राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, March 22, 2023

राज ठाकरे च्या सभे पूर्वी मनसे कडून शिवसेना भवना समोरच बॅनरबाजी व प्रचंड प्रमाणात भगव्या रंगाच्या पताक्या निदर्शनिय ?

(मुंबई) - प्रतिनिधि - वार्ता -
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज मुंबई येथील शिवाजी पार्क ( Raj Thackeray Shivaji Park Sabha) परिसरात पार पडणार आहे. गुढी पाडव्यानिमित्त मनसे (MNS Gudi Padwa Melava) द्वारा आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांची भाषणातून तोफ धडाडणार आहे.
तत्पुर्वी मनसेकडून सेना भवन परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. गुढीपाडवा मेळावा निमित्त मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत.महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री.मराठा हिंदुजननायक राज ठाकरे या आशयाचे बॅनर सेनाभवना समोर लावण्यात आले आहेत. दादर उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असल्याच
शिवसेना भवनाच्या समोरच हे मोठे बॅनर्स लावण्यात आल्याने हे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवाजी पार्क मैदानाकडे जाताना जिप्सी हॉटेल च्या समोर हे बॅनर्स दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. तसेच हा संपूर्ण परिसर भगव्या रंगाच्या पतक्यांनी सजवला आहे
त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला असल्याचे निदर्शनास येत आहे. याशिवाय चलो शिवतीर्थ असे लिहिलेले सभेचे बॅनर्सही संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आले आहेत. मात्र, या बॅनर्समुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून राज ठाकरे यांना त्री पदाचे दावेदार म्हणून सादर केले जाणार का असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे.
















No comments:

Post a Comment