राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, August 28, 2025

मोर्शी हद्दीत जुगार अड्ड्यावर धाडधाडीत २० लाखांचा मुद्देमाल जप्त


- मोर्शी - प्रतिनिधी -/ वार्ता -
पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी
मोर्शी (जि.अमरावती) हद्दीतील शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. 
या धाडीत पोलिसांनी १६ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून अंदाजे २० लाख ५३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

२४ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, प्रशांत वाघमारे यांच्या शेतातील - घरात जुगार सुरू आहे, या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकून प्रशांत सुभाष वाघमारे (४०), प्रफुल्ल प्रकाश दारोकार (३२), जितेंद्र बाळासाहेब सदाफळे (४२), अमोल रामदास वाघमारे (४०), शहीद खाँ छोटे खाँ (५५), जितेंद्र प्रकाश डेहनकर (३६) अंकुश राजेंद्र दारोकार (३३), शेख सलीम शेख इस्माईल (४२), मंगेश प्रल्हाद सदाफळे (४०), आशीष जानराव कोरडे (४७), सौरभ प्रल्हाद गहुकर (३४), महादेव सिताराम पानसे (४५) सर्व रा.हिवरखेड, विलास सुभाष मालवे (४२) रा. टेंभुरखेडा वरूड, धनराज केदारनाथ टिकस (४८) रा. लक्ष्मीनगर वरूड, धर्मेंद्र एकनाथ गोंडाणे (४९) रा. रिंगरोड वरूड, किशोर मोतीराम भगत (५२) रा. रिंगरोड वरूड यांना ताब्यात घेण्यात आले, तर ऋषिकेश वैराळे .रा. हिवरखेड हा फरार आहे. यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी २ लाख ४२ हजार ६५० रुपये, जुगाराचे साहित्य किंमत ७०० रु, १७ मोबाईल १ लाख ७० हजार रुपये व दोन दुचाकी किंमत १ लाख ४० हजार रूपये तसेच हुन्डाई कार किंमत अंदाजे १५ लाख रूपये असा एकूण २० लाख ५३ हजार ३५० रूपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखा प्रमुख पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोउपनि सागर हटवार, पोलिस अंमलदार बळवंत दाभणे, रवींद्र बावणे, पंकज फाटे, चालंक पोकॉ प्रशिक वानखडे यांच्या पथकाने पार पाडली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार प्रविण सावरकर ✍️✅🇮🇳...
 (वरुड जि.अमरावती)
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, August 27, 2025

न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्याची तायक्वांदो स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड


- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
रयत शिक्षण संस्थेच्या राहाता तालुक्यातील कोल्हार येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ (कला) महाविद्यालातील तीन विद्यार्थ्यांची तायक्वांदो या स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड झाली. प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर या ठिकाणी नुकत्याच तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला यामध्ये कोल्हार येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील १४ वर्ष वयोगट प्रेम संदीप कोरडे द्वितीय, १७ वर्षे वयोगट शौर्य संदीप कोरडे - प्रथम, आयुष्य संदीप मेनगर - प्रथम, १९ वर्षे वयोगट सोहम सतीश कानडे - प्रथम, या तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन करून तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची निवड जिल्हास्तरावर होणाऱ्या तायक्वांदो स्पर्धेसाठी करण्यात आली या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक दीपक मगर, शुभम पवार, विलास गभाले यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य अंकुशराज जामदार, उपप्राचार्य सिताराम बोरुडे, पर्यवेक्षिका श्रीमती संजीवनी आंधळे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.अरुण कडू पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष मा. अॕड. सुरेन्द्र खर्डे पाटील,जनरल बॉडी सदस्य मा.रावसाहेब म्हस्के पाटील, सदस्य सर्वश्री अजीत मोरे, श्री बी.के.खर्डे, पा.श्री संतोष थेटे पा., योगेश कोळपकर, पांडूरंग देवकर पाटील, संजय शिंगवी, विभागीय अधिकारी बोडखे साहेब. सहाय्यक विभागीय अधिकारी नाईकवाडी साहेब, तोरणे साहेब तसेच सर्व शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
पत्रकार राजमोहम्मद शेख - कोल्हार 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, August 25, 2025

पत्रकार बाळासाहेब आगे यांना धमकी देणाऱ्याचा शोध सुरु - पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे


पत्रकार बाळासाहेब आगे यांना धमकाविणाऱ्यावर कठोर कारवाईचे नगर शहर पत्रकारांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार व दै.जयबाबाचे संपादक बाळासाहेब शंकरराव आगे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी आणि त्यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकारी व नगर शहरातील पत्रकारांनी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देऊन केली. दरम्यान या आरोपीबाबत हा गुन्हेगार वृत्तीचाच असून त्याला पकडण्यासाठी पोलिस शोध घेत आहेत या आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.  


श्रीरामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार व दै. जयबाबाचे संपादक बाळासाहेब शंकरराव आगे यांना विरोधात बातमी प्रकाशित केल्याच्या कारणावरुन एकाने सोशल मिडीयावर जीवे मारण्याची धमकी दिली. त्या पार्श्वभूमीवर नगर येथे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, संजयकुमार पाठक, अन्सार सय्य्द, गिरीष रासकर, अमित आवारी, प्रल्हाद एडके, प्रसाद शिंदे, आदील शेख, रविंद्र कदम, गोरख शिंदे, नावेद शेख यांच्यासह पत्रकारांनी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देऊन आरोपीवर कारवाईची मागणी केली. 
निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नशेच्या इंजेक्शनसह महिला अटक झाल्याची बातमी व श्रीरामपुर येथील पोलिस उपाधिक्षक यांचा माहिती देेणारा व्हिडिओ प्रकाशीत केला. त्यात गणेश मुंडे याचे नाव आले. त्यानंतर सबंधित व्यक्तीने श्रीरामपुर (जि.अहिल्यानगर) येथून प्रकाशीत होणाऱ्या दैनिक जयबाबा या दैनिकात चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आगे यांना इन्टाग्रामवरुन धमकी देत हे वृत्त डिलीट कर अन्यथा तुला डीलीट करुन टाकील असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.

 सबंधित व्यक्तीपासून आगे यांना तसेच पत्रकारांना धोका आहे. सामाजिक स्थितीवर लेखन करणाऱ्या तसेच पोलिसांनी दिलेली माहीती प्रकाशीत केली म्हणून जर मारुन टाकण्याची धमकी येत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे पोलिसांनी सबंधित व्यक्तीला तातडीने अटक करुन त्याच्यावर कठोर कारवाई करावी व बाळासाहेब आगे यांना संरक्षण द्यावे. आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. गुन्हे अन्वेषन विभागालाही त्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्याला लवकर पकडले जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आश्वासित केले.

=================================
-----------------------------------------------
  *वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
 पत्रकार आदिल रियाज शेख अ.नगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Saturday, August 23, 2025

मुळा धरणातून नदीपात्रात दिड हजार क्यूसेस विसर्ग


- जावेद शेख - राहुरी -/ वार्ता -
अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहीनी समजले जाणारे २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणात आज २५ हजार दशलक्ष घनफूट (९६ टक्के) पाणी जमा झाले असल्याने धरणाच्या सांडव्यातून दिड हजार क्युसेक्सने विसर्ग करण्यात येत आहे. नदीपात्रात होत असलेल्या विसर्गाने नदीकाठच्या जनतेला दक्षतेचा इशारा दिला आहे. 

      आज दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजता मुळा धरणातील एकूण पाणीसाठा २५ हजार  दलघफु इतका होत आहे.  मुळा धरणाच्या जलाशय परिचालन सूची (ROS) नुसार पाणीसाठा २४ हजार ८८५  दलघफु इतका नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आज शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मुळा धरणातून मुळा नदीपात्रामध्ये १ हजार ५०० क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यांत येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुळा धरणातून नदीपात्रामध्ये आवश्यकता भासल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  
    मुळा नदीकाठच्या गावांना या प्रकटनाद्वारे जाहीर आवाहन करण्यात येते की, नदीपात्रातील चल मालमत्ता, चीज वस्तू, वाहने, पशुधन, शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावीत. नदीपात्रात प्रवेश करु नये. कुठलीही जीवित वा वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. असे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*  
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111              
----------------------------------------------- 
=================================

Friday, August 22, 2025

अल करम हॉस्पिटलतर्फे मोफत सर्वरोग निदान शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
अहिल्यानगर शहरातील अल करम हॉस्पिटलच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मोफत सर्वरोग निदान उपचार व औषधासह शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील सर्वसामान्य रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला रुग्ण व नागरिकांकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी तौफिक तांबोली, शेरअली शेख, एजाज तांबोली तसेच नामवंत डॉक्टर्स डॉ.जहीर मुजावर, डॉ. जैनब पटेल, डॉ. नजमा जहीर, डॉ. अशपाक पटेल, शाहनवाज तांबोली आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आरोग्य सेवेला सामाजिक जबाबदारीची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.
शिबिरात विविध आजारांवर तपासण्या व सल्ला रुग्णांना देण्यात आला. विशेषतः हर्निया, अपेंडिक्स, कॅथलॅब तपासणी, एन्जिओप्लास्टी, किडनी स्टोन, डायबेटीस, हृदयविकार, प्रोस्टेट सर्जरी, रक्तदाब, सांधेदुखी, पाठदुखी तसेच व्यंधत्व निवारण यांसारख्या गंभीर आजारांची सविस्तर तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टर्सनी रुग्णांना आवश्यक ते मार्गदर्शन करत औषधेही मोफत उपलब्ध करून दिली.
तसेच सामान्य तपासण्यांमध्ये ब्लड प्रेशर, शुगर तपासणी, ईसीजी, एक्स-रे या सेवा पूर्णपणे विनामूल्य देण्यात आल्या. या सेवा सुविधांचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.
या उपक्रमाद्वारे अल करम हॉस्पिटलने रुग्णसेवा हाच सर्वोत्तम धर्म असल्याचा संदेश दिला. हॉस्पिटलचे डाॅ. जहीर मुजावर यांनी सांगितले की, “आजच्या काळात आरोग्याची समस्या ही सर्वांत गंभीर समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत समाजातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. येत्या काळातही अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल.”
शिबिरातील डॉक्टरांनी रुग्णांशी संवाद साधून योग्य आहार, व्यायाम, जीवनशैलीत बदल व आजारांपासून बचाव याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याबरोबरच जनजागृतीतही भर पडली.
या शिबिरामुळे अनेक रुग्णांना योग्य निदान व तत्काळ उपचार मिळाल्याने समाधान व्यक्त झाले. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागातून आलेल्या रुग्णांनी हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानले.
समारोपप्रसंगी डॉ.अशपाक पटेल म्हणाले की,अशा सामाजिक वैद्यकीय शिबिरांमुळे गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळतो असे ते म्हणाले. यासोबतच वर्षभर असे विविध प्रकारचे आरोग्य शिबिरे आयोजित करत राहण्याचे मानसही यावेळी त्यांनी व्यक्त केले. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
 *वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, August 21, 2025

सदैव निर्पेक्ष तथा आदर्शवत कामगीरीत्यावर परोपकारी असे कर्तृत्वही छान !म्हणूनच सुनील साळवे यांचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मान !!


मुख्याध्यापक सुनील साळवे (सर) आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
माध्यमिक शिक्षण विभाग व माध्यमिक व उच्च माध्यमिक जिल्हा मुख्याध्यापक संघ यांचे वतीने उत्कृष्ठ प्रशासक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल दिला जाणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे येथील डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील प्रभाकर साळवे (सर) यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.

     अहिल्यानगर येथे अमर ज्योत मंगल कार्यालयात शिक्षण विभागाचे उपसंचालक गणपत मोरे यांच्या शुभहस्ते व जिल्हा माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीत सुनील साळवे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
        
       सुनील साळवे ३२ वर्षापासून रयत शिक्षण संस्थेच्या सेवेत आहेत. मालुंजा, कोल्हार, वडाळा महादेव, गणेशनगर, पुणतांबा येथे शिक्षक म्हणून त्यांनी उत्तमरीत्या सेवा बजावली आहे, तर श्रीरामपूर याठिकाणी उपशिक्षक व मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्षापासून ते कार्यरत आहे.
             शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, आरोग्य, कला, क्रीडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल श्री.सुनील साळवे यांचा मुंबई येथे राजभवनात तात्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते तर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचे हस्ते सन्मान झालेला आहे.
         रोटरी क्लब श्रीरामपूर, रांजणखोल ग्रामपंचायत, मानवी कल्याण पुरस्कार मुंबई, भारत सरकार युवा क्रीडा मंत्रालयाचा नेहरू युवापुरस्कार,इंडियन अचिवर्स अवॉर्ड यांसह विविध क्षेत्रातील संस्था, संघटनांनी श्री.साळवे यांचा सन्मान केलेला आहे.
          श्री.सुनील साळवे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्य करणाऱ्या इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव आहेत तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती,युवक बिरादरी भारत,आदी महत्त्वाच्या संस्थांवर जिल्हा पदाधिकारी म्हणून काम करत आहेत.
              रयत शिक्षण संस्थेमध्ये शैक्षणिक काम करताना त्यांना रयत च्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांचे मोलाचे पाठबळ व सहकार्य मिळाले. त्यांच्यामुळेच विद्यालयाची गुणात्मक वाढ भौतिक विकास सुरू आहे. शैक्षणिक कार्य करताना मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांचे मोलाचे योगदान व मार्गदर्शन मिळाले असल्याची प्रतिक्रिया सुनील साळवे यांनी यावेळी दिली.
          सुनील साळवे यांचे पुरस्काराचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, तालुका गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, श्रीरामपूर शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजीवन दिवे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, गुणवत्ता कक्ष प्रमुख काकासाहेब वाळुंजकर , सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडी, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सेक्रेटरी मिथुन डोंगरे, प्राचार्य प्रवीण बडदे, प्राचार्य संजय कांबळे, प्राचार्य मुकुंद पोंधे, मुख्याध्यापिका सोनाली पैठणे, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जाकीर सय्यद, सचिव सुनील म्हसे, पीडीएफचे तालुकाध्यक्ष रवींद्र औताडे, दत्तात्रय कांबळे, श्रीराम कुंभार, नितीन जाधव, डी.डी. काचोळे विद्यालयाचा सर्व स्टाफ व रेड क्रॉस संघटनेचे सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Wednesday, August 20, 2025

महाराष्ट्र ब्राम्हण सभेच्या महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुखपदी सौ. धनश्रीताई उत्पात


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र ब्राम्हण सभा ही खूप जुनी तथा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचाराने प्रेरित झालेली ही संस्था आहे,
देशभरात ह्या संस्थेचे काम चालते संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल व्यास तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मयुरेश अरगडे, कार्याध्यक्ष चैतन्य जोशी, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई घटवाई तसेच सर्व सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यां तसेच स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या विश्वस्त सौ. धनश्रीताई उत्पात यांची महाराष्ट्र ब्राम्हण सभेच्या 
महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली.
 सौ.धनश्रीताई उत्पात ह्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात संघटन बांधणी करून ह्या संस्थेचा विस्तार करतील व संस्थेच्या माध्यमातून ब्राम्हण समाजाच्या अडीअडचणी सोडवत समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहतील ही अपेक्षा ठेवत ही मोठी जबाबदारी संस्थेने त्याच्यावर सोपवली आहे‌
सौ धनश्रीताई उत्पात यांच्या या निवडीमुळे ब्राम्हण समाजामध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे कारण सौ. उत्पात यांच्या सारखे निर्भीड पदाधिकारी संस्थेने निवडला आहे की जो सर्वसामान्य ब्राम्हण समाजाच्या व्यथा, समस्या ह्या सरकार पर्यंत पोहचवून समाजाला योग्य दिशा दाखवत समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न सौ. धनश्रीताई ह्या करतील अशी अशा व्यक्त करत ब्राम्हण समाजाला पुढे नेत समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगारीच्या संधी उपलब्ध करून देऊन एक भक्कम नेतृत्व करत समाजाला पुढे नेण्याचं काम सौ.धनश्रीताई ह्या महाराष्ट्र ब्राम्हण समाजाच्या वतीने करतील अशी अपेक्षा आहे. त्यांच्या पुढील कार्यास स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक मुख्य महासचिव कमलेश शेवाळे त्याच बरोबर विश्वस्त उमेश काशीकर, संगीताताई बोराडे, प्रशांत निकम, सविता तावरे, संचालक रवींद्र करंगुटकर विशाल बोराडे, वैशाली कांबळे, संदिप जाधव, संदिप वाघमारे, श्रीकांत देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार कमलेश (देवा) शेवाळे 
चांदा ता.नेवासा जि. अहिल्यानगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================