राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, September 8, 2025

सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेतशिक्षक दिन उत्साहात साजरा


शिक्षक हे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, जबाबदारी आणि आत्मविश्वास निर्माण करतात - आबीद खान 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शिक्षक दिन हा दिवस फक्त औपचारिक नाही, तर आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
सावित्रीबाई फुले यांचे नाव या शाळेला लाभले आहे, आणि त्यांच्यासारख्या समाज सुधारक स्त्रीने शिक्षणाची मशाल पेटवली, त्यामुळं आज आपण इथं ज्ञानाच्या प्रकाशात आहोत.
शिक्षक म्हणजे केवळ धडे शिकवणारे नसतात, तर ते विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, जबाबदारी आणि आत्मविश्वास निर्माण करतात. आजच्या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या पाहून मनाला अपार आनंद झाला.
विद्यार्थ्यांनी केलेला शिक्षकांचा सन्मान ही खरी मोठी कमाई आहे. तुमचे प्रेम, आदर आणि विश्वास हाच शिक्षकांना नेहमी प्रेरणा देतो असे प्रतिपादन मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी केले.
मोहम्मदिया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित नगर शहरातील सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, हसीब शेख, मुख्याध्यापक सय्यद नौशाद, शिक्षक शेख फरजाना दिलावर, शेख अस्लम पटेल, शेख शाहिन, शेख हिना, पठाण फरहान उज़मा, शेख यास्मीन व शेख सुलताना आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थिनींनी शिक्षकांविषयी आपली भावना मनोगतातून व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून सर्व वक्तृत्व सादर करणाऱ्या विद्यार्थिनींना बक्षिसे प्रदान केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असलम पटेल यांनी केले. तर प्रास्ताविक मुख्याध्यापक नौशाद सय्यद यांनी केले. आभार शेख सुलताना यांनी मांनले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Sunday, September 7, 2025

सर्वच शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात यावा

सर्वच शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात यावा

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे
हेमकांत गायकवाड यांची निवेदनाद्वारे मागणी

- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
२८ सप्टेंबर हा दिवस सर्वच शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना (महाराष्ट्र राज्य) आणि ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेना जळगांव जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांनी 
नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम तसेच जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे ई - मेल निवेदनद्वारे केली आहे.

या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, बहुतांश शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येत नाही,करीता आपल्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या सर्वच शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी केली आहे.
कारण माहिती अधिकार हा कायदा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे, तसेच या कायद्याचे महत्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी तसेच शासकीय आस्थापना म्हणून आपली देखील ही जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २८ सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा असा शासन निर्णय क्रमांक - केमाअ २००८/पत्र क्र.३७८/०८/ सहा सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई दिनांक २० सप्टेंबर २००८ शासन निर्णय संदर्भानुसार आहे.
सदर निर्णयानुसार दर वर्षी शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे आदेश आहेत, या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी 
१) माहिती अधिकार विषय व्याख्यानमाला / चर्चासत्र, २) प्रश्नमंजुषा, निबंध, वकृत्व, इ. स्पर्धा, ३) माहिती अधिकार अधिनियंमावर आधारित प्रदर्शन, ४) स्थानिक नागरिक सामाजिक संस्था व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग,घ्यावा असे शासनाने सुचविलेले आहे. त्याची आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वच शासकीय कार्यालयात अंमलबजावणी व्हावी.
या वर्षी २८ सप्टेंबर २०२५ या 'दिवशी रविवार तसेच २७ सप्टेंबर शनिवार असल्यामुळे सुट्टी आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर २०२५ रोजी शक्य नसल्यास सदर माहिती अधिकार दिन हा २६ सप्टेंबर २०२५ किंवा २९ सप्टेंबर २०२५ या दिवशी साजरा करावा, तशा सूचना आपल्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयांना तातडीने कराव्यात ही आपणास विनंती तसेच माहिती अधिकार कायद्या बाबत शासकीय अधिकारी व कर्मचारी नागरिकांमध्ये जनजागृती करून आणण्यासाठी वरील उपक्रम राबविण्यात यावेत अशी मागणी विभागीय आयुक्त नाशिक व जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे हेमकांत गायकवाड यांनी केली आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Saturday, September 6, 2025

कुछ रिश्ते मानवता कें लिये रक्तदान करके बनाते, चलो रिश्ता बनाते हैं मानवता कें लिये " डॉ. सलीम शेख 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🌹🥀🌺🌸🌷🕉️☪️🪯✝️

 पैगंबर मुहम्मद स्व.च्या जयंतीच्या दिवशी बैतुशशिफा दवाखान्यात यशस्वी आयोजन
 " ज्यानं एका जीवन वाचविले त्याने समस्त सृष्टीचा जीव वाचविले व ज्यानं एका जीवाची रक्षा केली त्यानं संपूर्ण मानवजातीची रक्षा केली " पवित्र कुरआन तील या पवित्र आयती च्या शिकवणी नुसार 05 सप्टेंबर 2025 शुक्रवारी श्रीरामपूर येथील डॉ सलीम शेख बैतुशशिफा दवाखान्यात " विद्रोही संस्कृतक चळवळ महाराष्ट्र व जमिल काकर मेडिकल फौंडेशन, बैतुशशिफा मेडिकल फौंडेशन व अहिल्यानगर येथील साईसेवा ब्लड बँक " यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर आयोजन केले होतें. त्यामध्ये तीन (3) महिलांनीं, तीन हिंदू बांधूनी व 57 मुस्लिम बांधून मिळून 63 रकदात्यांनी मनावते साठी स्वखुशीने पवित्र दान रक्त दान केलं. यामध्ये काही रकदात्यांची 30- 40 वी 50 वी 60 वी वेळ होती, अशपाक बाबुलाल शेख यांची 58 वी वेळ तर मोहसीन बाऊन्सर यांची तर 60 वी वेळ ऐकून तेथील नवीन रकदान करणाऱ्यानां फार कुतूहल वाटलं व त्या नंन्तर अनेक नव नवीन मुलांनी स्वच्छेने रक्तदान केलं. अशपाक बाबुलाल शेख व काही रकदात्यांचा सन्मान भेट देण्यासाठी आलेल्या आमदार हेमंत ओगले, माजी उपनगराक्ष करण ससाणे, श्रीरामपूर शहराच्या लोकनियुक्त नगराक्षा अनुराधाताई आदिक मॅडम, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे श्रीरामपूर अध्यक्ष लकी सेठी जी, साई बाबा संस्थाचे सदस्य सचिन गुजर,नेते सिद्धार्थ मुरकुटे,ज्ञानेश्वर मुरकुटे, विद्रोही सांस्कृतिक चळवळ चे राज्य सचिव डॉ जालिंदर घिघे जी, काकर समाज चे जावेद काकर, दिलीप नगारे,नाना पाटील जी, हाजी मुझफ्फर शेख, हाजी मुख्तर शहा,राहुरी हुन आलेले विद्रोही चे महेश साळवे, यांच्या हस्ते प्रेषित मुहम्मद स्व यांच्या जीवन चारित्र वरील पुस्तकं देवून सन्मान केला. रक्तदान शिबिराला रकदात्यांना शुभेच्छा व भेट देण्यासाठी विशेष करून शहरातील सिख धर्म गुरु जी ग्यानी अलोकजी मस्कीन जी, महाराष्ट्र राज्य काझी समाज अध्यक्ष व श्रीरामपूर शहर काझी मौलाना अकबर अली सय्यद,उमर फारूक मस्जिदचे हाफिज सहाब,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन चे प्रमुख पि आय नितीन देशमुख व त्यांचे सहकारी, भारतात विविध सामाजिक संघटनेत व कम्युनिस्ट चळवळीत काम करणारे कॉम्रेड जीवन सुरुडे,व सामाजिक कार्यकर्ते मुदस्सर मुस्ताक पटेल, वंचित बहुजन आघाडीचे सुनील वाघमारे, भा ज पा चे रवी पंडित जी,भा ज पा चे साजिद शेख, राष्ट्रवादी शरद पवार चे आडवोकेट राजेश बोर्डे जी, संविधान बचाव चे अहमदभाई जहागीरदार, याकूब भाई कुरेशी सहाब, भा ज पा चे हाजी आरिफ बागवान, समाजवादी पार्टी चे जोएफ जमादार, काँग्रेस चे रियाज पठाण, जाफर शाह, बहुजन पक्षा चे जाकीर शहा, इब्राहिमभाई पोलीस, रिश्ते नाते चे मुस्ताक शेख वेस्टन खानवळ चे अकबर पठाण , शिवसेना वाहतूक शाखेचे यासिन सय्यद, लेबर ऑफिसर लतिफ पटेल सहाब विशेषता: बरखेडी पाचोरा येथून खास शिबिरासाठी जमिल भाई काकर, काँग्रेस सेवा दलाचे मास्टर सरोवर भाई सय्यद, शौकत भाई शेख,सलीम टूर्नर, सलीम जहागीरदार, तौफिक शेख, अहमद शहा,अमीन शहा, नूरा भाई, फिरोज पोपटीया, इत्यादी, अनेकउत्साही युवक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व असें विविधतेत ऐकते ला मानणारे सर्व विविध स्थरातील सामाजिक,राजकीय, इंजिनीरिंग, वैद्यकिय, वकील, शिक्षण क्षेत्रातील, मंडीळीनीं आवर्जून भेटी दिल्या.यामध्ये प्रेषित मुहम्मद स्व. च्या जीवन चरित्र वरील पुस्तकं मानवता फॉउंडेशन चे अध्यक्ष व समाजसेवक सलीम खान पठाण सर यांनी 25 पुस्तकं व डॉ सलीम यांनी 50 पुस्तकं, हार पुष्पगुच्छ फुलं येवजी पुस्तकं भेट देण्यात अली.

या शिबिरात सहकार्य करणारे जमील काकर मेडिकल फॉउंडेशन चे इकबाल इस्माईल काकर सर, सचिव जुनेद जमिल काकर, ज्यांनी दिवस भर मेहनत करून काकर समातील जास्तीत जास्त रक्तदान कसे होईल असं विशेष कार्य जावेद काकर यांनी केले, विद्रोही संस्कृतिक चालवळी चे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष अशोकराव दिवे सर, विद्रोही राज्य कार्यकारणी सदस्य शाहीर भीमराव कदम, विद्रोही संघटक आडवोकेट अमोल सोनवणे, संतोष त्रिभुवन, बौद्ध महासभा व विद्रोही चे राजेंद्र हिवाळे सर, बँक मॅनेजर अकबर शेख, तन्वीर शेख, खालिद मोमीन, खोकर चे इंजिनीर राजु पठाण, मालुंजे चे राजु सिकंदर शेख, बिलाल काकर,दययान काकर, दानीयल काकर, तसेंच डॉ सलीम शेख बैतुशशिफा मेडिकल फौंडेशन चे डॉ सलीम शेख व अहिल्यानगर येथील साईसेवा ब्लड बँक चे संचालक अजित जगताप व त्यांची संपूर्ण स्टाफ त्यामध्ये तीन महिला नर्स व दोन पुरुष ब्रदर यांनी विशेष मेहनत घेऊन 63 रकदात्यांचे रक्तदान अगदी उत्साही पन यशस्वी केलं...

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
++++++++++++++++++++++++++++++++++
:- डॉक्टर. सलीम सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल. मिल्लतनगर. ✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर.
मोबाईल नं. 9271640014.
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
++++++++++++++++++++++++++++++++++






ईद ए मिलादून्नबी निमित्त भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रम संपन्न


🕉️☪️✝️🪯
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कर्मवीर चौक मित्र मंडळ व अल वारीस 
युथ फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - वार्ता -
ईद-ए-मिलादुन्नबी ( पैगंबर जयंती) च्या निमित्ताने कर्मवीर चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कर्मवीर चौक मित्र मंडळ व अल वारीस युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमात तब्बल १५० हून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

     या रक्तदान शिबिरात युवक वर्गाने मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत रक्तदान करत सामाजिक भान जपले. जोंधळे ब्लड बँक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण व्यवस्थापन हाताळले. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन सन्मानित करण्यात आले.


                  तसेच या रक्तदान शिबिरात जमा झालेल्या रक्तापैकी ५० पिशव्या गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ही एक महत्त्वपूर्ण बाब असून, गरजू लोकांपर्यंत नि:स्वार्थ मदत पोहोचवण्याचा आमचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
       सध्या काही ठिकाणी सामाजिक कार्यक्रमाच्या नावाखाली केवळ डीजे, ढोल-ताशा, आणि लाखो रुपयांची उधळण केली जात आहे. त्या तुलनेत, आजचा हा कार्यक्रम एक सामाजिकदृष्ट्या प्रेरणादायी उदाहरण ठरला. आयोजकांनी गरजूंना मदत करण्यासाठी खऱ्या अर्थाने पैशाचे व वेळेचे मूल्य दाखवून दिले.
     या उपक्रमात विविध धर्म,जाती-पंथातील लोकांनी एकत्र येत रक्तदान केले. हा शांतीचा व एकतेचा संदेश देणारा कार्यक्रम ठरला. “रक्त कोणाचेही नसते, ते फक्त जीवन वाचवते”, ही भावना लोकांच्या कृतीतून उमटत होती.
या कार्यक्रमाद्वारे कर्मवीर चौक मित्र मंडळ आणि अल वारीस युथ फाऊंडेशन ने हा कार्यक्रम म्हणजे केवळ धार्मिक उत्सव न ठरता, समाजाच्या आरोग्यासाठी दिलेलं एक योगदान आहे असा संदेश दिला.

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
++++++++++++++++++++++++++++++++++
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
इम्रानभाई शेख - श्रीरामपूर
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
++++++++++++++++++++++++++++++++++


<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
<^>
++++++++++++++++++++++++++++++++++
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 🌹🥀🌺🌸🌷✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111  
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
++++++++++++++++++++++++++++++++++

मदरसा कादरीया अंजुमन ए जमीयतुल कुरैश च्यावतीने सिरतुन्नबी क्विज कॉम्पिटिशन संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
१५०० वा जश्ने ईद मिलादुन्नबी (स.) निमित्त अहमदनगरमध्ये सिरतुनबी क्विझ कॉम्पिटिशन सिझन दोन २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पैगंबर हजरत मुहम्मद मुस्तफा (स.) यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रश्नोत्तर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान प्रदर्शित केले.
स्पर्धेत पहिला क्रमांक तहेरीन शकील कुरैशी (₹ ११०००/-), दुसरा क्रमांक उम्मे फायजा आसिम कुरैशी (₹ ७०००/-) आणि तिसरा क्रमांक नाजीया बुरहाण शेख (₹ ४०००/-) असे तीन बक्षीसे देण्यात आली. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
१५०० व्या जश्ने ईद मिलादुन्नबी या पवित्र पर्वानिमित्त मदरसा कादरिया अंजुमन-ए- जमीयतुल कुरेश, अहमदनगर तसेच आला हजरत ताजुल फुहुल अकॅडमी शाखा अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पैगंबरांच्या जीवनावर आधारित क्विज कॉम्पिटिशन चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख पाहुणे व जज म्हणून पुणे येथील राहतअली कुरैशी, हाफीज जुल्फेकार, हाफीज अनीस कुरैशी, ईमरान शेख आदी उपस्थित होते. 
अल्लाहच्या रसूल यांचे जीवन संपूर्ण मानवजाती साठी आदर्श आहे. त्यांची सीरत म्हणजे अखंड मार्गदर्शनाचा प्रकाश आहे.
या सिरतुनबी क्विझ स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी पैगंबर यांच्या जीवनाविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला ही अत्यंत आनंदाची बाब आहे. सर्वांनी पैगंबर यांच्या शिकवणीप्रमाणे आपले जीवन घडवावे, हेच या स्पर्धेचे खरे यश आहे.असे प्रतिपादन नालबंद मस्जिदचे पेशइमाम मौलाना मोहम्मद अदनान कादरी यांनी केले.
कार्यक्रमास विद्यार्थ्यांबरोबर पालक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. आयोजकांचे सर्वांनी भरभरून कौतुक केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

क.जे. सोमैया हायस्कूल मध्येविद्यार्थ्यांनी चालविली शाळा


क.जे. सोमैया हायस्कूल मध्ये
विद्यार्थ्यांनी चालविली शाळा

*शिक्षकांचा आदर - सन्मान*
 *करावा - RTO संदिप निमसे* 

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
हिंद सेवा मंडळाच्या क.जे. सोमैया हायस्कूल मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती, ५ सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहायक प्रादेशिक (आरटीओ) परिवहन अधिकारी संदिप निमसे, 
डॉ. सौ.ज्योत्सना तांबे, सौ. वैशाली जोशी, विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन जितेंद्र अग्रवाल, शालेय समिती सदस्य प्रकाश कुलथे, किशोर फुणगे, सुर्यकांत कर्नावट, कारभारी कान्हे,अरुण धर्माधिकारी, शाळा व्यवस्थापन सदस्या दिप्ती आमले, किशोर कुलकर्णी, प्रशासनाधिकारी बी.एस. कांबळे, मुख्याध्यापक भूषण गोपाळे, हिंद सेवा मंडळ पतपेढी संचालक महेश डावरे, स्मिता पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

इ.१० वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची भुमिका केली, या विद्यार्थ्यांनी इ. ५ वी ते इ.९ वी च्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम केले . मुख्याध्यापक भुमिका चि. गणराज म्हसे, पर्यवेक्षक चि. आयुष शिंपी, उदय त्रिभुवन, मिथिलेश आहिरे, यांना उत्कृष्ठ विद्यार्थी शिक्षकाची भूमिका म्हणून घोषीत केले.

सर्व विद्यार्थी शिक्षक यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य भेट देऊन गौरव करण्यात आला.
शालेय समिती यांच्या वतीने विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला.

 विद्यालयाचे चेअरमन यांनी आपल्या मनोगतात शिक्षक दिनाचे महत्व सांगीतले. वैशाला जोशी, प्रकाश कुलथे, डॉ. ज्योत्स्ना तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तथा शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 
आपल्या अध्यक्षीय भाषणात आरटीओ अधिकारी संदिप निमसे यांनी शिक्षकांचा आदर सन्मान करावा, तसेच शिक्षणाचे महत्व विशद केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल चोभे, सुत्रसंचालन रमेश धोंडलकर, आभार उर्मिला कसार यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
अशोकराव खैरे (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी जात असलेल्या जड वाहनामुळे व्यंकटेश नगर परिसरातील रस्ता खचला


नागरीकांची नगर परिषदेला
रस्ता दुरुस्तीची मागणी

- वरुड - प्रतिनिधी -/ वार्ता -
वरुड शहरातील व्यंकटेश नगर भागात नवीन उपजिल्हा रुग्णालयाचे काम सध्या सुरू असून, त्या अनुषंगाने बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू आहे. या वाहनांमुळे परिसरातील मुख्य रस्ता मोठया प्रमाणात खचला आहे , त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
व्यंकटेश नगर ही एक शांत वसाहत असून, येथे दररोज शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक आणि सर्वसामान्य रहिवासी यांची सतत वर्दळ असते. अशा ठिकाणी बांधकामासाठी आलेल्या ट्रक व डंपर सारख्या जड वाहनांनी रस्त्याचे मोठे नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी याबाबत नगर परिषद प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदाराने (कॉन्ट्रॅक्टर) यांनी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. "सरकारी कामासाठी रस्ता वापरणे समजण्यासारखे आहे, पण रत्यांच्या क्षमते पेक्षा जड वाहणा द्ववारे बिल्डींग मटेरियलची वाहतुक होत असल्या मुळे परिसराती रस्ता खराब झाला हा रस्ता दुरूस्त करण्याची जबाबदारी घेणे हे संबंधित ठेकेदाराचे कर्तव्य आहे," असे मत परिसरातील अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

*रस्त्याच्या खचण्यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढण्याची शक्यता असून, शाळकरी मुलांसाठी ही स्थिती अत्यंत धोकादायक आहे. स्थानिक नगरपरिषद व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित ठेकेदाराला त्वरित दुरुस्तीचे आदेश द्यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. - प्रा. सुरेंद्र सिनकर, व्यंकटेश नगर - वरुड*


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
पत्रकार प्रविण सावरकर - वरुड 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर -9561174111
-----------------------------------------------
=================================