुरेश नागरे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर -9561174111
----------------------------------------------
=================================




राजकारणाबरोबरच समाजकारणातून लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करा - आ. विठ्ठलराव लंघे पाटील


एकता पत्रकार संघाच्यावतीने नेवासा फाटा येथे पत्रकार दिन व पुरस्कार वितरण समारंभ थाटात संपन्न

- नेवासा - प्रतिनिधी -/ वार्ता -
 पत्रकारितेला आता काळानुरुप प्रिंट मीडिया बरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मोठे आव्हान असून हल्लीच्या युगात पत्रकारिता क्षेत्रात समाजातील घडामोडींची क्षणार्धात बित्तंबात्तमी देत सामाजिक जागृता निर्माण करण्याचे काम पत्रकार करत असून पुर्वीच्या काळात खेडे गावात सकाळी वृत्तपत्र घरी येऊ पर्यंत जिल्ह्यातील घडामोडी सर्वसामान्य जनतेला समजत नव्हत्या आता माञ पत्रकारितेत मोठे बदल होवून जलदगतीने सामाजिक घडामोडींचे आकलन पत्रकारितेच्या माध्यमातून होत असते त्यामुळे पत्रकारांनी या सर्व स्पर्धेच्या युगात वास्तवतावादी पञकारिता करुन राजकारण आणि समाजकारणात लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करावा असे आवाहन नेवासा तालुक्याचे शिवसेना आमदार विठ्ठलराव लंघे - पाटील यांनी सोमवार (दि.६) रोजी झालेल्या नेवासा फाटा येथील ञिमुर्ती शैक्षणिक संकुलात आयोजित नेवासा तालुका एकता पञकार संघाच्या पञकार दिन व पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलतांना केले.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नेवासा फाटा येथील श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनिलगिरी महाराज,श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, नेवासा पोलीस ठाण्याचे निरिक्षक धनंजय जाधव, ञिमुर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील, मुकिंदपूरचे माजी सरपंच दादा निपुंगे, नेवासा पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, समर्पन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे ज्येष्ठ नेते रामराव पाटील भदगले, कृषी शास्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे, गणेशराव लंघे, भाजपाचे नेते अंकुशराव काळे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष रावसाहेब घुमरे, एकता पञकार संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.
      
         नेवासा तालुका एकता पञकार संघाच्यावतीने आयोजित पञकार दिन व पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेञात उत्तुंग भरारी घेत शिक्षणाची जिल्ह्यासह परजिल्ह्यात मोठी दालने उभी करुन ज्ञानार्जन करणाऱ्या ञिमुर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील यांना शिक्षण महर्षी पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
 तर पञकारिता क्षेञात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या भेंडा येथील पत्रकार कारभारी गरड, घोडेगांव येथील पत्रकार दिलीप शिंदे तर बालाजी देडगांव येथील पत्रकार बन्सी एडके यांना दर्पण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
    
      यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे - पाटील बोलतांना पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणूकीत जनतेने मला निवडून दिल्यानंतर आता अनेकांच्या मोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे आपण केवळ निवडणुकी पुरतेच राजकारण करुन स्व. वकिलराव अण्णा लंघे यांच्या जुन्या पिढीचे संस्कार जपत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणार असल्याची ग्वाही यावेळी बोलतांना त्यांनी दिली. तालुक्यातील सर्वच पञकार आमचे मिञ असून पञकारांनीही मला सदैव नेहमीच साथ दिलेली असून आता विकास कामे करण्यासाठी पञकारांनी मार्गदर्शकाची भूमिका बजाविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी पञकारांना केले.
         यावेळी बोलतांना श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनिलगिरी महाराज यांनी आमदार विठ्ठलराव लंघे - पाटील यांनी धक्क्यावर धक्के घेत विधानसभा निवडणूकीत विजयी मिळविलेला आहे,
 ते पहीले क्लिनर होवून मग ड्रायव्हर झाल्यामुळे त्यांना कामाचा मोठा अनुभव असून त्याचा फायदा विकास कामाबाबत समाज घटकाला नक्कीच होणार असल्याचे गौरोद्गार यावेळी बोलतांना महंत सुनिलगिरी महाराज यांनी काढले.
     
       याप्रसंगी बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी म्हणाले की, हल्लीच्या युगात खुन (हत्या) यापेक्षा अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक झपाट्याने वाढत असल्याने मोठा चिंतेचा विषय ठरत असल्याचे सांगत वास्तवात याचे स्पष्टिकरण आणि अनेक कारणे विषद करुन प्रबोधन केले. तर पोलीस निरिक्षक धनंजय जाधव, ञिमुर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
        
याप्रसंगी पञकार राजेंद्र वाघमारे, संदिप गाडेकर, चंद्रकांत दरंदले, अशोक पेहरकर, विनायक दरंदले, इकबाल शेख, युनुस पठाण, मकरंद देशपांडे, नामदेव शिंदे, गणेश बेल्हेकर, अभिषेक गाडेकर, सौरभ मुनोत, सचिन कुरुंद, सुधाकर होंडे, बाळासाहेब पंडीत, राहूल कोळसे, विकास बोर्डे, विलास धनवटे, सोमनाथ कचरे, देविदास कचरे, मोहन शेगर, अशोक भुसारी, राहूल चिंधे, संतोष सोनवणे, विठ्ठल उदावंत यांच्यासह तालुक्यातील पञकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, सामाजिक कार्यकर्ते महेश कांडके, शहर कॉंगेसचे अध्यक्ष अंजूम पटेल यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेञातील मान्यायवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन सुधीर चव्हाण यांनी केले तर आभार दादासाहेब निकम यांनी मानले. 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदिप गाडेकर, राजेंद्र वाघमारे, अशोकराव पेहरकर, चंद्रकात दरंदले, सतिष उदावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार संदिप गाडेकर - नेवासा 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

देशात विचारी,सदाचारी पिढी घडविण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक - भाषामंडळ संचालक - प्रा. (डॉ.) सुभाष वाघमारे


देशात विचारी,सदाचारी पिढी घडविण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक - भाषामंडळ संचालक - प्रा. (डॉ.) सुभाष वाघमारे

किसनवीर महाविद्यालयात वाचन कौशल्य व तंत्र विकास कार्यशाळेचे प्रभावी आयोजन 

वाई (जि.सातारा) प्रतिनिधी:
वाचन हेच जीवन आहे. शरीराचे पोषण करण्यासाठी जशी अन्नाची गरज असते, तसे मनाचे ,मेंदूचे पोषण करण्यासाठी बहुविध स्वरूपाच्या वाचनाची गरज आहे. वाचनाने माणूस घडतो. जीवन उदात्त व उन्नत होण्यासाठी स्वहितकारी व समाजहितकारी वाचन आवश्यक असते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आईनस्टाईन यारख्या जगातील ज्ञानी व्यक्ती वाचनातून विविध प्रकारचे ज्ञान मिळवून समाजाला योग्य मार्ग देणाऱ्या व्यक्ती झाल्या. आंबेडकर यांनी ग्रंथावर जेवढे प्रेम केले तेवढे कोणी केल्याचे ऐकिवात नाही. ज्ञान मिळविण्यासाठी स्वतःचे राजगृह हे घर त्यांनी ग्रंथालय बनविले. वाचनातून प्रेरणा घेऊन त्यांनी अस्पृश्यतेचा संमुळ नायनाट केला. देशाला एक करणारे संविधान लिहिले, महात्मा गांधीजी ,रवींद्रनाथ,टागोर ,जवाहरलाल नेहरू इत्यादी विचारी माणसे जगातले ग्रंथ वाचत होती. आज समाजात ज्या विकृती निर्माण झाल्या आहेत, ते रिकामे डोके असल्याचे लक्षण आहे. चांगले संस्कार देणारी पुस्तके शोधून वाचली पाहिजेत. स्वर्ग प्राप्त करण्याच्या भ्रामक कल्पनेत न राहता बुद्धांनी सागीतल्याप्रमाणे बहुजन हिताय,बहुजन सुखाय असे आचरण पृथ्वीवर आवश्यक आहे. म्हणूनच देशात विचारी व सदाचारी पिढ्या घडविण्यासाठी ग्रंथ वाचनाची नितांत गरज आहे. असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभागप्रमुख व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे संचालक प्रा. (डॉ.) सुभाष वाघमारे यांनी केले. ते येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील मराठी विभाग, ग्रंथालय विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' अभियानांतर्गत ‘ वाचन कौशल्य : तंत्र व विकास ’ या कार्यशाळेतील दुसऱ्या व्याख्यानात ते वाचनसंस्कृती जोपासण्याची कारणे आणि उपाय या विषयाव प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, उपप्राचार्य डॉ. हणमंतराव कणसे, श्री. भीमराव पटकुरे, बाळासाहेब कोकरे, ज्येष्ठ प्राध्यापक (डॉ.) सुनील सावंत, प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे, प्रा. (डॉ.) विनोद वीर,ग्रंथपाल डॉ. शिवाजी कांबळे, डॉ. धनंजय निंबाळकर, डॉ. संग्राम थोरात यांची उपस्थिती होती.
                डॉ. वाघमारे म्हणाले, ‘ तंत्रज्ञानाने प्रगती होते हे जरी मान्य केले तरी कोणती प्रगती होते ? माणसाने पंचशील पालन केले नाही तर तंत्रज्ञानाचा दुरुपयोग सुरु होतो. समाजात समता,बंधुभाव ,व प्रेम निर्माण करण्यासाठी काम करायचे की द्वेष निर्माण करण्यासाठी ? हे कळण्यासाठी विवेकी . विचारी होणे आवश्यक आहे. वाचनाने बुद्धीचा विकास केला तरी ती बुद्धीचा सदुपयोग करण्याचे संस्कार आवश्यक आहेत. त्यामुळे ग्रंथ जरी वाचले तरी त्यात काय चांगले ,काय वाईट याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. सोशल मिडीयावर केले जाणारे वाचन सखोल नाही. त्यासाठी ग्रंथ विकत घेऊन वाचनाची सवय लावली पाहिजे. घरात सोने ,नाणे या संपत्तीला प्रतिष्ठा देण्याची प्रथा आता दूर करून घराघरात ग्रंथालय कसे होईल यासाठी काम करायला हवे. प्रत्येक लेखक आपल्या ग्रंथातून काहीतरी चांगला संदेश देत असतो. त्याचा शोध घेऊन प्रत्येकाने तो विचार आचरणात आणला पाहिजे. दलित साहित्याच्या वाचनाने आत्मभान जागृत होते. संतांनी, समाजसुधारकांनी समानतेच्या दिलेल्या मंत्राचा अंगीकार करुन जीवन जगायला हवे. त्यांच्या रस्त्यावरुन चालताना आपली सद्सदविवेक बुध्दी जागृत ठेवण्यासाठी वाचनाची नितांत गरज आहे, कारण वाचन हे जीवन आहे. त्यांनी आपल्या भाषणातून वाचनसंस्कृतीचे महत्त्व, ती वृद्धिंगत करण्याचे उपाय, उद्देश, वाचनसंस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे उदाहरणांसह विशद केली .
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, वाचनाने माणूस स्वयंप्रकाशित होतो. ग्रंथांमध्ये जीवनानुभव असतात त्याचा शोध घेता आला पाहिजे. ज्ञान आणि प्रेम यांचा संयोग व्यक्तीच्या अंगी असला पाहिजे. माणसाचे विचार चांगले असतील तर ती व्यक्ती माणूस म्हणून मोठी ठरते. आपली वाटचाल योग्य दिशेने होण्यासाठी समाजज्ञान आणि समाजभान असणे आवश्यक आहे. वाचनाचा संस्कार माणसाला प्रगल्भ बनवतो. निरंतर वाचनाने शब्दभांडार वाढते. समाजात बोलताना व वागताना अंगी नम्रता येते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रो. डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. 
डॉ. संग्राम थोरात यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रीमती सुमती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शिवाजी कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अमोल कवडे यांनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमास डॉ. मंजुषा इंगवले, डॉ. बाळकृष्ण मागाडे, डॉ. अंबादास सकट, डॉ. संदीप वाटेगावकर, दीपाली चव्हाण,संदीप पातुगडे, तानाजी हाके, सोमिनाथ सानप, नीलम भोसले, रेश्मा मुलाणी, दीक्षा मोरे, मेघा शिर्के, सुलभा घोरपडे, जितेंद्र चव्हाण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

वॉर्ड क्र.२ नवीन घरकुल मधील त्रस्त नागरीकांची माथी शेवटी भडकणार ?


अन् त्रस्त नागरीकांचा मोर्चा कधीही
नगर पालिकेवर येवून धडकणार !!

नागरीकांच्या घरात शिरत असलेल्या गटारीच्या घाण पाण्याचा बंदोबस्त करा

अन्यथा नगर पालिकेवर त्रस्त नागरीकांचा धडक मोर्चा - रियाजखान पठाण यांचा इशारा 

शौकतभाई शेख / श्रीरामपूर
येथील वॉर्ड क्र.२ नवीन घरकुल याठिकाणी कमालीची अस्वच्छता निर्माण झाली असून यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नगर पालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करुनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने परिसरातील त्रस्त नागरीकांचा मोर्चा नगर पालिकेवर धडकणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रियाजखान पठाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रियाजखान पठाण आणी परिसरातील त्रस्त नागरीकांनी श्रीरामपूर नगर पालिका मुख्याधिकारी यांना दिलेला निवेदनात म्हटले आहे की,वॉर्ड क्र.२ मधील नवीन घरकुल याठिकाणी दोन्ही घरकुल इमारतींच्यामधून जी ड्रेनेजची गटार गेलेली आहे. ती गटार खुप खराब झालेली आहे. त्या गटारीमध्ये प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले असून त्यात उंदीर आणी घुशीचे मोठं मोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे सदरील ड्रेनेज गटारीत माती जावून गटारीची लेव्हलच राहिलेली नाही. यामुळे नेहमी गटार तुंबते आणी गटारीचे व ड्रेनेजचे घाण पाणी नवीन घरकुलमधील नागरीकांच्या बाथरुमद्वारे थेट घरात शिरत आहे.अशी ही अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झालेली असल्याने सदरील ठिकाणी रहिवासी नागरीकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे,
या परिसरात प्रचंड प्रमाणात डास,मच्छर आणी रेंगणारे किटक घरात रेंगताना आढळून येत असल्याने यामुळे येथील रहिवाशांच्या लहान लहान बालकांसह थोर मोठ्यांना गंभीर स्वरूपाचे आजार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वारंवार फोन करुनही म्हणावी तशी दखल घेतली जात नाही,न.पा. कर्मचारी कधी काळी येतातही मात्र थातूर - मातूर साफसफाई करुन जातात, परंतु पुन्हा परिस्थिती जैसे थे, या संदर्भात तात्कालिन मुख्याधिकारी गणेश शिंदे, सोमनाथ जाधव यांच्याकडे देखील अनेक तक्रारी केलेल्या होत्या व आहे,तसेच न.पा.चे मुकादम असलम शेख,आरोग्य विभागाचे धारवर,आरणे न.पा. बांधकाम अभियंता गवळी, यांना देखील कळविले होते. त्यांनी सांगितले की यावेळी संभाळून घ्या. पुढच्यावेळी ठिक करु,मात्र ही आश्वासने केवळ फोलच ठरली आहे. याबरोबरच सदरील ठिकाणच्या रहिवाशांच्या घरात खुपच दुर्गधी पसरली, आहे. करीता विद्यमान मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी जातीने लक्ष घालून सदरील ठिकाणच्या गटारीचे कामे लवकरात लवकर हाती घ्यावे आणी याठिकाणच्या जवळपास तीनशे ते चारशे रहिवासी नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा अशी या निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली असून. 
या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, सदरील कामे ही लवकरात लवकर न झाल्यास परिसरातील त्रस्त नागरीकांच्या सहनशिलतेचा अंत होवून त्यांची माथी भडकतील आणी पुढे याच गटारीचे घाण पाणी घेऊन ते आपल्या नगर पालिकेवर धडक मोर्चाद्वारे धडकतील यापासून निर्माण झालेल्या बऱ्या व वाईट परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित नगर पालिका प्रशासनावरच राहील याची वेळीच नोंद घेण्यात यावी असा इशाराही शेवटी सामाजिक कार्यकर्ते रियाजखान पठाण आणी संबंधित त्रस्त नागरीकांद्वारे नगर पालिका प्रशासनास देण्यात आला आहे.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561274111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------

श्रीरामपूर - येथील वॉर्ड क्र.२ मधील नवीन घरकूल याठिकाणी गटार साफ होत नाही, मोठ्या प्रमाणात गटारी तुंबलेल्या आहेत, गटारीचे घाण पाणी नागरीकांच्या घरात शिरत असल्याने याठिकाणच्या रहिवासी खुपच त्रस्त झालेले आहे, त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही घरकुल इमारतींच्या मध्ये तात्काळ नवीन ड्रेनेज गटार बांधण्यात यावी, यामुळे नागरीकांच्या समस्यांचे निवारण होवून सुविधा उपलब्ध होईल अशा अशयाचे निवेदन श्रीरामपूर नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले, याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रियाजखान पठाण, सुनिल भाऊ, उस्मान भाई काकर,फिरोजभाई शहा व परिसरातील त्रस्त नागरीक उपस्थित होते.
-----------------------------------------------
=================================