राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, March 24, 2023

जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे नांदेड मध्ये संदेश ?

( नांदेड ) - वार्ता - जुनी पेन्शन योजना (old pension scheme)काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळातच बंद करण्यात आली, . शिंदे-फडणवीस सरकार या योजनेबाबत सकारात्मक असून ती लवकर कशी सुरू होईल, यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी ग्वाही भाजपचे नेते, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नांदेडमध्ये बोलताना दिली.                                                           
तसेच, राज्यातील निवडणुकांमधील प्रचारात सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला, तो म्हणजे जुनी पेन्शन योजना अवघ्या महिन्याभरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनाही या योजनेवरुन केलेल्या वक्तव्यावरुन पुनर्विचार करायला भाग पाडले आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड आणि पंजाब या बिगर भाजप राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे.           
गिरीश महाजन म्हणाले, जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून लवकरच ही योजना लागू केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.                                                          
                दरम्यान, जुनी पेन्शन योजना रद्द करून नवी योजना लागू करावी, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आता करत आहेत; परंतु जुनी योजना रद्द करण्याचे काम त्यांच्याच सरकारने २००५ या वर्षी केले होते. माझा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ वगळता राज्यात त्यांचेच सरकार होते. मात्र आता चर्चा घडवून लबाडी करत असल्याची टीका फडणवीसांनी केली. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रश्नाबद्दल मी विधान परिषदेत सविस्तर उत्तर दिले, असेदेखील फडणवीस म्हणाले होते.

No comments:

Post a Comment