राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, April 2, 2025

श्रीरामपूर - नगरपरिषद समोरील होत असलेलं बे मुद्दत आंदोलन स्थागित...

श्रीरामपूर नगरपालिका समोर सुरू असलेले धरणे आंदोलन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर व मुख्याधिकारी गणेश घोलप यांच्या मध्यस्थीने स्थगित...

सफाई कामगारांच्या वारसांना लाड - पागे समितीच्या शिफारशीनुसार सेवेत कायम करावे या मागणीसाठी श्रीरामपूर नगरपालिका समोर धरणे आंदोलन सुरू


सफाई कामगारांच्या वारसांना लाड - पागे समितीच्या शिफारशीनुसार सेवेत कायम करावे या मागणीसाठी श्रीरामपूर नगरपालिका समोर धरणे आंदोलन सुरू 

नगरपालिका सफाई कर्मचारी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील - भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 श्रीरामपूर नगरपालिका आरोग्य विभागातील आस्थापनेवरील कायम रिक्त पदावरील सफाई कामगारांच्या वारसांना लाड - पागे समितीच्या शिफारशीनुसार सेवेत कायम करावे या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्हा नगरपालिका कामगार कर्मचारी यांच्या वतीने कॉ. जीवन सुरुडे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर नगरपालिके समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 
  लाड - पागे समितीच्या शिफारशीनुसार कामगारांच्या वारसांना सेवेत घेण्याची पद्धत गेली अनेक वर्ष सुरू असून शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने लाड -पागे समितीच्या शिफारसीच्या अनुषंगाने सफाई कामगारांचे वारसा हक्काच्या अंमलबजावणी बाबत २४ फेब्रुवारी २०२३ शासन निर्णय निर्गमित केला आहे तरी शासन निर्णयाच्या अनुषंगाने उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजी नगर यांनीही ८ जानेवारी २०२५ रोजी या शासन निर्णयाची तातडीने काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश दिलेले आहे तरीही श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाकडून सदर कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याने तसेच कोर्ट आदेशाचे पालन होत नसल्याने धरणे आंदोलन सुरू असून या बेमुदत आंदोलनासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर यांनी आंदोलन कर्ते यांची भेट घेऊन आपल्या कामगारांच्या प्रश्नाबाबत प्रयत्नशील असून पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा विनिमय करून येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. तसेच कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी भाजपाचे मारुती बिंगले आपल्यासाठी सदैव प्रयत्नशील होते व आहेत. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे आपल्याला यश मिळालेले आहे तसेच तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे सार्थक झाले असल्याचे चित्र आज न्यायालयाच्या माध्यमातुन दिसत आहे अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर यांनी दिली. प्रसंगी शहराध्यक्ष मारुती बिंगले,बंडू कुमार शिंदे, हंसराज बत्रा, सतीश सौदागर, अक्षय गाडेकर, किराण कर्नावट, आनंद बुधेकर, महेश रुपेश हरकल, भैय्या भिसे, राहुल पांढरे, पूजाताई चव्हाण, पुष्पाताई हरदास, मिलिंद कुमार साळवे, गणेश करडे,विजय आखाडे आणि भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शेवटी बंडू कुमार शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई ✍️✅🇮🇳...
वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, March 26, 2025

रमजान मुबारक 2025,रोजा नं. 26 वां, गुरुवार दिनांक 27-03-2025..

रमजान मुबारक 2025,
रोजा नं. 26 वां, गुरुवार दिनांक 27-03-2025..
!! " लैलतुल कद्र -जुमाआ -तुल- विदाह " च्या एका - लम्हा - क्षणा -क्षणाची सुवर्ण संधी साधा.. "!!.
आज पवित्र रमजान मधील 26 वा रोजा ची लैलतुल कद्र ची 27 वी रात्रं, पुन्हा जुमाआ ची पवित्र रात्रं अर्थात योगा योग..
पवित्र कुरआन मध्ये अल्लाह म्हणतात कीं, "(1) निश्चितच आम्ही पवित्र कुरआन ला शब ए कद्र च्या रात्रीत अवतरीत केलेले आहेत, (2), तुम्हाला ( शब ए कद्र ) कद्र ची रात्रं म्हणजेच काय? हें काय माहित आहे??(3)हजार महिन्याहुनही ( महिन्यांपेक्षा ही )अधिक उत्तम अशी रात्रं म्हणजेच कद्र ची रात्रं. (4)या रात्रीत देवदूत ( फारिस्ते )आणि खास देवदूत ( जिब्राईल अलै.)आपल्या अल्लाह ची आदेशानुसार प्रत्येक चांगल्या सुखाच्या गोष्टी घेऊन पृथ्वीवर अवतरतात., (5) आणि ही संपूर्ण रात्रं बरकतीची आणि शांती ची आहेत.( उष काळा पर्यंत ).(पारा 30 वा, सुरह 97,अल - कद्र आ. नं. 1 ते 05).
हजरत इब्न अब्बास रजि. सांगतात कीं , आम्हाला पैगंबर मुहम्मद स्व. नी सांगितले कीं, लैलतुल कद्र च्या पवित्र रात्रीं रमजान महिन्यात शेवटच्या विभागात (अशहरा )मध्ये विषम( ताक )संख्येत 21,23,25,27,29, पाच रात्रीं येतात, ( हदिस बुखारी 2020).
यामध्ये कोणती रात्रं जास्तच महत्वाची आहेत यामध्ये विविध 
मुफ्ति व विशेष अभ्यास करणाऱ्या मध्ये मत्मात्तांतर दिसून येते. याचं गुपीत फक्त्त अल्लाह व प्रेषित मुहम्मद स्व. यांनाच माहित, तरीही विशेष रात्रं ही 26 व्या रोजाची येणारी रात्रं ही अंदाजे महत्वाची मानली गेली, 
पूर्वीच्या काळात लोकं 500- 1000 वर्ष जगत होती, त्यांमुळे त्यांनी ठेवढे पुण्यांची कर्म केलेलं , व प्रेषितांच्या काळात सहाव्या शतकात लोकांचं आयुर्मान हें 60-ते 80-90 वर्षांच्या आसपास म्हणून प्रेषित यांना काही मित्र सहकारी यांनी प्रश्न उपस्थित केला कीं, हें अल्लाह च्या रसूल ( पैगंबर ) त्याकाळातील लोकांच्या बरोबर पुण्य कामावणे आज च्या दृष्टीने अशक्य आहेत आजच वय त्याकाळापेक्षा कमी आहेत.. तर., अल्लाहचा संदेश वरील सुरह अल कद्र च्या स्वरूपात आला. कीं कद्र ची एक रात्रीचे महत्व रोजच्या रात्रीं पेक्षा जास्तच अर्थात एक हजार महिन्याच्या रात्रीं पेक्षा ही जास्तच असणार आहेत ( सुरह 97, अल - कद्र आ. नं., 03)..त्या रात्रीचे महत्व जाणाल तर तुम्हीं स्तबध आश्यर्य चिकीत व्हाल. तुम्हाला भान राहणार नाहीत.
काही अभ्यासक, तज्ञ मंडळीनीं आप आपल्या कुवतीनुसार अंदाजे आकडेमोड दिलीत, एक हजार (1000) महिन्याच्या दिवसानुसार त्या रात्रीं, एक (1)सेकंद = 23 तास , एक मिनिट (1 मिनिट ) = 58 दिवस, एक (1) तास = 8-9 वर्ष यांची आकडेमोड करून बेरीज केली तर 83 त्रेयांशी वर्ष्याची इबादत - बंदगी - प्रार्थना होते.. अशा आपल्याला 20-25 वर्ष्याच्याप्रत्येक वर्षाची एक तरी लैलतुल कद्र ची पवित्र रात्रं भेटली तर त्याकाळातील हजार वर्ष्याच्या प्रार्थना पेक्षा ही कितीतरी जास्तच होईल. प्रत्येक सेकंद मिनिटाचं पुण्य एवढ्या प्रमाणात भेटत असेल तर यां सुवर्ण संधीचा फायदा इमाने इतबारे इबादत प्रार्थना करून उचलणं अत्यन्त गरजेचं.मग एक एक सेकंड, मिनिट, तास का? वाया घालवायचं.
प्रेषित मुहम्मद स्व.यां रात्रींचं महत्व सांगतात कीं, " अल्लाह -परमेश्वर - परमात्मा -गॉड यां रात्रीं मध्यरात्रीं सातव्या आकाशात येऊन पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्र, मानवानां आव्हान करतात कीं, " #कोण आहेत जो माझ्याकडे दयेची याचना करेन त्यावर मी ती दया देईल, #:कोण आहे कीं, माझ्याकडे करुणेची भीक मागेल मी त्याला त्या करुणेची भीक देईल,:# कोण आहे जो आपल्या केलेल्या लहान मोठया पापांची क्षमा माफी मागेल कीं मी त्याला क्षमा माफी देईल, # कोण आहे जो माझ्या कडे त्याच्या मनातील मनोकामना साठी माझ्या कडे येईल कीं मी त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल, "
पुन्हा पुन्हा अल्लाह मनाव जातीला आव्हान करतात कीं " कोण आहेत जो एका अशा अल्लाहला कर्ज देईल ".. हें कर्ज कशाला तर, समाजातील गरीब -पीडित,-अनाथ -लाचार- विधवा- अत्याचारीत - दिन दुबळे - उपाशी पोटी झोपलेल्या साठी, त्यांची भूक मिटवण्यासाठी, त्यांचं पालनपोषण करण्यासाठी, त्यांच्या बरीकातील बारीक, छोटया छोटया गरजा पुरवण्यासाठी.
तर यां मध्ये लैलतुल कद्र बराबरंच जुमाआ ची ही रात्रं आहेत व दिवस ही पवित्र जुमाआ आहेत.. त्या दिवस एक क्षण असा असतो कीं अल्लाह आपलं कोणतं ही दुआ पूर्ण कबूल करतात.. त्याचा डबल डबल फायदा आहेत तर त्याचा ही लाभ उठवला पाहिजे..
(मित्रांनो लेख आवडल्यास मित्रांना, नातेवाईकांना जरूर पाठवा, त्यांना ही फायदा होईल.. आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा )

(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>

लेखक :- डॉक्टर. सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
मोबाईल नं. 9271640014.👍👌
🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹

(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>

Tuesday, March 25, 2025

पत्रकार निखिल बावणे यांनी साजरा केला न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या मुलांसोबत आपला वाढदिवस

पत्रकार निखिल बावणे यांनी साजरा केला न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या मुलांसोबत आपला वाढदिवस

- तुषार खासबागे - वरुड जि.अमरावती -/ वार्ता 
पत्रकारीता क्षेत्रामध्ये अल्प कालावधीत सर्वांना सुपरिचित झालेले युवा पत्रकार निखिल अनिल बावणे (सह संपादक दैनिक वरुड केसरी) यांनी न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला.
अत्यंत सामान्य कुंटूबा मध्ये जन्म घेउन शिक्षणा सोबतच सोशल मिडीया मध्ये काम करित असतांनी कुठलही प्रशिक्षण न घेता ग्राफिक्स डिझाईन बनवण्याची कला अवगत करून आपल्या परिवारा साठी शिक्षणा सोबतच जोड व्यवसाय म्हणून काम करत असतांनी दैनिक वरुड केसरी या वृत्त पत्राच्या माध्यमातुन सोशल मिडींया सोबतच प्रिन्ट मिडीया मध्ये सुद्धा अल्प कालावधी मध्ये आपली ओळख निर्माण करण्याचे धाडस श्री निखिल बावणे यांनी केले व आज ते सहसंपादक म्हणून दैनिक वरुड केसरी या वृत्त पत्रा मध्ये काम करित आहेत, आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त वरुड शहरातील न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे लहान मुलांन सोबत मित्रांनी वाढदिवस साजरा करण्याचा मानस केल व या छोटेखानी कार्यकमाला शाळेच्या प्राचार्य कोमल पांडव यांच्या मदतीने लहान मुलांन सोबत आपला आनंदाचा क्षण साजरा करण्याचा आनंद मिळऊन दिला. या वेळी प्रामुख्याने धिरज खोडस्कर सचिन परिहार तुषार खासबागे संपादक प्रविण सावरकर व शाळेच्या प्राचार्य कोमल पांडव व शिक्षक वृंध प्रामुख्याने उपस्थित होत्या या वेळी केक कापुन .मुलांना चॅकलेट वाटप करण्यात आले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


रमजान मुबारक 2025,रोजा नं. 25 वा, बुधवार दिनांक 26-03-2025


रमजान मुबारक 2025,
रोजा नं. 25 वा, बुधवार दिनांक 26-03-2025

   इस्लाम,:- !!! जिहाद :- मानवी कल्यानासाठीच!!.
         "जिहादी-जिहाद " हा शब्द एकविसाव्या शतकातील सर्वात चांगला असूनही बदनाम केलागेलेला शब्द, ज्याचा कायम चुकीचा अर्थ लावला जातोय, म्हणजे "इस्लामच्या शत्रू विरोधात युद्ध "म्हणजे फक्त्त हिंसा आणि जुलूम, जिहाद हा सर्वाधिक विवादीत आणि संवेदनशील शब्द जगातील पक्षपाती मीडिया असा एकही दिवस सोडत नाहीं कीं इस्लाम वर टीका करण्यासाठी सोडत नाहीं.   
  परंतु, पवित्र कुरआन व प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या दृष्टीने जिहाद चा सरळ अर्थ "प्रयत्न "किंवा संघर्ष अथवा " मी प्रयत्न करेन, मी आपल्या परीने पुरेपूर प्रयत्नशील राहीन ".
   जिहाद हा एक अरबी शब्द आहेत, जो "जहद "धातूपासून तयार झाला आहेत ज्याचा अर्थ" संघर्ष "असा होतोय, जिहाद ची व्याख्या ही कीं" एखादे उदिस्ट साध्य करण्याकरिता शक्यतो सर्व प्रयत्न करणं, "याचा अर्थ" वापर अनेक परिस्थितीशी व पद्धतीशी तोंड देणे असा ही होतोय." उदा.हा संघर्ष बौद्धिक, अध्यात्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, किंबहुना भौतिक स्वरूपात ही असू शकतो. साधारत: उर्दु भाषेत नेहमी" जेद्दोजहद "शब्द नेहमी वापरला जातो, ज्याचा अर्थ" संघर्ष 'असा होतो. 
राष्ट्रपिता महात्मा गांधी जी आफ्रिकेतून भारतात भारतीय स्वातंत्र संग्रामात ब्रिटिश सत्ता विरोधात भाग घेण्यासाठी आले त्यावेळेस जिहाद विषय ऐतिहासिक उदगार काढले कीं, " मी भारतात जिहाद करण्यासाठी जात आहेत ", म्हणजेच "अहिंसा" नावाने शांतीपूर्ण संघर्षाला अरबी भाषेत जिहाद म्ह्टले गेले आहेत. 
             पैगंबर, प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात कीं, " सर्वात महान व व्यापक जिहाद म्हणजेच आपल्या स्वतः च्या विरोधात जिहाद होय. अर्थात आपला अहंकार, लालसा, मोह, कधीही पूर्ण न होणाऱ्या इच्छा - आकांशा, तसेच आपल्या मनातील वाईट विचार - आचार, आपल्या आंतरिक वाईट इच्छा, अपल्याला लागलेल्या वाईट सवयी त्या विरोधात, तसेच समाजातील वाईट गोष्टी, समाजातील दुस्टप्रवृत्ती विरोधात, सर्व प्रकारचे अत्याचार छळ जुलूम जबरदस्ती, अतिरेक, या सर्व विरोधात जिहाद करून समाजात नेकी, सदाचारी न्याय आणि शांती प्रस्थापित करणं म्हणजेच जिहाद करणं. इस्लाम हा शांततां प्रिय आहेत म्हणून जिहाद करून तिला शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणं ".
                     बैरूत देशातील एक संशोधक युसूफ विश यांनी म्हटले कीं," सर्वाना व्यापक जिहाद म्हणजे आपल्या स्वतःच्या पशवी प्रवृत्तीविरोधात लढणे बाह्य जगाशी जिहाद पेक्षा आपल्या आंतरिक पाशवी प्रवृत्ती वर विजय मिळवणे , आपल्या भावनावर नियंत्रण ठेवणं.
                              प्रेषित मुहम्मद स्व. हें हुंनैन युद्धातुन परत येताना घोषणा केली " आम्ही छोटया जिहाद ( प्रयत्न, प्रतिरोध, सुधारणे साठी संघर्ष ) करून येत आहोत आणि "महान "जिहाद कडे जात आहोत,"
त्यावर एका मित्र- सहकारीनें प्रश्न विचारलला, " हें पैगंबर साहब, हा महान जिहाद कोणता?? "
त्यावर, पैगंबर प्रेषित यांनी उत्तर दिले, " हें आपल्या स्वतः शी, " अहंकाराशी " लढणे होय, ".
                                     जिहाद म्हणजेच (1)सत्याचा असत्य विरोधात लढा, (2)दृष्टी प्रवृत्तीच्या विरोधात चांगल्या प्रवृत्ती चा लढा (3)दुष्कार्मा विरोधात सत्कार्माचा लढा (4)अन्याया विरोधात न्यायाचा लढा, (5)जुलूम करणाऱ्या विरोधात लढा, (6) कोणावर अत्याचार झालेला असेल तर अत्याचार करणाऱ्या विरोधात लढा. (7) कोणत्याही देशातील जुलूम करणाऱ्या सत्ता विरोधात लढा . म्हणजे जिहाद.(8)एखाद्या स्त्री वर अत्याचार झाला असेल त्या अत्याचार करणाऱ्या विरोधात लढा उभारणे त्या स्त्री ची इज्जतिची, अब्रू ची रक्षण कारण म्हणजे जिहाद. मग ती कोणत्याही पंथाची, कोणत्याही जाती ची समाजाची कीं असेना.
                              
                        अल्लाहच्या मार्गातील जिहाद काय? तर मनावतेवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार, अशांती विरुद्ध आपल्या मृत्युची ही पर्वा न करता निस्वार्थी पण संघर्ष करणं, सत्य- समता - शांती बहाल करणं, न्याय व्यवस्था व्यवस्थित करणं, मानवाला अन्याय, अत्याचारा पासून मुक्ती देवून स्वातंत्र्य समता बंधू भाव जोपासणे मानवते वर आधारित आदर्श समाज व्यवस्था निर्माण करणं अर्थात निस्वार्थ मानवी सेवा करून आपल्या पालन पोषण करणाऱ्या अल्लाह ला खूष करणं हाच सर्वात मोठा जिहाद आहेत. यालाच सर्वात मोठी उपासना संबोधित करतात.संपूर्णसृष्ठी चा पालनहार हा एकच आहेत म्हणून संपूर्ण मनाव जात सर्व एक समान आहेत,निर्माण करत्याने प्रत्येक मनुष्याला धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहेत, पवित्र कुरआन मध्ये अल्लाह सांगतात कीं," धर्माच्या बाबतीत कोणतीही बळजबरी जबरदस्ती नाहीं "म्हणून जिहाद हें कोणत्याही एका विशिष्ट्य धर्मा विरोधात किंवा एखाद्या विशिष्ट राष्ट्रा विरोधात नाहीं किंवा इस्लाम धर्म प्रसारा साठी केलेला संघर्ष ही बिल्कुल नाहीं तर जिहाद हा कोणत्याही अन्यायग्रस्त, वाईट, अतिरेकी प्रवृत्ती, मग अन्याय हा कुणावर कोणत्याही जाती वर होवो ती मग मुस्लिम असला तरी ही त्याविरोधात "आवाज -एल्गार - विद्रोह करणं आहेत.. 
म्हणून अल्लाह सर्व जगातील अनुरेणू जीव जंतू वर प्रेम करतात व प्रत्येकांची त्यांना काळजी आहेत म्हणून जिथे जिथे मानवी मूल्य ची गळचेपी होईल तिथे तिथे आपल्या आपल्या परीने आवाज उठवून -जिहाद- विद्रोह करून बिमोड करणं होय. 
प्रेषित मुहम्म स्व, सांगतात कीं, तुमच्या पैकी कोणी कोणावर अन्याय - वाईट कृत्य होताना पाहाल तर, आपल्या स्वतः च्या हाताने रोखा, जर तुम्हीं तर आपल्या वणीने आवाज उठवून रोखा, अगर त्याचीही रोख ण्याची तुमची कुवत, हिम्मत नसेल तर कमीत कमी त्या त्या कृत्याला मनामध्ये वाईट समजा.. परुंतु हा श्रद्धे चा सर्वात खालचा दर्जा आहेत."
                        तुम्ही कोणत्याही वाईट प्रवृत्ती- गोष्टीला -वाईट कृती ला फक्त्त प्रेक्षक म्हणून पाहू नका, ते प्रेक्षक म्हणून पाहणं म्हणजे त्या वाईट कृत्याला मूक संमतीच देणं होय. म्हणून उद्याच्या भविष्यातील गंभीर समस्याला तोंड देण्या पेक्षा आजच विरोध करा. कारण कालांतराने त्याचे वाईटच परिणाम होतील.म्हणून जिहाद ही इस्लाम मधील एक उपासना पद्धती आहेत. 
           पवित्र कुरआन मध्ये अल्लाह सांगतात कीं, " लढण्याची परवानगी त्या लोकांना दिली जात आहे, ज्यांच्यावर (शत्रू पक्षाकडून ) आक्रमण होत आहेत, (परवानगी देण्याचे )कारण कीं त्यांच्या वर अत्याचार झालेला आहेत,आणि अल्लाह, त्यांची मदत करण्यासाठी पूर्णपणे समर्थ आहे " सुरह नं. 22, अल - हाज, आ. नं -39).
                           अल्लाह ला जगात संपूर्ण शांतता प्रस्थापीत करायची परुंतु ती ही शांततेच्याच मार्गाने.. आणि जिहाद चा ही अतिरेक नको.
पुन्हा अल्लाह पवित्र कुरआन मध्ये सांगतात कीं, " अल्लाह च्या मार्गात अतिरेक, अन्याय करणाऱ्या शी लढा जें तुमच्या विरोधात लढत आहेत परंतु त्याचा ही अतिरेक करू नका, अल्लाह अतिरेक करणार्यांना पसंत करीत नाहीं ". (सुरह नं. 02, सुरह बकराह आ. नं. 190).अल्लाह ला मर्यादाचे उल्लंघन करणारे पसंत नाही..
सर्व सामान्य लोकांच्या मना मध्ये सोसिअल मीडिया, प्रिंट मीडिया, व्हाट्सअप बघून जिहाद हा फक्त्त मुस्लिम हें फक्त्त रक्तपात, खून खराबा, सतत लढाया, मुंडके उडवणं, कत्तली करणे, मारामाऱ्या, बॉम्ब स्फोट, जाळपोळ, घातपात, अतिरेकी कारवाया येवढ च फक्त्त चित्र दिसतं... किंवा टोळी युद्ध, काही माथेफ़ुरू लोकांनी समाजाला वेठीस धरून केलेला रक्तपात, आत्मघाती हमले हल्ले, सगळे कडे मजवलेला आतंकवाद हें सर्व इस्लाम मध्ये निषेध निषेध आहेत.. इस्लाम व जिहाद चा या अशा अमानुष कृत्याचा काहीच जवळजवळचा ही संबंध नाहीं.
                                       यावर अल्लाह पवित्र कुरआन मध्ये सांगतात कीं," पृथ्वीवर ( जमिनीवर ), उपवद्रव माजविन्यासाठी,# जर एखादया माणसाने जो निष्पाप व्यक्तीचा खून ( हत्या )करेल : तर : समजा : संपूर्ण मानवजातीची ती हत्या केल्या सारखे ठरेलं,# आणि # जर जो कोणी एका ही मानवाच्या मानवाच्या प्राणाचे रक्षण करील त्याने अखिल मानवजातीच्या प्रणाचे रक्षण केल्या सारखे श्रेय लाभेल.. "( सुरह नं 05, सुरह अल - मायदा आ. नं 32 वी ).
                 या जगात प्रत्येक मानवाचं सर्वात जास्त मूल्य व मौल्यवान आहेत.. प्रत्येक मानवाची कोणत्याही परिस्थितीत रक्षण झालेच पाहिजे हें इस्लाम शिकवते.
मानवतेच्या शत्रू असलेल्या उपद्रवी, अत्याचारीत लोकांविरोधात कधी कधी टोकाची भूमिकाही द्यावी लागते म्हणून त्यांच्या बरोबर संघर्ष ही होतो परुंतु या आणीबाणीच्या परिस्थिती मध्ये ही इस्लाम नें नैतिक तेचे आदर्श उदाहरण दिले आहेत, नैटिकता जोपसण्याचे आचारसंहिता देखील दिली आहेत, या ठिकाणी इस्लाम चे पहिले खलिफा हजरत अबूबक्र सिद्धीक रजि.सांगतात कीं आम्हाला प्रेषित मुहम्मद स्व.नी सक्तीने आदेश दिले कीं," युद्ध झालेत तर, युद्धात स्त्री यांची हत्या करू नका त्यांच्या अब्रू ची रक्षण करा, महिला, वृद्ध, बालके, आजारी, यांची हत्या करू नका, त्यांना त्रास देवू नका, जाळपोळ करू नका, फळ झाडांना कापू नका, कोणताही विनाश करू नका मध माश्याणा अगीच्या हवाली करू नका, कोणत्याही धर्म स्थळाचा अवमान करू नका, अराजक्ता, आतंक माजवू नका, वास्त्याणा उध्वस्त करू नका, जेवढी कमीत कमी हानी होईल याची सतत काळजी द्यावी, सदाचरण, सदावर्तन करा, परोपकाराची भावना ठेवा, अल्लाह परोपकार व सदाचरणी, न्याय करणार्यांना पसंत करतात. "
ज्या जिहाद मध्ये स्रियाच्या अब्रू ची , स्त्री यावर होणाऱ्या अत्याचार, स्त्री विरुद्ध होणाऱ्या विविध छळा, त्रास कारणाऱ्या विरोधात जो समाज जिहाद करतोय, ज्या समाजात स्त्री बद्दल वारंवार आदेश आलेले आहेत कीं स्त्री यांचं रक्षण करा, ज्या प्रेषित पैगंबर मुहम्मद स्व. यांनी स्त्री यांना वाचविण्यासाठी, स्रियाच्या न्याय हक्का साठी, विधवा महिला बरोबर लग्नाला प्रोत्साहन दिले व ते स्वतः ही विधवा व तालाक दिलेल्या महिला बरोबर स्वतः विवाह करून संपूर्ण जगाला दाखवून दिले कीं विधवा स्त्री या बरोबर लग्न करून तिला पुन्हा एकदा जीवन जगण्याची संधी द्या. पुन्हा आपल्या शेवटच्या स्वास पर्यंत जो पैगंबर महिला हक्कासाठी काळजी होती अशा चांगल्या पैगंबराचे संस्कार असलेला कशाला लव्ह जिहाद च्या फांदयात पडेल.. लव्ह जिहाद हा इस्लाम व जिहाद चा एकदम विरोधाभास आहेत.. इस्लामला फसवून धर्मांतर करणे मुळीच मान्य नाहीत हें जिहाद च्या बिलकुल विरोधी भूमिका आहेत.. राजकीय पक्ष याचा गैरसमज करून मन दूषित करून फायदा उचलून राहिलं..
पुन्हा सध्या गाजत असलेला वोट जिहाद.. तों असाच राजकीय फायदा उचलण्यासाठी असो.. पुन्हा कधी यावर.
युद्धधाच्या आणीबाणी च्या परिस्थिती त जो नैतिकतेच उदाहरणं देतं आहेत असा इस्लाम मग अतिरेक कसा करेल..
जिहाद सारख्या महान मानवी कल्याणा साठीच्या उद्देश असलेल्या ततत्वत दयानाचे व उपासना पद्धतीचे जगात इस्लाम विरोधातील आप प्रवावृत्तीनें विदरूपीकरण करून लोकांची दिशा भूल करून, वास्तविक पणे मनाव जातीला शोषण मुक्ती देवून जगात सत्य- शांती - समानता - एकता अखंडतां व न्यायावर आधारित समाजनिर्मान करणे हें जिहाद चे प्रमुख ध्येय असल्यामुळे ती एक प्रकारे सर्वश्रेष्ठ मनाव कल्याण ची सेवाच.
 (मित्रांनो लेख आवडला तर मित्रांना व नातेवाईकांना जरूर पाठवा.. त्यांना ही फायदा होईल.. प्रतिक्रिया जरूर कळवा )


((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

आपला मित्र :- डॉक्टर. सलीम सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल. मिल्लतनगर.
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर.
मोबाईल नं. 9271640014.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷.

((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷




.

Monday, March 24, 2025

रमजान मुबारक 2025रोजा : नं. 24 वां, मंगळवार दिनांक 25-03-2025


रमजान मुबारक 2025
रोजा : नं. 24 वां, मंगळवार दिनांक 25-03-2025

    #!!" सृष्टी - युनिव्हर्स चा पालणकर्ता ; -अल्लाह - परमेश्वर - गॉड - परमात्मा .?? "!#


                        (1)" एकम ब्रह्म द्वितीय नास्ते नेह नां नास्ते किंचन "( ब्रह्ममा सूत्र ).
अर्थात:- परमेश्वर एक आहे, दुसरा नाही, बिलकुल नाहीं, कण मात्र देखील नाहीं ".
                            (2)," नां तस्या प्रतिमा अस्ति "(याजूर्वेद 32:3).
अर्थात:- उसकी कोई छवी नहीं, अर्थात : उसका कोई चित्र या मूर्ती नाहीं.
                               (3),"एक ओंकार सत नाम करतां पुरख निर्भ अ ओ निर्वाईर अकाल अजूनी सैभण गुरु परसाद " गुरुवानी ".
अर्थात:- परमेश्वर एक है, उसका नाम सत्य है, वह सृजन कर्ता है, अमर है, भय रहित है, उसको किसीने जन्म नहीं दिया, गुरु कीं कृपा से उसकी प्राप्ती होती है..
                                 (4), कुल- हु -वल्लाहु आहद,!अल्लाह -हुस -समद! लम- यलिद :, व-लम -युवलद :, व-ल्लम या-कुल्लाहु :, कुफू - अन - अहंद " पवित्र कुर आन ( सुरह नं. 112, सुरह - इखलास, आ. नं. 01-ते 04).
अर्थात :- ( पैगंबर! हें लोकं अल्लाह विषयी विचारतात ) तर, तुम्हीं त्यांना सांगा, " अल्लाह ( परमेश्वर )एकच आहे(1), तों आत्म निर्भर ( व स्वयंपूर्ण ) आहे (2), ना तों कोणाला ( अपत्य रूपी ) जन्म देतो, ना तों कोणापासून जन्माला आलेला आहे. (असा आहे अल्लाह )(3) आणि त्याच्या सारखा दुसरा कोणीच नाही.. (4).( सुरह नं. 112,सुरह - अल -ईखलास ).
                           (5) पवित्र दिव्य कुरआन नुसार , " ज्याने मला आईच्या पोटात जन्म दिला आहे ; तो , ही मला सरळ मार्ग दाखवतो ; तोच मला अन्न-पाणी देतो ; आणि आजारी पडलो तर तोच मला बरा करतो ; तोच मला एकदिवस मृत्यू देईल आणि मग पुन्हा तोच मला कयामतच्या दिवशी जिवंत करणार आहेत ,; आणि ज्यांच्यापासून मी फार आशा बाळगतो की ; तोच( अल्लाह )च कयामत ( मरणानंतरही आपण या जन्मी केलेल्या बऱ्यावाईट कर्माचं चांगले वाईट फळ)च्या मोबदल्याच्या दिवशी माझी चुक माफ करील ," (पवित्र कुराण ,पारा नं.१९ ,सुरहा नं.२६ , सुरह अल-अशुराह आ.नं.७८,७९,८०,८१,८२).,
                         (6)" तोच सृष्टीचा निर्माता ,रब (पालनकर्ता) आहे , तोच एक मात्र कृपावंत ,आणि दयावंत आहे ." ( पारा नं.१ सुरह नं.१ अल -फातिहा आ.नं.१,२),
                          (7)" तोच चिरंतरजीवी असून ,तमाम सृष्टीचा भार त्या एकट्या नेच सांभाळलेला आहे , पृथ्वी व आकाशाचा स्वामी (रब) तोच आहे " ( सु..नं.२ आ.नं.२५९ ).,
                           (8) " समस्त सृष्टीचा स्वामी ( रब) पालनपोषण करणारा तोच आहे ; प्रतिष्ठा (प्राप्त करणारा ) मिळवून देणारा ही तोच (रब) आहे ; पुन्हा, ( चुकीच्या गोष्टी केल्या तर) अपमानित सुध्दा करणारा ही तोच आहे " ( सु.नं.३ आ.नं.२६-२७) . , 
                        (9) " आकाशातील चंद्र- सुर्य -तारे सर्व काही ब्रामहांड -युनिव्हर्स फक्त त्याचेच आहे ; तोच जीवन व मृत्यू देणारा आहे "( सु. नं.१०, आ.नं.५५-५६).,
                        (10)" सृष्टीच्या प्रत्येक वस्तूला- आणु रेणूंनां तिचे स्वरूप प्रदान करणारा व तिला मार्ग दाखविणारा फक्त तोच आहे ". (सु.नं.२०,आ.नं.५०) ., 
                         (11)" मागी ल व पुढील सर्व अनंत काळ -समई- दाहींही दिशेने तोच आहे , चिरंजीवी व चिरस्थानी तोच आहे ." ( सु. नं. २० आ.नं.११०-१११).,
                           (12)" तोच सर्व कणा कणांना सर्वत्र सर्वोत्तम उपजिविका देणारा आहै ." ( सु. नं. २२ आ.नं.५८ व ६६). ,
                           (13)" तोच असण्याला नष्ट करतो , सत्याला खरे करून दाखवतो , लोकांची निराशा झाल्यानंतर ही पाउस पाडतो " ( सु.नं..४२ आ.नं.२४ व ३१).
                           (14)" तोच, वाली व दाता आहे , तोच मृतांना जिवंत करणारा (कयामतच्या दिवशी) आहेत ." (सु. नं.४२ आ.नं.९).,
                             (15)" कोणीही त्याचा पुत्र नाही व तो कोणाचाही पुत्र नाही व तो निर्विवाद निर्विकारच आहे , व त्याच्या सर्व ब्रांमहांडात - युनिव्हर्स मधे फक्त त्याचीच बादशही आहे व कोणी ही त्याचा भागिदार नाही ." ( सु. नं.१७ आ.नं.१११)., 
                           (16) " तोच फक्त व फक्त क्षमा करणारा ही आहे व कठोरातील कठोर शिक्षा देणारा ही तोच आहे ." ( सु. नं.१३ आ.नं.६). , 
पवित्र कुरआन मध्ये असंख्य वेळा असें आयात- स्लोक आलेले आहेत पण काहीच ठराविक येथे दिले आहेत, असो.
जेंव्हा जेसूस यांना सर्वात मुख्य वचना बद्दल विचारलं तर, ते म्हणाले, " The most important one "
                    "द मोस्ट इम्पॉर्टन्ट वन "
        " हम्हारा परमेश्वर एक है " (मार्क 12:29)
          अरबी चा शब्द "अल्लाह ""अल "तथा " ईलाही " पासून बनला है "अल्लाह " ज्याचा इंग्रजी अर्थ " The GOD " गोड " है,
कोणी गोड, तर भगवान-ईश्वर- परमेश्वर- परमात्मा तर कोणी आपल्या बोली भाषे प्रमाणे आपल्या पालनकर्त्याला वेगवेगळ्या नाम विशेषणाने बोलवतात.,.. नांव वेगवेगळ्या पद्धतीने घेतलं जातं.. असो.
                  जर समस्त युनिव्हर्स - सृष्टी- ब्रह्मांड वर बारीक लक्ष दिले तर , निश्चितच आश्चर्यचकित झालंय शिवाय होतं नसते , सृष्टीतील प्रत्येक कण न कण , चंद्र सुर्य ,तारे ,प्रत्येक घटना आपल्याला आश्चर्यचकीत , चमत्कारिक, अदभुत करुन सोडतात . सृष्टीच्या निर्मितीचा व सृष्टी चा सुनियोजित आराखडा ,रचना , पद्धती, त्यांची प्रत्येक वेळेस ची अचुकता , प्रत्येक मायक्रो सेकंद सुद्धा आप-आपल्या वेळी , त्यामधे मिली सेकंदाचा ही फरक नसतो एवढी अचुकता , चंद्र सुर्य तारे पृथ्वी यांच्या मधे एक मिली सेंकदाचाही फरक न होता आपल्या वेळेनुसार रूतूचक्र फिरत आहेत .येवढं अदभुत चमत्कार आज प्रगत विज्ञानाच्या युगात सुद्धा आपण आश्चर्यचकीत होऊन पहात असतो. एवढ्या जगात , एवढ्या मोठ्या जगातील प्रत्येक जीवजंतूंना , जनसंख्येला वेळेवर तीन वेळा पोटात अन्न पुरवतो व पोटभर देतो , समुद्रात जवळपास १८००० आठरा हाजार पेक्षाही अधिक जीवजंतू आहे ( पवित्र कुरआन नुसार), त्यामधे एकटा व्हेल मासा कितीतरी टन एका वेळेस खातो, उदाहरणासाठी फक्त एकजीव घेतला तरी . पृथ्वी च्या पोटात असे हजारोंच्या कोटींनी जिवजंतु जिवंत युनिव्हर्स मधे जींवन जगत आहेत . त्यामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गरजा - वेगवेगळे नखरे, सवयी, हे सर्व बघून माणूस हैरान - आश्चर्यकारक -आश्यर्य चकित होतं, फार अदभुत होतं, पण सृष्टीच्या प्रत्येक हो प्रत्येक जिवजंतु , प्राणी मात्र , प्रत्येक आणु रेणू ,ची सृष्टी च्या निर्मात्याने अगदी साचेबद्ध रचना बनवली आहे. प्रत्येक गोष्ट शिस्तबद्ध -साचेबद्ध , काम करीत आहे. प्रत्येकाला आप -आपलं स्वातंत्र्य अस्तित्व टिकवून ज्याची त्याची विशिष्ट ओळख देऊन जन्माला घातलं आहे. सृष्टीत प्रत्येक जीव जंतूत अगदी नर्जीव गोष्टीत सुद्धा चराचरात चैतन्य भरलेले पाहायला मिळते , प्रत्येक जिवाला एक आपलं वैयक्तिक पातळीवर सुद्धा एक वैशिष्ट्य बाहल केलेलं आहे . 
सृष्टीच्या प्रत्येक जीवजंतू जन्मापासून मृत्यूपर्यंत एक साचेबद्ध नियमितपणे नियमबद्ध जीवन जगत आहे.
हें कोणीतरी चालवतंय हे लक्षात घेतलं तर .कोणी तरी अदृश्य शक्ती चालवतंय.. हें आपण जाणतोय, कळतंय.. सर्व कळतंय.

       युनिव्हर्स - गॅलेक्सी मधे ज्याला आईच्या गर्भातून जन्म घेतले असेल आशा प्रत्येक बाळाला ( कोणी काहीही त्यांना नांवं देवो ) तो जन्माला येण्याआधी त्याची दुधाची सोय करुन ठेवतो . एवढी प्रत्येक जीवाची काळजी.. प्रत्येक जण अगदी स्पेसिअल.. हो एकदम स्पेसिअलच..जसं जगातील प्रत्येक आई वडिलांना, जिवजंतू च्या ही जन्म देणाऱ्या गटारीतील ही जन्म देणाऱ्या जिवंच्या जन्म देणाऱ्या त्याच्या माते ( आई ) ला आपलं मुलं, बाळ स्पेसिअल वाटतं अगदीच तसे अल्लाह ला प्रत्येक जीव जंतू हा स्पेसिअल वाटतं.
   त्या आणुरेणूंना, जीव जंतू ना, बाळाला कण कणाने मोठं करत करत समाजाच्या प्रत्येक घटकांकडून काही तरी शिकायला देतो.आईवडील एक माध्यम म्हणून बनवलेले .
जमीनीतुन एक दाणा पेरणी केल्यानंतर त्या दाण्याचे रूपांतर असंख्य संख्येने धान्यात करून प्रत्येक दाण्यांची विल्हेवाट लाउन , प्रत्येक दाण्यां दाण्यांला त्याच्या भुकेच्या वेळेनुसार ज्या दाण्यांवर त्या प्रत्येक खाण्याऱ्यांचं अदृश्य नांव लिहीलेले असतात, प्रत्येक कण कण त्या खाणाऱ्या च्या पोटात घालतो .किती अद्भुत आहे ना ? विचार केला तर आश्चर्य करण्याशिवाय काहीच पर्याय नसतो.. फक्त आश्चर्यच ....
म्हणून पवित्र कुरआन मध्ये (पारा) अध्याय नं. 25 मध्ये,
         ## वारंवार एक वाक्य सतत अल्लाह सांगतात कीं, "तों, तुम, आपने रब कीं, कोण कोणशी न्यामत को झूठलाओनंगे??".( पारा 25, सुरह नं., 55, सुरह अर - रहमान आ. नं 13 अश्या 31 वेळा )
          ## अर्थात:- " तेंव्हा, हें जिन्न ( फारिश्ते ) व मानवांनो, तेंव्हा, तुम्हीं, आपल्या पालनकर्त्याच्या कोण कोणत्या देणग्यांना नाकारणार??
ज्याच्या त्याच्या कर्मानुसार तो मोठा होऊन ५०,६०,७०,८०-१०० जगून जग सोडून जातात, हा सृष्टीच्या नियम आहेत, प्रत्येक कणा - कणाला मरण येणं हे सत्य आहे ( कुल्यु नफसून जायकतुल मौत ), मरणं हे अंतिम सत्य, मृत्युनंतर तो कयामतच्या दिवशी प्रत्येक जीव जंतूला जीवंत सुद्धा करणार आहे , या जगात केलेल्या चांगल्या- वाईट कामांचं हिशोब घेण्यासाठी.. हे सुध्दा अंतिम सत्य च आहे ...हे जीवन चक्र आहे.
           हे सर्व फक्त अदृश्य अल्लाहा च चालवत असतो. .!!.तोच हा अल्लाह आहे, निर्विकार, 
                          अल्लाहा बद्दल काही ही व्याख्या केली तरी ती पुर्ण होउच नाहीत..आपल्या शब्दापलीकडे -अंदाजापलीकडेचच....
                     # पवित्र कुरआन पारा न. १५ मधे ,सुरह कहफ , अयत नंबर १०९ ,"हे पैगंबर (स्व. सल्लम. सांगा की,जर सात ही समुद्र हे माझ्या पालनकर्ता च्यां गोष्टी लिहिण्यासाठी शाई( इंक -लिहीण्याची) बनवले तर , ती साता समुद्रांचीं ही शाई संपेल ; परंतु , पालनकर्ता च्यां गोष्टी संपणार नाही ; इतकेच नव्हे , तर पुन्हा तितकीच शाई पुन्हा आम्ही आणली तरी देखिल ती पुरेशी ठरणार नाही ," #
       🌷"" तुम्हीं आपल्या पालन कर्त्या च्या कोण कोणत्या देणग्यांना नाकारणार??".🌷.

( मित्रांनो लेख आवडला तर नक्कीच आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना पाठवा आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा)

(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

आपला मित्र, डॉक्टर. सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
मोबाईल नं. 9271640014.
        ‌‌ @#@₹@₹@₹@₹@#@#@
🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹

(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷