(मुंबई) - प्रतिनिधि - वार्ता - बनावट औषध विक्री रोखण्यासाठी येत्या काळात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक औषधाची माहिती रोवण्यासाठी या उत्पादकक्रेते ग्राहक यांच्यासाठी एक संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) विकसित करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. बनावट औषधे विक्री करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का
लावण्यासोबतच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यासाठी विचार करू, असे राठोड म्हणाले.
४ हजार ५०० बनावट इंजेक्शनची विक्री करण्यात आल्याची बाब तपासात समोर आल्याचा तारांकित प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. या चर्चेत आमदार अभिजीत वंजारी, अँड. अनिल परब, भाई जगताप, अॅड. मनीषा कायदे आदींनी उपप्रश्न विचारले. याला उत्तर
देताना मंत्री राठोड म्हणाले, संबंधित हॉस्पिटलमधील औषध विक्री (मेडिकल) दुकानातून घेतलेले पेशी वाढवण्यासाठी दिले जाणारे इंजेक्शन बनावट असल्याचे तपासात उघडकीस आले.
तेथून ७ बनावट इंजेक्शन ताब्यात घेतली. पोलिसांनी बनावट औषधे विक्री साखळीचा शोध सुरू केला. यात १२ विक्रेत्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून ५ जणांचे परवाने रद्द केले आहेत. ही औषध विक्री साखळी दिल्ली
परीयंत असल्याचे समोर आले. तीन आरोपींना अटक केल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात एकूण १ लाख १८ हजार परवाने अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिले आहेत. तपासणी दरम्यान ८९ हजार किरकोळ विक्रेते २८ हजार ८५५ पाऊक विक्रेते आणि ९९६
उत्पादकांची तपासणी करण्यात आली. यात २ हजार ४५० परवाने निलंबित करण्यात आले असून ५५२ परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहेत, अशी माहितीही मंत्री संजय राठोड यांनी मांडले असे सांगण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment