राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, February 28, 2023

श्रीरामपूर पोलिसांनी शिताफिने पकडलेल्या आरोपींकडून समरी खाख्या दाखवताच वर्षभरातील बाराहून अनेक गुन्ह्यांची कबुली ?

श्रीरामपूर तालुका ग्रामीण भाग पोलीस ठाणे हद्दीत माळवाडगाव, भामाठाण येथील तिघा आरोपींवर 12 महिन्यांत बारा गुन्हे दाखल असून तिघांपैकी दोन जणांच्या मुसक्या आवळण्यात तालुका पोलिसांना यश आले असले तरी एका अट्टल गुन्हेगाराचा पोलिसांना अद्याप छडा लागलेला नाही. बारा महिन्यांत बाराहून
अनेक गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे.
श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वडाळा महादेव, हरेगाव, मुठेवाडगाव, माळवाडगांव, माळेवाडी या गावांत गेल्या एक वर्षापासून या तिघा आरोपींनी अन्य गुन्हेगारी प्रवृत्तीच्या महिला, पुरुष यांच्या मदतीने अगोदर भुरट्या व नंतर घरफोडी, जबरी चोर्‍या करण्यास सुरुवात केली. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे, श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे, विरगाव (वैजापूर) पोलीस ठाणे, शिलेगाव (गंगापूर) येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तालुका पोलीस ठाण्यात सर्वाधिक भादंवि कलम 379, 34 चे आठ, एक दरोडा सुद्धा व खुनी हल्ल्याचे तेंच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.
रात्री चोर्‍या करून दिवसा राजरोसपणे गावात येऊन बसत असे. पोलिसांनी एखाद्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर जामिनावर बाहेर येताच पुन्हा चोरी करत. माळवाडगाव, मुठेवाडगाव, भामाठाण परिसरात सोयाबीन कट्टे, गायी, बकर्‍या, मोटार पंप, मोटारसायकल अशा एक ना अनेक गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे. या गुन्ह्यातून त्या गुन्ह्यांमध्ये पोलीस त्यांना टाकत असले तरी यातील अट्टल सुशिल वाकेकर (रा. भामाठाण) हा फरार आहे.
तेजस मोरे व एका महिलेस मुठेवाडगाव गायीच्या चोरी प्रकरणात गावकर्‍यांनी मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात दिले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी आपल्या सहकार्‍यांसह शिताफिने साफळा रचून सुजित आसने यास माळवाडगाव येथे पळून जाताना शिताफीने पकडले. या तरुणांवर बारा महिन्यांत बाराहून अधिक गुन्हे दाखल आहेत तर मुद्देमाल मूळ मालकास परत मिळाल्याने कित्येक गुन्हे दाखल झालेले नाहीत असे समजते


(कार्य.संपादक,)  सा : राज प्रसारित.भगवंत सिंघ  प्रितम सिंघ बत्रा 



















मराठी भाषेला आणखी दर्जा करिता त्यासाठी तुमची सर्व सामान्य जनतेचे आमच्या संघर्षाला साथ हवी,राज ठाकरेंनी घातली मराठी भाषिकांना साद ?


( मुंबई ) - वार्ता - मराठी भाषा दिन. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, २७ फेब्रुवारी, 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून घोषित केला जातो. कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित करण्यात येत आहे
याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील मराठी भाषिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी पत्र ट्विट करून मराठी भाषिकांस शुभेच्छा दिल्या आहेत. 'व्यवहारात मराठी ते अभिजात भाषेच्या दर्जासाठी आम्ही संघर्ष केला. त्यासाठी तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी, अशी साद राज ठाकरे यांनी मराठी भाषिकांना घातली.

सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वाना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
कुसुमाग्रजांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाला अभिवादन म्हणून तेंव्हाच्या सरकारने, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, २७ फेब्रुवारी, 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून घोषित केला. पण नेहमीप्रमाणे सरकारी उदासीनतेत तो साजरा व्हायचा. कुठल्याही राजकीय पक्षाला देखील तो साजरा करायची इच्छा नव्हती.
पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो अत्यंत उत्साहात साजरा करायला सुरुवात केली. मराठी भाषेला 'अभिजात भाषेचा' दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पक्ष पण आमचाच पहिला. हे सगळं सांगायचा उद्देश इतकाच की, आपल्या भाषेसाठी, आपल्या सणांसाठी, आपल्या संस्कृतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर एकही पक्ष हिरहिरीने पुढे आलेला नाही. आणि सध्या जी एकूणच जी राजकीय दंगल सुरु आहे, त्यात कोणी येईल अशी शक्यता वाटत नाही.
असो, त्यामुळेच आजच्या दिवशी आपल्या लाडक्या मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना, ह्या भाषेसाठी आपल्याला सगळ्यांना उभं रहावं लागणार आहे हे भान सोडून चालणार नाही. व्यवहारात मराठी, प्रशासनात मराठी, दूरसंचार माध्यमांमध्ये मराठी, दूरदर्शनच्या समालोचनात मराठी इथपासून ते अभिजात भाषेच्या दर्जासाठी आम्ही संघर्ष केला, आणि पुढे देखील करू. पण त्यासाठी तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी तरच हे शक्य आहे.
मला माहिती आहे, मनसेकडूनच तुमच्या सगळ्या बाबतीत अपेक्षा असतात, पण ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या साथीची गरज आहे. आपण 'मराठी एकत्र' असू तर 'सर्वत्र मराठी' करायला क्षणाचाही विलंब लागणार नाही.
मी माझ्या विकास आराखड्यात म्हणलं आहे तसं, मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, ह्याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा.








ई व्ही एम मशिन ने मतदारांचा अधिकार हिरावून घेतला बामसेफचे राष्ट्रीय अध्येक्ष वामन मेश्राम यांची टीका ?

( महाड ) - वार्ता - माध्यमातून मिलीजुली सरकारचा खेळ सुरू आहे. लोकांच्या मतांतून सरकार बनत नसून,ते ईव्हीएमच्या माध्यमातून होत आहे. असे खुले संभ्रम वक्त करण्यात आले एकंदर ईव्हीएमने मतदारांचा अधिकारच हिरावून घेतल्याची टीका बामसेफचे राष्ट्रीय
अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केली आहे. तसेच याविरोधात बामसेफद्वारे जनआंदोलन उभे करून म भारत बंद केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मेश्राम यांनी नुकतीच महाडमध्ये व भेट दिली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन केले. यावेळी त्यांनी भेटीचा हेतू स्पष्ट करताना स ईव्हीएमविरोधात भंडाफोड परिवर्तन यात्रा आंध्र प्रदेशपर्यंत काढली होती. 
यंत्रानाच्या मध्येमातून मतमोजणी का नाही

ईव्हीएमबरोबर पेपरटेल यंत्रातील मतमोजणी का होत नाही, असा सवालही मेश्राम यांनी उपस्थित केला आहे. तसेच घटनेने दिलेल्या मताच्या अधिकारासाठी आपला लढा अखंडपणे सुरू राहील, असेही मेश्राम म्हणाले.

            ई व्ही एम विरोधात जनजागृती अभियान   
मात्र, कोविडमुळे यात्रा रद्द केली होती. त्यानंतर कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत दुसरी परिवर्तन यात्रा काढण्यात आली. मात्र, तीदेखील पोलिस परवानगीसाठी थांबविण्यात आली. त्यामुळे यापुढे करण्यासाठी ६७४ जिल्ह्यांत रॅली काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मेश्राम यांच्यासमवेत नथुराम हाटे, सुभाष मोहिते, अशोक सकपाळ, अब्दुल्ला देशमुख, अमीर डांगे, लबडे रमेश पवार, संजीवन तांबे, रफीक नाना अंबावले, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Monday, February 27, 2023

पुण्याचा सुपुत्र होणार वर्ल्ड बँकेचा अध्यक्ष भारताचा डंका पर राष्ट्रात वर्ल्ड बँक काम काज करिता निवड अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची शिफारस ?

डेव्हिड यांच्या जागी अजय बंगा ? मूळ भारतीयालाप्रथमच हा मान सन्मान 

( नवि दिल्ली ) News एजन्सी - विषेश : वार्ता, बायडेन जागतिक बँकेच्या (वर्ल्ड बँक) अध्यक्षपदासाठी मूळ 'भारतीय तसेच मास्टरकार्डचे माजी सीईओ अजय बंगा (६३) यांच्या नावाची शिफारस केली आहे. डेव्हिड मालपास हे सध्या या बँकेचे अध्यक्ष असून, एप्रिल २०२४ पूर्वी पद सोडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. अजय बंगा
 हे या पदासाठी शिफारस झालेले पहिले मूळ भारतीय आहेत. त्यांची निवड झाल्यास अर्थातच ते या पदावरील पहिले मूळ भारतीय ठरतील. अजय बंगा भारतीय नागरिक यांची वर्ल्ड बँक अमेरिका येथून निवडयशा चे शिकर गड काम करण्याची संधी मिळणे ही खुब सर्वासामान्य भारतीय करिता आनंदाची आरश्या जनक गोष्ट आहे हे केएफसी अन् पिझ्झा हटचे संस्थापक आहेत. भारतात त्यांनीच केएफसी आणि पिझ्झा हट आणले.
जागतिक बैंक जगभरातील १९८ देशांचे प्रतिनिधित्व करते, हे येथे उल्लेखनीय!जन्म आणि शिक्षण महाराष्ट्रातील पुण्यात त्यांचा जन्म झाला. हैदराबाद येथे शालेय शिक्षण झाले. वडील हरभजन सिंह बंगा लष्करात अधिकारी होते.
अजय यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अहमदाबाद मधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले.
"गरिबी हटाव या वर्ल्ड बँकेच्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी अजय बंगा हे अत्यंत उपयुक्त ठरतील - जो बायडेन
जागतिक बैंक जगभरातील १९८ देशांचे प्रतिनिधित्व करतेहे येथे उल्लेखनीय कोण आहेत अजय बंगा ?1981 नॅस्ले इंडियात व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी 1996 सिटी ग्रुपचे मार्केटिंग हेड 2000 सिटी फायनान्शियलचे
प्रमुख 2009: मास्टरकार्डचे सीईओ
2012: फॉर्म्युनकडून शक्तिशाली उद्योगपती म्हणून निवड
2015 अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामांचे व्यापार धोरण सल्लागार
 2016 भारत सरकारकडून पद्मश्री
2023 : सध्या इक्विटी फर्म जनरल अटलांटिकमध्ये उपाध्यक्ष

***शब्द रचना संकलन ***
(भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा )










कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडेंय यांच्या वर विनयभंगाचा गुन्हा दाखल, करण्याची मागणी परिचारिकेच्या तक्रारीनंतर फिर्याद दाखल करुन घेतल्याचे समजते ?

( कोपरगाव ) - वार्ता - जि अहमदनगर, कोपरगाव ता. येथिल तहसीलदारांनी ग्रामीण रुग्णालयात शनिवारी पहाटे साडेपाच वाजता पोहोचून रुग्णालयातील परिचारिका व तेथील कर्मचाऱ्यांशी असभ्य गैरवर्तन करुन तेथे उपस्थित परिचारिकेच्या तसेच रुग्णाच्या नातेवाईक मुलीच्या देखीलसंताप जनक प्रकार केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत परीचारिकेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ग्रामिण रुग्नालय कोपरगाव येथे रात्र पाळी डयुटीस आसताना आरोपी तहसीलदार विजय बोरुडे हे अवेळी दारू पिऊन येऊन फिर्यादीस तुमचे मेन अधिकारी कोण आहेत. असे म्हणुन फिर्यादिने दिलेला डयुटी तक्ता फेकून देऊन वैद्यकीय अधिकारी यांना फिर्यादीचे फोन वरून शिवीगाळ करून फिर्यादीचे सोबत डयुटीस असलेला कक्ष सेवक सचिन टोंबरे यांना दवाखाण्याच्या बाहेर काढून दिले व फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्या नंतर तेथे असलेले पेशंटची नातेवाईक मुलगी हिला आवाज देऊन तीला जवळ बोलून शिवीगाळ करत हॉस्पीटल बाहेर निघुन गेले आहे. असे सर्व घडल्याला प्रकार सांगितले आहे 



मराठी भाषा गौरव दिन निमित्त सर्व हित चिंतक सदा आपुलकी व प्रामाणिक पणे स्नेह ठेऊनारे सा : राज प्रसारित मराठी भाषे्तिल वार्ता पत्र इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया पोर्टल वाचकाण,चे अभार - तथा- हार्दिक अभिनंदन व मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🌹🥀🌺🌷🌸🙏♥️ 🇮🇳

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.[१][२]
भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 347 नुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रपतींना राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद
मुख्य लेख : मराठी भाषा दिवस
अनेक वेळा सर्व सामान्य माणसा कडून 'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी भाषा दिवस' याची गफलत केली जाते.
१ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून "१ मे" दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला. सन १९६६ पासून तो अंमलात आला.[३][४] १ मेेे रोजी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने घोषणा करीत असतांना वसंतराव नाईक यांनी मांडलेले मराठी भाषा दिनाचे मांडलेले विचार प्रेरक होते. वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करीत प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना केली. राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले. अनेक मराठी लोकांसाठी व आधिकाऱ्यांसाठी 'राजभाषा परिचय' पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. 'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी भाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे.
*********************************
---------------------------------------
===========================
सा :राज प्रसारित, (संपादक ) राजु मिर्जा...!
सा :राज प्रसारित,( कार्यकारी )संपादक भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा...!!
इंडियन पिनल कोर्ट कायदे तज्ज्ञ (ऍडव्होकेट) आर के चौधरी पाटील  B.A.L.L.B -लॉ -प्रमुख :सलागार समिती...!!!





Saturday, February 25, 2023

नामांतरावरून एमआयएम संतप्त, घाणेरडे राजकारण जगासमोर आणण्याचा दिला इशारा ?


( ANI ) News Riportings,Ejancy समाचार.

आता औरंगाबादसाठी आमच्या शक्तीप्रदर्शनाची वाट पाहा. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव नामातंर करण्यास केंद्राने मंजुरी दिली. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे या निर्णयाचे राजकीय पदसाद उमटायला सुरूवात झाली आहे. एमआयएमने (Aimim) या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. जी-२० परिषदेच्या दरम्यानच आंदोलन करून भाजपचे घाणेरडे राजकारण जगासमोर आणण्याचा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
संभाजी महाराजांना आमचा विरोध नाही, पण त्यावरून सुरू असलेल्या राजकारणाला असल्याचे म्हणत मोठ्या शक्तीप्रदर्शनाला तयार राहा, असा इशाराच त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना दिला आहे. नामातंराच्या निर्णयानंतर इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी ट्विट करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
इम्तियाज जलील म्हणाले, या निर्णयाला विरोध करण्यासाठी मोठा लढा उभा करणार असून, रस्त्यावर उतरणार आहे. जी 20 परिषदेच्या औरंगाबादेतील बैठकी दरम्यानच आंदोलन करणार असल्याचे इम्तियाज यांनी स्पष्ट केले. फडणवीस साहेब हा जिल्हा माझा आहे, कोणाच्या बापाचा नाही. कोणीही माझ्या शहरात येईल आणि हे नाव द्या ते नाव द्या अशी मागणी करेल, सध्या हेच धंदे सुरू आहेत का ?
जी 20 परिषदेच्या बैठकीच्या दिवशी मी जर विरोध केला तर काय करणार मी जगासमोर तुमचे घाणेरडे राजकारण उघडे करीन. फडणवीस गृहमंत्री आहेत, त्यांना सांगतो, मी मोठ आंदोलन उभारणार. नामांतराच्या निर्णयामुळे एक औरंगाबादकर म्हणून मला दुःख झाले आहे. ज्या लोकांना या निर्णयामुळे आनंद होत आहे, त्यांना सांगू इच्छितो सरकार तुमचे आहे म्हणून तुम्ही निर्णय घेतला आहे.
यापुढेही तुम्ही असे निर्णय घेत राहाल, पण ज्यांचे नाव शहराला दिले, त्यांच्या नावाच्या दर्जाप्रमाणे शहर सुधारणार आहात का? आठ दिवसांनी मिळणारे पाणी उद्यापासून दोन वेळा पाणी मिळणार आहे का? असा सवाल देखील इम्तियाज यांनी उपस्थितीत केला. औरंगाबाद आमचे शहर आहे, होते आणि राहील.
आता औरंगाबादसाठी आमच्या शक्तीप्रदर्शनाची वाट पाहा. आपल्या लाडक्या शहरासाठी भव्य मोर्चा... आमच्या शहराच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपच्या शक्तींचा पराभव करण्यासाठी औरंगाबादवासियांनो सज्ज व्हा, आम्ही निषेध करतो आणि आम्ही लढू, असे ट्विट देखील इम्तियाज यांनी करत नामांतराचा विरोध दर्शवला आहे.















मुंबई :उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना आणि धनुष्यबाण निसटल्यानंतर त्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी ठाकरे यांची भेट घेतली. ?



(मुंबई) - समाचार - एजन्सी - उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं नाव, चिन्ह मेरिट कायाद्यानुसार निवडणूक अधिकारी यांनी निर्णय दिल्या नुसार गेलंय. पण सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल, अशी आशा केजरीवाल यांनी व्यक्त केली. त्याचवेळी दंगली-भांडणं आणि धार्मिक विद्वेषाचं राजकारण काही लोक सातत्याने करत असल्याचं सांगत केजरीवालांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. देशातील भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोट बांधली पाहिजे, अशी अपेक्षा या भेटीत केजरीवाल यांनी ठाकरेंजवळ व्यक्त केली, त्यामुळे येणाऱ्या काळात या भेटीचे रिझल्ट देशपातळीवर दिसतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर ठाकरेंना मोठा धक्का बसला. देशातील विविध पक्षाचे नेते ठाकरेंना फोन करुन धीर देतायत. तसेच नव्याने लढण्यासाठी आम्ही सोबत असल्याचा संदेश देतायत. अशातच आज मुंबई दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, खासदार संजय सिंग, खासदार राघव चढ्ढा यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तसेच ठाकरेंचा पाहुणचार घेतला. या भेटीत केजरीवाल यांनी ठाकरेंचं 
तोंड भरून कौतुक केले अस्थांना पुढे केझरीवाल म्हणाले बाळासाहेब वाघ च्या भुमिकेत शोभेल अश्या प्रकारे त्याचे स्वभाव होते, तुम्ही त्यांचे सुपुत्र, लढा-महाराष्ट्र तुमच्या सोबतीला.
सुप्रीम कोर्टही त्यांना न्याय देईल. तोपर्यंत महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक विजयी होतील, अशा शुभेच्छा केजरीवाल यांनी दिल्या. दरम्यान येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही ठाकरेंशी युती करणार का या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले, 'निवडणुका लागल्या की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील !!!
दिल्लीने कोरोना काळात मुंबई मॉडेल स्वीकारलं, ठाकरेंनी लै भारी काम केलं !!!

उद्धव ठाकरे यांच्याशी भेटण्याची मला खूप दिवसांपासूनची इच्छा होती. कोरोना ज्यावेळी पीकवर होता त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उल्लेखनीय काम केलं. दिल्लीने कोरोना काळात मुंबई मॉडेल स्वीकारलं, हे सांगायला मला कोणताच संकोच वाटत नाही, असं खुलेपणाने केजरीवाल यांनी सांगितलं.



          शब्द:रचना,संकलन.
( भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा )