राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, April 17, 2025

अल करम हाॅस्पिटल तर्फे महात्मा फुले व डॉ. आंबेडकर जयंती निमित्त मोफत सर्वरोग आरोग्य शिबीर संपन्न


आधुनिक उपचारपद्धतीमुळे रोग निवारण मोठ्याप्रमाणात होत आहे - डॉ.अशपाक पटेल 

अ,नगर - प्रतिनिधी - वार्ता -
बदलती जीवनशैली आणि वातावरणातील बदलांमुळे मनुष्याची प्रतिकार शक्ती कमी होत आहे. विशेषत लहान मुलांमध्ये आजारांचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. दुषित पाणी, फास्ट फूड, अस्वच्छता यामुळे आजारांची उत्पत्ती होतांना दिसते. या वेगवेगळ्या आजारांचे निदानही अत्याधुनिक मशिनरीद्वारे करता येत असल्याने उपचार करणेही आता सोपे होत आहे. उपचार वेळेत न झाल्याने आजार बळावतात. त्यासाठी अशा मोफत तपासणी शिबीराच्या माध्यमातून आजारांचे निदान वेळेत झाल्यास त्यावर उपचार करणे सोपे होणार आहे. त्यामुळे अशा शिबीरांची गरज आहे, असे प्रतिपादन डायबॅटोलाॅजिस्ट व कार्डीयोलाॅजिस्ट डॉ. अशपाक पटेल यांनी केले. 
अल करम हॉस्पिटलच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तीन दिवस मोफत सर्वरोग आरोग्य शिबीर निदान व उपचार करुन रुग्णांना औषधे ही देण्यात आली.
 या शिबीरात प्रत्येक दिवशी ४० ते ५० रुग्णांनी याचा लाभ घेतला. रुगणांची तपासणी डॉ. अशपाक पटेल यांनी केली. रक्त व शुगर तपासणी महेश सानप, शिफा शेख, विशाल काळे, दानिश खान, मुस्कान शेख यांनी केले. यावेळी डॉ. जहीर मुजावर, डॉ सय्यद खुसरो, डॉ के. व्यंकटेश, शेरअली शेख आदी उपस्थित होते. 
प्रास्तविकात हॉस्पिटलचे डॉ. जहीर मुजावर म्हणाले, आज विविध आजारांची उत्पत्ती ही हवा, पाणी, खाण्यातून होतांना दिसते.धकाधकीचे जीवन, वेळेवर न जेवणे, दुषित अन्न-पाणी, कोड्रिंक, फास्टफूड यामुळे बर्‍याच जणांना पोटाचे विकार होतात. यासाठी नियमित व्यायाम, संतुलीत आहार महत्वाचा आहे. प्रत्येकाने आपली प्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज आहे. तसेच छोट-छोट्या व्याधींकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी केल्यास भविष्यात उदभवणारे आजारांवर वेळीच निदान होऊ शकते. यासाठीच मोफत तपासणी शिबीराच्या माध्यमातून रुग्णांना दिलसा देण्याचे काम अल करम हॉस्पिटलच्यावतीने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.या शिबीरात हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफ, टेक्निशियन, कर्मचारी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेरअली शेख यांनी केले. तर आभार एजाज तांबोली यांनी मानले. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

रयत हा एकसंघ परिवार :- सुधीर म्हस्के


रयत हा एकसंघ परिवार : सुधीर म्हस्के

- अजीजभाई शेख -  राहाता -/ वार्ता -
रयत सेवक हा समाजात जिव्हाळ्याने आणि सह्रदयतेने सेवा देणारा सेवक असून रयत हा एकसंघ परिवार आहे असे प्रतिपादन श्रीरामपूर दूध संघाचे चेअरमन सुधीर म्हस्के यांनी केले.
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलातील सेविका ममताज शेख यांचा सेवापूर्ती समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीरामपूर दूध संघाचे चेअरमन सुधीर म्हस्के हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य विनायक मेथवडे यांनी केले. यावेळी सत्कारमूर्ती मुमताज शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संजय ठाकरे, भारती भुसारी, गोरक्षनाथ बनकर, शिवाजी बेंद्रे, माजी प्राचार्य मधुकर अनाप, माजी प्राचार्य अंगद काकडे, माजी प्राचार्य अण्णासाहेब साबळे, तौसिक शेख, सत्कारमूर्ती मुमताज शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे प्रमुख तोरणे यांनी रयत सेवकांची एकनिष्ठा आणि त्यागाविषयी विचार मांडून रयत सेवकांची अण्णांवरील श्रद्धा हा खरा भक्तिभाव आहे, असे मत व्यक्त केले. सुधीर म्हस्के यांनी सामाजिक, शैक्षणिक कार्यप्रती रयत सेवकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. रयत सेवक हा एकसंघ परिवार असून रयत सेवक निष्ठेने आणि ध्येयाने एकरूप असल्याचे मत व्यक्त त्यांनी व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थी शिवाजी बेंद्रे यांनी ॲग्री विषययात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास बक्षीसासाठी पन्नास हजार रुपयांचा ठेवीचा चेक प्राचार्य विनायक मेथवडे यांच्याकडे सुपूर्द केला. तर कन्या विद्यालयासाठी पन्नास हजार रुपये देणगी व मुमताज शेख यांनी मुले विभागासाठी अकरा हजार रुपये देणगी जाहीर केली. याप्रसंगी रतिलाल भंडारी. चंदूभाई तांबोळी, भाऊसाहेब पेटकर, समशेर पठाण, माजी प्राचार्य जी. टी. गमे, मुख्याध्यापक देवराम वडीतके, गणीभाई शेख, राजूभाई शेख, सलीम शेख, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपप्राचार्य अलका आहेर, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, पर्यवेक्षिका शोभा कडू, पर्यवेक्षिका संजीवनी आंधळे, शोभा चौधरी, शरद शिंदे, जावेद शेख, गफार तांबोळी, मुस्ताक पटेल, यासीन शेख, समीर पटेल, जावेद तासगावकर, सादिक शेख, सलीम शेख, बानू शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट, अश्विनी सोहोनी व रेणुका वरपे यांनी केले. तर शेवटी उपमुख्याध्यापक दिलीपराव डहाळे यांनी आभार मानले.- 

=================================
-----------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग डॉ.शरद दुधाट (सर) 
✍️✅🇮🇳...श्रीरामपूर, वृत्त प्रसिद्धी सहयोग,समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर.•
-----------------------------------------------
=================================

Tuesday, April 15, 2025

श्रीरामपूरच्या राजकारणात मोठा भूकंपकाँग्रेसच्या १२ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश ; शहराच्या राजकीय समीकरणात मोठा बदल


श्रीरामपूरच्या राजकारणात मोठा भूकंप
काँग्रेसच्या १२ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश ; शहराच्या राजकीय समीकरणात मोठा बदल

- श्रीरामपूर - प्रतिनीधी -/ वार्ता -
श्रीरामपूर शहराच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे. काँग्रेस पक्षाचे तब्बल १० ते १२ माजी नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत थेट भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. दिवंगत आमदार जयंत ससाणे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी असलेल्या या नेत्यांनी मंगळवारी मुंबई येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयात पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, अहिल्यानगर चे प्रभारी विजय चौधरी, अहिल्यानगर उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.  
या घडामोडींमुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजप प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, तसेच माजी नगरसेवक अशिष धनवटे, शशांक रासकर, शामलिंग शिंदे, कैलास दुबय्या, मनोज लबडे, राजेंद्र आदिक, संजय गांगड, आणि वळद उंबरगांव येथील सरपंच विराज भोसले यांचा समावेश आहे. हे सर्व नेते जयंत ससाणे यांच्या राजकीय वारशाचे समर्थक आणि काँग्रेसमध्ये प्रभावी स्थान राखून होते.
संजय फंड यांनी स्पष्ट केले की, शहरातील रस्ते, पाणी, घरकुल योजना तसेच अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी सत्तेत सहभागी होणे आवश्यक आहे. सत्तेच्या बाहेर राहून या समस्या सोडवता येणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. फंड यांच्या निवासस्थानी गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात सलग बैठका सुरू होत्या. अखेर या बैठकीतून भाजप प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला. या प्रवेश सोहळ्यामुळे श्रीरामपूरमध्ये भाजपचा झेंडा आता अधिक बळकट होणार आहे. प्रत्येक प्रभागात भाजपचे कार्यकर्ते सक्रिय होणार असून, पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला बळ मिळणार आहे. 

याबाबत माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांनी स्पष्ट केले की, हा पक्षप्रवेश सध्या केवळ शहर आणि नगरपालिका हद्दीत मर्यादित असून, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा यात समावेश नाही. विशेष म्हणजे, भाजपच्या शहराध्यक्ष पदासाठी काँग्रेसमधून आलेल्या या गटातील एखाद्या माजी नगरसेवकाची निवड होण्याची शक्यता आहे. नुकतीच शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष निवडीसंदर्भात बैठक झाली असून, लवकरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

पक्षांतराबाबत करण ससाणे यांच्याशी कोणताही विरोध नाही असे स्पष्ट करत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, “शहराच्या विकासासाठीच आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहोत.” या राजकीय उलथापालथीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला लागलेला हा मोठा फटका त्यांच्या संघटनेवर आणि गटबाजीत परिणाम करणारा ठरू शकतो. श्रीरामपूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी या प्रवेशामुळे झालेली आहे, हे निश्चित. 
या पक्ष प्रवेशावेळी , सोमनाथ गांगड, श्रीरामपुर पंचायत समिती उपसभापती सुनील क्षीरसागर,भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन दिगंबर फरगडे, शिरसगांवचे उपसरपंच वैभव लोढ़ा , दत्तात्रय धालपे, पराग शाह, राकेश न्याती, संदीप अग्रवाल, योगेश डंबीर, चिरायू नगरकर, सिद्धार्थ फंड, अमोल शेटे, सागर बर्वे यांच्यासह श्रीरामपूर शहरातील व तालुक्यातील शेकडो पदाधिकारी- कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

'"श्रीरामपूर शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधा पूर्ण करणाऱ्या योजनांमुळे – जसे की छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, १७८ कोटींची जलयोजना, जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी, सर्वसामान्यांसाठी घरकुल योजना व टपरी धारकांचे पुनर्वसन या विकासगंगेचा भाग होण्यासाठी आणि श्रीरामपुर शहराच्या उज्वल भविष्यासाठी आज अनेकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे मन:पूर्वक स्वागत!" – जिल्हाध्यक्ष नितीन
 दिनकर

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई 
वडाळा महादेव ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

सदगुरू कुंभार काका यांची १९ वी पुण्यतिथी साजरी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर फाटा परिसरातील ओम शिव गोरक्षनाथ मंदिर या ठिकाणी सदगुरु कुंभार काका यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली, यावेळी सकाळी विधीवत पूजन अभिषेक होम हवन दुपारी १२ वा वारकरी सांप्रदायिक भजन सेवा संपन्न झाली यानंतर महाआरती महाप्रसाद वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संतोष भालेराव,नाना दळवी, गौरव पवार, सुनील पवार, श्याम उफाड, श्रीराम शिंदे, आप्पासाहेब मोरे, ग्रामपुरोहित वेदाचार्य रंगनाथ मेगदे, साजन भोंडगे, युवराज साळवे, दीपक पवार
 अनिल देवगिरे, नागेश सुगुर, पोपर परदेशी,  
 हभप तुकाराम महाराज कदम तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संतोष परदेशी, पो. कॉ. वसीम इनामदार, प्रविण कांबळे, गृहरक्षक दलाचे राजेन्द्र देसाई, चंद्रकात मोरकर, महेश भालके आदि यावेळी उपस्थित होते.
उफाड परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिरसगांव भजनी मंडळ, गोरक्षनाथ मंडळ आदींनी सहकार्य केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे अध्यक्ष श्री बाबासाहेब उफाड यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई 
वडाळा महादेव ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, April 14, 2025

शिवसेनेच्या (उबाठा) वतीनेडॉ.आंबेडकर जयंती साजरी

श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने श्रीरामपूर येथील महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना तालुका प्रमुख लखन भगत, तालुका प्रमुख राधाकिसन बोरकर,शहर प्रमुख संजय छल्लारे,ज्येष्ठ शिवसैनिक अशोक थोरे मामा,भगवान उपाध्ये,तेजस बोरावके, संजय साळवे, कल्याणकर मामा,सुहास परदेशी,युवा सेना सुरेश थोरे, रोहित नाईक , बापु बुधेकर , विशाल पापडीवाल, विशाल दुपाठी आदी शिवसैनिक उपस्थितीत होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तू जतन कराव्या - संध्या मेढे


जिल्हा पर्यटन विकास आराखड्यात समावेश करण्याची इतिहास प्रेमी मंडळाची मागणी

- अ,नगर - प्रतिनिधी - / प्रतिनिधी - वार्ता -
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला अहमदनगरच्या जनतेने मोठे सहकार्य केले होते. त्यांच्या खांद्याला खांदा लावून येथील जनता त्यांच्यासोबत होती. डॉ. बाबासाहेब अनेकदा अहमदनगर परिसरात आले होते. त्यांनी प्रत्यक्ष भेटून येथील जनतेला न्याय दिला. त्यांनी आपला थॉटस ऑन पाकिस्तान हा ग्रंथ सावेडी- भिस्तबाग परिसरातील पटवर्धन बंगला येथे लिहला होता. माळीवाडा महालक्ष्मी मंदिर येथे त्यांनी व्यापक बैठक घेतली होती. त्यांनी येथील आयुर्वेदिक डॉक्टर गुणे यांच्याकडून मधुमेहावर औषध घेतले होते. आजच्या सिध्दार्थनगर येथील सोमवंशी बोर्डींग येथे भेट देवून कामकाजाची माहिती घेतली तसेच येथील शेरेबुकात नोंद केली होती. या व अशा अनेक आठवणी जुनी जाणती मंडळी सांगत असतात. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी या सर्व ठिकाणांचे स्मृतीफलक येथे लावून त्यांच्या स्मृती जतन कराव्यात तसेच जिल्हा पर्यटन विकास आराखड्यात समावेश करण्याची मागणी अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाच्या संध्या मेढे यांनी केली. 
अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करताना त्या बोलत होत्या. यावेळी इंजि.अभिजीत एकनाथ वाघ, ॲड.संतोष गायकवाड, आबीद दुल्हेखान, पंकज गुंदेचा, भैरवनाथ वाकळे, ऍड. विद्या जाधव आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक माणसाला सामाजिक न्याय देणारे महामानव आहेत - डॉ.विठ्ठल सदाफुले


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक माणसाला सामाजिक न्याय देणारे महामानव आहेत असे उद्गार अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल सदाफुले यांनी काढले. तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभाग, इतिहास विभाग व जयंती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, भारताची राज्यघटना ही देशातील सर्वोत्कृष्ट घटना आहे. देशातील सर्व घटनांचा अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संविधान लिहिले.या संविधानामधील न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्रत्येक माणसाला मिळाली पाहिजे आणि प्रत्येकाने कलमांनुसार आपले अधिकार व कर्तव्याला जागले पाहिजे असेही ते म्हणाले.इंग्रजी विभागाचे प्रा.गोरख साळवे यांनी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे यांनी भुषविले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.सतिश पावसे,प्रा.चंद्रकांत कोतकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================