( संगमनेर ) - प्रतिधी,- वार्ता - प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत महाराष्ट्रात अनेक रस्त्यांचे कामे सुरू असून संगमनेर तालुक्यातील मालदाड - सोनोशी ते चिंचोली गुरव, गुंजाळवाडी, राजापूर व इतर रस्त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र तांत्रिक मान्यता न मिळाल्याने काम सुरू होत नाही. तरी पावसाळ्यापूर्वी कामे सुरू होण्यासाठी तातडीने या कामांना तांत्रिक मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीद्वारे तांत्रिक मान्यते अभावी रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजुरीची मागणी करताना आमदार थोरात म्हणाले की, महाराष्ट्रात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा तीन अंतर्गत केंद्र सरकारकडून ४१२ रस्त्यांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील मालदाड- सोनोशी- बिरेवाडी- नान्नज दुमाला - चिंचोली गुरव आशा पीर बाबा चौफुली जिल्हा हद्द हा १९.१७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याला १५ कोटी १६ लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे.
तर राष्ट्रीय महामार्ग ६० घुलेवाडी फाटा ते गुंजाळवाडी राजापूर- चिखली वरपे वस्ती या ११ किलोमीटरच्या रस्त्याला ९ कोटी ६२ -लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. तसेच तिरंगा चौक संगमनेर नगरपालिका हद्द ते - मालदाड या ६ किलोमीटर रस्त्याकरीता ४ कोटी ३७ लाख रुपये मंजूर
आहेत. आणि दरेवाडी ते कवठे मलकापूर या ६ किलोमीटर रस्त्या करता ४ कोटी ६४ लाख रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता आहे. या कामांच्या निधी मंजुरीस दोन महिने उलटून गेले. तरी या रस्त्यांच्या कामांना तांत्रिक मान्यता दिली नाही. त्यामुळे ह्या रस्त्यांची कामे रखडली आहेत.
पावसाळ्यापूर्वी हे कामे होण्याकरता सरकारच्या ग्रामविकास विभागाने तातडीने या रस्त्यांच्या कामांना तांत्रिक मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार थोरात यांनी लक्षवेधीद्वारे विधानसभेत केली. यावर उत्तर -देताना ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन त्यांनी आजच तातडीने या रस्त्यांची रखडलेली तांत्रिक मान्यता देण्यात येईल, असे आमदार थोरात यांना सभागृहात आश्वासित केले.
-----------------------------------------------------
====================================
-----------------------------------------------------====================================
-विनम्र -निवेदन -सा :राज प्रसारित उत्तपत्र मध्ये सर्व लेखनशी (संपादक )सहमत असेल असे नाही. न्याय लय वाद नाशिक जिल्हा,न्यायलीन कक्षेत राहील......
-----------------------------------------------------
====================================
No comments:
Post a Comment