( नाशिक ) - समाचार -
समाजातील गरजू व वंचित घटकांच्या मदतीसाठी नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित 21 व्या नाशिक रन मध्ये महात्मा नगर क्रीडांगणावर हजारोंच्या संख्येने नाशिककरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी संगीताच्या तालावर उपस्थित स्पर्धकांना वॉर्म अप करायला लावण्यात आले.यावेळी नवीन तोलाणी इन्स्टिट्युट च्या वतीने नृत्य सादरीकरण करण्यात आले. यावेळी ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने नाशिक रनचीसुरवात करण्यात येऊन क्रीडापटूंच्या हस्ते नाशिक रनच्या ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून व ध्वज दाखवून मॅरेथॉनची सुरवात करण्यात आली.
यावेळी लहान मुलांसाठी नाशिक रन चा शुभारंमहात्मानगर क्रीडांगणापासून रिलायन्स फ्रेश,पारिजात नगर,वर्ल्ड ऑफ टायटन, मधुइलेक्ट्रानिक्स, परत समर्थ नगर,पारिजात नगर,सिक्स सिग्मा हॉस्पिटल व महात्मा नगर.त्याचप्रमाणे प्रौढांसाठी महात्मा नगर,रिलायन्स फ्रेश,पारिजात नगर, वर्ल्ड ऑफ टायटन,रॉकेट सर्कल,
जेहान सर्कल, स्वामी समर्थ सर्कल ,आयसीआयसीआय बँक एटीएम परत रॉकेट सर्कल,समर्थ नगर,पारिजात नगर,सिक्स सिग्मा हॉस्पिटल महात्मानगर ,बंजारा हॉटेल व परत महात्मा नगर क्रीडांगण असा रन चा मार्ग होता.
मॅरेथॉन नंतर नाशिक रन 2024 चे आयटीडीकेकडून बॉशकडे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, नाशिक रनचे
अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी, उपाध्यक्ष आर. आर. भुयांन, सचिव अनिल दैठणकर, राजाराम कासार, ए अनंथरामन, प्रबल रे, मुकुंद भट, अशोक पाटील,श्रीकांत चव्हाण, सुधीर येवलेकर, उत्तम राठोड, रमेश जी आर, करीन गीलगिस, अविनाश देशपांडे, कलोल सहा, गगन बन्सल, नाशिक रन चे स्वयंसेवक स्नेहा ओक, नितिन देशमुख, राजू माने, गोविंद बोरसे सचिन शिलोथे,
वासुदेव भगत आरटीओ नाशिक, संचालक सुमित बजाज, शशांक बेथारिया, डी के राय, टी बी चौधरी, आकाश कसोदकर, दयानंद कुलकर्णी,अरविंद पाटील, पल्लवी पांडे, राहुल संघवी, रणजित कोपिकर यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी लकी ड्रॉ द्वारे स्पर्धकांसाठी बक्षिसांची लयलूट करण्यात आली. यावेळी डिजिटल स्क्रीनवर नाशिक रनचा हेतू व राबविण्यात आलेले प्रकल्प व विविध उपक्रमांच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले. नाशिक रनचे सचिव अनिल दैठणकर यांनी उपस्थितांचे व सर्व सहकारी संस्थांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment