राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, March 16, 2023

धार्मिक कट कारस्थान तेढ सोशल मिडिया वरील निर्माण करणार्‍यांना जेलची हवा खावी लागेल आय.टी.अ‍ॅक्ट कलम.नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल पोलीस अधिक्षक ओला यांचा इशारा ?

(अहमदनगर) - प्रतिनिधि - वार्ता अनेक दिवसांपासून जिल्ह्यात धार्मिक कट कारस्थान तेढ निर्माण करणार्‍या विषयात वाढ झाली आहे. काही समाज कंटकांकडून सोशल  मिडिया व्दारे धार्मिक तेढ निर्माण करणारे व अफवा पसरविणारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केले जात आहेत. यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा प्रकारचे संदेश कोणीही खात्री न करता सोशल मिडिया व्दारे प्रसारित करण्यात येऊ नये, अन्यथा सदर व्यक्ती विरूध्द माहिती व तंत्रज्ञान कायदा (I T Act ) अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी दिला.
जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या घटना घडत आहेत. नुकतीच शेवगाव तालुक्यात तशी घटना समोर आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान काही समाजकंटकांकडून जाणिवपूर्वक सोशल मिडियाव्दारे धार्मिक तेढ निर्माण करणारे व अफवा पसरविणारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. नागरिक सदर मजकुराची कोणतीही शहानिशा न करता सदरचे संदेश पुढे पाठवित असतात.
त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा व लोकांन चा गैरसमज पसरून कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक शांतता व सलोखा शिस्थ भंग होण्याची शक्यता निर्माण होत असते. कोणत्याही प्रकारच्या सोशल मिडियावरून (व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर इत्यादी) आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. नागरिकांनी ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा शिस्थ भंग प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारचे संदेश कोणीही खात्री न करता सोशल मिडियाव्दारे प्रसारित करू नये, अन्यथा सदर व्यक्ती विरूध्द माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असा इशार अधिक्षक यांनी दिला आहे.
-----------------------------------------------------
सायबर क्राईम ब्रँच पोलिसांचा वाचिंग.
===================================

धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश सोशल मिडियावर खात्री न करता पुढे प्रसारित केले जातात. यामुळे तेढ निर्माण होत असल्याचे प्रकार घडत आहे. यावर येथील सायबर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. धार्मिक तेढ निर्माण करणारे अक्षेपार्ह चूकीचा संदेश पसरविणार्‍या सर्व प्रकारच्या सोशल मिडियावर सायबर पोलीस दक्षताने लक्ष  पुर्ण पणे ठेवून आहे. अधीक्षक राकेश ओला, अपर अधिक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक प्रतिक कोळी व त्यांची टिमचा सोशल मिडियायावर दक्षता ने ‘वॉच’ राहणार आहे.























No comments:

Post a Comment