राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, February 15, 2023

आनंदाची बातमी (Good News) सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी ?

(नाशिक) - वार्ता - समाचार.
--------------------------                           सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या  संघटनांकडून अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येण्याशक्व्य.
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना सध्या असलेली ३० लाख रुपयांच्या कामांसाठी टेंडरमध्ये (tender) सहभागी होण्याची मर्यादा आता ७५ लाखापर्यंत वाढवण्यासाठी या प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी लवकरच जिल्हा परिषदेच्या कामांसाठी सुशिक्षित बेरोजगारांना टेंडरमध्ये सहभागी होण्याची मर्यादा वाढवून ७५ लाख रुपये करणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे. असे झाल्यास सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना मोठ्या कामांच्या टेंडरमध्ये सहभाग घेता येणार आहे.प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यास नोकरी (job) देऊ शकत नाही, म्हणून सरकारने त्यांना सरकारी बांधकाम क्षेत्रातील कंत्राटे घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दहा लाख रुपयांच्या आतील कामांमध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ३३ टक्के कामे दिली जातात. त्याचप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना जिल्हा परिषद (zilha parishad) व सार्वजनिक बांधकाम विभागातील (Department of Public Works) बांधकामाची कंत्राटे घेण्यासाठी ३० लाख रुपयांपर्यंत टेंडरमध्ये सहभागी होता येते. मात्र, ही मर्यादा ठरवण्याला अनेक वर्षे झाली आहेत. त्यामुळे ३० लाख रुपयांची मर्यादा आता अपुरी पडत असल्यामुळे ती वाढवण्यात यावी, अशी मागणी या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची गेल्या पाच वर्षांपासून आहे.
राज्य अभियंता संघटनेने तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर वेळोवेळी सचिवांच्या तीन बैठका मुंबईला (mumbai) पार पडल्या. त्यांनी याबाबत सकारात्मक अहवाल सादर केला होता. मधल्या काळात हे प्रकरण मागे पडले असले तरी आता विद्यमान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Rural Development Minister Girish Mahajan) यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल व जिल्हा परिषदेत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ७५ लाख रुपयांच्या कामांच्या टेंडर प्रक्रियेत सहभागी होता येईल, असे सांगितले आहे.सुशिक्षित बेरोजगा अभियंत्यांना दहा लाख रुपयांच्या आतील कामे काम वाटप समितीच्या माध्यमातून दिली जातात. तसेच त्यांना वर्षाला ५० लाख रुपयांपर्यंतची कामे घेता येतात. त्याचप्रमाणे खुल्या टेंडर प्रक्रियेत ३० लाख रुपयांपर्यंत सहभागी होता येते व एका वर्षभरात दीड कोटी रुपयांपर्यंतची कामे करता येतात. ही मर्यादा ७५ लाख रुपयांपर्यंत गेल्यास सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचा खुल्या टेंडर प्रक्रियेतील सहभागी वाढू शकेल, असे राज्य अभियंता संघटनेचे म्हणणे आहे.





No comments:

Post a Comment