राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, March 24, 2023

प्रभु श्री रामनवमी यात्रा उत्सवाची जय्यत तयारी सुरु श्रीरामपूर ?

(श्रीरामपूर) - प्रतिनिधि - वार्ता - श्रीरामपूर शहरातील नागरिकांचे आराध्य दैवत व राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीरामपूरची प्रभू श्रीराम नवमी यात्रा गुरुवार दि. 30 मार्च रोजी सुरू होणार आहे. यात्रेचे हे 94 वे वर्ष आहे. तीन दिवस चालणार्‍या या यात्रा उत्सवाची श्रीराम नवमी यात्रा कमिटीच्यावतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या यात्रेकरिता राज्यातील विविध भागातून छोटे-मोठे व्यवसायिक, रहाट पाळणे त्याचबरोबर भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यादृष्टीने यात्रोत्सव मोठ्या आनंदाने व शांततेत पार पडावा याकरिता श्रीराम नवमी यात्रा उत्सव कमिटी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. गुरुवार दि. 30 मार्च रोजी दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव तसेच भजन, कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्याचबरोबर सायंकाळी
6 वाजता रथातून प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. तसेच वॉर्ड क्र. 7 मधील पाटाजवळ फटाक्यांची आतिषबाजी व शोभेचे दारूकाम केले जाते. यावर्षी रथाचे नवीन रंगकाम सुरू असून या रथावर पितळी कलश बसविण्यात येणार आहे. तसेच मंदिरावर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यात्रा उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्रीराम मंदिर येथे शुक्रवार दि. 31 रोजी सकाळी 10 वाजता ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हिंदू मुस्लिम सिख इसाई प्राचीन दीर्घ काळा पासून एकत्रित सह भागी होत असून गुना गोविंदाणे आनंदिय
रामनवमी यात्राचे प्रतीक ओळख ले जातात  तसेज पुर्ण राज्यात नाव लौकिक आहेत सायंकाळी 7 वाजता श्री शनि देवाची यात्रा व प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर यात्रेच्या तिसर्‍या दिवशी शनिवार दि. 1 एप्रिल रोजी दुपारी भारतातील प्रसिद्ध मल्लांचा कुस्त्यांचा फड हगामा होणार असून त्यानिमित्ताने राज्यातील अनेक नामांकित पैलवान येणारया हगाम्यासाठी विविध भागातून सुमारे 400 पेक्षा अधिक मल्ल येत असतात. त्यांच्या लहान मोठ्या कुस्त्या लावल्या जातात आणि बिदागी दिली जाते. तसेच आशिष बोरावके यांच्यावतीने त्यांचे वडील कै. अण्णासाहेब बोरावके यांच्या स्मरणार्थ व श्रीरामपूरचे प्रथम नगराध्यक्ष रामचंद्र बाळाराम महाराज उपाध्ये यांच्या स्मरणार्थ उपाध्ये परिवारातर्फे आणि श्रीरामपूर नगरपरिषदेच्यावतीने मानाच्या कुस्तीच्या पैलवानांना सुवर्णपदक दिले जाते. श्रीरामपूर शहरात गेल्या 93 वर्षापासून सुरू असलेल्या या श्रीराम नवमी यात्रा उत्सवासाठी शहरातील व परिसरातील व्यापारी, लहान-मोठे व्यावसायिक, विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी, सार्वजनिक संस्था, लोकप्रतिनिधी, श्रीराम मंदिर ट्रस्ट व शहरवासीयांचे मोठे योगदान लाभत असल्याचे श्रीराम यात्रा उत्सव कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी माहिती दिली आहे.

----------------------------------------------------
===================================
भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा...शब्द संकलन रचना
----------------------------------------------------
===================================

























No comments:

Post a Comment