राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, December 9, 2025

मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची कन्या श्रीमंत राजकुमारी मृणालीराजे आणि श्रीमंत पृथ्वीराज देशमुख यांचे चि. श्रीमंत रविराज यांचा विवाह समारंभ संपन्न होत आहे.


- सातारा - प्रतिनिधी -/ वार्ता -
माझे सहकारी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची कन्या श्रीमंत राजकुमारी मृणालीराजे आणि श्रीमंत पृथ्वीराज देशमुख यांचे चि. श्रीमंत रविराज यांचा विवाह समारंभ संपन्न होत आहे.

या विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही कुटुंबीयांची भेट घेऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच, नववधू-वरांस भावी वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि उज्ज्वल भविष्य लाभो, ही प्रार्थना आई अंबाबाईच्या चरणी केली.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



Wednesday, December 3, 2025

नागपूर हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान होणार -

- मुंबई - प्रतिनिधी - वार्ता -
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज विधानसभेचे अध्यक्ष मा.श्री. राहुलजी नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत अधिवेशनातील कामकाजाचे स्वरूप, प्रस्तावित विषय आणि पुढील प्रक्रिया याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीत दि. ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत नागपूर अधिवेशन घेण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच, अधिवेशनातील सर्व महत्त्वाचे विषय सुरळीतरीत्या पार पडावेत, यासाठी आवश्यक नियोजनावरही यावेळी शिक्कामोर्तब करण्यात आले.

या बैठकीस मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार तसेच कामकाज सल्लागार समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Tuesday, December 2, 2025

शिर्डीत भाजपा-महायुतीच्या समर्थनार्थ जनसागर...शिर्डी उमाटलं


शिर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस असून, यानिमित्ताने भाजपा-महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ शहरातून भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी असंख्य नागरिकांच्या उपस्थितीने संपूर्ण शिर्डी शहर उत्साहाने दुमदुमून गेले.



शिर्डीकरांनी नेहमीच विकासाला प्राधान्य देऊन भाजपा-महायुतीवर विश्वास दाखवला आहे. यंदाच्या निवडणुकीतही शिर्डीकरांचा भरभरून प्रतिसाद पाहून प्रचंड महाविजयाचा संकल्प अधिक दृढ झाला आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे.

शिर्डी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महायुती कटिबद्ध असून, यावेळी उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



Monday, December 1, 2025

श्रीरामपूरमध्ये उबाठा गटाचा मोठा राजकीय धक्का डॉ. महेश शिरसागर यांचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश


श्रीरामपूर (प्रतिनिधी) वार्ता – तालुक्यातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी महत्त्वपूर्ण राजकीय घटना काल घडली. उबाठा गटाचे उत्तर महाराष्ट्रातील शिव आरोग्य सेना प्रमुख म्हणून ओळख असलेले आणि सामाजिक उपक्रमांमुळे तालुक्यात विशेष लोकप्रियता मिळवलेले डॉ. महेश शिरसागर यांनी काल भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला हा प्रवेश सोहळा केवळ मोठ्या उत्साहातच नाही, तर भविष्यातील राजकीय ध्रुवीकरणाचे संकेत देणारा ठरला.

 श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नामदार विखे पाटील हे श्रीरामपूर दौऱ्यावर असताना हा पक्ष प्रवेश करण्यात आला डॉ. महेश शिरसागर यांनी शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून तालुक्यात रुग्णसेवा, आरोग्य शिबिरे, रक्तदान, सामाजिक उपक्रम अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय सेवा हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य नेहमीच चर्चेत राहिले. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

यावेळी बोलताना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “श्रीरामपूरचा विकास, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही क्षेत्रांमध्ये हा प्रवेश निर्णायक ठरेल. युवकांना नेतृत्व मिळावे आणि सामाजिक कार्याला दिशा मिळावी, या उद्देशाने आम्ही एकत्र आलो आहोत. भाजपच्या माध्यमातून श्रीरामपूरचा विकास अधिक वेगाने होईल.”

दरम्यान डॉ. शिरसागर यांनी आपले विचार मांडताना सांगितले, “ही केवळ राजकीय पायरी नाही तर समाजसेवेच्या कार्याला नवा आयाम देण्याचे पाऊल आहे. जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूनेच मी प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे श्रीरामपूर शहरात आणि तालुक्यात विविध चर्चांना चांगलीच उधाण आले आहे. आगामी निवडणुका, नगरपालिकेतील सत्ताकारण आणि विविध गट-तटबंदीच्या पार्श्वभूमीवर शिरसागर यांचे पक्षप्रवेश हे प्रस्थापित राजकीय घटकांसाठी धक्का मानला जात आहे. या प्रवेश सोहळ्यानंतर लगेचच शहरात चर्चा वाढली असून, “श्रीरामपूर आता नव्या राजकीय पर्वाकडे वाटचाल करत आहे,” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. राजकीय वातावरणात बदलाचे संकेत देणाऱ्या या घटनाक्रमामुळे श्रीरामपूरचे राजकारण अधिक रंगतदार आणि स्पर्धात्मक होणार हे निश्चित!

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


Sunday, November 30, 2025

निर्धार भाजपाचा, संकल्प विजयाचा पाथर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना, राधाकृष्ण विखे पाटलाची उपस्थिती


पाथर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेस पालकमंत्री ना, यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रभागातील विविध विकासकामांबाबत माहिती देत भाजपा उमेदवारच पाथर्डी शहराचा सर्वांगीण विकास वेगाने पुढे नेऊ शकतील, असा विश्वास व्यक्त करत सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.


या सभेला आमदार मोनिकाताई राजळे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप भालसिंग, माजी नगराध्यक्ष श्री. अभय आव्हाड यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पाथर्डी शहरात महायुतीला व्यापक जनसमर्थन मिळत असल्याचे स्पष्ट जाणवले.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील विविध घटकांतील नागरिकांशी संवाद पालकमंत्री ना, राधाकृष्ण विखे पाटील


श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील विविध घटकांतील नागरिकांशी संवाद साधला. स्थानिक प्रश्न, अपेक्षा आणि विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करत नागरिकांनी व्यक्त केलेल्या सूचना आत्मीयतेने समजून घेतल्या. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार सक्षम आणि कटिबद्ध आहेत, याची माहिती देत सर्वांना एकजुटीने मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले.



=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Saturday, November 29, 2025

श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या भेटीगाठी व संवाद पालकमंत्री ना,राधाकृष्ण पाटील


- प्रतिक रामदास पाटील - वार्ता -/ वार्ता -

श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांत जाऊन स्थानिक नागरिकांच्या भेटी घेतल्या आणि स्थानिक प्रश्नांवर संवाद साधला. यावेळी नागरिकांनी भाजपा-महायुतीच्या उमेदवारांना दिलेला प्रतिसाद अत्यंत मोलाचा होता.

, श्रीरामपूर शहराचा विकास वेगाने पुढे न्यायचा असेल तर महायुतीच्या उमेदवारांना विजयी करणे अत्यंत आवश्यक असल्याची भावना व्यक्त करून सर्व उमेदवारांना आशीर्वाद देण्याचे देखील आवाहन केले.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================