उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्या शि चर्चाकरताना महाराष्ट्रसाहित्य साहित्य परिषद,पुणे चे कार्याध्यक्षप्रा. मिलिंद जोशी.
उपमुख्यमंत्र्यांकडे कार्याध्येक्षाची म.सा.प.मागणी -----------------------------------------------------------------
( पुणे )- वार्ता - वर्धा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी साहित्य संस्थांच्या प्रतिनिधीचे व साहित्यिकांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी नेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली. वर्धा येथे 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशीच्या सत्राचा प्रारंभ करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी वर्ध्या येथे उपस्तित होते. यावेळी प्रा. मिलिंद जोशी यांनी त्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन त्यांना सादर केले.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने लोकचळवळ उभी केली. पंतप्रधान कार्यालयाला एकलाख पत्रे पाठविली. साहित्यिकांच्या बैठका, त्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन, राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी त्यांच्या भेटीगाठी, अशा अनेक गोष्टी केल्या. एवढेच नव्हे तर राजधानी दिल्लीतही आवाज उठविला. आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता होऊनही अद्याप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. तो
मिळणे ही मराठी माणसांसाठी अभिमानास्पद गोष्ट असणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी साहित्य संस्थांच्या प्रतिनिधीचे व साहित्यिकांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीसाठी घेऊन जावे, अशी विनंती जोशी यांनी फडणवीस यांच्याकडे केली.
No comments:
Post a Comment