राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, May 12, 2023

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावरअजित पवार यांनीही भाष्य केले आहे ?

(मुंबई) - प्रतिनिधि - वार्ता -
महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही भाष्य केले आहे. लातूर दौऱ्यावर असताना सुप्रीम कोर्टाच्या निकालावर मी माझे मत मांडले होते. आज पुण्यामध्ये अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.दरम्यान अजित पवार म्हणाले, 'जर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार परत आणलं असतं असे मतसुप्रीम कोर्टाने व्यक्त केले होते.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याविषयी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की यातून जो धडा मिळाला पाहिजे तो मिळाला.असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.गेल्या वर्षी जूनमध्ये ज्या घटना घडल्या आणि त्याबाबात बऱ्याच जणांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. दोन दिवसांपूर्वी निकाल येण्याच्या आधीच मी सांगितले होते की, या निकालात विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यायचा अधिकार देण्यात येतील आणि तशाच पद्धतीने घडलं. सगळ्याच राजकीय पक्षांना संविधानाने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा आदर करून जनतेचा अपमान होता कामा नये, स्थिरता लाभली पाहिजे असं पाऊल उचलले पाहिजे. कुठलाही निकाल लागलाअसता
तरी सरकारवर परिणाम होणार नव्हता. त्यांच्याकडे बहुमत होते, १६ आमदार अपात्र झाले असते तरी सरकार टिकले असते असं अजित पवारांनी सांगितले. नैतिकतेला धरून शिंदे-फडणवीस सरकारने राजीनामा दिला पाहिजे अशी उद्धव ठाकरेंची मागणी आहे. परंतु मागणी असून काहीही उपयोग नाही, अटलबिहारी वाजपेयींची उंची आणि आत्ताच्या लोकांची उंची यात जमीन आस्मानचा फरक आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस राजीनामा देतील हे स्वप्नातही पाहू नये असं सांगत अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला.
पुढे अजित पवार असे ही म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम वर कितीवेळा चर्चा उखरून काढायची. जे झालं त्याबद्दल आमच्‍ मत मांडून काय फायदा आहे का?' तसंच, 'यातून सगळ्यांना जो धडा मिळाला पाहिजे तो मिळाला. इथून पुढे असा प्रसंग कोणाव येऊ नये. जर असा प्रसंग आला तर त्यांनी विश्वासदर्शक ठरावाला समोर गेलं पाहिजे.', असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
------------------------------------------------------------------------==========================================================================
सा : राज प्रसारित...कार्यकारी... संपादक...भावंत सिंग प्रितम सिंग बतरा...शब्द✍️✅️🇮🇳...रचना...संकलन...वार्ता...
==========================================================================------------------------------------------------------------------------






No comments:

Post a Comment