( औरंगाबाद प्रतिनिधी ) वाळूज महानगर परिसरात एक रोमिंयो प्रकार समोर आला असून, तू मला खूप आवडते म्हणत 18 वर्षीय तरुणीचा हात धरत एकाने छेड काढली आहे. तर मुलीचा पाठलाग करून छेड काढल्याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. सलमान सलीम शेख (रा. पंढरपूर) असे आरोपीचे नाव समजते याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज महानगर परिसरात कुटुंबासह राहणारी 18 वर्षीय तरुणीची ओळख शेख सलमान याच्या सोबत सहजा सहज झा ली होती. दरम्यान 29 डिसेंबररोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तरुणी बजाजनगरातून घराकडे जात होती. यावेळी आरोपी सलमान याने पाठलाग करून तरुणीचा हात धरला, तसेच तू मला खूप आवडते असे म्हणून त्याने छेड काढली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितले. त्यामुळे मुलीच्या आई-वडिलांनी सलमान यास फोन करून यापुढे मुलीला त्रास देऊ नको, असे बजावले होते. अखेर पोलिसात गुन्हा दाखल...
आपल्या मुलीला त्रास देऊन नको असे पीडीत मुलीच्या आई-वडिलांनी यापूर्वीच आरोपीला अनेक वेळस समजून सांगितले होते. मात्र असे असताना देखील 7 जानेवारीरोजी रात्री नऊवाजेच्या सुमारास सलमान हा तरुणीच्या घरासमोर आला. त्याने तरुणीला शिवीगाळ करून तुझ्या आई-वडिलांना चाकूने मारून टाकीन अशी धमकी देत निघून गेला. त्यामुळे तरुणीसह तिच्या कुटुंबातील सदस्यांनी ना इलाजा ने हद्दीतील वाळूज पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर या प्रकरणी वाळूज ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शेख सलमान याच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून पत्रकार परिषद घेऊन माहिती घड ल्याले प्रकारची माहिती देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment