राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, February 3, 2023

विधीमंडळ आणि मंत्रालयात वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्षपदी महेश पवार तर कार्यवाहीपदी प्रविण पुरो ?

( मुंबई ) - वार्ता - मंत्रालय आणि विधिमंडळ वर्ताहर संघाच्या सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदी मुंबई लक्षदीपचे प्रमोद डोईफोडे यांची बहुमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदासाठी 'टीव्ही ९'चे पत्रकार महेश पवार (५८ मते) तर कार्यवाह पदी 'रायगड टुडे'चे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो (८५ मते) आणि कोषाध्यक्ष पदी 'भास्कर'चे वरिष्ठ पत्रकार विनोद यादव (६७ मते) यांची निवड करण्यात आली. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या निवडणुकीत १५९ सदस्यांनी मतदान केले. अध्यक्ष पदासाठी प्रमोद डोईफोडे आणि राजा अदाटे यांच्यात लढत झाली. प्रमोद डोईफोडे हे ७८ मतांनी विजयी झाले. कोषाध्यक्ष पदी 'भास्कर'चे पत्रकार विनोद यादव हे ६७ मतांनी निवडून आले. कार्यकारीणीवर 'इंडियन एक्स्प्रेस' चे पत्रकार अलोक देशपांडे (७१मते), 'लोकमत' चे पत्रकार मनोज मोघे (६८मते), 'लोकशाही' कमलाकर वाणी (६१ मते), दै. 'सांज महानगरी' चे पत्रकार खंडूराज गायकवाड (५९ मते), 'डेक्कन क्रॉनिकल'चे भगवान परब (५८ मते) निवडून आले. दर दोन वर्षांनी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाची निवडणूक होते. प्रमोद डोईफोडे यांनी यापूर्वी उपाध्यक्ष, कार्यवाह म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती. जेष्ठ पत्रकार राजन पारकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्तम प्रक्रिया राबविलेली आहे 


No comments:

Post a Comment