राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, March 11, 2025

विद्यानिकेतन स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांची मेंटल मॅथस परीक्षेत उत्तुंग भरारी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,स्टेट बोर्डमधील विद्यार्थ्यांनी इग्निटेड माईंड लॅब, मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या मेंटल मॅथस् परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेस विद्यालयातील इ.पहिली ते सातवीतील ९७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. तसेच पुढील सेकंड लेव्हल परीक्षेसाठी विद्यालयातील २५ विद्यार्थी पात्र ठरले. दरम्यान उर्वरित उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी विद्यार्थ्यांना राजश्री तासकर,ज्योती खंडागळे,
शुभांगी चौधरी,ज्योती गाढे, मंगेश साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले.
        यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके,व्हा. चेअरमन डॉ.प्रेरणाताई शिंदे,खजिनदार डॉ.राजीव शिंदे,प्राचार्य विनोद रोहमारे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


विजेच्या खेळ खंडोब्यामुळे श्रीरामपूर ग्रामीण भागातील शेतकरी प्रचंड त्रस्त


सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांचा विज अधिकाऱ्यांना घेराव आंदोलनाचा इशारा

- श्रीरामपुर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये वीजेचा खेळ खंडोबा झाला असून सुरळीत वीज पुरवठा न होता अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होतो तसेच कमी दाबाने वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होत नाही.
या विजेच्या अनियमिततेचा पुरवठा व बिबट्याची भीती पोटी शेतकरी वर्ग प्रचंड त्रस्त झाला असून त्वरित वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसह घेराव आंदोलन घालण्याचा इशारा पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, सध्या शेतामध्ये ऊस, कांदा,मका, फळबागा व इतर पिके असून विजेच्या लपंडावाने व कमी दाबाच्या विजेमुळे शेतकऱ्यांचे भरणे होत नसून शेतकरी त्रासला आहे. पाण्याची पातळी कमी झाल्याने पिके वाचवण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून शेतीला पाणी देण्यासाठी उभा आहे. परंतु वीज वितरणाच्या अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हातबल झाला आहे. शेतकऱ्यास पिके वाचवण्याची काळजी लागली आहे. त्यामुळे वीज वितरणाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांचा वीज पुरवठा सुरळीत करावा. तसेच ग्रामीण भागातील काही ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असून त्यामधील ऑईल बदलणे, इतर दुरुस्ती करून चांगल्या दाबाने वीजपुरवठा करावा, सदरची कामे महावितरण विभागाने जलद गतीने त्वरित करून द्यावी.वेळ गेल्यानंतर शेतकऱ्यांवर पश्चातापाशिवाय काही उरणार नाही. शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी वीज वितरण विभागाने त्वरित कार्यवाही करावी. श्रीरामपूर तालुक्यासाठी जे नवीन सबस्टेशन २२० / ३३ के.व्ही. अति उच्चदाब मंजूर झालेले असून त्याचे काम लवकर सुरू करावे, शेतकऱ्यांच्या विजे संदर्भात विविध मागण्या असून पूर्ण न झाल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसह घेराव घालण्यात येईल असा इशारा पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

रमजान मुबारक 2025 रोजा नं.11 बुधवार दिनांक -12-03-2025


रोजा :- "दुआ ( याचना ) हे श्रद्धांवंतां( मोमीन ) चे हत्यार आहेत " प्रेषित मुहम्मद स्व..
            " कोई सुनता नहीं दुआ के सीवा :,
               कोई सुनता नहीं खुदा के सीवा "!!.
                        अबू हु्रेरा रजि. सांगतात कीं, आम्हाला, प्रेषित मुहम्मद स्व. नी सांगितलं कीं, " अल्लाह रबबूल इज्जत म्हणतात, कीं, " अद - इंद - जननीं -बी - व -अन - मआहूं - इजा - द नीं "
अर्थात :- मी आपल्या अनुयायी ( बंदे ) साठी असा आहेत कीं, जसा तो माझ्या बद्दल विचार करतोय किंवा आठवण करतो : आणि जेव्हा जेंव्हा तो मला हाक ( पुकारतो ) मी त्या त्या वेळी त्याच्या बरोबर च असतो ".( सहीहं बुखारी ).
पुन्हा एकदा प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात कीं, " तुमच्या रब (अल्लाह - परमेश्वर ) ने सांगितले कीं, " मला तुमची दुआ मंगत चला आणि तुमचे म्हणणे ( दुआ- विनंती ) मी जरूर कबूल(मान्य - स्विकारील )करील. ( मसनद ए हादिस, तिरमिझी, अबू दाउद, इब्न माझा, ).
इस्लाम मध्ये दुआ चे फार महत्व आहेत.
दुआ - हा अरबी शब्द आहेत, त्याचा शब्दशा आर्थ एखाद्याला बोलावणं होतं, तसे अरबी भाषेत एका शब्दाचे तीस तीस अर्थ होतात, परंतु आपल्याला याचा आर्थ अल्लाह कडे कळकळीची याचना करणं- विनंती करणं- मागणी करणं-मागणी मागणं- आपण आपली याचिका अल्लाह कडे सादर करणं, अल्लाह कडे कृपेची -दयेची याचना करणं, अल्लाह कडे आपल्या प्रत्येक गरजेच्या गोष्टी मागणं, आपल्या प्रत्येक समस्यांचे ग्राहने मांडण, आपण आपलं ग्रहने विश्व च्या मालकाकडे अल्लाह -(ईश्वराकडे) सर्व शक्तीमान अशा अल्लाह कडे मांडत असतो..
तसे बघितलं तर दुआ म्हणजेच इस्लाम मध्ये उपास्नेचाच प्रकार आहेत, प्रत्येक मुस्लिम श्रद्धांवंताच्या दुआ चे खूप महत्व आहेत, प्रत्येक गरजेचे दुवा करणं म्हणजेच एक उपासना कारणच आहेत.
प्रेषित मुहम्मद यांनी एका ठिकाणी म्हटलं आहेत " दुआ करणं तुम्हीं केलेल्या सर्व उपासना च सार आहेत. व तुम्हीं कधी दुआ नाहीं केली तर अल्लाहला फार राग येतो.' म्हणून थोडी जरी अल्लाह ची उपासना केली तरी अल्लाह कडून काही बक्षीस घेणं हे अल्लाहला खुश करण्या सारखं असतं.. नाहीतर ते आपल्याला "अहंकार "झाल्या सारखं होतं. अल्लाह ला अहंकारी पसंत नाहीं. " गर्वाचं घर खाली "म्हणतात तेच.
                       प्रत्येक श्रद्धावंत मुसलमानाना प्रत्येक आणीबाणीच्या व संकटाच्या काळात जवळच्या मित्रा सारखा हो अगदी जवळच्या मित्रा सारखाच अल्लाहच वाटतो. अगदी मित्रा सारखंच अल्लाह जवळ आरे कारे च्या भाषेत तच दुवा केली जातं, जसा काय अल्लाह आपल्या समोरच आपल्या शेजारीच बसलेला आहेत एक विश्वासूं मित्रा सारखा मित्र,
प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात कीं, "अल्लाह जवळ येवढ्या भरवश्यावर, भरवश्याने दुवा करा कीं तो संपूर्ण एकूण घेऊन आपल्या सर्व इच्छा आकांक्षा, मुराद, मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारचच आहेत येवढ्या भरोसा ठेवून दुवा करा " ( हादिस तिर्मिजी ).
पवित्र कुरआन मध्ये अल्लाह म्हणतात कीं, " हें पैगंबर स्व.! जेंव्हा माझे भक्त ( सेवक, श्रद्धांवान ) माझ्या बाबतीत तुम्हाला विचारतील, तर, तुम्हीं माझ्या वतीने त्यांना सांगा कीं,तो (अल्लाह )तर, तुमच्या अगदीच निकट ( जवळ )च आहेत, आणि, कोणी हाक दिली तर हाक देणाऱ्याच्या हाकेला मी प्रतिसाद देत असतो,! 🙏 ". जे अनुचित मागण्या सोडून सर्व योग्य मागण्या पूर्ण करतोय." ( पारा ( खंड 02,सुरह ( अद्याय 02):सुरह बकराह आ. नं. 186).
जेंव्हा जेंव्हा तुम्ही संकटाच्या विळख्या मध्ये असतात तेंव्हा तेंव्हा तुम्ही अल्लाह कडे याचना करतात, अर्थात आपण प्रत्येक्षात संपूर्ण सृष्टीच्या मालकासमोर, विश्वाच्या निर्माण कर्त्या समोर आपलं म्हणणं रूपी अर्ज सादर करत असतो म्हणून आपलं सर्व अहंकार सोडून दुवा जरूर कराव्यात, घडी घडी दुवा करावे. म्हणजे आपल्या हृदयात एक कोमलता निर्माण होते, अहंकार नष्ट होतं, मी पणा च पतन होतं हृदय हलकं होतं. एक प्रकारचा विश्वास निर्माण होतं, व कोणत्याही गरजेसाठी सरळ सरळ अल्लाह च्या दरबारात हात पुढे करून पसरून दुवा याचना करून, ती पूर्ण करायची म्हणूनच म्हणतात ना कीं, दुआ मोमीन का हत्यार है....
                " हार बार मांगा करो तो क्या हासील :
               दुआ वही है जो दिल से कभी निकलती है!!
( -:- क्रमशा -:- )

मित्रांनो लेख आवडल्यास आपल्या मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा, त्यांचा ही फायदा नक्कीच होईल.. प्रतिक्रिया आवश्य कळवा ) 


=================================
-----------------------------------------------
लेखक डॉक्टर सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
9271640014🌷🌷
🌷🌷🌹🌹🌹
-----------------------------------------------
=================================

Monday, March 10, 2025

श्रीरामपूर येथील ‘महिला शक्ती’ बहुमाध्यम चित्रप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद


श्रीरामपूर येथील ‘महिला शक्ती’ बहुमाध्यम चित्रप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्रीय संचार ब्युरो आयोजित 
तीन दिवसीय प्रदर्शनाचा समारोप

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/वार्ता,-
 केंद्रीय संचार ब्युरो (अहिल्यानगर) यांच्यामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त श्रीरामपूर येथे आयोजित तीन दिवसीय ' महिला शक्ती' या बहुमाध्यम चित्रप्रदर्शनाचा आमदार हेमंत ओगले यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. या प्रदर्शनास विद्यार्थी, महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

इंडियन रेड क्रॉस सोसायटी श्रीरामपूर, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, पंचायत समिती श्रीरामपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या समारोप कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी शोभा शिंदे, केंद्रीय संचार ब्यूराचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी फणिकुमार, शिर्डी (उमाका) माहिती अधिकारी सुरेश पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक मच्छिंद्र कुरे, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव सुनील साळवे, सामाजिक कार्यकर्ते सचिन गुजर, शरद नवले आदी उपस्थित होते.

आमदार श्री.ओगले म्हणाले की, महिला शिक्षित झाली, तर ती संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करते. महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून बॅंकेतून कर्ज घेऊन विविध व्यवसाय सुरू करून सक्षमीकरणासाठी पाऊल टाकावे.

यावेळी अनंता जोशी, सुरेश पाटील, सुनील साळवे, सचिन गुजर, शरद नवले यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक शोभा शिंदे यांनी केले.
 
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये क्रमांक मिळविणाऱ्या महिलांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या आगाशे सभागृह (आझाद मैदान) लोकमान्य टिळक वाचनालय येथे हे मल्टीमीडिया प्रदर्शन दि.६ ते ८ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. 
या प्रदर्शनात नगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. बचत गट, महिला मंडळ, अंगणवाडी महिलांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. पाककला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, संगीतखुर्ची, ‘होम मिनिस्टर’ यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनात पद्म पुरस्कार विजेत्या भारतीय महिला, महिला स्वातंत्र्यसैनिक, संरक्षण दलातील महिलांची भूमिका, नव्या भारतातील महिला शक्ती, ग्रामीण भागातील यशस्वी महिला उद्योजक आणि भारतीय महिला वैज्ञानिकांची माहिती चित्ररूप आणि मल्टीमीडिया स्वरूपात सादर करण्यात आली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️👍🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

विद्यार्थ्यांनी विविध कला, गुणांसोबत चांगले छंद जोपासावेत - प्र.पो.अधीक्षक बन्सल


विद्यार्थ्यांनी विविध कला, गुणांसोबत चांगले छंद जोपासावेत - प्र.पो.अधीक्षक बन्सल

माळवाडगाव जिल्हा परीषद प्राथमिक 
शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीच करत असते,’’ असे मत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक (आयपीएस) रॉबिन बन्सल यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील माळवाडगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल हे होते. 
यावेळी भारत मातेचे पूजन आयपीएस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्री गणेश वंदन नृत्याने झाली. यावेळी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. 
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उद्धव शेळके, उपाध्यक्ष व भाजपचे तालुका प्रसिध्दी प्रमुख संदिप आसने, ललिता उमाप, सुदाम आसने, सचिन आसने, दीपक आसने, किरण शिंदे, पत्रकार प्रवीण साळवे, सुमन आसने, मनीषा प्रवीण आसने, तेजस्विनी आसने, सुरभी दांगट, आरती आसने आदि उपस्थित होते.
        यावेळी मुख्याध्यापक देवदास मुंतोडे यांनी शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांसाठी पालकांनीही खिसा रिकामा करत हजारो रुपये बक्षीसे दिले. 
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रम प्रसंगी श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, उत्तमराव आसने, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष बाळासाहेब आसने, उपसरपंच शाम आसने, ग्रामपंचायत सदस्य सुरेश आसने, योगेश आसने, बबनराव आसने, माजी अध्यक्ष जालिंदर आसने, रावसाहेब काळे नाना, इंग्लिश स्कूल शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुनिल आसने, सुभाष आसने, पत्रकार रवींद्र आसने, माळवाडगांव सोसायटीचे सचिव प्रदीप आसने, सुनील आसने, बापूसाहेब आसने, भगवान आसने, तान्हाजी खताळ, वैभव आढाव, राहुल कावरे, पद्माकर आसने, हरी त्रिभुवन, मंगेश साळवे, अनिल आसने, सदाशिव आसने, सुधीर आसने, राणी गाडे, छाया दांगट, भक्ती आसने, अर्चना आसने, मंदा आसने, पल्लवी शिंदे, मीना आसने, माया शिंदे, अलका आसने, अश्विनी धायगुडे, आरती दुशिंग, वैशाली साळवे, पुजा आसने, रोहिणी शेळके, अनिता आसने आदी ग्रामस्थ पालक मान्यवर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक मुंतोडे सर, पाचपिंड सर, धोंगडे सर, शेळके सर, साळवे मॅडम, बोबडे मॅडम, मते मॅडम, तोडमल मॅडम, साळवे मॅडम, कोरिओग्राफर त्रिंबके आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. मारिया साळवे व शेळके सर यांनी प्रास्ताविक केले तर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष पत्रकार संदीप आसने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार संदिप आसने 
 पाटील,माळवाडगांव
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

सौ. कल्याणीताई धनवटे या देहरे गांवच्या सरपंचपदी बिनविरोध


सौ. कल्याणीताई धनवटे या देहरे 
 गांवच्या सरपंचपदी बिनविरोध 

- श्रीरामपूर - प्रतिनिध -/ वार्ता -
नगर तालुक्यातील देहरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणूकीत सौ. कल्याणीताई मेघनाथ धनवटे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाली. गावच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व मिळावे या हेतूने ग्रामस्थांनी एकमताने त्यांना ही संधी दिली.

देहरे ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत सौ.धनवटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. गावातील सर्वपक्षीय सदस्यांनी तसेच ग्रामस्थांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला हे विशेष.
निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या समारंभात त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

निवडीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना सौ. धनवटे म्हणाल्या, "ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. गावाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असेल, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असेही त्या म्हणाल्या.
या निवडीनंतर गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. या वेळी अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.


गावाच्या विकासासाठी नवीन संधी आणि आधुनिक योजना राबवण्याचा निर्धार सौ. धनवटे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार विशाल रमेश जेठे - देहरे 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

स्त्री शिक्षणाची जनक म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले- विजयराव खाजेकर


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
नव स्वराज्य सेनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला श्रीरामपूर येथील आझाद मैदान या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी नव स्वराज्य सेनेचे अध्यक्ष विजयराव खाजेकर यांनी प्रतिपादन केले की, ज्यावेळी भारतासारख्या रुढी वादी परंपरा असणाऱ्या देशात स्त्रीला समाजात चुल आणि मुल एवढे या पर्यंतच मर्यादित स्थान होते. महिलांना समाजात कोणताही दर्जा दिला जात नव्हता, अशा वेळी महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा नवसंजीवनी देण्याचे महान कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. अशा या महान ज्ञानज्योती फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे द्वार खुले केले त्यांचे योगदान तर्कसंगतता आणि सत्य समानता आणि मानवता यासारख्या मानवी कारणाभोवती फिरते. जगेल तर लोकांसाठी व मरेल तर लोकांसाठी हा जनसेवेचा ध्यास घेऊन जगणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुणे येथे आलेल्या प्लेग च्या साथीमध्ये लोकांची सेवा करताना आपल्या मधून निघून गेल्या त्यांचा आदर्श घेणे म्हणजे त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे ते म्हणाले.
यावेळी संजय वाहूळ, भाऊसाहेब त्रिभुवन, उत्तम हिवराळे , सागर धेंडे, डॅनियल शिंदे ,खंडागळे मास्तर,अनिल वाघमारे, सुरज मगर, यश वाहुळ, लक्ष्मण जाधव, सुरेश बनसोड, योसेफ जगताप, जोसेफ फर्नांडिस, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================