राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, February 5, 2025

संगमनेर दोघांविरुद्ध गुन्हा, दोघा अज्ञात चोरट्यांनी रस्त्यावरून पायी जाणाऱ्या एका शिक्षिकेचे ५० हजार रुपयांचे दागिने लांबविले.


- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता -दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी रस्त्यावरून पायी जाणाऱ्या एका शिक्षिकेचे ५० हजार रुपयांचे दागिने लांबविले आहे. शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वृत्तपत्र विक्रेते दिनेश टकले यांच्या भावजयी शिक्षिका योगिता निखिल टकले (वय ३९) या संगमनेर शहरालगतच्या गुंजाळ मळा परिसरातील श्रद्धा कॉलनी मध्ये राहतात. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्या वॉकिंग करून घरी पाई जात होत्या. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी टकले यांचे पन्नास हजार रुपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण लांबविले. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने टकले यांचे गंठण ओढले. यानंतर चोरटे फरार झाले.

याबाबत योगिता टकले यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



Tuesday, February 4, 2025

निळवंडे ते कौठे कमळेश्वर रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या या उद्देशाने थांबलेल्या दरोडेखोरांना संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (दि.28) पहाटे पाच वाजेच्या सुमारास पाठलाग करुन पकडले.


- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता - निळवंडे ते कौठे कमळेश्वर रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने थांबलेल्या दरोडेखोरांना संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (दि.28) पहाटे पाच वाजेच्या सुमारास पाठलाग करुन पकडले. या कारवाईत पोलिसांनी गावठी कट्टा व 4 लाख 61 हजार 650 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पकडलेल्या तीन दरोडेखोरांना न्यायालयात हजर केले असता 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दोघे पसार होण्यात यशस्वी झाले आहे.

 याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांना गुप्त माहिती मिळाली की निळवंडे ते कौठे कमळेश्वर रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने कार (क्र.एमएच.23, ई.6847) थांबलेली आहे.

त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते, पोहेकॉ. शिवाजी डमाळे, संपत जायभाये, आशिष आरवडे, सचिन उगले, पोकॉ.बाबासाहेब शिरसाठ, प्रमोद चव्हाण यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने मंगळवारी पहाटे सदर ठिकाणी पाठलाग करुन कारमध्ये असलेले दरोडेखोर ललित अनिल थोरात (वय 24, रा. थोरात वस्ती, वडगाव पान, ता. संगमनेर), किरण संजय काळे (वय 19, रा. माळेगाव हवेली, ता. संगमनेर) व गणेश चंद्रभान गायकवाड (वय 26, रा. खांडगाव, ता. संगमनेर) या तिघांना पकडले. तर अजित अरुण ठोसर उर्फ करमाळ्या (रा. मातकोळी, ता. आष्टी, जि. बीड) व भैय्या राऊत (पूर्ण नाव माहीत नाही) हे दोघे पसार होण्यात यशस्वी झाले.

पोलिसांनी त्यांच्याकडून 15 हजार रुपयांचा गावठी कट्टा व आठशे रुपये किमतीचे चार जिवंत काडतुसे, लाल रंगाची मिरची पावडर, 15 व 20 हजार रुपये किमतीचा मोबाइल, 50 हजार रुपये किमतीचे प्रत्येकी दोन आयफोन, 3 लाख 10 हजार रुपये किमतीची कार, दोनशे रुपये किमतीचा कोयता, सुताची दोरी, सहाशे रुपये किमतीचे तीन प्लास्टिकचे ड्रम असा एकूण 4 लाख 61 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Monday, January 27, 2025

मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत सावित्रीबाई फुले उर्दु प्राथमिक कन्या शाळा, मौलाना आझाद उर्दु मुलींचे हायस्कुल, मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अण्ड सायन्स् फॉर गर्ल्स, मासुमिया डी.एल.एड्. कॉलेज (उर्दू) व मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वाबळे कॉलनी, मुकुंदनगर, नगर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कुरान पठणाने झाली. हम्द व नाआत नंतर संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी अरुणा आसिफ अली सामाजिक व शैक्षणिक महिला मंडळाच्या अध्यक्षा शेख फरीदा भाभी तसेच मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे सदस्य मिर्झा नवेद गयासबेग, शेख शरफोद्दीन जैनोद्दीन व इतर सभासद तसेच मुख्याध्यापक नौशाद सय्यद व सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापिका फरहाना सय्यद व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद, मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक वृंद, मासुमिया डी.एल.एड्. कॉलेज (उर्दू) व मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यायाचे सर्व प्राध्यापक वृंद इत्यादी उपस्थित होते.
यावेळी प्रा.डॉ. शेख अब्दुस सलाम सर यांनी आपल्या भाषणात प्रजासत्ताक दिनाबद्दल "धार्मिक एकात्मता व अखंडता" व भारतीय घटनेबद्दल आपले सखोल व सविस्तर विचार व्यक्त केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थीनींनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले.
सुत्रसंचालन बहार सय्यद यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन नाजेमा जुल्फेकार यांनी केले व शेवटी शेख अब्दुल हसीब यांनी सर्वांचे आभार मानले..


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

दारुल उलूम रज़ा ए मेहबूबमध्ये प्रजासत्ताक दिवस देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात जल्लोषात साजरा

दारुल उलूम रज़ा ए मेहबूबमध्ये प्रजासत्ताक दिवस देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात जल्लोषात साजरा

- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
प्रजासत्ताक दिन हा दारुल उलूम रज़ा ए मेहबूब येथे मुख्य मैदानावर ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.
यावेळी मदरसातील विद्यार्थी गणवेशात शिस्तबद्ध रांगा लाऊन मोठ्या संख्येने उत्साहात शामिल झाले होते.
मदरसाच्या मुख्य मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष सय्यद साबीरअली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मुफ्ती शाहजहां कादरी रज़वी व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले.मदरसातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय देशप्रेमावर आधारित गीत सादर केले.
मदरशामधील विद्यार्थ्यांना मिठाई वाटपाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
याप्रसंगी नगरसेवक आसिफ सुल्तान, सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज़, मोहम्मद मुबीन वलीयोद्दीन शेख, खत्मे कादरीया ग्रूपचे सर्व सदस्यसह मुकुंदनगर भागातील काही ज्येष्ठ नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे विश्वस्त खलिफा ए मन्सूरे मिल्लत हाजी शेख बाबर चाँद कादरी रज़वी मेहबूबी रब्बानी, शेख नदीमभाई कादरी रज़वी, शेख रफिक केडगाव, सय्यद अलीमुद्दीन, शेख तहनूर कादरी, मौलाना शाहीद कादरी रज़वी, मुन्शी मामू, नदीम रज़ा, अदीब शेख, आफताब शेख, अरबाज़ बागबान, सय्यद अबूज़र, रेहान शेख रिक्षावाले इत्यादींनी प्रयत्न केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


डी पॉल पब्लिक स्कूलमध्येप्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


डी पॉल पब्लिक स्कूलमध्ये
प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी येथील डी पॉल पब्लिक स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्तीने भरलेला हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून शहरातील सुप्रसिद्ध विधिज्ञ आणि समाजसेवक ऍडव्होकेट मोहसिन शौकत शेख यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
भारतीय राष्ट्रध्वज फडकवून 
कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्राचार्य फादर शिजो यांच्या हस्ते ध्वज पडकवीत ध्वजास मानवंदना देण्यात आली.
तर राष्ट्रगीताने संपूर्ण परिसरातील वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावून गेले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकले. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती, संविधानाचे महत्त्व आणि सामाजिक प्रश्नांवर आधारित नृत्य, नाटके आणि भाषणे सादर करून उपस्थितांना थक्क केले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण
ठरला पुरस्कार वितरण सोहळा
मुख्य अतिथी ऍडव्होकेट मोहसिन शेख यांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना आणि विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांचे कौतुक करताना त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मुख्य अतिथी 
ऍडव्होकेट मोहसिन शेख यांनी आपल्या भाषणात दोन महत्त्वाच्या विषयांवर विशेष भर दिला त्यात १) भारतीय संविधानाचे महत्त्व आणि, २) सायबर गुन्हेगारीपासून तरुण पिढीचे संरक्षण
ऍड. शेख त्यांनी संविधानाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “आपल्या देशाच्या प्रगतीसाठी संविधानाचे पालन खुपच अत्यावश्यक तीतकेच महत्वाचे आहे. तरुणांनी संविधानाचे अध्ययन करून त्याचा आदर केला पाहिजे.” तसेच सायबर गुन्हेगारीवर बोलताना त्यांनी आधुनिक युगातील धोके आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला.त्यांच्या प्रेरणादायी विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
शाळेच्या व्यवस्थापनाचे कौतुक
कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी शाळेचे प्राचार्य फादर शिजो, उपप्राचार्य सिस्टर दीप्ती मॅडम,अशोक
पवार सर आणि संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पार पाडली. त्यांच्या अथक मेहनतीमुळेच कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला. व्यवस्थापनाने सर्व लहानसहान गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवत कार्यक्रम अधिक भव्य आणि आकर्षक बनवला.
कार्यक्रमास पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 सर्वांनी शाळेच्या उत्तम आयोजनाची आणि मुख्य अतिथींच्या मार्गदर्शनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

देशभक्तीची प्रेरणा आणि नवी ऊर्जा
हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा विद्यार्थ्यांना देशप्रेम, संविधानाबद्दल आदर आणि आधुनिक समस्यांवर जागरूकता यासाठी प्रेरणादायी ठरला. डी पॉल इंग्लिश स्कूलने अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या उच्च स्तर गाठण्याचा आदर्श घालून दिला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचे योगदान अमूल्य ठरले. असा प्रेरणादायी आणि रंगतदार कार्यक्रम अनुभवण्यासाठी उपस्थित सर्वांनी उत्सुकतेने सहभाग घेतला.
यावेळी डी पॉल पब्लिक स्कूल मुख्याध्यापक फादर शिजो,सिस्टर दीप्ती, अशोक पवार सर, आशिष अमोलिक, बाबासाहेबाचे मते, संदीप जाधव, सोनम वधवा, स्मिता कांबळे, करुणा पाटील, हेमा कोहाले,जॉन सर तथा समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट चे संगणक प्रशिक्षक तहेसिन पांडे सर इत्यादी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
=================================
-----------------------------------------------

Sunday, January 26, 2025

डी पॉल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
भारतीय संविधान स्विकारुन आज २६ जानेवारी २०२५ रोजी ७५ वर्ष पूर्ण झाल्याने हे वर्ष देशभरात हिरक महोत्सव म्हणून साजरे होत आहे, यानिमित्त श्रीरामपूर येथील डी.पाॅल इंग्लिश मीडियम स्कूल च्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर श्री.बाबासाहेब दिघे, ॲडमिनीस्टेटर फा.फ्रॅन्को, मुख्याध्यापिका सि.सेलीन यांनी शालेय ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात केली. सर्वप्रथम भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यानंतर पुढे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी च्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यानंतर रॅली पुढे शाहिद भगतसिंग चौकात पोहोचली येथे शहीद भगतसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तेथे माजी नगरसेवक श्री. रवी (अण्णा) पाटील व दिपक चव्हाण यांनी प्रजासत्ताक दिना निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याच ठिकाणी अमर जवान स्मारक येथे सेवानिवृत्त स्वातंत्र्य सैनिक यांचे मार्गदर्शन लाभले व त्या ठिकाणी देखील अभिवादन करण्यात आले. शेवटी डी पॉल स्कूलच्या प्रांगणात रॅलीचा समारोप झाला.
रॅली यशस्विरित्या पार पाडण्यात फादर फ्रँको, रवींद्र लोंढे सर, संदिप निबे, गणेश पवार, विकास वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच याच दिवशी आगाशेनगर या ठिकाणी देखील प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
यासाठी सुनील बोरगे मामा यांनी परिश्रम घेतले.याही फेरीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला डी पॉल स्कूलच्या प्रांगणात सौ. मंगल ताई दुशिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यासाठी सौ.अनुराधा कपिले, शिना कुथुर, प्रतिक्षा कोळगे यांनी परिश्रम घेतले. 
या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲडमिनिस्ट्रेटर फा. फ्रॅन्को मॅनेजर फा. शिजो, मुख्याध्यापिका सि. सेलीन यांचे तसेच श्री रवी सर यांचे देखील अनमोल मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, January 23, 2025

श्रीरामपूर बस डेपोला नवीन २० बस द्या आमदार हेमंत ओगले यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी


आमदार हेमंत ओगले यांची परिवहन
मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी

प्रवासी व विद्यार्थ्यांना होणाऱ्या गैरसोईकडे वेधले लक्ष

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर बस आगारातील अनेक बस गाड्याची अवस्था दयनीय झाली असून यामुळे प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने श्रीरामपूर बस डेपोला वीस नवीन बस गाड्या उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. 
       सध्या श्रीरामपूर बस आगारात एकूण ५९ बसेस व चार शिवशाही बस आहेत या सर्व बस जवळपास सुमारे १२ लाख किलोमीटरच्या पुढे आहेत त्यामुळे प्रवाशांच्या विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या दहा ते बारा वर्षापासून श्रीरामपूर बस आगाराला नव्याने बस आलेल्या नाहीत. भौगोलिक दृष्ट्या श्रीरामपूर तालुका हा मोठा असून दळणवळणाच्या दृष्टीने तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी हे श्रीरामपूर शहरात बसने प्रवास करतात त्यामुळे बसची संख्या देखील अपुऱ्या असून असलेल्या बस देखील जुन्या अवस्थेत आहेत त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे आमदार ओगले यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. 
       यावेळी मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना श्रीरामपूर बस डेपोला नवीन बस गाड्या देण्याबाबत सूचना दिल्याची माहिती आमदार ओगले यांनी दिली आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================