राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, April 10, 2023

नव्या नियमांना फेक न्यूज बाबतच्या एडिटर्स गिल्डचा विरोध ?


(नवी दिल्ली) - न्यूज - एजन्सी - फेक न्यूज अर्थात अ दर्जेदार बातम्या कोणत्या आहेत, हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार सरकारला देणाऱ्या कायद्यातील दुरुस्तीला पत्रकार, संपादकांची संघटना (एडिटर्स )गिल्ड ऑफ इंडिया'ने विरोध केला आहे.
सरकारलाच सर्वच शक्ती देणारे कायद्यातील हे बदल मागे घेण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.गिल्डने शुक्रवारी यासंदर्भात एक निवेदन जारी करत आपली भूमिका मांडली. सरकारने माहिती 
तंत्रज्ञान (मध्यस्थ दिशानिर्देश आणि डिजिटल मीडिया आचार संहिता) दुरुस्ती नियम मागे घ्यावेत. तसेच प्रसारमाध्यमांच्या संघटना व संस्थांसोबत सल्लामसलत करावी, असे गिल्डने म्हटले आहे. कायद्यातील दुरुस्ती व अंमलबजावणीबाबत सरकारने प्रसारमाध्यमांसोबत चर्चा विनिमय
करण्याचे आश्वासन दिले होते, याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. नव्या नियमांनुसार माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने स्वतःला एक फॅक्ट चेक युनिट स्थापन करण्याची शक्ती दिली आहे. याद्वारे एखादी बातमी खरी आहे की खोटी हे ठरवण्याचे सर्वाधिकार आयटी मंत्रालयाकडे
न्यायालयीन अवलोकन, अपील करण्याचा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाने सोशल मीडियावरील एखादी माहिती हटवण्यासाठी किंवा हैंडल ब्लॉक करण्यासाठी काही दिशानिर्देश निश्चित केले होते. परंतु सरकारच्या नव्या कायद्यात या दिशानिर्देशांचे पालन होत असल्याचे दिसत नाही. हे नैसर्गिक न्यायाच्या सिद्धांतांच्या विरोधात असून एक
प्रकारची सेन्सॉरशीप आहे, असा मुद्दा एडिटर्स ग्लिडने मांडला आहे. आयटी मंत्रालयाने प्रसारमाध्यमांशी संबंधित संस्था, संघटनांसोबत कोणत्याही चर्चेविना नव्या नियमांची अधिसूचना जारी केल्याबद्दल गिल्डने तर्क वितरक अवेदन व्यक्त केल्याचे समजत आहे.



















No comments:

Post a Comment