राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, August 20, 2025

शिर्डीच्या शाबेरा सय्यद यांचा भारत समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव


धर्मवीर छञपती संभाजीराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र आयोजित सन्मान महाराष्ट्राच्या तेजस्वी कर्तुत्वाचा..साईनगरीत सोहळा संपन्न

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
भारत मातेच्या कणखर माती जन्मलेल्या कर्तुत्ववान व्यक्तींचा व समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान सोहळा शिर्डी येथे मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित श्री साईबाबांजीच्या पुण्यनगरीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे सुप्रसिद्ध सिने अभिनेते विजय पटवर्धन सुप्रसिद्ध उद्योजिका मोनिका फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला या कार्यक्रमात शिर्डीच्या ज्येष्ठ नागरिक उद्योजिका व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या श्रीमती साबेरा करीम सय्यद यांना भारत समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले 
सावेरा करीम सय्यद ह्या महिलांना नेहमीच सांगतात की महिलांचे आयुष्य हे फक्त चूल व मूल ऐत पर्यंत मर्यादित न राहता स्त्रीच्या जातीने शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक स्वावलंबनाचे धडे घेतले पाहिजे आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे त्या स्वतः प्रथम एक उत्तम व्यावसायिक असून मुस्लिम समाजातील असूनही त्यांनी आपल्या प्रगल्भ विचारसरणीने प्रथम आपल्या मुलीस एमएमएस एमएसडब्ल्यू एमबीए पीएचडी एलएलबी एल एल एम इथपर्यंत सुशिक्षित करून तिला स्वतःच्या पायावर आर्थिक सक्षम बनवून त्यानंतर समाजातील सर्वसामान्य महिलांना स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करून अनेक रोजगार मिळवून दिले त्यांना झाशीची राणी महिला सामाजिक प्रतिष्ठान सारख्या संस्थेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सामाजिक कौटुंबिक क्षेत्राचे धडे नेहमीच देत असतात व वेळोवेळी सर्वसामान्य महिलांच्या मदतीसाठी तत्पर असतात त्या नेहमी सांगतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे त्यामुळे स्त्रियांनी शिकले पाहिजे मुस्लिम समाजातील असूनही त्यांचे मराठी भाषेवर विशेष प्रेम व प्रभुत्व आहे त्यामुळे त्यांना सर्व समाजातील महिलांना काम करण्याची उभारी देण्यास मदत मिळू शकले या त्यांच्या कार्याची पावती म्हणूनच की काय त्यांना भारत समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे..त्यांना मिळालेल्या सर्व समाजातील तळागाळातील लोकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
 पत्रकार राजेंद्र बनकर - शिर्डी
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेसb💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Tuesday, August 19, 2025

चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीयकार्याध्यक्षपदी शिवाजी साळवे


वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने समाजाला पुढे नेणे ही काळाची गरज - माजीमंत्री बबनराव घोलप 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
समाजाला जोडून पुढे घेऊन जाणे हीच खरी समाजसेवा आहे. वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने समाजाला पुढे नेणे ही काळाची गरज आहे. समाजाचा विकास हा सर्वांचा एकमेव उद्देश असला पाहिजे आणि त्यासाठी एकच दिशा ठरवून काम करणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले.
नगर शहरातील हॉटेल पॅराडाईज येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात घोलप बोलत होते. हॉटेल पॅराडाईज येथे झालेल्या मेळाव्याप्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्‍वर कांबळे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य अध्यक्ष माधवराव गायकवाड, राज्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे, राष्ट्रीय सचिव दत्तात्रेय गोतीसे, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र बुंदिले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे, राज्य सचिव अनिल कानडे, महिला आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य शोभाताई कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, माणिकराव नवसुपे, युवक राज्य कार्यकारणी सदस्य कैलासराव गांगर्डे, चंद्रकांत नेटके, विठ्ठलराव जयकर, बाबासाहेब लोहकरे, रोहिदास उदमले, रामकिसन साळवे मेजर, प्रा. संजय कानडे, पोपट बोरुडे आदींसह महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे घोलप म्हणाले की, वैचारिक वादाने समाजाचे नुकसान न करता विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे. महासंघाच्या वतीने राज्य सरकारकडे संत रविदास विश्‍वविद्यापीठ स्थापन करावे, कोरोनामुळे डबघाईला आलेल्या चर्मकार व्यावसायिकांची कर्जमाफी करावी, बार्टी प्रमाणे संत रविदास रिसर्च सेंटर स्थापन व्हावे, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर चर्मकार विकास महामंडळाला नियम लागू करावेत आणि संत रविदास महाराज जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. तसेच मंत्रीपदाच्या काळात समाजासाठी स्वतंत्र बजेटची तरतूद केली असून, हा पॅटर्न देशभर राबविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माजी आमदार भाऊसाहेब कांबळे म्हणाले की, सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले शिवाजी साळवे यांच्या माध्यमातून एक जबाबदार कार्यकर्ता महासंघाशी जोडला गेला आहे. त्यांनी ग्रामीण भागात समाज बांधवांना एकत्र आणत अनेक प्रश्‍न सोडविले आहेत. शेवटच्या घटकांना आधार देऊन पीच परवाने मिळवून दिले, कर्ज प्रकरणे मंजूर होण्यासाठी पाठपुरावा केला. हे सर्व काम गाजावाजा न करता प्रामाणिकपणे केले आहे, त्यामुळे समाजाच्या चळवळीला नवी गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
या मेळाव्यात चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय चर्मकार महासंघात प्रवेश केला. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी साळवे यांची राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. साळवे म्हणाले की, आजपर्यंत मी समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी संघर्ष करत आलो आहे. शेवटच्या घटकाला न्याय मिळावा, रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, शिक्षणाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न राहिला आहे. महासंघात सामील होताना माझ्या खांद्यावर अधिक मोठी जबाबदारी आली आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी निष्ठेने काम केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्याच्या प्रारंभी संत रविदास महाराजांना अभिवादन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक राजेंद्र बुंदिले यांनी करुन संघटनेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. मेळाव्याचे आयोजन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे व माणिकराव नवसुपे यांनी केले होते. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस  ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल तर्फे सायकली, शिवणयंत्रे, वेंडिंग मशिन्स व इंसीनरेटरचे वाटप


शौकतभाई शेख - जेष्ठ संपादक -/ श्रीरामपूर -
 रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने अहिल्यानगर येथील बडीसाजन हॉलमध्ये समाजोपयोगी सेवा प्रकल्प राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत ११ सायकली, ११ शिवणयंत्रे, ११ वेंडिंग मशिन्स व ११ इंसीनरेटर यांचे वितरण करण्यात आले. 
या प्रकल्पामुळे महिला सक्षमीकरणास चालना मिळाली.
क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सुनील कटारिया यांनी प्रास्ताविक केले.
सहायक प्रांतपाल मधुरा झावरे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
जिल्हा फर्स्ट लेडी रोटेरियन संगीता लातूरे यांनी महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे विशेष अभिनंदन केले.  
मुख्य अतिथी जिल्हा प्रांतपाल रोटेरियन सुधीर लातूरे यांनी क्लबच्या उपक्रमांचे कौतुक करून सर्व रोटरी क्लब्स व दात्यांनी रोटरी फाउंडेशनसाठी उदारतेने दान द्यावे असे आवाहन केले.
या प्रकल्पासाठी सी.बी. छाजेड चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, रिसन्स इंडस्ट्रीज एमआयडीसी अहिल्यानगर, रमेश फिरोदिया चॅरिटेबल ट्रस्ट अहिल्यानगर, संगिता चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, आर. एन.धाडीवाल कल्याणी नगर पुणे या संस्थांचे व व्यक्तींचे मोलाचे योगदान लाभले.
हा उपक्रम क्लबच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण टप्पा ठरला.
तसेच या कार्यक्रमात अवयव दान जनजागृती अंतर्गत सिव्हिल हॉस्पिटलचे जिल्हा समन्वयक सतीश अहिरे यांनी सर्वांना अवयव दान संबंधित शपथ दिली.
या सोहळ्यास जिल्हा प्रांतपाल रो. सुधीर लातुरे तसेच जिल्हा फर्स्ट लेडी सौ. संगीता लातुरे, सहायक प्रांतपाल रो. मधुरा झावरे, क्लबचे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. शिरीष रायते, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नाॅमिनी रो. क्षितिज झावरे, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. प्रमोद पारीख, सहाय्यक प्रांतपाल रो.ईश्वर बोरा सर्व जिल्हा संचालक, विविध क्लबचे अध्यक्ष, सचिव, रो. डॉ. श्रीकृष्ण जोशी , रो.नरेंद्रभाई चोरडिया, रो.मनीष बोरा, रो.प्रसन्न खाजगीवाले, रो. अमर गुरप (सचिव), रो. सुजाता कटारिया, रो. श्रेया खाजगीवाले, रो. हरीश नय्यर, रो. हितेश गुप्ता, रो. निलेश शाह, रो. चेतन अमरापूरकर, रो.राजेश परदेशी,रो. सुनील मुथा,रो. संजय मुनोत,रो. वसंत मुनोत रो. विनोद भंडारी, रो.डॉ दिलीप बागल, रो.डॉ उज्वला शिरसाठ,क्लबचे अॅनस अ‍ॅनेट्स व इतर मान्यवर उपस्थित होते.
तसेच विविध शाळा आणि संस्थांचे अनेक पदाधिकारी व लाभार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन क्लबचे सचिव रोटेरियन अमर गुरप यांनी मानले.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचा हा उपक्रम "सेवा हेच सर्वोच्च" या ब्रीदाचा उत्तम प्रत्यय देणारा ठरला. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

एसएमपी इंटरियर डिझाईन असोसिएट ऑफिसचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
नगर शहरातील एसएमपी इंटरियर डिझाईन असोसिएट ऑफिसचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडले. या व्यवसायात तब्बल आठ वर्षांपासून कार्यरत असलेले संचालक सईद पठाण यांनी आतापर्यंत अनेक बंगले, फ्लॅट्स, हॉटेल्स, मंगल कार्यालये तसेच विविध वास्तूंचे आकर्षक डिझाईन करून यश मिळवले आहे.
सदरील उद्घाटन सोहळा सईद पठाण यांच्या मातोश्रींच्या शुभहस्ते रिबीन कापून संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सईद पठाण यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करुन भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोतवाली पोलिस स्टेशनचे निरीक्षक श्री.दराडे, उपजिल्हाधिकारी सय्यद वसीम, हाजी करीमशेठ हुंडेकरी, एन.आर. लाॅनचे हाजी नजीर अहमद, न्यू मॉडर्न कन्सट्रक्शनचे इकबाल सय्यद, केअर एन क्युअर हॉस्पिटलचे डॉ. सईद शेख , कॉन्ट्रॅक्टर चांद शेख, अब्दुल सलाम भाई,सय्यद परवेज, मदरसा आलमगीरचे हाफीज हाजी रियाज, कॉन्ट्रॅक्टर उस्मान इनामदार, कॉन्ट्रॅक्टर रफिक भाई, फिरोज जहागीरदार, कवीजंग लॉनचे वसीम भाई, हाजी मिर्झा,अर्शद भाई, मतीन भाई तसेच या सोहळ्यास बांधकाम क्षेत्रातील इंजिनीयर, आर्किटेक्ट, कांन्ट्रॅक्टर, डॉक्टर, नगरसेवक, पत्रकार व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी केअर एन क्युअर हॉस्पिटलचे डॉ. सईद शेख म्हणाले की, आजच्या युगात इंटेरियर डिझाईन ही केवळ सजावट नसून ती जीवनशैली बदलणारी संकल्पना ठरते. सईद पठाण यांनी या क्षेत्रात केलेले काम प्रेरणादायी असून पुढेही समाजाला उत्कृष्ट सेवा मिळेल याची खात्री आहे असे नमुद केले. उपस्थितांचे मतीन भाई व अर्शद भाई यांनी आभार मानले. आणि समाजास उत्तम व दर्जेदार डिझाईन सेवा पुरविण्याचा संकल्प व्यक्त केला.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीदखान - अ.नगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, August 18, 2025

माजी सैनिक संघर्ष समितीचा वर्धापनदिन उत्साहात साजरा


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील आजी माजी सैनिक संघर्ष समितीचा प्रथम वर्धापन दिन बेलापूर रोड येथील काळे लॉन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी समितीच्या पुढील प्रगती साठी सर्वधर्म समभाव,एकदुसऱ्याच्या सुख दुःखात सहभागी होणे बाबतीत, सद्ध्या अनेक पतसंस्था डबघाईस निघून अनेक सैनिकांची आर्थिक फसवणूक होत आहे अशा अनेक बातम्या पेपरला छापून येत आहेत त्यामुळे ठेव ठेवतांना नॅशनल बँकेत ठेवावी अशा प्रकारे अनेक विषयावर चर्चा करण्यात आली याप्रसंगी तालुक्यातील माजी सैनिकांना सातत्याने सेतूच्या माध्यमातून मोफत सेवा देणारे शिवतीर्थ सेतूचे सर्वेसर्वा प्रविण पैठणकर यांचा व संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मेजर सुधाकर हरदास यांचा प्रकट दिनानिमित्त समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. 
समितीच्या वर्धापनदिनानिमित्त मेजर सुधाकर हरदास यांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते,याप्रसंगी मेजर कृष्णा सरदार, बाळासाहेब बनकर , बाळासाहेब भागडे, विलास खर्डे, बाळासाहेब लोखंडे अशोक कायगुडे, चांगदेव धाकतोडे ,सुजित शेलार, राम पुजारी, राजेंद्र आढाव, पंढरीनाथ पुजारी भगीरथ पवार, अशोक साबळे, सुनील गवळी संजय बनकर सुनील भालेराव पार्वताबाई देसाई , वसंत देसाई,रामधन बिलवाल, शरद तांबे ,माधव ढवळे , कैलास गोरे ,गणेश सोडणार, सचिन पवार , रमेश माळी, ज्ञानदेव पुजारी , काळे कॅशियर स्टेट बँक इत्यादी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

माजी सैनिक संघर्ष समितीच्यावतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा


श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
आजी माजी सैनिक संघर्ष समितीच्या वतीने देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने शहरातील शहीद स्मारकाजवळ साजरा करण्यात आला, याप्रसंगी माजी सैनिक विधवा पत्नी श्रीमती पार्वताबाई देसाई यांच्या हस्ते शहीद स्मारकास रीथ (पुष्पचक्र) वाहून स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा सर्व स्वातंत्र्यसैनिकांना व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या सैनिकांनी स्वातंत्र अबाधित राखण्यासाठी भारत देशाच्या सीमा रेषेच रक्षण करत असतांना प्राण अर्पण केले त्यांना सलामी दिली व संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले, 
याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मेजर सुधाकर हरदास व मेजर बाळासाहेब बनकर यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगतात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आठवण करून दिली, तिरंग्याचा सन्मान म्हणजे आपल्या देशाच्या सन्मानाचे रक्षण करणे होय, तिरंगा म्हणजे केवळ कापडाचा तुकडा नाही तर आपल्या इतिहासाची संस्कृतीची आणि ऐक्याची ओळख आहे हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही यासाठी स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान,त्याग आणि संघर्ष यांमुळेच आपण हा दिवस साजरा करत आहोत त्यामुळे तरुणाईने देशाच्या प्रगतीसाठी सतत योगदान दिले पाहिजे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर कृष्णा सरदार यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष मेजर बाळासाहेब भागडे यांनी केले. कार्यक्रमास मेजर सुधाकर हरदास, अशोक कायगुडे, चांगदेव धाकतोडे, सुनील गवळी,बाळासाहेब बनकर, राजेंद्र आढाव, विलास खर्डे, बाळासाहेब लोखंडे, अशोक साबळे, सुनील गवळी, संजय बनकर,भगिरथ पवार , पंढरीनाथ पुजारी,राम पुजारी, काळे स्टेट बँकेचे कॅशियर शरद,तांबे सुजित शेलार, सुनील भालेराव, माधव ढवळे, कैलास गोरे, गणेश सोडणार, सचिन पवार, रमेश माळी, ज्ञानदेव पुजारी, वसंत देसाई ,रामधन बिलवाल, इत्यादी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेतले तर उद्याचा भारत नक्कीच उज्ज्वल होईल - शरफुद्दीन सर


मखदूम सोसायटीतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता - 
स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान देऊन मिळवून दिला आहे.
या दिवशी आपण फक्त ध्वजवंदन करून थांबायचे नाही, तर देशासाठी कर्तव्यभावनेने जगण्याची शपथ घ्यायची आहे. शिक्षण हेच खरे शस्त्र आहे. आज मखदूम सोसायटीच्या वतीने मुलांना वह्या वाटप करून ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे.
आजच्या पिढीने प्रामाणिकपणे शिक्षण घेतले, मेहनत केली, तर उद्याचा भारत नक्कीच उज्ज्वल होईल. आपण सर्वजण मिळून समाजात ऐक्य, प्रेम, बंधुता आणि प्रगतीचे आदर्श निर्माण करूया, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सल्लागार शरफुद्दीन शेख यांनी केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त मखदूम सोसायटीच्या वतीने केडगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
या वेळी अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सल्लागार शरफुद्दीन सर, सचिव आबीद दूल्हे खान, शिक्षिका आसमा बाजी, आयशा सुलताना आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमासाठी प्रसिद्ध कवयित्री डाॅ. कमर सुरुर, शरफुद्दीन शेख, शफी हज टूर्स अँड ट्रॅव्हल्स, राजकुमार गुरुनानी, डाॅ.दमन काशीद, युनुसभाई तांबटकर, वसंत पारधे, तन्नु महाराज, सुनील भंडारी, दिनेश मंजरतकर आदींचे सहकार्य लाभले.
या वेळी आबीद खान यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे संस्कार जोपासण्यासाठी मार्गदर्शन केले.
सुत्रसंचालन आसमा बाजी यांनी केले. आभार आयेशा सुलताना यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================