राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, February 19, 2023

छत्रपती संभाजी महाराजांची पहिली प्रतिक्रिया ठाकरे कडून नाव चिन्ह गेलेत अस्थांना म्हणाले, शिंदेंना आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ?

( नाशिक ) - वार्ता - धुळे येथे  युवराज माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांचे धुळे शहरांमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. त्या नंतर यावेळी चक्क जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून छत्रपती संभाजी महाराज यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
शिवजयंती निमित्ताने धुळे शहरात पवनपुत्र विजय व्यायाम शाळा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शन सोहळ्याचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आताच्या सरकारने आताच्या पुढाऱ्यांनी नुसता शिवाजी महाराजांचा जयजयकार करून चालणार नाही तर, छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार आत्मसाद करणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांचे स्मारक हे जिवंत ठेवायचे असेल तर सर्व गडकोठ किल्ल्यांचे संवर्धन केव्हा करणार आहेत असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.
भारतीय निवडणूक आयोग हे स्वतंत्र आयोग आहे, सर्वांनी त्याचा आदर करावा. ज्यांना चिन्ह व नाव मिळालंय त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. लोकांना काही घेणंदेणं नाही, कोणाला कोणतं चिन्हं मिळालं लोकांना इतकच माहिती आहे. मागील अडीच वर्षात अस्थिर सरकार असल्यामुळे बरीच कामं झाली नाहीत,आता तुम्ही अडीच वर्षात काय करून दाखवणार आहेत, याची लोक वाट पाहत आहेत. चिन्ह मिळून सगळ्या गोष्टी साधू शकत नाही. साधायचेच असेल तर लोकांची सेवा  मना पासून करा व रायतेस सर्व घटक सोबत घेऊन शिकर गाठा व मंग यश प्राप्त करा प्रलंबीत प्रश्न त्यांनी सोडवावे, अशी प्रतिक्रिया संभाजी महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.















No comments:

Post a Comment