राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, June 8, 2025

सौ.अनिता माळवे राज्यस्तरीयज्योतिष पुरस्काराने सन्मानित


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
नाशिक येथील वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठान नाशिक यांच्यातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय ज्योतिष पुरस्कार नाशिक येथील सुवर्णकार समाजाच्या ज्येष्ठ समाजसेविका सौ.अनिता महेश माळवे यांना नुकताच प्रदान करण्यात आला. पंचांगकर्ते मोहन दाते शास्त्री गुरुजी यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिक येथील पाटीदार भवन याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अधिवेशन वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठान नाशिक हे अधिवेशन भरविण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उदय कुलकर्णी, हर्षद महाजन, भूषण पाटील, प्रकाश संत, प्रथमेश दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन गीता सागरे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा परिचय पद्मश्री पेटकर, दिपाली निकम यांनी करून दिला. 
सौ अनिता माळवे ह्या सुवर्णकार समाजातील एक कर्तुत्वान समाजसेविका आहेत. त्यांना अनेक संस्थांकडून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगांव यांच्याकडून ज्योतिष रत्न पुरस्कार डॉ. बत्रा यांच्याकडून ॲडव्हान्स मोबाईल अंकशास्त्रज्ञ डॉ. सागर गगे वास्तुतज्ञ, यांच्याकडून एस्ट्रो वास्तुतज्ञ, तसेच कुंडली वरून वास्तुशास्त्र, आणि वास्तुशास्त्र क्रिस्टल रत्नशास्त्र, रुद्राक्ष मंत्र शास्त्र यंत्रशास्त्र अश्या अनेक शास्त्रांचा अभ्यास गेल्या दहा वर्षापासून त्या करीत आहेत. 
समाजासाठी नेहमी काहीतरी करण्याची त्यांची धडपड असते समाजातील अनेक उपेक्षित वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात. समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हे नेहमी त्यांच्या प्रयत्नातून दिसून येते, समाजातील सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी अनेक वेळा त्यांनी संघर्षही केलेला आहे. अनेक संकटांना तोंड देऊन त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. त्या ज्योतिष शास्त्रामध्ये त्यांचा चांगला अभ्यास असून अनेकांना त्यांचा चांगला अनुभव आलेला आहे. अनेकांना योग्य दिशा देणे त्यांच्या हातून चांगलं कार्य करून घेणे व त्यांना जीवनात यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग त्यांनी दाखवला आहे. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना हा मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार महत्त्वाचा असून त्या निश्चितच येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी राहील. 
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सुवर्णकार समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छा आणी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. 

=================================
-----------------------------------------------
*वृत प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

विवाह समारंभाबाबत मराठा समाजाच्या आचार संहितेस समर्थन करण्यासाठी मंगळवारी श्रीरामपूरात मीटिंगचे आयोजन



- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
मराठा समाजातील विचारवंतांनी एकत्र येऊन समाजात नवीन विवाह समारंभ करण्याबाबत एक आचारसंहिता नियमावली तयार केली आहे, त्या आचारसंहिता नियमावलीचे समर्थन करण्यासाठी मंगळवार दिनांक १० जून २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजता शासकीय विश्रामगृह श्रीरामपूर या ठिकाणी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली. 
       प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, पुणे येथील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण समाजासमोर आल्यामुळे मराठा समाजातील विचारवंत जागृत झाले असून हुंडा घेणार नाही देणार नाही या संदर्भात जनजागृती करण्यासाठी नियमावली तयार केली आहे. त्या नियमावली मध्ये हुंडा घेऊ अगर देऊ नये, कर्ज काढून विवाह समारंभ करू नये, विवाह समारंभास १०० ते  २०० लोकांनाच निमंत्रित करावे, विवाह समारंभात डीजे न लावता पारंपारिक वाद्य लावण्यात यावे, जेवणाचे मेनू पाचच प्रकारचे असावे, हळद,साखरपुडा विवाह एकाच दिवशी करावे, प्री वेडिंग फोटोशूट करू नये, केल्यास त्याचा सगळ्यासमोर देखावा करू नये, भेटवस्तू ऐवजी पुस्तके, झाडे किंवा रोख रक्कम द्यावी, हार घालताना नवरदेवाने नवरीला उचलून घेऊ नये, नवरदेवासमोर दारू पिणाऱ्यांनी नाचू नये अशी समाजहिताची नियमावली तयार करण्यात आलेली आहे, तरी या अचार संहिता नियमावलीचे प्रत्येक समाजातील घटकांनी या आचारसंहिताचे पालन व जनजागृती आणी समर्थन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासोबतच सदरील मिटींगला विविध पक्ष संघटना, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार सामाजिक संस्था,संघटना पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आव्हानही सुभाष दादा त्रिभूवन, गौतम उपाध्ये, तेजस गायकवाड, बाबासाहेब पवार यांनी केले आहे. तसेच या कार्यक्रमासाठी विविध समाजातील लग्न लावणाऱ्या सर्व धर्मगुरूंना आमंत्रित केले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

माजी आ.भानुदास मुरकुटे व माजी नगर सेवक संजय छल्लारे यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश


माजी आ.भानुदास मुरकुटे व माजी नगर सेवक संजय छल्लारे यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
मुंबईत काल शनिवार दि. ७ जुन २०२५ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूर येथील माजी आमदार भानुदास मुरकुटे व माजी नगरसेवक संजय छल्लारे, निरज मुरकुटे, गणेश छल्लारे, प्रवीण फरगडे, सिद्धांत छल्लारे, लक्ष्मण कुमावत,भगवान उपाध्ये, शेखर दुब्बैया, तेजस बोरावके, रोहित नाईक, संजय साळवे, संजय परदेशी, महेंद्र टाटिया यांच्यासह इतर अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेनेचे राज्य सचिव राम रेपाळे, सचिव संजय मोरे, प्रवक्ते राहुल लोंढे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       या पक्षप्रवेशामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक बळावणार आहे, त्यामुळे श्रीरामपूर चे अनेक गणिते बिघडणार असल्याचे दिसून येत आहे.हा पक्ष प्रवेश प्रामुख्याने विकासाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील अनेक माजी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्याचा या सोहळ्यात लक्षणीय सहभाग होता. त्यामुळे येत्या काळात स्थानिक राजकारणात मोठे बदल घडण्याची चिन्हे देखील दिसून येत आहेत. याप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत, मुख्यमंत्री असताना राज्यातील सर्वसामान्यांसाठी अनेक लोककल्याणकारी योजना आम्ही आणल्या.सध्या महायुतीची दुसरे पर्व सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझ्या नेतृत्वाखाली सरकारने महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेताना 'सर्वसामान्य माणूस' केंद्रस्थानी ठेवला आहे. महाराष्ट्राची प्रगती, औद्योगिक वाढ आणि सामाजिक समरसता हेच आमचे ध्येय

*प्रगती आणि समृद्धीचे सरकार*

एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षांत महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आणि अनुभवले आहे.महायुतीच्या नेतृत्वाखाली सरकार हे स्थगिती नव्हे तर प्रगती व समृद्धीचे सरकार असल्याचा पुनरुच्चार ना. शिंदे यांनी यावेळी केला.
 मुरकुटे यांच्या प्रवेशाने या सोहळ्यात विशेष लक्ष वेधून घेतले,निरज मुरकुटे (माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नातू ) यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतल्यानंतर थेट शिवसेनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.याबद्दल शिंदे म्हणाले, "समाजहितासाठी उच्चशिक्षित पिढीने राजकारणात सक्रीय भाग घेणे ही काळाची गरज आहे. निरज मुरकुटे यांच्यासारखे तरुण हे पक्षाला बळकटी देणारे आहेत असेही ना. शिंदे म्हणाले.याच कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अलीकडील परदेश दौऱ्याचा विशेष उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.श्रीकांत शिंदे यांनी चार देशांच्या दौऱ्यात ऑपरेशन सिंदूर' संदर्भात भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली आणि पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केला. त्या चारही देशांनी भारताला पाठिंबा देत पाकिस्तानला विरोध दर्शवला असेही त्यांनी स्पष्ट केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, June 4, 2025

मख़दुम सोसायटी व रहमत सुलतान फाउंडेशन तर्फे


पुण्यश्लोक अहिल्यादेवी
 होळकर यांना अभिवादन 

- अ,नगर -  प्रतिनिधी - प्रतिनिधी -
भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला.त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्थान अग्रभागी आहे. त्यांच्या जीवनकार्याने सिद्ध केलं की एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासना पुरतं मर्यादित राहत नाही, तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकतं. अहिल्यादेवी होळकर या केवळ इंदूरच्या होळकर घराण्याच्या महाराणी नव्हत्या तर त्या एक न्यायप्रिय नेत्या, समाजसुधारक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या आद्य पुरस्कर्त्या होत्या. त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, त्यांचे स्मरण त्यांच्या विचारांमधून नव्याने प्रेरणा घेण्याचे निमित्त आहे.असे प्रतिपादन रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर यांनी केले. 
मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व रहमत सुलतान फाउंडेशन तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रहमत सुलतान फाऊंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबटकर, एडवोकेट हनीफ बाबूजी, जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद, अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाचे आसिफ दुलेखान, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ. कमर सुरूर, उर्जिता फाउंडेशनच्या संध्या मेढे, राजाभय्या, जावेद मास्टर, अबरार शेख आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.कमर सुरुर व संध्याताई मेढे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले. तर आभार आरिफ सय्यद यांनी मांनले. कार्यक्रमास मखदूम सोसायटी, रहमत सुलतान फाउंडेशन व अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ आदींचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* 
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, ✍️✅🇮🇳...
अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================

=================================-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

पत्रकार तोडकर यांचेवरनारायणगांव मध्ये हल्ला


पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्याची इलेक्ट्रॉनिक मीडिया संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अतुल परदेशी यांची मागणी

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
वार्तांकनासाठी गेलेले न्यूज 18 लोकमतचे पत्रकार सचिन तोडकर यांच्यावर नारायणगांव (ता.जुन्रर,जि.पुणे) येथे सोमवार दि.२ जुन रोजी भरदिवसा हल्ला करण्यात आला. त्यांच्या मोटारीचीही नासधूसही केली गेली. 
या घटनेचा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाने लगेच तीव्र निषेध केला तसेच याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्याची लेखी मागणी संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अतुल परदेशी यांनी स्थानिक नारायणगांव पोलिस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षकांना भेटून आज (मंगळवार दि.३) केली. अन्यथा पत्रकारांच्या वतीने राज्यभरात मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

नारायणगांव येथे बांधकाम कामगार नोंदणीसाठी अनधिकृतरित्या भरविण्यात आलेल्या बायोमेट्रिक कॅम्प ची बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या तोडकर यांच्याावर नोंदणी करणाऱ्या खासगी एजंटांनी सोमवारी ( दि.२) दुपारी हल्ला केला.अरेरावी करीत त्यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या मोटारीची काचही फोडली. याबाबत नारायणगांव पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. परंतू,पोलिसांनी एफआयआऱ घेतला नाही. आपल्या गैरकामाचे पितळ उघडे पडू नये याकरिता संघटनेच्या काही लोकांनी हा हल्ला प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या तोडकरांना रोखण्यासाठी केल्याचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.परदेशी यांनी सांगितले. तसेच हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदवून घेण्याऐवजी तोडकरांविरुद्धच महिलांना धक्काबुक्की केली आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्याच्या सुरु असलेल्या हालचालीबद्दल हा प्रकार म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डांटे असा आहे,असा संताप त्यांनी व्यक्त केला. त्याामुळे तोडकर यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस विश्वास आरोटे राज्यातील सर्वच पत्रकार बांधव पत्रकार सचिन तोडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असेही परदेशी यांनी निवेदन देताना आपल्या मनोगत सांगितले. 
यासंदर्भात सबंधित हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Tuesday, June 3, 2025

कोल्हार येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी


कोल्हार येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील शिवाजीनगर भागात शिवाजीनगर मित्र मंडळ यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष कैलास चिंधे सर होते. प्रमुख उपस्थिती कोल्हारेश्वर पतसंस्थेचे चेअरमन आबासाहेब सयाजी खर्डे पाटील, रयत चे माजी प्राचार्य सोनवणे सर, अहिल्यानगर गोल्ड व्हॅल्यूवर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बेंद्रे,पत्रकार प्रमोद कुंभकर्ण, रामदास वडीतके, उपसरपंच कडीत आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रस्ताविक जयश्री रोडे/ मिडगे यांनी केले. आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते निलेश वडीतके यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जीवन चरित्र आपल्या सुमधुर वाणीतून शब्दांकित केले. त्यांच्या जीवनातील प्रसंग व त्यांची दूरदृष्टी, राज्यकारभाराची प्रशासन व्यवस्था आपल्या उत्कृष्ट शब्दात मांडली. 
या कार्यक्रमाप्रसंगी कैलास चिंधे सर, सोनवणे सर, डॉ.श्रीकांत बेंद्रे,प्रमोद कुंभकर्ण, सचिन बुचुडे, रामदास वडीतके, अर्चनाताई कुंभकर्ण, जयश्री रोडे, राजश्री बुचुडे, उत्तमराव धट, इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी राजेंद्र दातीर, रावण काकडे, राहुल रिठे, चित्ते साहेब, सयाजी राजभोज, एकनाथ येवले, बेंद्रे गुरुजी, लक्ष्मण मेनगर, रावसाहेब लोखंडे, निवृत्ती लोखंडे, उत्तम दातीर, रंभाजी बोरुडे, दिनेश लोढा, देशपांडे मॅडम, सीमा वैष्णव, जनाबाई मेनगर, मनीषा येवले, सविता मेनगर, अनिता पगारे, बेंद्रे मॅडम, चित्ते मॅडम, इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंदर रोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन फॉरेस्ट ऑफिसर निलेश रोडे यांनी केले. कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार हाजी राजमोहम्मद शेख - कोल्हार
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, June 2, 2025

विस्थापित दुकानदार कुठवर वाट पाहणार तात्काळ पुनर्वसन करा अन्यथा उद्रेक होणार


नेवासाच्या धरतीवर श्रीरामपूर शहरातील विस्थापितांना तात्काळ पाच फुटाची जागा द्यावी, अन्यथा उद्रेक - सुभाष दादा त्रिभुवन

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/वार्ता -
श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली विस्थापित व्यापाऱ्यांना पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा मिळालीच पाहिजे, ठराविक व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढून बाकीच्यांना अभय का दिले गेले ? याचा जाब विचारण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेवर जवाब दो आंदोलन करण्यात येऊन मुख्याधिकारी सोमनाथ घोलप यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन म्हणाले की, श्रीरामपूर प्रमाणेच नेवासामध्ये देखील अतिक्रमणे काढली गेली होती परंतु पुन्हा आहे त्या जागेवर पाच बाय पाच च्या छोट्या टपऱ्या करून आहे. त्या ठिकाणी सर्व विस्थापित व्यापाऱ्यांना नेवासा मध्ये जागा देण्यात येऊन व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू केले आहे, त्याच धर्तीवर श्रीरामपूर शहरात देखील विस्थापित व्यापाऱ्यांना देखील आपल्या व्यवसायासाठी पाच बाय पाच फूटाची जागा देऊन त्याचे पुनर्वसन करावे अन्यथा श्रीरामपूर मध्ये मोठा उद्रेक होईल असा इशारा सुभाष दादा त्रिभुवन यांनी दिला आहे.
याप्रसंगी मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, जितेंद्र छाजेड, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले. 
यावेळी तेजस गायकवाड, तौफिक शेख, बाळासाहेब बागुल, रईस शेख, रवी चव्हाण, एजाज पठाण, उत्तम चित्ते, भाऊसाहेब राऊत, जुबेर कुरेशी, बंडू वाघमारे, ओम नागरे, इंदर सेठी, सुनील दळवी, प्रकाश मुळे, असलम शेख, भारती वाणी, हाजी मजीदभाई मेमन, शेख शरीफ, रवींद्र कोरडे, राजेंद्र तरटे, जया तरटे, जावेद सय्यद, विजय अस्वले, विजय चौतमल, संजय शेलार, गौरव बिडवे, अशोक लोणकर, बापू सोनवणे, सुरेश ठाकरे, गौस तांबोळी, सुरेश बारस्कर, पोपट वाकचौरे, गुलाब गायकवाड, मनोज सहानी, सुमन थोरात, ज्योत्स्ना नरवडे, जावेद अत्तार, संजय खर्डे, अवंतिका देवकाते, संतोष छाजेड, अझहर अत्तार, सरदार अत्तार, सुलतान अत्तार, मुनीर शेख, सागर बोलके,ताहीर बागवान, विकी चव्हाण, गणेश पवार, सतीश पवार, राजू पवार, किशोर कंत्रोड, विकी कंत्रोड,निलेश मोरगे, कल्पना नरोडे, निजाम शेख, सवेरा सय्यद, मनोज गेलानी, हरी क्षीरसागर, राहुल तरटे, रिंकू लुल्ला, आनंद देठे, अलीम मनियार, सचिन भगरे,अजित शिरसाट, श्रीकांत बाकले, अभिषेक कल्याणकर, पंकज गंगवाल, रवी जावरे, ललित कंत्रोड, वसीम बागवान, शाहिद बागवान, इरफान बागवान, तन्वीर बागवान, अतिक बागवान, ताहेर बागवान, हारुन बागवान, इकबाल बागवान, सद्दाम बागवान, शाहरुख बागवान, योगेश घोरपडे, मनोज गायकवाड, ताया शिंदे, सोमनाथ पतंगे, किरण कतारे, नितीन उडे, नाना गव्हाणे, रामेश्वर काळे, भारत कांबळे, प्रेम शिंदे, प्रशांत कुलकर्णी, अशोक लोणकर, अक्षय गवळी, बंडू वाघमारे,रवींद्र गरेला, संतोष गरेला आदी विस्थापित दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================