राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, April 11, 2023

बॅटऱ्या चोरणारे B S N L चे तिघांना गजाआड ठोकल्या हातकड्या नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेक्षण (LCB) फ्लाईंग स्कॉड पथक्काची सक्षम कारवाई ?

(श्रीरामपूर) - प्रतिनिधि - वार्ता - अकबर - शेख 
राहाता परिसरात तालुक्यातील रांजणगाव खुर्द येथील भारत संचार निगम लिमिटेड टेलीफोन एक्सचेंज मधील बॅटरी चोरी करून त्याची विक्री श्रीरामपूर येथे करीत असताना तिन आरोपींना नगर येथील गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या आरोपींना गजाआड करून त्यांच्याकडून जवळ पास १६ बँटऱ्या आणि पिकअप वाहन अशा एकुण ५ लाख २५ ह०० रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे.
श्रीरामपुरात चोरीचा माल घेणारे केंद्र
नगरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून चोरलेले भंगारासह आदी साहित्यांची श्रीरामपुरात खुलेआम खरेदी केली जात आहे. याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती
असूनही ते याकडे कानाडोळ करीत आहेत. चोरीचा माल विकत घेणाऱ्यांवर पोलिसांना कारवाई करण्याची मागणी होत आहे.
योगेश चंद्रकांत झाडीकर (वय ३८, धंदा नोकरी, रा. बीएसएनएल स्टाफ क्वॉर्टर, ता. राहाता) यांचे गणेशनगर जिल्हा परिषद शाळेसमोर, रांजणगाव (ता. राहाता) येथे असलेले बीएसएनएल टेलीफोन एक्सचेंजचे खोलीचा कडी-कोयडा तोडून आत प्रवेश करून खोलीतील २५ हजार ६०० रुपये किंमतीच्या १६ स्क्रॅप वॅट-
या अनोळखी इसमांनी चोरून नेल्या होत्या. सदर घटनेबाबत राहाता पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा हा आरोपी लुकमान शहा याने त्याचे दोन साथीदारासह केला असून चोरी केलेल्या बॅटऱ्या पांढरे रंगाचे पिकअप टेम्पोमध्ये भरुन विक्री करण्यासाठी फातिमानगर, श्रीरामपूर येथे येणार असल्याचे कळाल

खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला.काहीवेळेत या ठिकाणी एक पांढरे रंगाचा पिकअप वाहन आली. पोलिसांनी ती थांबविली असता त्यांना  देखील गाडीत लुकमान इसाक शहा (वय २२, रा. संजयनगर, ता. श्रीरामपूर), वसीम गफार शेख (वय २२, रा. संजयनगर, ता. श्रीरामपूर), सादिक असिफ पठाण (वय २९, रा. काझीवाबा रोड, वॉर्ड नं. २, ता. श्रीरामपूर) हे तिथे निदर्शनास आढळून आले व त्यांचे स्पष्टीकरण केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या गाडीची झडती घेतली असतात्यामध्ये बॅटऱ्या आढळून आल्या.याबाबत त्यांच्याकडे चौकशीकेली असता त्यांना प्रथम उडवा- उडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांनी  संमर्री पावर करताच सरळ सुरळीत पणे गुन्ह्या ची कबुली दिली. पुढील तपास काम गुणे अन्वेक्षण पोलीस अधिकारी (LCB)करीत असल्याचे समजते.


 

 












No comments:

Post a Comment