रमजान मुबारक 2025
रोजा नं. 10वा, मंगळवार दिनांक 11-03-2025
!!! अल्लाह च्या" रहमत " ( दया व कृपा ) साठी आपल्याला ही काही चांगलं केलं पाहिजेत ना!!
प्रेषित मुहम्मद स्व. नी कथन केलं कीं, " रमजान महिना असा आहेत कीं त्याचे तीन विभाग ( आशराहा )केलेलं आहेत, ज्यामध्ये पहिला (1) विभाग " रहमत "(2)विभाग " मगफिरात "आणि तिसरा(3) विभाग हा " जहाँनम से आझादी ( नरका तील भडकत्या आगी पासून सुरक्षता ).
मित्रांनो आज बोलता बोलता रमजान मुबारक चे 10 दहा रॊजे पूर्णतःवास जात आहेत तरीही आपण गाफिल व निष्काळजी आहोत, एवढी मोठी संधी असताना आपण खुशाल संधीची वाट लावत आहोत, पहिले दहा रोज़े हें "रहमत " अर्थातच "दया " करणारा, अल्लाह हें कायमच दया करणारे आहेत आपल्या हातून दिवस भरात किती कळत न कळत अशा गोष्टी होत असतात कीं अपल्याला त्यांच गुमान ही नसतं. उदाहरण दयायच झाले पुष्कळ देता येतील चालता चालता कोणाला तरी शिवी देतो, व्यवहार करताना चुकींच खोटे बोलून शपथ खाऊन माल विकतात किंवा घेतात अर्थातच कोणाला तरी फसवूनच हें व्यवहार चालतात, भाजी विकताना भाजीवाला वारंवार भाजीवर ताजी दिसावी म्हणून पाणी मारून ताजी आहेत म्हणून विकतात, कोणाचे पैसे डुबवलं जातात, वारंवार खोटे बोलून घरी बसले जाते, देणं घेणं खोटे बोलून टाळलं जातं, असं असंख्य गोष्टी कळत न कळत केलं जातं, वारंवार खोटे बोललं जातंय आपल्या दोस्ताला, वडिलांना, आपल्या बॉस बरोबर असं असंख्य उदाहरण देता म्हणून याची काहीतरी कमी व्यव्ही म्हणून आपण ते टाळण्यासाठी म्हणून आपण काहीतरी सत्कार्य करीत कुढे तरी मनात रुख रुख असतं म्हणून रमजान चं रोज्या मध्ये वारंवार अल्लाह ची रहमत व्यव्ही म्हणून आम्ही अल्लाह जवळ कायम कायम वारंवार माफी मागितली पाहिजे व वारंवार होणाऱ्या आपल्या चुका पुन्हा कधी ही होणार नाहीं याची अल्लाह जवळ गवाही साक्ष दिली पाहिजेत. अल्लाह हा दायवंत कृपावंत कृपाळू ही आहेत. अल्लाह आपल्या बंद्यावर सत्तर आई पेक्षा जास्त प्रेम करत असतो म्हणून वारंवार माफी मागत चला, ज्याच्या ज्याचाशी तुम्हीं चुकीचं वागलात, बोललात, चुकीचा व्यवहार केलेत त्या सर्वांशी पुन्हा पुन्हा माफी मागा अल्लाह एवढा दयावान आहेत तर आपल्या समोरील व्यापारी, आई, बाबा, मित्र, ज्या बरोबर चुकीचं वक्तव्य केलं तो तर मनुष्य आहेत.. चुका या माणसा कडूनच होतं असतात.. फक्त्त जगात चुका या फारिस्ते च करीत नसतात, मनुष्य प्राणी हा वारंवार चुका करणारा असतो म्हणून अल्लाह त्याच्या राहमत साठी दुवा करा... म्हणून रामजानुल मुबारक चा या पवित्र महिना अल्लाह चा आवडता महिना आहेत म्हणून जास्त जास्त चुका माफ होण्याचा संधी चा महिना आहेत...
म्हणून प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात कीं, या महिन्यात काही गोष्टी वारंवार कराव्यात, (1) वारंवार अल्लाह ( परमेश्वर ) एक आहेत व प्रेषित मुहम्मद स्व, अल्लाह चे अंतिम प्रेषित (पैगंबर, संदेशष्टा आहेत..
(अर्थातच ला ई लहा ईललिल्लाह मुहम्मद दूर रसूललिल्लाह स्व.).
(2) इस्तीगफार (.वारंवार आपण केलेल्या भूतकाळातील चुकांची माफी मांगने )
(3)जन्नत कीं तलब ( मारणोत्तर जीवनानंतर स्वर्गातील जागेची इच्छा ).
(4).. आग से पन्हा ( मारणोत्तर जीवनामधील नरकातील अगी पासून रक्षण ).
समाजातील बहुतेक बंधूना उपासना मागचा उद्देशच माहिती नसते, केवळ समाजातील लोकं, आजूबाजूला, शेजारी करतात म्हणून करीत असतात, रमजानचे उदाहरणं म्हणजेच जगातील सर्व देशात एकाच वेळी-एकच दिवस- महिना - उपवास ची सेहर व इफ्तार वेळा या त्या त्या देशाच्या वातावरणाच्या हिशोबाने असतात प्रौढ बंधू बघीनी चा विचार केलं तर 70-80% लोकं जगात रोजा ठेवतात अपवाद फक्त्त असाध्य रोगानी ग्रस्त , गर्भवती स्त्री व दूध पाजणारी माता यांना रोजा ठेवण्यासाठी सवलत दिलेली आहेत परंतु त्यांनी नंन्तर त्याची पुर्तता
केली पाहिजे.
परुंतु एवढ्या रोजे ठेवणाऱ्या रोजीदारांना रोजे ठेवण्याचा उद्देश विचारलं तर,फारच थोडया लोकांना व्यवस्थित उत्तर देता यईल म्हणून सर्व रोजदारांनी आपलं उदीष्ट काय आहेत हें माहित करून उपासना केली तर किती मजा येईल अल्लाह ही राजी होईल होतील.. म्हणून या, "रहमत मगफिरात" मिळणाऱ्या महिना ची संधी साधून जरूर बंपर ऑफर चा फायदा उचला.
उद्या पासून मगफिरात चा अश रहा चालू होणार अल्लाह जवळ आपण केलेल्या चुकांची माफी मागायची... माझ्या साठी ही अल्लाह जवळ दुवा मागा व माझ्या सह जगातील समस्त जगातील शांती व एकोपा टिकावं म्हणून ही आपल्या दुवा मध्ये सामील करून द्यावेत.....
(मित्रांनो लेख आवडला तर जरूर आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवा.. जरूर फायदा होईल... प्रतिक्रिया अवश्य कळवा 🙏)
=================================
-----------------------------------------------
लेखक :- डॉक्टर सलीम साईदा सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल --मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर.. जिल्हा :- अहमदनगर
9271640014
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
-----------------------------------------------
=================================