राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, January 23, 2025

बेलापूर वि.का.से.संस्थेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने पञकारांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अशोक गाडेकर,भास्कर खंडागळे ,रणजीत श्रीगोड, मारुतराव राशिनकर,सुनिल मुथा,विष्णुपंत डावरे,ज्ञानेश गव्हले,देविदास देसाई, नवनाथ कुताळ,सुनिल नवले,दिलिप दायमा,सुहास शेलार,शरद पुजारी,रुपेश सिकची,आतिष देसर्डा यांचेसह अभिजीत राका, गणेश साळुंके यांचे समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, पंचायत समितीचे माजी सभापती दत्ता कु-हे , लहानुभाऊ नागले पंडीतराव बोंबले,प्रकाश पा. नाईक,विश्वनाथ गवते, चंद्रकांत नाईक, तुकाराम मेहेञे, बाळासाहेब दुधाळ, कलेश सातभाई, सुधाकर खंडागळे,प्रकाश कु-हे , बाळासाहेब लगे,बंटी शेलार, सुरेश कु-हे, शफिक आतार, संजय शेलार, रमेश अमोलिक,अशोक प्रधान, अन्तोन अमोलिक,रमेश शेलार, आयजुभाई शेख, आदि उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

अलमीजान मध्ये कॉपी मुक्त अभियानकॉपी न करण्याची विद्यार्थ्यांना शपथ

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील अलमिजान एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित हजरत मौलाना मख्दूम हुसेन साहब उर्दू हायस्कूल व मख्दूमिया कॉलेज ऑफ सायन्स येथे, शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय परिक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना परिक्षेत कापी न करण्याची शपथ देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिक्षेत कॉपी करू नये व कॉपी करून मिळविलेले यश टिकत नाही तसेच कॉपी केल्याने कोण कोणती शिक्षा होऊ शकते व विद्यार्थ्याचे जीवन कसे उद्ध्वस्त होऊ शकते याची माहिती मुख्याध्यापिका व प्राचार्य सय्यद आरिफा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी पूर्ण तयारी करून अभ्यास करून तणाव मुक्त वातावरणात परिक्षा द्यावी. कॉपीमुक्त जनजागृती अभियान हे २० जानेवारी ते २६ जानेवारी पर्यंत चालणार असून यामुळे विद्यार्थी व पालकात जनजागृती निर्माण होईल तसेच होणाऱ्या बोर्डाच्या परिक्षेत परिक्षेच्या कारभाराच्या भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात परिक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यास मदत होईल. शासनाच्या या नवीन निर्णयाची अंमलबजावणी अलमिजान संस्थेच्या वतीने करण्यात आली व शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका आरिफ सय्यद, नसिमा सय्यद ,आरिफ शेख, रफिक शेख, इब्राहिम बागवान , फैजिन मुस्ताक, नदीम शेख ,शहानवाज गुलाम व सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
इकबाल काकर (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, January 20, 2025

बेलापूर महाविद्यालयाचे उंबरगाव येथे रासेयोचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
युवा अवस्थेत युवकांनी व युवतींनी आपल्या यशाचे तेज कायम वाढते ठेवले पाहिजे. समाजसेवेची सुरुवात करताना ती आपल्यापासून करावी, मात्र आपण आपल्यासाठी नाही, तर गावासाठी झटून खऱ्या अर्थाने सामाजिक विकास साध्य होईल असे प्रतिपादन उंबरगावच्या सरपंच ऍड. सुप्रियाताई भोसले यांनी केले. 
       श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उंबरगांव येथील विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त भरत साळुंके हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त नंदूशेठ खटोड, , महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा. हंबीरराव नाईक,अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विराज भोसले, संचालक सचिन काळे, उंबरगाव विकास सोसायटीचे चेअरमन रवींद्र झरेकर, राजेंद्र ओहोळ,ग्रामस्थ दादा पाटील काळे, बाळासाहेब राऊत, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत कोतकर, प्रा. अशोक थोरात, प्रा. डॉ. संजय नवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. 
         यावेळी प्रा. हंबीरराव नाईक मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपलं गाव हेच आपलं राष्ट्र समजून युवकांनी कार्य केले पाहिजे. तर राजेंद्र ओहोळ म्हणाले की, तुम्ही जिथे जाताल तिथे आपल्या कार्याचा ठसा उमटविला पाहिजे. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेतून आदर्श युवक घडावेत. समाजासमोर उभ्या असलेल्या ज्वलंत प्रश्नांची जाण त्यांना असावी तरच राष्ट्राचा विकास घडवून येतो. 
         कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षीय सूचना प्रा. डॉ. संजय नवाळे यांनी मांडली, तर प्रा. अशोक थोरात यांनी अनुमोदन दिले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. बाबासाहेब पवार यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत कोतकर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.अशोक माने यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. बाबासाहेब पवार यांनी मानले. सदर कार्यक्रमास उंबरगाव ग्रामस्थ, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवकवृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या समस्त पदाधिकाऱ्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------=================================

महात्मा गांधी विद्यालयासस्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार


- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयास स्वच्छ शाळा व सुंदर शाळेचे पारितोषिक नुकतेच प्राप्त झाले आहे.
रयत शिक्षण संस्था उत्तर विभागीय कार्यालयाचे वतीने देण्यात येणाऱ्या मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती परितोषिक प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयास नुकतेच प्राप्त झाले आहे. 
राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे आयोजित कॉम्रेड पी. बी. कडू पाटील व स्वर्गीय शांताबाई कडू पाटील स्मृती पुरस्कार वितरण समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संजय ठाकरे यांचा स्मृतिचिन्ह, रोख रक्कम आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, उपाध्यक्ष अरुण कडू, सचिव विकास देशमुख, मीनाताई जगधने, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, महेंद्र घरत, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, प्रकाश निकम पाटील, डॉ. राजीव शिंदे, प्रमोद तोरणे आदी जण उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारण्यासाठी रावसाहेब म्हस्के, एकनाथ घोगरे, उपप्राचार्य अलका आहेर, प्रभारी मुख्याध्यापक सुभाष भुसाळ, डॉ. शरद दुधाट, नरेंद्र ठाकरे, अश्विनी सोहोनी, शाहिस्ता शेख, योगिता निघुते, श्रीमती कुदळ आदी जण उपस्थित होते. विद्यालयास मिळालेल्या या सन्मानाबद्दल ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*💐✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत प्रसिद्ध सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा


पांचपीर ट्रस्ट (मोहाडी) आयोजित व्याख्यानमाला आणि संविधान व सामाजिक परिवर्तनाचे कवी संमेलन संपन्न 

धुळे - मोहाडी - प्र.डांगरी -/ प्रतिनिधी -
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमीत्ताने संविधान व सामाजिक परिवर्तनाच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष नवनाथ आनंदा रणखांबे यांनी अध्यक्षिय भाषणात बोलताना, " गावचा आणि गाव कुसा बाहेरच्या गावाचा, देशाचा आणि देशातल्या बहिष्कृत देशाचा विकास हा भारतीय संविधानाने झाला आहे. कोणताही भेदभाव न करता संविधानाने सर्व सामान्य माणूस देशाच्या सर्वोच्च पदावर विराज मान झाला आहे. ही किमया भारतीय संविधानाची आहे. आज संविधानाच्या अमृत महोत्सवादिनानिमित्ताने व्याख्यानमाला, कवी संमेलन, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा कौतुक सोहळा, संविधान उद्देशिका घराघरात अशा छान उपक्रमा बरोबर संविधानाची जनजागृती प्रसार आणि प्राचार , शाम बैसाने अध्यक्ष पांचपीर ट्रस्ट (मोहाडी) यांनी स्वतःच्या मोहाडी प्र. डांगरी या आपल्या गावात राबवला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.
मुंबईला गेल्यावर लोकं गाव विसरतात पण शाम बैसाणे गावाला विसरले नाहीत. गावात छान उपक्रम त्यांनी घेतला आहे. सामजिक कार्य ते चांगले करीत आहेत. आज काल लोकं कौतुक करीत नाहीत पण बैसाणे यांनी चांगली भूमिका घेऊन गावात चांगले कार्य करणाऱ्या गावातील मान्यवरांचा आणि विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला आहे." असे प्रतिपादन केले. 
       भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने पांचपीर ट्रस्ट (मोहाडी), कार्यक्षेत्र भारत आयोजित व्याख्यानमाला बारकु काळू खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली आणि संविधान व सामाजिक परिवर्तनाचे कवी संमेलन जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे यांच्या अध्यक्षतेखाली व शाम बैसाने अध्यक्ष पांचपीर ट्रस्ट (मोहाडी) यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
      व्याख्यानमालिकेत वक्ते ॲड. नाना अहिरे (प्रसिद्ध वकील आणि समाजसेवक) यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन कार्य , वक्ते पिंटू धनगर (माजी सरपंच) यांनी फुले शाहू आंबेडकर आणि मानवतावादी चळवळ, 
आणि वक्ते बाळासाहेब शंकर बैसाणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान, या विषयानुसार मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन पेंढारे यांनी केले तर दुसऱ्या सत्रात संविधान व सामाजिक परिवर्तनाचे कवी संमेलनामध्ये अध्यक्ष नवनाथ आनंदा रणखांबे (कल्याण) सहभागी निमंत्रित कवी भटू जगदेव (भिवंडी), मास्टर राजरत्न राजगुरू ( बदलापूर ), अजय भामरे (अमळनेर), शरद धनगर (अमळनेर), शाम बैसाणे ( मोहाडी ), डॉ. सुशील बैसाणे ( मोहाडी), साक्षी खैरनार ( धुळे), पल्लवी चौधरी (मोहाडी ) आदी विषयानुरूप कविता सादर करून सामजिक प्रबोधन केले. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन अहिराणी बोलीभाषेतील प्रसिध्द कवी शरद धनगर यांनी केले. मराठी भाषेसह अहिराणी बोली भाषेतील कविता , गजल , लोकगीते सादर करून उपस्थित गावकरी समाज बांधवांचे प्रबोधन केले.
      कवी संमेलनाच्या निमंत्रीत कविंच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मान्यवरांच्या बरोबरच दहावी आणि बारावी मध्ये गावात प्रथम, दुतिय आणि तृतीय क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या गुणवंत मुला - मुलींचा सन्मानपत्र , संविधान उद्देशिका व पुष्पगुच्छ देऊन कौतुक सोहळा संपन्न झाला.
   यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती रतन मोरे, महेश चौधरी, डॉ. सुशिल बैसाणे, (कार्याध्यक्ष पांचपीर ट्रस्ट मोहाडी) ,ॲड नाना अहिरे (सचिव पांचपीर ट्रस्ट मोहाडी), श्रावण अहिरे, तुषार पाटील , सुशीलाताई सोनवणे, विलास गुजर, सुनील पाटील, भाऊराव बैसाणे, हुकूमचंद गुजर, संतोष बिऱ्हाडे, पिंटू धनगर, नाना चौधरी, सागर आखाडे, जगदीश खैरनार, आशाबाई खैरनार, योगिता खैरनार, दिपाली खैरनार, योगेश बैसाणे, राहुल बैसाणे, बाळू बैसाणे, किशोर पवार, मोनू अहिरे, माया अहिरे, प्रकाश बैसाणे, रहीम खाटीक, राजू सोनवणे, आबा माळी, अमृत भोई, सागर बैसाणे, हिम्मत पाटील, महेश चौधरी, पवन बैसाणे, अशोक धनगर, अरुण जैन, गोरख भोई, कैलास पवार, शालिक चित्ते , कैलास चित्ते , आनंदा हरी बैसाणे, मनोज चित्ते, युवराज माळी, हर्षवर्धन बसाणे, आदी सह गावातील ग्रामस्थ होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Sunday, January 19, 2025

अवैध दारू दुकान बंद करणेसंदर्भात आमदार अमोल खताळ यांना बानोबी शेखसह सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन


 सोमवारपासून सुरू होणार आमरण उपोषण, उत्पादन शुल्क विभाग आणी पालिका अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात

- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता -
संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात कुरण रोड याठिकाणी अनाधिकृतपणे असलेले सागर वाईन नामक सरकारमान्य देशी दारू दुकान हे गेल्या काही वर्षापासून खोट्या कागदपत्राच्या आधारावर लायसन बनवून व्यवसाय सुरू असल्याचा आरोप सर्वतो कागदपत्राच्या पुराव्यांनिशी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे तथा याबाबतचे आवश्यक सर्व ते पुरावे देखील त्यांनी संबंधित प्रशासनाला व प्रसार माध्यमांना वारंवार दिलेले देखील आहेत,मात्र सदरील अवैध दारु दुकानावर अद्यापही कोणतीत कारवाई केली जात नसल्याने उद्या सोमवार दि.२० जानेवारी २०२५ रोजी पासून आमरण उपोषण देखील त्याच दारू दुकानाच्या समोर कुरण रोड या ठिकाणी होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
या संदर्भात त्यांनी आज संगमनेरचे आमदार अमोल खताळ - पाटील यांची प्रत्येक्ष भेट घेऊन त्यांना उपोषणाचे निवेदन देत सदर प्रकरणी आवश्यक सर्व कागदपत्रांचा योग्य पाठपुरावा देखील केला आहे, 
सदर निवेदन स्विकारताना आमदार अमोल खताळ - पाटील यांनी देखील आपण दिलेल्या कागदोपत्राची सर्व ती चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांशी याची योग्य शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासने दिले आहेत, तर पुढे बोलताना अमोल खताळ म्हणाले की, संगमनेर शहर व तालुक्यात विविध अवैध व्यवसाय तसेच शासनाच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून अवैध व्यवसाय करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, अश्यांची गय देखील केली जाणार नाही, योग्य वेळी योग्य ती कारवाई केली जाईल असा दिलासा देखील आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे.
सदरचे प्रकरण बघता,
सदरील देशी दारू दुकानाच्या कागदपत्राचा पाठपुरावा करत असताना माहिती अधिकाराच्या अर्जामध्ये नगरपालिकेने उत्तर देताना स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला आहे की, सदरचे दुकान हे आमच्या कुठल्याही परवानग्या न घेता, आमचा कुठलाही कर न भरता, आमचे कुठलेही ना हरकत दाखले न घेता, आमच्या विभागांमध्ये कुठलीही नोंद न करता केलेला गैरप्रकार - कारस्थान असून या संबंधी आमच्याकडे कुठलाही पुरावा उपलब्ध नाही.
मग धडधडीत असे असताना संगमनेर नगरपालिका व पालिकेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी सदर दुकान धारक मालकाला का पाठीशी घालत आहेत ?, इतर ठिकाणी अतिक्रमण काढली जातात मात्र या देशी दारू दुकानाचे अतिक्रमण का हटवले जात नाही ? हा देखील मोठा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेसमोर उभा ठाकला आहे. तर दुसरीकडे या दुकानाचा सर्व लेखाजोखा हा अहिल्यानगर दारुबंदी उत्पादन शुल्क विभागाकडे असून तिथे देखील पाठपुरावा केलेला आहे, मग संगमनेर शहरात विराजमान झालेले दारुबंदी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सहस्रबुद्धे तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे विभागीय दारुबंदी उत्पादन शुल्क अधिकारी सोनोणे हे या दुकानदारास कारवाई करण्याऐवजी का पाठीशी घालत आहेत ? हा देखील मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेस पडलेला आहे. त्यामुळे सुज्ञ नागरिकांमध्ये अशी देखील चर्चा आहे की, या दुकानाचे अनाधिकृत बांधकाम आणि अनाधिकृत देशी दारू दुकानाला लायसन देणारे या सर्वांचे लागेबांधे असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
असो उद्या सोमवार दिनांक २० जानेवारी २०२५ सकाळी दहा वाजल्यापासून सदरचे उपोषण हे सध्या अस्तित्वात असलेल्या अवैध दारू दुकानासमोर सुरू होणार असून याबाबत संबंधित प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार अमोल खताळ यांना निवेदन देते वेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार अहिल्यानगर जिल्हाध्यक्षा बानोबी शेख, सामाजिक कार्यकर्ते जमीर उर्फ बब्बू पाकीजा, आकील पठाण, हाजी अब्दुल कादीर शेख, मुजम्मिल उर्फ गुड्डू भाई शेख आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Saturday, January 18, 2025

विद्यानिकेतन म्हणजे जणू रवींद्रनाथ टागोरांचे शांतीनिकेतन - साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये


विद्यानिकेतन म्हणजे जणू रवींद्रनाथ टागोरांचे शांतीनिकेतन - साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 शिक्षणतपस्वी,देशभक्त, समाजसेवक,साहित्यिक असलेले स्व.ॲड्.रावसाहेब शिंदे यांच्या महादेव मळ्यातील विद्यानिकेतन प्री प्रायमरी स्कूल म्हणजे जणू ज्ञानतपस्वी रवींद्रनाथ टागोरांचे संस्कार आणि शिक्षण देणारे शांतीनिकेतनच होय,असे मत साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील महादेव मळ्यातील ॲड्. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचालित विद्यानिकेतन प्री प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थी विविध क्रीडास्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रतिष्ठानचे कार्यकारिणी चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते. प्राचार्या चित्रा सूरडकर यांनी स्वागत केले तर समन्वयक जया फरगडे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. 
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सांगितले की, बालपण हे ओल्या मातीसारखे असते, बालपणातच संस्कार,ज्ञान, क्रीडा, देशभक्ती आणि समाजनीतीचे बाळकडू त्याला मिळाले पाहिजेत, यादृष्टीने विद्यानिकेतन शाळेतील उपक्रम आणि परिसरसमृद्धी यांचा प्रभावी वापर केला जातो, हे कौतुकास्पद आहे, श्रीमती शशिकलाताई शिंदे, डॉ. राजीव शिंदे, डॉ. प्रेरणा शिंदे, चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके, प्राचार्या चित्रा सूरडकर आणि सर्व शिक्षक यांचे नियोजन उपयुक्त आहे, त्यामुळेच ही शाळा जणू शांतीनिकेतन सारखी ज्ञानसंस्कारी शाळा असल्याचे डॉ. उपाध्ये यांनी सांगितले.
प्राचार्य शेळके म्हणाले, बालपण हे संवेदनशील आणि काहीसे निराधार असते, त्यासाठी शाळेतील शिक्षक फार महत्वाचे असतात. असे सांगून त्यांनी प्राचार्य डॉ. गागरे व डॉ. उपाध्ये यांनी कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले, ते प्रसंग सांगून आता मुलांना खूप सोयी सवलती आहेत, त्यांचा फायदा त्यांना होत आहे, त्याविषयी कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी चंद्रावर जाऊ चला ही कविता सादर करून क्रीडा उपक्रमाचे कौतुक केले.
टीचर प्रिती राठी, सोनाली बनभेरू, प्रियंका पगारे यांनी विविध वर्ग ग्रुपचे बक्षीस वितरण सूचना मांडली. टीचर निकिता गरुड, मनिषा आव्हाड, कल्याणी जोशी, साक्षी गायकवाड, प्रिया दळवी, शुभांगी दुशिंग, अश्लेषा दुशिंग, साक्षी दुशिंग, कोमल बत्तीसे, यांनी उपक्रमांचे नियोजन केले. हर्षदा भांड यांनी छायाचित्रण केले. सूत्रसंचालन जया फरगडे यांनी केले तर प्राचार्या चित्रा सूरडकर यांनी आभार मानले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
=================================
-----------------------------------------------