( नाशिक ) - वार्ता - पोलीसनामा ऑनलाइन – शेत जमिनीचा भूमि अभिलेख कार्यालयाने तयार केलेला हिसा नमुना 12 मध्ये लिखाण प्रमादाची चूक दुरुस्त करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाचा अधीक्षक (Superintendent of Land Records) महेशकुमार महादेव शिंदे (Mahesh आणि लिपिक अमोल भीमराव महाजन यांना 50 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) नाशिक एसीबीच्या (Nashik ACB Trap) पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. नाशिक एसीबीच्या (Nashik ACB Trap) पथकाने ही मंगळवारी (दि.31 जानेवारी) शिंदे यांच्या कार्यालयीन दालनात कारवाई दाखल केली.
नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शेत जमिनीचा भूमि अभिलेख कार्यालयाने तयार केलेला हिसा नमुना 12 मध्ये लिखाण प्रमादाची चूक दुरुस्त करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाचा अधीक्षक (Superintendent of Land Records) महेशकुमार महादेव शिंदे आणि लिपिक अमोल भीमराव महाजन यांना 50 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) नाशिक एसीबीच्या (Nashik ACB Trap) पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. नाशिक एसीबीच्या पथकाने ही कारवाई मंगळवारी (दि.31 जानेवारी) शिंदे यांच्या कार्यालयीन दालनात केली.
याबाबत तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे (Nashik ACB Trap) लेखी तक्रार केली आहे. तक्रारादार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेत जमिनीचा भूमि अभिलेख कार्यालयाने तयार केलेला हिसा नमुना 12 मध्ये लिखाण प्रमादाची चूक झाली होती. ही चूक दुरुस्तीचे आदेश देण्यासाठी महेशकुमार शिंदे यांनी 1 लाख 80 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती एक लाख रुपये देण्याचे ठरले होते.
तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पथकाने पडताळणी केली. त्यावेळी भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक महेशकुमार शिंदे याने तक्रारदार यांच्याकडे 1 लाख 80 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 1 लाख रुपये लाच मागतिली. त्यापैकी 50 हजार रुपये लाच घेताना शिंदे यांना त्यांच्या दालनात रंगेहात पकडण्यात आले. तर लिपीक अमोल महाजन याने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहित केले. दोघांविरुद्ध बुधवारी (दि.1 फेब्रुवारी) सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीच्या पथकाने कारवाई केली.
No comments:
Post a Comment