(संगमनेर) - प्रतिनिधि - वार्ता -
पाच जिल्ह्यांतील बारा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धुमाकूळ घालणार्या मोटारसायकल चोरांच्या तीन जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात संगमनेर शहर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून 20 लाख रुपये किमतीच्या 52 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 22, ओझर व सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी दोन, इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन सातपूर औद्योगिक वसाहतीतून एक, पुणे जिल्ह्यातील मंचर आणि चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मालेगावमधून दोन आणि चक्क मध्य प्रदेशातील सेंधवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही त्यांनी एक मोटारसायकल मोटर सायकलची चोरी केली होती.
तपासी पथकातील प्रभारी उपअधीक्षक संजय सातव, शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस उपअधीक्षकाच्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, अमृत आढाव, प्रमोद गाडेकर व अप्पर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातील सायबर सेलचे पोलीस नाईक फुरकान शेख व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव यांनी ही कामगिरी बजावली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या पथकाचे कौतुक केले आहे.
51 गाड्यां ज्यांच्याकडे सापडल्या त्यांना आरोपी का करण्यात आले नाही त्यामुळे या कारवाईवर संशयाची सुई ठेवण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होत आहे चोरीची गाडी विकत घेणारा हा देखील आरोपी केला जातो पण या कारवाईमध्ये तसे होताना दिसले नाही त्यामुळे या कारवाईत विशेष पथकाचे हात मलिद्याने बरबटले तर नाही ना असा प्रश्न संगमनेरातील सुज्ञ नागरिकांना पडला आहे.संगमनेर, राजूर, श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी व नेवाशातील चोरल्या गाड्यासंगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी करण्यात आलेल्या 18,संगमनेर तालुका, घारगाव व आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक, राजूर, श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी व नेवासा येवून चोरलेली प्रत्येकी एक व अद्यापपर्यंत माहिती समोर न आलेल्या सहा अशा एकूण 51 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या असल्याचे समजते.
------------------------------------------------------------------------================================================================================================================-===================================
कायदे.तज्ज्ञ... ✍️✅️🇮🇳 इंडियन पिनल कोर्ट सलागार.समिती.राजस्तर.(ऍडव्होकेट).आर. के.चौधरी पाटील B.A.L.L B.
====================================================================================================================================================------------------------------------------------------------------------