( श्रीरामपूर ) - प्रतिनिधि - वार्ता - खंडाळा गावात तीन ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या झाल्या. येथील अरुण ज्ञानदेव मरकडे यांच्या बंद घराचा कोयंडा तोडून घरातील कपाट उघडून त्यातील रोख 55 हजार रुपये तसेच अडीच तोळे सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास केली. यावेळी शेजारच्या खोलीमध्ये मरकडे
कुटुंबीय झोपलेले होते चोरी करताना चोरट्यांनी त्या घराची बाहेरून कडी लावून घेतली होती.सकाळी झोपेतून उठल्यावर बाहेरून कडी लावल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यानंतर बाळासाहेब पुरोहित यांचे घरी बंद घराचे कुलूप तोडून आतील सामानाची उचकापाचक केली. त्या घरामध्ये श्री. पुरोहित यांच्या भगिनी राहतात. त्या बाहेरगावी गेलेल्या असल्यामुळे नक्की घरातून काय गेले हे त्यांना सांगता आले नाही.
त्यानंतर चोरट्यांनी नामदेव विठ्ठल ढोकचौळे यांचे बंद घराचे कुलूप तोडून त्यांच्याही घरात उचक पाचक केली. श्री. ढोकचौळे सध्या त्यांच्या मुलाकडे नगरला राहतात. श्री. मरकडे यांच्या मोठ्या बंधूंची गतवर्षी याच महिन्यचोरी झाली होती. त्या चोरीचा पोलिसांनी शोध लावला होता. गेलेल्या सोन्यातून काही सोने श्री. मरकडे यांना परत मिळाले होते. पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदर घटनेची माहिती घेतली. तसेज सदर घडल्याले प्रकरण संदर्भात पालक ठेऊन घरफोडी चोरी करण्याचा उद्धेश बहुतेक पूर्ण पणे चोरांनी केला असावा असं प्राथमिक संभ्रम निहाय अंदाज पोलीस खात्या मार्फत लावण्यात येत आहे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment