राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, February 22, 2023

खंडाळा येथे दोन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कारकरणाऱ्याविरोधात समाजवादी पार्टीकडून फास्ट ट्रॅककोर्टात खटला चालविण्याची मागणी ?

(श्रीरामपूर) खंडाळा येथे दोन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार निचकृति करणाऱ्याविरोधात समाजवादी पार्टीकडून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची मागणी
श्रीरामपूर (इम्रान शेख प्रतिनिधी) येथील खंडाळा गावातील एका दोन वर्षाच्या चिमुकलीवर ६५ वर्षाच्या भास्कर मोरेने बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघड आली आहे. या संदर्भात समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्या वतीने देण्यात आलेल्या लेखी निवेदनात म्हंटले आहे की,  खंडाळा येथे दोन वर्षाच्या छोट्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्ती विरोधात तत्परतेने फास्ट ट्रैक कोर्टात दाखल होऊन त्या नराधमाला लवकरात लवकर कठोरातील कठोर शिक्षा व्हावी तसेच सदर बाब ही अत्यंत निंदनीय असून मानवाला काळीमा फासणारी असून तीव्र शब्दात निषेध करीत त्याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. सदरच्या प्रकरणात प्रशासनाने लक्ष घालावे याकरिता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक
 परिक्षेत्र नाशिक, पोलीस अधीक्षक अहमदनगर,
उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर तहसीलदार तथा दंडाधिकारी, पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस स्टेशनला यांना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
यावेळी तौफिक शेख, आसिफ तांबोळी, कलीम शेख, इम्रान मन्सूरी, संजय वाघ आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.





No comments:

Post a Comment