राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, March 17, 2023

चोरटे २४ तासांत पकडले कंपनीत चोरी करणारे ६ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त ?

(नगर ) - प्रतिनिधी - वार्ता - एमआयडीसीतील कंपनीचे स्टोअररुम फोडून ८१ हजार ७५० रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेणाऱ्या चोरट्यांना एम आय डी सी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच काही तासांत दक्षता पूर्वक शिथाफिने पकडले असून, त्यांच्याकडून चोरीच्या साहित्यासह ६ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे एम आय डी सी तिल स्पेशालिटी एन्टरप्रायझेस कंपनीच्या स्टोअररुमचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करत ८१ हजार ७५० रुपये किंमतीच्या प्लॅस्टिक दाण्याच्या गोण्या चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी राजू लक्ष्मण (रा. रेणावीकरनगर, सावेडी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा सचिन टकाराम भगत (रा. सुपा ता. पारनेर) व पवन शंकर
जगताप (रा. शेंडी बायपास रोड, मोहिणीनगर, नवनागापुर ता. नगर) यांनी केला असल्याची माहिती स.पो. नि. राजेंद्र सानप यांना मिळाली. स.पो. नि. राजेंद्र सानप, स.फौ. रावसाहेब लोखंडे, संदिप खेंगट, मच्छिद्र पांढरकर, चांगदेव आंधळे, किशोर जाधव, सचिन हरदास यांच्या पथकाने दोघा आरोपींना पकडून त्यांच्याकडून चोरीला गेलेले साहित्य व त्यासाठी गुन्हयात वापरलेला टाटा कंपनीचा टॅम्पो जप्त केला असल्याचे समजते 






No comments:

Post a Comment