राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, February 1, 2023

अर्थसंकल्पातून आकड्यांचा संख्या वारी मोदी सरकारच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांची फक्त जुमलेबाजी नेहमीप्रमाणे तेच ते असल्याची टीपणी श्री छगन श्रभुजबळ कडून ?


( मुंबई ) - ANI - News - Ajancy - सेवा (Nashik) केंद्रीय अर्थमंत्री (Centre) निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी मोदी सरकारच्या (Narendra Modi) कार्यकाळातील नववा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. तो आगामी लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ जुमला आहे. यंदाचा  तेच ते अर्थसंकल्प हा फक्त आकड्यांचा धूर आहे. त्यातून सर्वसामान्यांच्या हाताला काहीच लागणार नाही, अशी टिका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे. (Ordinery class people nothing get from centre`s this budget)
श्री. भुजबळ म्हणाले, मागील काही वर्षात अर्थसंकल्पातून केलेल्या घोषणांचे नेमके काय परिणाम कारक प्रगतीशील घडलं याचं उत्तर अनुत्तरीत आहे. मोदी सरकारकडून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे जुमलेबाजी कायम आहे.
एकीकडे देशाचा अर्थसंकल्प मांडला जात असतांना नुकताच इंडियन बर्ग या संस्थेने अदानी समुहाबाबत संशोधनात्मक विश्लेषण केले आहे. त्यानंतर लगेचच अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मोठी घसरण झाली. या अदानी समूहाला एलआयसी सारख्या शासकीय संस्थांनी अर्थसहाय केलं आहे. शासकीय उपक्रमांनी खाजगी उद्योगांना सहाय केल्यामुळे हे खाजगी उद्योग डुबले तर या शासकीय संस्थाचे मोठं नुकसान होणार आहे. चुकीचे निर्णय घेतले तर ज्याप्रमाणे दिवाळखोरीमुळे श्रीलंकेची परिस्थिती झाली त्याप्रमाणे आपली परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केवळ अर्थसंकल्पाचे रक्कम फुगवून दाखवत येणार नाही.





No comments:

Post a Comment