( मुंबई प्रतिनिधि ) समाचार एजन्सी : शाहरुख स्टॅटिस्टिक्सच्या ट्विटर अकाउंटवरुन यादी जाहिर करण्यात आली आहे. ज्यामध्ये शाहरुख चैथ्या स्थानी आहे.
शाहरुख जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. पण नुकताच आलेल्या एका रिपोर्टमध्ये शाहरुख जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. 8 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये शाहरुखचं नाव समोर आलं आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या ट्विटर अकाउंटवरुन यादी जाहिर करण्यात आली आहे. ज्यामध्ये शाहरुख चौथ्या स्थानी आहे.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान याच्याकडे 770 मिलियन डॉलर म्हणजे भरतीय रुपयानुसार 6 6 हजार 300 कोटी रुपयांची संपत्ती आहे. महत्वाचं म्हणजे, शाहरुख याच्यापेक्षा अधिक चाहत्यांची संख्या
असणार हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ पाचव्या स्थानावर आहे. टॉम क्रूझ याच्याकडे 5 हजार 90 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
तसेज शारुक खान नियमित पणे त्याच्या मोठ्याने संपत्ती नुसार शासनाचा कर भरत असून शासनाच्या यादीत नाव लौकिक असल्याने भारताचा श्रेष्ठ अभिनेता सुद्धा शारुक मानला जातो थोड्याच दिवसात त्याच नवा चित्रपट -पठाण- प्रदर्शित होण्या अगोदर त्याच्या चाहत्या पासून सिनेमा बगन्या करीता हर्षयो उल्लास मय आनंदाचे वारे सुटल्याची चर्चा प्रत्येक शहरांत आहे असे ऐकण्यात येते,
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगातील 8 श्रीमंत अभिनेत्यांची यादी जाहिर केली आहे. यादी जाहिर झाल्यानंतर शाहरुख पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुख आगामी सिनेमा ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोनच्या भगव्या बिकीनीमुळे वाद शिगेला पोहोचला आहेमीडियारिपोर्ट्स नुसार, ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावर होणारा विरोध पाहता सेंसर बोर्डाने सिनेमातील काही सिनवर कात्री चालवली असून सिनेमात महत्त्वाचे बदल केले आहेत. दरम्यान, सिनेमाच्या ट्रेलरची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. सिनेमाचा ट्रेलर 14 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमा 25 जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.
No comments:
Post a Comment