राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, February 16, 2023

2024 ला स्वराज्य निवडणूक लढणार छत्रपती संभाजीराजे नि नाशिकमध्ये केली मोठी घोषणा ?

स्वराज्य संघटनेचे संस्थापक माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी 2024 च्या निवडणुका लढणारअसल्याची घोषणा नाशिक मध्ये केली आहे.
----------------------------------------------------
( नाशिक  ) - वार्ता -
नाशिक, 11 फेब्रुवारी : "मी चळवळीत काम करुन थकलोय, आता निर्णय घ्यावा लागेल", असे म्हणत माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. आज संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं.
[ रायतेत ले सर्व घटक सोबत घेऊन संविधानिक व प्रामाणिक तत्वाने राज्ये चालूवु,]___________________
====================================
वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये संभाजीराजे यांचा होणार भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलं होतं. नागरी सत्कारापूर्वी समर्थकांकडून संभाजीराजेंचा महाराष्ट्राच्या हृदयातील मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत फलकबाजी करण्यात आली. पन्नास वर्षांनंतर पहिल्यांदा संभाजीराजे यांचा अभिष्टचिंतन सोहळा कोल्हापूर बाहेर होत आहे. यावेळी संभाजीराजे यांनी संघटनेची पुढील भूमिका स्पष्ट केली.2024 निश्चित स्वराज्य लढणार : संभाजीराजे छत्रपतीमला मिळालेलं प्रेम कोणत्याही नेत्याला मिळणार नाही. स्वराज्य संघटना स्थापन केली. मात्र, किती दिवस चळवळीत काम करायचं? कार्यकर्त्यांवर अनेक खटले आहेत ते कोण सोडवणार? 2013 साली सगळे एकत्र आले. मागण्या मान्य झाल्या. 2000 विद्यार्थ्यांची चूक नसताना त्यांना बाद केलं. त्यासाठी मी आमरण उपोषण केलं. किती दिवस स्वराज्य संघटना चालवायची. ज्याच्याकडे पैसे तोच आमदार खासदार होणार का? लोक म्हणतात की तुम्ही सत्तेत या. स्वराज्य 101 टक्के राजकारणात आल्याशिवाय राहणार नाही, अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. 2024 हे निश्चित ध्येय असणार आहे.
संस्कृतीक परी भाषा काव्ये.
श्री अतुल चव्हाण मुख्ये अभियंता सा बा (प्रादेशिक ) विभाग पुणे 
----------------------------------------------------
====================================
आमचा तुम्हाला विरोध नाही, पण स्वराज्य सुद्धा असणार हे निश्चित. शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी कामाला लागू. माझ्यासाठी नाही पण गरिबांना ताकद देण्यासाठी आता स्वराज्य येणार आहे.वाचा - मनसेनंही आपला मोर्चा ठाण्याकडे वळवला; राज यांच्या खेळीने मुख्यमंत्र्यांना बळ मिळणार?'मी चळवळीत काम करुन थकलोय, आता निर्णय घ्यावा लागेल. चळवळीत काम करणारे फक्त काम करतात. त्यांनी जनसेवेसाठी सत्तेत यायचे कि नाही स्वराज्य किती दिवस सामाजिक राहणार, मी आज वाढदिवसानिमित्त मुद्दाम सांगायचंय स्वराज्य संघटना घेऊन आम्ही महाराष्ट्र पिंजून काढायला गालो पन खुप प्रश्न दिसले व ते सोडविण्यासाठी स्वराज्य हे 101% राजकारणात येणार बऱ्याच दिवसानंतर आम्ही तिघे एकत्र आलो आहे. ज्यांनी मला सांगितलं की आम्ही घर सांभाळतो तुम्ही समाजाची सेवा करा, अशा माझ्या पत्नी यांचे देखील आभार. अनेकदा भाषण करण्याची संधी मिळते. पण 52 वर्षात पहिल्यांदा माझा वाढदिवस कोल्हापूर सोडून नाशिकमध्ये साजरा करतोय. शिवाजी महाराज महाराष्ट्रात सुरतेची लूट करून येत असताना आधी नाशिकला आले. म्हणून आज नाशिकला वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. मी 4 कोटीच्या गाडीतुन फिरत नाही. हेलिकॉप्टरमधून प्रवास करत नाही. दिवसाला 15 तास प्रवास करतो. पण आता रात्री प्रवास करत नाही. माझ्यात कुठून शक्ती आली मला माहिती नाही. मनापासून बोलावलं की मी कार्यक्रमाला पोहोचतोच. काही लोक कॅमेरा घेऊन बांधावर जातात. फोटो काढले की निघातात. मात्र, संभाजी छत्रपती तुमच्यासारखाच राहतो, असेही संभाजीराजे म्हणाले.  (शायR मिर्जा.)

No comments:

Post a Comment