राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, July 19, 2025

रविवारी नगरमध्ये ॱएक दिल दो आवाजॱ फिल्मी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
संगीत मेजवानी मध्ये नगर शहरात नावाजलेल्या एस के मेलडी सिंगर्स ग्रुपच्या वतीने भारतीय सिनेमातील दिग्गज गायक मोहम्मद रफी व किशोर कुमार यांच्या गीतांची मैफल ॱएक दिल दो आवाजॱ चे आयोजन रविवार दिनांक २० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता नगर शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात करण्यात आले असल्याची माहिती आयोजक समीर खान व किरण उजागरे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमात किरण उजागरे, पवन फिरोदिया, समीर खान,सारंग पंधाडे, इस्थर पवार, मोहसीन सैफी, नेहा ओस्तवाल,समी खान, पुनम कदम हे कलाकार गीते सादर करणार असून सूत्रसंचालन रियाज पठाण हे करणार आहेत. कार्यक्रम लाईव्ह म्यूझिक बरोबर असल्यामुळे संगीत संयोजन निलेश सोजवल व ऍडवीन पेरेपाडम, साऊंड लाईट्स हर्मन प्रो ऑडीओ अँड लाईट्स श्रीरामपूर यांचे असणार असल्याचे किरण उजागरे यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रायोजकत्व इनकोर इंडस्ट्रीज,काशीद हॉस्पिटल,युनायटेड सिटी हॉस्पिटल, कुबेर मार्केट, मिवारा ब्रेकिंग न्यू ग्राऊंड्स, एच एस आर पी फिटमेंट सेंटर आदींचे सहकार्य लाभले आहे. 
कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिकेसाठी 7020681422 या नंबरवर संपर्क साधावा.कार्यक्रमास प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्रधान्य असणार असल्याचे समीर खान यांनी सांगितले.
तरी या एक आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा आनंद सर्व संगीत रसिकांनी अवश्य घ्यावा असे आवाहनही आयोजक समीर खान व किरण उजागरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

=================================
-----------------------------------------------
 *वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

अमराठी मतदारसंघ बनवून हा भूभाग गुजरातला देण्याचा डाव : - राज ठाकरे प्रत्येकाशी कायम मराठीत बोला; त्यासाठी भाग पाडा

- मुंबई - प्रतिनिधी- वार्ता -
मीरा-भाईंदर : - नगरसेवक, आमदार,
खासदार आपलेच निवडून आणायचे. अमराठी मतदारसंघ बनवून हा सगळा भूभाग गुजरातला मिळवायचा हा यांचा डाव आहे. हिंदुत्वाच्या बुरख्याआडून मराठी संपवण्याचे राजकारण सुरू आहे. तुम्ही खडकासारखे टणक राहा. प्रत्येकाशी मराठीतच बोला, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदरमधील जाहीर सभा गाजवली.

अटकेपार झेंडे फडकवणारा महाराष्ट्र आज हतबल झाला आहे. हिंदी सक्तीची करणार अशी भाषा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात. तसा प्रयत्न तर करून बघा, दुकानेच नाही, शाळाही बंद करू अशा शब्दात राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला. माझे सगळ्या भाषेवर प्रेम आहे. राज्यातल्या कोणत्याही नेत्यापेक्षा माझी हिंदी जास्त चांगली आहे. भाषा कोणतीही वाईट नसते. मात्र, ती जर तुम्ही लादणार असाल तर आम्ही बोलणार नाही, जा... काय करायचे ते करा..!

भाषेची सक्ती करत त्याअडून तुम्हाला चाचपडून बघायचे. तुम्ही चिडत नाही, पेटून उठत नाही, हे लक्षात आले

राष्ट्र नवनिर्माण सेना श्रीवर्धन ताब्यात घ्यायचे आणि मुंबई गुजरातला त्यांचे स्वप्न आहे, असे सांगून राज म्हणाले, तुम्ही स्वतःहून काही करू नका; पण कोणी माज दाखवला तर ठेचून काढायला मागेपुढे बघू नका.

- दुबे यांनी मुंबईत येऊन - दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू

तुम्ही स्वतःहून काही करू नका; पण कोणी माज दाखवला तर ठेचून काढायला मागेपुढे बघू नका. भाजपचे खासदार दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे. समुद्रात बुडवून बुडवून मारू. हा आमच्या बापाचा महाराष्ट्र आहे. जर का मराठी माणसाच्या वाटेला जाल, तर तुमचा गाल आणि आमचा हात याची युती झाल्याशिवाय राहणार नाही. असेही ते म्हणाले.

देशातल्या २५० भाषा हिंदीने मारल्या

दोनशे वर्षांचाही इतिहास नसलेल्या हिंदीने देशातल्या कमीत कमी २५० भाषा मारून टाकल्या. त्यातल्या अनेक भाषा उत्तरेकडच्या आहेत. देशात कोणाचीही मातृभाषा हिंदी नाही. जी हनुमानचालिसा * तुम्ही म्हणता तीदेखील हिंदी नाही. ती अवधी भाषेत आहे. ज्या हिंदीने अनेक जुन्या दुर्मीळ भाषा संपवल्या तीच हिंदी आता मराठी संपवणार असेल तर ते आपण होऊ द्यायचे का? असा सवाल ही राज ठाकरे यांनी केला.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================








Thursday, July 17, 2025

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड आल्याच्या निषेधार्थ आज श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला.......


- श्रीरामपूर - 
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड आल्याच्या निषेधार्थ आज श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला....... याप्रसंगी अखंड मराठा समाज तसेच विद्रोही संस्कृतीक चळवळ श्रीरामपूर व परिवर्तनवादी व समविचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Dr. सलीम शेख 



=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



आजचा बहुधा विधानपरिषदेतलं फार्स पाहुन राजसाहेब असेच खळखळून हसले असतील.


- मुबंई - प्रतिनिधी -/ वार्ता -
 आजचा बहुधा विधानपरिषदेतलं फार्स पाहुन राजसाहेब असेच खळखळून हसले असतील. राजकारणात फक्त मतदारांच्या भावनिकतेला महत्व आहे, राजकारण्यांच्या नाही.

दुर्देवाने गेल्या दशकापासुन महाराष्ट्राला लाभलेले सर्वच मुख्यमंत्री आजच्या महाराष्ट्राच्या दशेला कारणीभुत आहेत. सध्याच्या तर विचारुच नये! म्हणे ! त्रिभाषा सुत्र आणणारच !! उगाच नाही यांना नावं ठेवलीत लोकांनी अनाजीपंत म्हणुन. 

इतकं सर्व होऊनही आजच्या राजकारणाची पोकळी राज ठाकरेंच्या उपस्थितीनेच भरते अन्यथा महाराष्ट्राचं राजकारण अपुर्ण आहे.

सध्या रेल्वेमध्ये भैय्ये युट्युबवर "राजठाकरेविरोधी" चॅनेलची हिंदी भाषेतली बाष्कळ चर्चा उघडपणे मोठ्या आवाजात ऐकताना अनेकांना दिसली असतील. हा त्यांचा मुजोरपणा लवकरात लवकर उतरवायला हवा. यांना पुन्हा भिती बसायला हवी. भाजप सोबत असला तरी महाराष्ट्र काय तुनच्या भैय्याबापाची जहागिरी नाही. यासाठी राज ठाकरेंच्या आदेशाची वाट पाहता कामा नयेच.

जय महाराष्ट्र !!! 
यज्ञेश पास्टे वॉल वरुन 💐🙏✅...

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




निर्पराधांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असलेली शहरातील जड वाहतूककोणाच्या आशिर्वादामुळे


अपघातात निष्पापांचे बळी घेणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांचा समाजवादी पार्टी तर्फे जाहीर निषेध; मयतांच्या कुटुंबियांना शासनाने २५ लाख रुपयांची नुकसान भरपाईची द्यावी - समाजवादी ची मागणी 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
अहिल्यानगर (अहमदनगर) शहरातील वाहतूक समस्या आज पर्यंत सुटलीच नाही, पूर्वी उड्डाणपूल व बाह्य वळण रस्ता नसल्यामुळे शहरात दररोजच अपघात होत आहेत. त्यात कित्येक निर्पराधांचे बळी गेले, परंतु आता शहरात उडाणपूल तसेच बाह्य वळण रस्ता असूनही बिनदिक्कतपणे शहरातून जड वाहतूक सुरु आहे तथा अपघात घडून निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. मागील आठ दिवसांपूर्वीच तारकपूर याठिकाणी अपघातात एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला. परंतु संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांनी याची कोणतीच दखल घेतली नाही तसेच आज दिल्लीगेट येथे पुन्हा प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे अपघातात एका निष्पाप तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. यास बेजबाबदार वाहतूक प्रशासन आणी संबंधित महापालिकेचे अधिकारीच जबाबदार असून त्या सर्वांचे समाजवादी पार्टी तर्फे धिक्कार आणी तीव्र निषेध करीत आहोत. व अपघातात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना रुपये २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी तसेच अपघातात आणखी कोण्या निरपराधाच्या बळीची वाट ना पाहता नगर शहरातून होत असलेली जड वाहतूकीला त्वरित बंदी घालावी. अन्यथा नगरकरांच्या सुरक्षतेसाठी समाजवादी पार्टी मोठे जन आंदोलन उभारेल याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी असे अशयाचे निवेदन समाजवादी पार्टी चे नगर शहरजिल्हा अध्यक्ष आबिद हुसैन यांनी जिल्हाधिकारी अ.नगर यांना दिले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, July 16, 2025

शहिद ब्रिगेडियर उस्मान जयंती निमित्त मख़दुम सोसायटी तर्फे मोफत वहया वाटप


पाकिस्तानी सैन्यात सामील होण्यास ब्रिगेडियर उस्मान यांनी नकार दिला होता - डॉ.शमा फारुकी 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता-
ब्रिगेडियर मुहम्मद उस्मान हे भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेले भारतीय लष्कराचे अधिकारी होते. भारताच्या फाळणीच्या वेळी त्यांनी इतर अनेक मुस्लिम अधिकाऱ्यांसह पाकिस्तानी सैन्यात सामील होण्यास नकार दिला आणि भारतीय सैन्यात सेवा करत राहिले.
३ जुलै १९४८ रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याशी लढताना ते शहीद झाले. त्यानंतर त्यांना शत्रूचा सामना करताना दाखवलेल्या शौर्यासाठी भारताचे दुसरे सर्वोच्च लष्करी पदक "महावीर चक्र" ने सन्मानित करण्यात आले. असे प्रतिपादन मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ.शमा फारुकी यांनी केले.
      शहिद ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांच्या जयंतीनिमित्त मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी तर्फे आलमगीर ता.नगर) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत वह्या वाटप करण्यात आले.यावेळी मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या सचिव डॉ.कमर सुरुर, उपाध्यक्ष डॉ.शमा फारुकी, राजुभाई शेख, अकीला बाजी, मुख्तार शेख, मुख्याध्यापिका शेख जाकेरा,शेख नसरीन बानो, शेख शगूफता, सय्यद शाजिया, सय्यद रफअत,शेख शिरीन आदी उपस्थित होते.
      यावेळी विद्यार्थ्यांनी विविध बालगीते सादर केली. विद्यार्थ्यांना वह्यांसाठी वसंत पारधे,श्रीकांत सोनटक्के, डॉ.दमन काशीद,हेमंत नरसाळे, चारुता शिवकुमार, विका कांबळे,संजय भिंगारदिवे, अभय कांकरिया, राजुभाई शेख, डॉ.परवेज अशरफी,एड. गुलशन धाराणी आदिंनी सहकार्य केले.
मनोगत व्यक्त करताना डॉ. कमर सुरुर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनातच देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांबद्दल आपण काही न काही कार्यक्रमाच्या निमित्ताने माहिती दिली पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या पिढीला स्वतंत्र सैनिकांबद्दल माहिती होऊन त्यांच्यासाठी आदर निर्माण होईल असे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले. तर आभार राजुभाई शेख यांनी मानले.


=================================-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान ,अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग* 💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर -:9561174111
-----------------------------------------------
=================================

कॅन्सरविषयी जागरूकता आणि मानसिक बळ अत्यावश्यक - लेखिका : ऐश्वर्या भोसले


 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागात ‘लेखक आपल्या भेटीला’ कार्यक्रमात प्रेरणादायी संदेश

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 “कॅन्सर हा फक्त शारीरिक नव्हे, तर मानसिक लढाही असतो. त्यामुळे त्याविषयी सर्वांनी सावध राहून वेळेपूर्वी तपासणी करणे आवश्यक आहे. कॅन्सरच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये तो कळतच नाही, फुफ्फुसाचा कॅन्सर असेल तर श्वासाचे त्रास सुरू होतात, तोंडाच्या कॅन्सरमध्ये मानसिक नैराश्य अधिक ठरते. म्हणून कोणत्याही आजाराची लक्षणे दिसली की तात्काळ तपासणी करावी. स्वीकार आणि मनोबळ यामुळेच मी आज या टप्प्यावर आहे,”असे प्रतिपादन लेखिका ऐश्वर्या तानाजी भोसले यांनी सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागात झालेल्या ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात केले. जगणं नव्याने जगताना... कॅन्सर योद्ध्याचा प्रेरणादायी प्रवास’ या पुस्तकाच्या लेखिका असलेल्या भोसले यांनी स्वतःच्या अनुभवातून बोलत विद्यार्थ्यांना प्रबोधनपर आणि अंतर्मुख करणारे विचार दिले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे होते. यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ. सुभाष वाघमारे, डॉ. रामराजे मानेदेशमुख, डॉ. आबासाहेब उमाप, डॉ. संजयकुमार सरगडे, प्रा. प्रियांका कुंभार, प्रा. श्रीकांत भोकरे आदी प्राध्यापक उपस्थित होते.

          विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मानसिक तणाव ही आजच्या काळातील मोठी समस्या आहे. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी संवाद, संगीत, ध्यान यांचा उपयोग करा. स्वभाव एक दिवसात घडत नाही; घर, समाज आणि परिस्थिती यांचा त्यावर प्रभाव असतो. आपण आपल्याच स्वभावाचे विश्लेषण करायला हवे. कॅन्सरच्या काळात मी स्वतःला समजून घेतले. शरीर थकते पण मनाने आपण सक्षम राहिलो पाहिजे.”

        स्वतःला कॅन्सर कसा झाला आणि पुस्तक लेखनाचा प्रवास सांगताना त्यांनी सांगितले, “२०२० मध्ये मला सतत ताप येऊ लागला. कोरोना काळ होता. टेस्ट निगेटिव्ह आल्यावर पुढील तपासणीत ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे समजले. मी सर्व उपचार स्वतः समजून घेतले, करून घेतले. त्या अनुभवातून ‘कॅन्सर’ म्हणजे मरण नव्हे, ही जाणीव झाली. इंटरनेटवर प्रसिद्ध लोकांच्या कथा होत्या, पण सामान्य लोकांचे अनुभव कुठेच नव्हते. म्हणून मी नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, वर्धा येथे फिरून कॅन्सरग्रस्त सामान्य लोकांना भेटले. त्यांच्या अनुभवाचे शब्दांकन करून हे पुस्तक लिहिले. कॅन्सर म्हणजे फक्त आजार नव्हे, तो एक फोबिया आहे. आजही अनेक लोक तो लपवून ठेवतात. पण त्याला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टी अत्यंत आवश्यक आहे.आज पुस्तकाच्या माध्यमातून अनेक भाषांमध्ये हे अनुभव पोचत आहेत. डॉक्टर आणि रुग्ण यांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे असेही त्या म्हणाल्या. “

प्रास्ताविक प्रा. श्रीकांत भोकरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रियांका कुंभार यांनी केले तर आभार प्रा. डॉ. संजयकुमार सरगडे यांनी मानले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================