राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, July 9, 2025

घनकचरा व्यवस्थापनाकडे कचरा उचलण्याची मागणी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील वॉर्ड क्र.२ मधील पाटाच्या कडेस "वैदूवाडा पुल ते दाळवाले चाळ पर्यंत" नगर पालिका प्रशासनाने सिमेंट क्रॉंकिटचा रस्ता बनवला याबाबत नगर पालिका प्रशासनास धन्यवाद. 

मात्र याठिकाणी पाटाच्या कडेला जो कचरा टाकला जातो यामुळे परिसरात दुर्गंधी तर पसरतेच शिवाय या कचऱ्यामुळे मोकाट कुत्रे आणी डुकरे यांनी अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे,
तसेच या रस्त्यावर शालेय विद्यार्थी, महिला, मुले, वयोवृद्ध यांच्या ये जा ची मोठी वर्दळ असल्याने तथा याठिकाणी पाटाच्या कडेला असलेल्या वाढलेले गवत आणी अनावश्यक झाडा झुडपात डुकरे दिवसभर लपून बसलेली असतात, कोणी कचरा टाकल्यास त्यावर ताव मारण्यासाठी कुत्रे व डुकरे कचऱ्यावर तुटून पडतात, कधी काळी नागरीकांच्या अंगावर धावूनही येतात यामुळे भविष्यात काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही,तसेच सदरील कचरा हा काही वेळा पाटाच्या पाण्यात जातो आहे तर काही वेळा रस्त्यावर येत असल्याने रस्त्यावरुन ये - जा करणाऱ्या नागरीकांना दुर्गंधीसोबतच मोठ्या त्रासाचा सामना करणे भाग पडत आहे. करीता घनकचरा व्यवस्थापन विभागाने दररोजच सदरील ठिकाणचा कचरा उचलत जावा यासोबतच सदरील ठिकाणचे गवत व अनावश्यक झाडे झुडपे काढणेकामी नगर पालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, ज्यामुळे परिसरातील नागरीकांच्या समस्या दुर होवू शकतील अशी परिसरातील नागरीकांकडून मागणी केली जात आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, July 7, 2025

ऑबट श्रीमती मायादेवी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून सायकल वाटप !


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 रयत शिक्षण संस्थेच्या भिंगार (जि.अहिल्यानगर) येथील श्रीमती ऑबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल चे माजी विद्यार्थी अक्षय रमेश थोरात यांनी आपल्या शाळेप्रती कृतज्ञता म्हणून या विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सायकल वाटप केले. भिंगार येथील श्रीमती मायादेवी ऑबट विद्यालयात नुकताच सायकल वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य तथा उत्तर विभागीय सहाय्यक अधिकारी प्रमोद तोरणे हे होते. तर व्यासपीठावर रमेश थोरात, अक्षय थोरात, संध्या थोरात, मुकुल थोरात ,रेवती थोरात मनीष गायकवाड, पूजा साळवे, यशराज उबाळे, सागर साळवे, नितीन गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी १२ विद्यार्थ्यांना उच्च प्रतीच्या सायकलींचं वाटप करण्यात आले. अक्षय थोरात म्हणाले की, सामान्य घरातील माझा जन्म असून शाळेबद्दलच्या आपुलकी पोटी या सायकली मी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून नाव कमवावे. प्रमोद तोरणे म्हणाले की, पैशाने श्रीमंत खूप असतात परंतु देणारे कमी असतात शाळा दानशूरांना कधीच विसरणार नाही. यावेळी विद्यार्थ्यांच्या बहारदार नृत्याचं आयोजन सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव रेवगडे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका कविता शिंदे यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग* 
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

कृत्रिम बुद्धिमत्ता काळाची गरज : - प्राचार्य विनायक मेथवडे


रयत शिक्षण संस्था कृत्रिम बुद्धिमत्तेचे 
शिक्षण देणारी पहिली शिक्षण संस्था

- अजिजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
 रयत शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नाविण्याचा ध्यास घेणारी संस्था असून कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण देणारी पहिली संस्था आहे. स्वविकासाबरोबरच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य विनायक मेथवडे यांनी केले. 
प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच इयत्ता बारावी विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विनायक मेथवडे हे होते तर व्यासपीठावर उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्य अलका आहेर, पालक प्रतिनिधी कल्पना शेळके व तुषार थेटे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. शरद दुधाट यांनी केले. यावेळी सीईटी पॅटर्नवर विश्वास मोहिते, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर शाहिस्ता शेख, उपप्राचार्य अलका आहेर, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पालक प्रतिनिधी कल्पना पेंढारे व श्रेया घोगरे यांनी सीईटी, नीट व जेईई परीक्षांच्या उत्कृष्ट निकालाबद्दल कौतुक केले. प्राचार्य विनायक मेथवडे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, गेल्या तीन वर्षापासून एमजी महाविद्यालयाने सीईटी व नीट परीक्षेत आपला स्वतःचा एक पॅटर्न तयार केला असून रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठीचे अधिकचे प्रयत्न केले जात आहे. सीईटी, नीट अभ्यासक्रमाबरोबरच रयत स्वतःची हजारो एम.सी.क्यू प्रश्नांची पतपेढी आणि युट्युबवर शेकडो व्हिडिओ लेक्चर्स तयार करत आहे. महाविद्यालयातील तासिकांचे अध्यापन इंटरॅक्टिव्ह बोर्डवर प्रभावीपणे घेतले जात आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा ठोकळ यांनी केले तर आभार देवेश आहेर यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️💐🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

शासनाने तात्काळ अनुदानटप्पा मंजूर करावा - मागणी


अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेची अनुदान करिता मागणी

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
अंशतः अनुदान शाळा टप्पा वाढीसाठी पुरवणी माँगनी मध्ये आर्थिक तरतूद न झाल्याने ८ व ९ जुलै रोजी राज्यातील अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा बंद ठेवुन निषेधार्थ व आजाद मैदान मुंबई येथे आंदोलनात सहभागी होण्याकरिता पंचायत समिती च्या गटशिक्षणाधिकारी यांना शिक्षक समन्वय संघ व अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. पावसाळी अधिवेशनात निधी साठी आर्थिक तरतूद करण्यात येईल असे शब्द देण्यात आले होते तरी शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार आर्थिक तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली. शिक्षण विस्तार अधिकारी श्री. त्रिभुवन व केंद्रप्रमुख श्री. पिलगर यांनी निवेदन स्विकारले. या वेळी शिक्षक समन्वय समिती चे श्री. मुनतोड़े, श्री. काळे, श्री. पवार, श्री. त्रिभुवन, श्री. रूपटक्के व अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष इकबाल काकर, सचिव आरिफ शेख , उपाध्यक्ष इब्राहिम बागबान, उपाध्यक्ष साबीर शाह व अजीज शेख आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Sunday, July 6, 2025

आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना नाही, पण देवेंद्र फडणवीसांना जमलं' राज ठाकरे...


- मुंबई - प्रतिनिधी -/ वार्ता - 
राज्य सरकारने हिंदी सक्ती भाषेचा जीआर
मागे घेतल्यावर वरळी डोम येथील विजयी सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे. या भाषणामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गळाभेट घेतली. त्यानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदा भाषण सुरू केलं. ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

माझ्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, ज्याच्यातून या गोष्टी सुरू झाल्या. कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्रा मोठा आहे. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसांना जमलं. आता संध्याकाळी सर्व सुरू होईल आता, बॉडी लँग्वेज कशी होती? कोणी कमी हसलं, कोणी बोलतायेत का ? आपल्याकडे मूळ विषय सोडून बाकी विषयात रस असतो. खरं तर आजचा हा मेळावा, कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे महाराष्ट्राकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहायचं नाही. खरंतर हा प्रश्नाच अनाठायी होता. हिंदीचं कुठून आलं समजलं नाही, कशासाठी, कोणासाठी हिंदी?, लहान मुलांवर जबरदस्ती करता आहात तुम्ही, कोणाला विचारायचं नाही काही, आमच्याकडे सत्ता आहे आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल विधानभवनात आमच्या हातात सत्ता आहे रस्त्यावर. एक पत्र लिहिलं दोन पत्र लिहिली दादा भुसे आले म्हणाले. आम्ही काय
बोलतोय ते एकून घ्या त्यांना एक सांगितलं, दादा ऐकून घेईन पण ऐकणार नाही,असं राज ठाकरे म्हणाले.

सन्माननीय उद्धव ठाकरे, म्हणाले जमलेल्या माझी मराठी बंधू भगिणी आणि मातांनो, खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता, मराठी माणून सर्व बाजूने कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं. पण मोर्चाच्या चर्चेने माघार घ्यावी लागली. आजचा मेळावा शिवतीर्थावर व्हायला पाहिजे होता, पाऊस आहे त्यामुळे मुंबईत जागा मिळत नाहीत.

त्यामुळे इथे यावं लागलं, बाहेर जे उभे आहेत त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================








श्रीगोंद्यात मोहरम उत्सव साजरा


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 मोहरम पर्वात ताजिया स्थापनेची परंपरा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे गुरू सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह येथे पारंपारीक रुढी परंपरेने चालत आलेल्या ताजिया स्थापनेची परंपरा शेख महंमद बाबा यांच्या वंशजांनी जतन करत कायम ठेवत सालाबाद प्रमाणे चालु वर्षी दि. २७ जुन २०२५ रोजी शेख महंमद बाबा दर्गाह मध्ये पारंपारिक पद्धती नुसार ताबुत (ताजीया) ची स्थापना करण्यात आली होती.
तसेच श्रीगोदा शहरात जावेद 
फकीर, राजु मनियार, बाळासाहेब गोरे, बादशहा मालजप्ते, महंमद शेख, डॉ. बन्सीभाई मनियार आदिंसह श्रीगोंदा तालुक्यात अनेक ठिकाणी ताजिया व सवारी, पंजाची स्थापना करण्यात आली होती.
            शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष, वंशज, दैनिक सिटीझन चे संपादक अमीनभाई शेख, बंडूभाई शेख, अली शेख, अजीज शेख, राजू शेख, चांद शेख, फारूख शेख, सोहेल शेख, तौसीब शेख, रेहान शेख, शाहरुख शेख, शाहिद शेख,फरहान शेख यांच्या हस्ते सायंकाळी विधीवत धार्मिक पूजा करून.६ जुलै रोजी भाविक भक्तांच्या उपस्थितीत शहरातून वाद्य वाजवत मिरवणुकीने शहरातील पंचायत समिती वसाहतीतील विहिरीत ताबुताचे विसर्जन करण्यात आले.

यावेळी पो.नि.किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
        मंगळवार दि.०८ जुलै रोजी (तिजायत) दिवशी शेख महंमद बाबा दरबारात खिचाड्याचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
पत्रकार राजूभाई शेख - श्रीगोंदा 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

चि.फजल पठाण च्या थैलेसीमिया ऑपरेशनसाठी मदतीचे अवाहन



आपला एक एक रुपया या बालकाच्या भावी आयुष्यासाठी मोठ्या मोलाचा ठरेल

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
छ.संभाजीनगर (औरंगाबाद) 
येथील गारखेडा परिसरातील चि.फजल फेरोज खान पठाण हा १२ वर्षीय बालक (चार महिन्याचा असताना) गेल्या साडे आकरा वर्षांपासून थैलेसीमिया आजाराने ग्रस्त आहे, दर पंधरा,वीस दिवसांनी त्यास बाहेरुन रक्त द्यावे लागत आहे.
मात्र आता डॉक्टरांनी त्याच्या ऑपरेशनसाठी जवळपास चाळीस लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले आहे. सदरील कुटुंब हे अत्यंत गरीब असून त्यांच्याकडे इतकी मोठी रक्कम येणे शक्य नाही, करीता सामाजातील दानशुरांनी यासोबतच ज्यांना शक्य आहे अशा मान्यवरांनी सोबत दिलेल्या क्युआरकोड स्कॅनरवर अथवा रुग्णाच्या खात्यावर यथाशक्ती जी काही मदत करता येईल ती जरुर करावी, आपला एक एक रुपया या बालकाच्या आयुष्यासाठी मोठ्या मोलाचा ठरु शकेल अशी विनंती या बालकाच्या पालकांनी केली आहे.
तथा अधिक संपर्कासाठी बालकाचे पालक फेरोज खान जावेद खान पठाण यांनी आपला भ्रमणध्वनी क्रमांक 9284064278 देखील दिलेला आहे,
करीता यथाशक्ती जे काही शक्य आहे ती आवश्यक मदत करावी अशी नम्रतेची विनंती आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================